|
Shravan
| |
| Tuesday, March 25, 2008 - 12:08 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आरे मी खोडदला असल्याने मायबोली वर कमी दिसणार.. आताही घाइत आहे. भेटुयात...
|
Varshac
| |
| Tuesday, March 25, 2008 - 3:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अग, प्रतिभा गंमतीने म्हणत होते ग. सध्या तरी काही प्लन नाही भारतात येण्याचा तोपर्यंत माझी भारतात येउन काय काय खायचे आहे याची लिस्ट वाढ्तच जाणार आहे. पण भारतात आले कि नक्कि भेटुया आपण.
|
Zpratibha
| |
| Wednesday, March 26, 2008 - 8:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्रावण, खोडदवरुनहि हजेरी का? छान. बाकि सगळेपण बाळाला भेटायला गेलेत का?
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हाय लोक्स कसे आहात सगळे?? आताच श्रावणच्या पुण्यातल्या घरी फ़ोन केला होता. स्वारी अजुन गावीच आहे. आता तिकडे फ़ोन करुन सगळ्या जुन्नरकरांच्या वतीने त्याच फ़ोन वर अभिनंदन करेन प्रतिभा दांगटांची मिसळ आहे कुठे??
|
Zpratibha
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकास, दांगटांची मिसळ उंब्रजला त्यांच्या हॉटेलमधे. तिकडे खाल्ली याची शिक्षा म्हणुन मला आज ऑफिसमधे स्टाफला द्यावी लागणार आहे, उडप्याकडची. तशी चव शक्य तरी आहे का? भागवतात बिचारे दुधाची तहान ताकावर.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 27, 2008 - 1:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद प्रतिभा तर मित्रहो (ह्यात लेडीज बाया आणि बापय पुरुष समद्येच आलेत बरं ) श्रावण शेठ सध्या खोडद मुक्कामी आहे. मी त्याला भेटायला जाण्याचा प्लॅन करत आहे. जवळपास राहणारे अजुन कोणी इच्छुक आहे का भेट घेण्यास??? या लोकहो श्रावण अति आनंदात आहे तेवढीच पार्टी मिळेल शिवाय खोडदची दुर्बीण आणि नारायणगड हे देखील प्लॅन शक्य आहेत. अर्थात आधी आमच्या पुतणीला बघुन घेणार आम्ही. एकदा तिकडे भेट झाली की मग पुढच्या भटकंतीचे प्लॅन्स ठरवता येतील (जसे की पुरंदर) कोणी इच्छुक असेल त्याने मला एक मेल धाढा. zakasrao@gmail.com वर. मुंढे साहेब हे देशात ७ एप्रिल नंतर येणार आहेत ही माहिती मी श्रावण पर्यंत पोचती केली आहे. शक्यतो भटकंतीचा प्रॉग्राम ७ एप्रिल नंतर करता येइल श्रावण ला भेटलो की दांगटांकडे घेवुन जायचा विचार आहे. किती लांब आहे आणि किती वेळ लागेल??
|
Tonaga
| |
| Thursday, March 27, 2008 - 2:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे उम्ब्रज सातारा जिल्ह्यात आहे ना? तिथे मिळते ही सुन्दर मिसल?
|
Varshac
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकासराव, ऊंब्रजमधील धरणाच्याईथे जे जुणे देवीचे देऊळ आहे तेथुन पाहिल्यावर नारायण गावच्या काही खुणा सांगता येतात त्यावरुन तरी जवळ असेल असा अंदाज आहे. बाकि प्रतिभा सांगेलच बरोबर. टोन्गा, हे ऊंब्रज, हे पुणे जिल्ह्यात आहे.
|
वर्षा, टोणगा म्हणतोय तेहि बरोबर आहे. सातारा रोडवरुन कोल्हापुरला जाताना सातार्याचे उंब्रज गाव रस्त्यातच लागते. बरेच मोठे गाव आहे ते सुध्दा. गंमत म्हणजे तिकडेहि हांडे आडनावाची माणसे आहेत. पण तिकडच्या मिसळबद्दल मात्र काहि माहिती नाहि बर का. झकास उंब्रजला जाणार असशील तर सांग, आई बाबा गावीच आहेत तुमचा चांगला पाहुणचार होईल. नारायणगावापासुन उंब्रजला जायला कुकडि धरणावरुन दुचाकिने फक्त २० ते २५ मिनिटे लागतात.
|
Zakasrao
| |
| Friday, March 28, 2008 - 12:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद प्रतिभा आणि वर्षा बघु जर वेळ मिळणार असेल तरच जाइन उंब्रजला. झकास उंब्रजला जाणार असशील तर सांग, आई बाबा गावीच आहेत तुमचा चांगला पाहुणचार होईल.>>>> मी हे आधी चांगलाच अस वाचल आणि घाबरलो की टोनगा सातारा जिल्ह्यात देखील आहे ह्याच नावाच गाव. पण इथे जी चर्चा सुरु आहे ती जुन्नर जवळील उंब्रज ची. अशी एकसारखी नाव असणारी खुपशी गाव असतात. मला वाटत त्यात पहिला नं वडगाव ह्या नावाचा असेल. कारण इथे पुण्यातच मला वडगाव शेरी, वडगाव मावळ माहीत आहे. कोल्हापुरात एक पेठ्वडगाव आहे.
