Tonaga
| |
| Tuesday, April 01, 2008 - 5:07 pm: |
| 
|
'मंच' शब्द कसा वाटतो? अथवा 'समविचार मंच' अथवा तत्सम काहीतरी? 'सुहृद'?
|
Shraddhak
| |
| Wednesday, April 02, 2008 - 2:19 pm: |
| 
|
ऍडमिन, ' गाणे ओळखा ' आणि ' चित्रपट ओळखा ' हे विरंगुळा छापाचेच बीबी आहेत. ते सध्या My experience मध्ये आहेत आणि साठवले जातात. ( बरेच archives झाले आहेत त्यांचे!) त्यांनाही थोडे वाहते करावे, असे माझे मत. धन्यवाद.
|
ऐडमीन मी आजच ह्या बाफ वरची चर्चा वाचली. मला तुमची लेखनावरची भुमीका आवडली. ११ वर्षांनंतरही तुम्ही या बाबतीत ईतके संतुलीत आहात हे पाहुन खरच मायबोलीशी निगडीत असल्याचा अभिमान वाटला. ब्राव्हो.
|
Sashal
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:20 pm: |
| 
|
पण admin, नविनच हलवलेल्या सगळ्या BB's वर इमेज अपलोड साठी HTML code लिहीण्याव्यतिरिक्त इतर काही ठिकाणी सोय आहे इमेज द्यायची तशी सोय का नाही? आधीच्या काही ठिकाणी म्हणजे रंगीबेरंगी लेखन वगैरे ठिकाणी इमेज, लिंक द्यायची सोय आहे ..
|
Yog
| |
| Thursday, April 03, 2008 - 11:12 pm: |
| 
|
हो ना...आणि image direct दिसत नाही लेखामधे फ़क्त लिन्क दिसते, image तुमच्या personal space मधे store केलेली लागते असा माझा अनुभव आहे.. तो पूर्वीचा popupjpeg tag आता नाहीये का..?
|
सशल, योग आता फोटो डकवायची सोय प्रतिसादामध्ये देखिल केली आहे.
|
Giriraj
| |
| Monday, April 07, 2008 - 12:32 pm: |
| 
|
गृप हा शब्द आता बर्यापैकी मराठीत रुळला आहे असे वाटले.>>> तुम्ही दुसरे चांगले नाव सुचवलेत तर स्वागतच आहे>>> 'कंपू' नाव कसे वाटते? 'कट्टा' सुटसुटीत आणि बरे वाटते!
|
Sashal
| |
| Monday, April 07, 2008 - 6:50 pm: |
| 
|
नविन मायबोलीत परत बदल झालेले दिसत आहेत, जसं की Title field गरजेचं नाही .. पण Title field नाहिये तर एखाद्या पोस्ट किंवा टॉपिकची लिंक कशी द्यायची ते कळत नाहीये ..
|
Ladtushar
| |
| Tuesday, April 08, 2008 - 11:00 am: |
| 
|
चावडी, समूह, सामुहिक चर्चा, चर्चासत्र, मंच, गप्पा - टप्पा हे सारेच चांगले शब्द आहेत, त्यातल्यात्यात मला चर्चासत्र आणि मंच(Forum) बरे शोभतिल असेल सुचवायाचे आहे. सरळ मत चाचणी घ्यावी. ताजे लेखन ची ट्री व्हू ची लिंक खुप उपयुक्त होती, ती जर का नविन मायबोलीवर पूर्व व्रत केली तर जुन्या हितगुज वरील नविन लेखन लगेच शोधता येइल. तिचा ट्री व्हू चांगली मदत करतो ही खुप सोयिची सेवा होती. कृपया या गोष्टीवर विचार करावा ही विनंती. /hitguj/search/110_644.html
|
Ladtushar
| |
| Wednesday, April 09, 2008 - 5:05 am: |
| 
|
एडमिन, एडमिन अजुन एक नाव सुचले कदाचित हितगुज ला समांतर "गुजगोष्टी" बघा हे कसे वाटतय ते...
