|
ईथे वाल्चन्दनगर चे कुणी आहे का?
|
हाय मी वालचंदनगरचा नाही पन माझी आत्या राहायची तेव्हा नेहमी सुटित यायचो मी पोष्ट कॉलनी.... हो.... बरोबर धमाल यायची सकळी लवकर उठायचे... ६ वाजता.. लवकर सर्व आटोपुन.. रामाला जाउन यायचे.. गावापासुन थोडे लांब पन छान आहे मन्दिर त्यानन्तर फिरुन दुपारी जेवन झाले की मास्टर ऐटीना वर असेल तो पिक्चर पाहायचा.. दुपारी सर्वांची सामुहीक उन्हाळ्याची कामे चालायची सन्ध्याकाळी मग बागेत खेळायला जायचे...... तिथे जवळच होती पोस्ट कॉलनीत... गेट च्या जवळ...... परत फिरुन आले की.. आंगत पंगत व्ह्यायची.. नंतर गान्याच्या भेंड्या आंगनातच झोपायचे खरच मस्त दिवस जायचे तिथे कधीतरी मेन कॉलनीत.. फिरायला जायचे तिथे एक टॉकीज होती.... मला तिथे पिक्चर पाहाल्याचे आठवते आहे... आता आत्या ही नाही तिथे.. पन आठवणी सर्व तशाच आहेत..... अजुनही मला नक्किच आवडेल परत जायला...... अजही सर्व तसेच आहे का???
|
हॅलो मला वालचंदनगर सोडून १० वर्षे झाली. आता ते पूर्वीसारखे राहिले नाही. पण तेव्हाची मजा काही वेगळीच होती.
|
मी ही खुप दिवसात गेलो नाही साधारन १० वर्षच पन खरच खुप मजा यायची तुम्ही कुठे राहत होता माझी आत्या ( आफळे ) पोस्ट कॉलनीत रहायची.... रुम न. डी ८ ७ हो बरोबर कदाचीत माहेत आसेन.... तुम्हाला
|
आफळे माहीत आहेत.माझे बाबा त्यांना ओळखतात. आम्ही मेनकाॅलनी मधे रहायचो.
|
Sonalisl
| |
| Wednesday, November 07, 2007 - 11:26 pm: |
|
|
माझे आजोबा असताना आम्ही (माझ्या लहानपणी) मेन कॉलनी मध्ये राहत होतो. आता तर ते पुर्वीसारखं तर अजिबात रहिलं नाही. मलापण ते पुर्वीचे वालचंदनगर खुप आठवतं अन आवडतंही. तो क्लब संध्याकाली खेळन्यासाठी भरलेला असायचा, ती बाग पण सुंदर होती, गुरुवारी तर बाजारात खूप गर्दी असायची, तेव्हा तो एकच मोठा दवाखाना होता, मारुती अन देवाचं (बरेच देव होते तिथे) मंदिर पण छान होतं, शेटजींचा बंगला अजुन आठवतो. छानच होतं ते.... स्वप्नातल्या गावासारखं.
|
|
हितगुज दिवाळी अंक २००७
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज दिवाळी अंक २००६ |
|
|