|
Shravan
| |
| Saturday, March 29, 2008 - 5:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नमस्कार मंडळी, आज, उद्या पुण्यनगरीतील कामे आटोपून घ्यावी म्हणतोय. म्हणून आपली भेट होतेय. झकोबा येतोय खोडदला मंगळवारी. प्रतिभा, त्या एका दिवसामध्ये कितीतरी इच्छीत स्थळे उरकावयाची आहेत. तुझं आपलं जा उंब्रजला. टोणगा, आपले जुन्नर विभागात स्वागत! झकास, वडगाव हे भयानक (हाच शब्द बरोबर आहे) कॉमन नाव आहे. केवळ जुन्नरमध्येच वडगाव आनंद, वडगाव कांदळी, वडगाव सहाणी अशी तिन्-एक वडगावं आहेत. गावचे दिवस किती सुखात चाललेत म्हणता... अहाहा, चैत्रातला तो कडुनिंबाच्या बहराचा घमघमाट आठवतोय का तुम्हा कुणाला? गावात मोठमोठे निंब असल्याने या दिवसामध्ये तो धुंद गंध कसा भरुन उरलेला असतो परिसरात. शाळेच्या मैदानात शिरीषाची झाडे आहेत. ती पण नेमकी याच दिवसात बहरतात.. सुगंधी फुले घेऊन. आमच्या बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशा सगळ्या सुगंधाने भरलेल्या आहेत. आताही रात्री जेवण झाल्यावर चौकातल्या चावडीच्या ओट्यावर निंबाच्या झाडाखाली असेच नुसते पडून राहून त्या सुगंधी चांदण्या बघत बसतो. ओट्यावर बालपणीचे मित्र सतिश, जालू, नामा जमलेले असतात आणी दे धमाल गप्पा चालू असतात. त्या गप्पांमध्ये कधीच पगारवाढीच्या आकडेमोडीचा, शेअर बाजाराचा, प्रमोशनचा विषय नसतो. हे हिशोबी जग तिथे अस्तित्वातच राहिलेले नसते. त्या गप्पांना सुध्दा नकळत तोच कडुनिंबाच्या बहाराचा सुगंध येतोच. असे गावाकडचे थोडेसे दिवस सुध्दा मग पुढील कितीतरी दिवसांसाठी इंधन बनून राहतात. अशा सुगंधी दिवसांमध्येच आमची छकुली पण आली आहे. तिच्यासाठी असेच सुगंधी नाव शोधतोय. जुन्नरकर मंडळी मदत करा बरे! वळू बघतोय बहुतेक उद्या!
|
झकास, पोस्टिंग जरा नीट वाचत जा की. सगळिकडे आपली घाई घाई. श्रावण, अरे लक्ष्मी आलिये घरी तेव्हा म्हटल वेळ मिळाला तर उंब्रजच्या महालक्ष्मीचे दर्शन घे. उगाच आपल सगळ्यांना वाटत कि मला माहेरचाच ओढा आहे म्हणुन. भावना कोणी लक्षातच घेत नाहि.
|
Zankaar
| |
| Monday, March 31, 2008 - 6:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्रावण तुझ्या छकुलीचे नाव काय असेल याबद्द्ल मी देखिल खुप उत्सुक आहे, कारण तुझ्या घरामधील नावे जरा हटकेच व दुर्मिळ असतात अगदी तुझ्या नावापासुन.त्यामुळे मद्त करणे जरा कठिनच दिसतेय.तरीही माझ्यातर्फ़े हे नाव व्रुषालि( माझे आवड्ते नाव खास माझ्या मुलीसाठी राखुन ठेवले होते, मात्र मला मुलगा झाला, महाभारतात कर्णाच्या पत्निचे नाव). असो जालुला, डोंगरेमामांना माझा नमस्कार पाड्व्याची मिटिंग काय म्हणतेय. प्रतिभा तुझ्या भावना समजल्या बरं का.. पण काही म्हणा. माहेरच्या बाबतीत बायका जरा जास्तच .......................................(तुला समजले असलेच )
|
Varshac
| |
| Monday, March 31, 2008 - 3:28 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्याही नवर्याला व्रुषालि हे नाव फ़ार आवडत. मला आवडलेली मुलींची नावे गायत्री, रेवा, सायली.
|
श्रावण, वृषाली माझ्या नणंदेचे नाव आहे. आता ओळख माझी प्रतिक्रिया काय असेल ती.
|
Zakasrao
| |
| Wednesday, April 02, 2008 - 9:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
राम राम कसे आहात सगळे. श्रावण भेट झाली. प्रतिभा ताई यांच धरण पाहिल काल मुलगी क्युट आहे. श्रावण अह एक "जग्नमित्र" वल्ली आहे. लिहिनच. डिटेल माहिती आमच्या भटकंतीची लवकरच विथ फ़ोटॉ वाट पहा
|
Zankaar
| |
| Wednesday, April 02, 2008 - 2:49 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नमस्कार जुन्नरकर, मला कोणी नविन मायबोलीबद्द्ल सांगेल काय सध्या फारसे कोणी मायबोलीवर येत नाहीत. सगळे फार बिझी दिसतात. अरे श्रावण, मी सुचवलेले नाव आवड्ले कि नाही?
|
Zpratibha
| |
| Thursday, April 03, 2008 - 7:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मी तरी कोणतच धरण बांधल नाहीये रे झकास. काय मग जुन्नरचा परीसर आवडला कि नाहि? माहिती भटकंती वर टाकणार आहेस का? झंकार, मलातरी नविन मायबोलीपेक्षा जुनीच बरी वाटते रे.
|
हे सदर आता खालील जागी हलवले आहे /node/2104
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
![](/images/dc.gif) |
मायबोली |
![](/images/dc.gif) |
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|