|
Aschig
| |
| Friday, March 10, 2006 - 10:58 pm: |
|
|
महेश, मी शास्त्रीनगर्मध्ये रहायचो
|
तू कोणत्या शाळेत होतास? मी बाल विद्या मंदीर मध्ये होतो.
|
Wakdya
| |
| Tuesday, March 14, 2006 - 10:55 am: |
|
|
Aschig तुमच्या गणवेषातील पॅण्टचा रंग तांबडा लाल होता ना? बाल विद्द्या मंदिर, त्यांचा मरुन लाल होता महेश, तुम्हाला औंढेकर सर गणित भुमितीला होते का? आंबेकर सर इंग्रजीला? तिथले बांबुच्या तट्ट्यांचे वर्ग आता नसतील ना? अजुनही डोळ्यासमोर शाळेचे चित्र उभे रहाते पण शिक्षकांची फारशी नावे स्मरणात नाहीत, असो
|
जयंता, होय आम्हाला औंढेकर सर भूमितीला आणि विंग्रजीला आंभेखर स होथे (हे त्यांच्या टोन मध्ये बरंका!! विंग्रजी श्टाईल) तू कुठल्या शाळेत होतास? तू काय त्यांच्या कडे टिविशनला (परभणी चा पेट्ट शब्द!) व्हतास काय? आनी हा. आमच्या ड्रेस च्या चड्डीचा रंग लालच व्हता. दाहाव्वी ची पोरं प्यांटी घालून यायचे शाळेत. आन मंग शाळेमदीच आडोशाला जाऊन प्यांटी काढून चड्ड्या घालायचे! बांबूच्या तट्ट्याचे वर्ग?? माज्या वेळी तर पाट्यांचे वर्ग होते. ते आता नाहीत. लय बदललीये शाळा आता गड्या. आयला माझ्या बॅचचं (१९८४) इथं कोणीच दिसत नाही. (माझ्या बॅचचं इथं कुनीच कसं दिसनं?). असो. आशेच लीहीत राहा म्हंजे झालं.
|
इथं तर कुनीच दिसनं. इथले सगळे मेलेत काय की?
|
Hi mahesh my name is Pintu
|
Mahesh tujhi Company punyat kuthe ahe..??
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, July 19, 2006 - 1:13 pm: |
|
|
पिंटू, माझी कंपनी पुन्यात सेनापती बापट रोड वर आहे.. तुझी कुठे आहे? तू परभनीत कुठं रहातोस?
|
काय म्हणता दोस्त हो, बरेच दिवस झाले भेट नाही. परभणीच्या आठ्वणी पाठ सोडत नाहीत. पण आता आपला गाव खूपच बदलला आहे. माळी गल्ली, नानल पेठेतली बसकी घरे जाउन त्या जागी आता टूमदार बंगले उभे राहत आहेत.
|
Sandy2005
| |
| Tuesday, August 08, 2006 - 6:32 pm: |
|
|
बदलत्या परभणीचे रागरंग टिपण्यासाठी एकदा येउन जा राव. आपल्या काळी दोन वेण्या, पन्जाबी ड्रेस घालून कॉलेजात येणा-या पोरी आता चक्क जिन्स, टी-शर्ट घालून येउ लागल्या आहेत. अर्थात हा बदल प्रगतीचा निदर्शकच मानला पाहिजे. पण आपण मनात जपलेलं परभणी गाव मात्र अलीकडे ओळ्खायला न येण्याएवढं बदलू लागलं आहे, हे मात्र नक्की.
|
संदीप, पोरी बदलत आसतील रे... पन पोर्हायचं काय? ते बदलले का? नाय तर त्यावेळच्या सारखं शिवाजी चौकात उभं राहून पोरींची टिंगल करन्याचा त्यांचा धंदा अजून चालूच हाय का? परभनी बदललं तरी पोरं बदलतेल काय?
|
स्यान्डी तु परभणीत आहेस का? कळव म्हण भेटता येइल. मी आनन्द. परभणीत असतो. परभणीच्या ओरिजनल पैकी एक.
|
मी सन्दीप जोशी कोनि पथ्रि चे आहे का
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|