|
मॉड, नवीन मायबोलीकरांच्या सूची मधे केवळ "ameya" एवढंच नाव असलेला आय. डी. दिसत नाही पण मायबोलीवरती तो मला नव्याने घेता ही येत नाहिये. असं का?
|
Admin
| |
| Saturday, April 12, 2008 - 3:24 pm: |
| 
|
गोंधळ होऊ नये म्हणून, नवीन काय जुने काय सगळ्या मायबोलीकरांची यादी एकच आहे. फक्त नवीन मायबोलीवरच्या सूची मधे ज्यानी आपले स्थलांतर केले आहे त्यांचेच नाव दिसते. तुम्ही म्हणता ते नाव आधीच जुन्या मायबोलीवर आहे, ते स्थलांतर झाले नाही इतकेच.
|
Admin
| |
| Saturday, April 12, 2008 - 3:27 pm: |
| 
|
ट्रिव्हू किंवा तत्सम वाचन सुलभ सुविधा करण्याचे काम चालू आहे. गुलमोहर विभागासाठी अशी सुविधा आहे.
|
गुलमोहर वरील ट्री व्हू सापडला धन्यवाद
|
Sonchafa
| |
| Sunday, April 13, 2008 - 5:23 am: |
| 
|
नमस्कार मॉड, मी गुलमोहर वर सद्ध्या काही ललित लेखन करत आहे. लेखन अपूर्ण असल्याने ते दर वेळेस सबमिट करीत आहे. पण नंतर गुलमोहर वरून ललित वर गेल्यास तेथे माझ्या लेखनाचे शीर्षकही मला दिसत आहे. ते इतरांनाही दिसतं का? का केवळ माझे लेखन मला पटकन शोधता यावं म्हणून ते फ़क्त मलाच दिसायची ही सोय आहे?
|
सोनचाफ़ा ते अपूर्ण लेखन फक्त लेखकालाच दिसतं.
|
Sonchafa
| |
| Sunday, April 13, 2008 - 4:21 pm: |
| 
|
त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद मॉड १०, परवा लेखन सबमिट केल्यावर सुद्धा जेव्हा मला ते ललित मधे दिसलं तेव्हा ते अर्धवट लेखन इतरांनाही दिसेल म्हणून झालेलं अक्ख लेखन मे घाबरून पटकन डिलिट करून टाकलं... ते करण्या आधी सुचलं नाही तुम्हाला विचारायचं.. नशीब आज तरी विचारलं नाहीतर लेखन कधी पुरं झालं असतं की नाही शंकाच आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, April 14, 2008 - 10:22 am: |
| 
|
नेमस्तक, सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाबाबत एक बा फ़ उघडण्यात आला आहे. तिथे प्रतिक्रिया देताना तोल ढळणे शक्य आहे. हा अगदी संवेदनशील विषय आहे आणि तिथल्या प्रतिक्रियांमुळे काहि कायदेशीर अडचणी येऊ शकतील आणि मायबोलीलाच भविष्यात काहि धोका, उदभवू शकेल, असे मला वाटते. म्हणुन शक्य असल्यास, हा बा फ़ बंद करावा. मायबोलीच्या मुखपृष्ठावर, इथे दिलेली मते ह सभासदांची वैयक्तिक मते असून, मायबोली या संकेतस्थळाची ती मते आहेत असे नाही, असा एक मजकूर टाकणेही आवश्यक आहे.
|
नेमस्तक, "Hitguj - Religion - माझे आध्यात्मिक अनुभव" हा बा.फ. नवीन ठिकाणी हलविण्यात आलेला आहे. परंतु मला तो पाहता येत नाही. मी नवीन संकेतस्थळावर टिचकी मारल्यावर खालील संदेश दिसतो. "Access denied You are not authorized to access this page."
|
Admin
| |
| Tuesday, April 22, 2008 - 3:47 pm: |
| 
|
त्यासाठी त्या पानावर डावीकडे वर नवीन मायबोलीत प्रवेश करा आणि धार्मिक या गृपचे सदस्य व्हा. इथे नवीन मायबोलीवरच्या गृपची यादी आहे
|