|
आपण अंताक्षरी खेळतो एक विरंगुळा म्हणून, पण इतर कोणत्याही खेळाप्रमाणे थोडं नियमांचं बंधन इथेही हवं. १. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल. २. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये. ३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे. ४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा). ५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत. ६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही ७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे. ८. हिंदी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ह' असेल तर ते गाणे लिहीणार्याने पर्याय देणे अपेक्षित आहे. पर्याय दिल असेल तरी तो घेणे बंधनकारक नाही. पर्याय दिला नसेल तर ह\' पासून किंवा उपांत्य अक्षरापासून गाणे लिहावे. ९. हिंदी अंताक्षरीमध्ये जाये' किंवा जा_ए' आणि तत्सम शब्दांच्या बाबतीत जसे आधीचे गाणे संपले असेल त्याप्रमाणे अंत्य अक्षर धरले जावे. १०. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका
१०.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे. १०.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.
|
|