Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
General Feedback

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 17, 200620 01-17-06  6:03 pm
Archive through January 18, 200714 04-26-06  11:43 am
Archive through February 12, 200716 02-12-07  6:19 pm
Archive through February 19, 200702-19-07  3:39 pm
Archive through March 16, 200720 03-16-07  1:06 pm
Archive through March 19, 200720 03-19-07  1:14 pm
Archive through March 28, 200720 03-28-07  4:46 am
Archive through April 24, 200720 04-24-07  2:52 pm
Archive through May 05, 200720 05-05-07  4:15 am
Archive through May 24, 200720 05-24-07  4:48 am
Archive through July 03, 200720 07-03-07  11:19 am
Archive through July 29, 200720 07-30-07  12:00 am
Archive through August 10, 200720 08-10-07  7:35 pm
Archive through August 30, 200720 08-30-07  8:37 pm
Archive through September 01, 200720 09-01-07  5:38 pm
Archive through September 08, 200720 09-08-07  4:56 am
Archive through September 19, 200720 09-19-07  5:59 pm
Archive through September 28, 200720 09-28-07  10:59 am
Archive through October 24, 200720 10-24-07  8:01 am
Archive through November 05, 200720 11-06-07  3:57 am
Archive through November 25, 200720 11-26-07  4:49 am
Archive through December 10, 200720 12-10-07  4:05 pm
Archive through December 12, 200720 12-12-07  6:06 pm
Archive through December 18, 200720 12-18-07  5:56 am
Archive through December 24, 200720 12-24-07  5:04 pm
Archive through January 05, 200820 01-05-08  9:45 am
Archive through January 18, 200820 01-18-08  6:06 am
Archive through February 20, 200820 02-20-08  5:08 pm
Archive through March 21, 200820 03-21-08  4:39 am
Archive through April 01, 200820 04-01-08  9:49 am
Archive through April 22, 200820 04-22-08  3:47 pm

Princess
Tuesday, April 29, 2008 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, नवी मायबोली सुरु होऊन आता बरेच दिवस झालेत पण अजुनही तिथे लक्षणीय म्हणावे असे लिखाण आलेले नाही. जुन्या मायबोलीवर जसे लिहितांना अन वाचतांना सुद्धा छान वाटायचे तसे नव्या मायबोलीत वाटत नाही.

झुळुकेवर तर नव्या मायबोलीत अतिशय अन्याय झालाय. त्यामुळे तिथे आता नेहमीचे लोक दिसत नाही शिवाय जर झुळुकेला भेट देणार्‍यांची संख्या तुम्ही जाणुन घेण्याचा प्रयत्न केलात तर कळुन येईल की झुळुकेवर वाचायला जाण्याचाही लोक आता कंटाळा करतात.

हल्ली कवितेच्या बीबीवर बरेच नवीन लोक लिहायला लागलेत ती आनंदाची गोष्ट आहे. पण जुन्यानी कविता लिहिणे पूर्ण बंद केलय की काय? जुने लोक आता चुकुनही तिथे फिरकत नाहीत. जुन्या मायबोलीवर एकापेक्षा एक सरस कविता सलग वाचता यायच्या. वैभव किंवा निनावीची कविता वर असेल तर आपली कविता टाकतांना शंभरदा विचार करुन (स्वत:च कडक समीक्षा करुन) मगच टाकली जायची. आता सगळ्यांना स्वतंत्र जागा दिल्यामुळे दर्जा घसरलाय :-(

कथा, ललित वर सुद्धा लिहितांना जी मजा यायची ती आता येत नाही. आमच्यासारखे नवीनच कथा लिहिणारे लोकांना कथेच्या मध्ये मध्ये येणार्‍या प्रतिसादांनी हुरुप यायचा. ज्यांना प्रतिसाद नको असेल ते लोक कथेच्या सुरुवातीला तसे सांगु शकत.

पूर्ण (मोठी)कथा एकदम लिहिली तर वाचक कदाचित कंटाळतील म्हणुन हल्ली नव्या मायबोलीवर पण लोक भाग एक दोन असे तुकड्याने प्रकाशित करतात. मग ते तुकडे तुकडे निरनिराळे उघडुन वाचावे लागतात. त्यापेक्षा जुनीच मायबोली बरी होते असे वाटते. निदान एकाच थ्रेड मध्ये सगळी कथा मिळायची.

मला वाटते निदान प्रायोगिक तत्वावर तरी तुम्ही जुनी मायबोली पुन्हा सुरु करावी. जुन्या लोकानी पुन्हा एकवार लिखाण सुरु करण्यासाठी मला तरी सध्या तोच एक उपाय दिसतोय. नाहीतर रोजच्यारोज उघडणारे व्यथांचे नवीन बीबी आणि साहित्याचा घसरणारा दर्जा यामुळे जुने लोक इथे कायमचे येणे बंद करतील असे वाटते. :-(

एकदा याचा जरूर विचार व्हावा. मायबोली एक दिलासा आहे, एक हिरवळ आहे आमच्यासाठी. ती होती तशीच राहु द्या... बस्स एवढच.


Admin
Wednesday, April 30, 2008 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या भावना समजू शकतो. इतर मायबोलीकरानीही आम्हाला हे कळवलं आहे.
परत एकदा सांगतोय. बदल करण्याचा मूळ उद्देश दुसर्‍या कुठल्या वेबसाईटसारखे मायबोलीला करणे हा नव्हता.
गेल्या ११ वर्षात जुने झालेले software कसेबसे चालत होते. ते तुम्हाला व्यवस्थित चाललेले दिसले तरी त्यामागचे आमचे कष्ट फक्त आम्हालाच माहीती. कुठलाही बदल किंवा प्रश्न सोडवायचा तर अवघड झाले होते. जे संगणक क्षेत्रात काम करतात आणि ५ वर्षापेक्षा जुने झालेले software ज्याना सपोर्ट करावे लागते त्याना याची कल्पना येऊ शकेल.

जुनी मायबोली चालू केली, एखाद्या दिवशी ती अचानक बंद पडली आणि परत चालू होण्याच्या पलीकडे गेली तर तुम्हाला चालेल का?

तुम्ही सगळ्यानी जे सहकार्य केले आहे त्याबद्दल मायबोली तुमची ऋणी आहे. पूर्वीच्या सुविधा एका दिवसात आलेल्या नसून त्या ११ वर्षात आल्या होत्या. आम्ही आमच्या परीने हळुहळु जुन्या सुविधा जशा जमेल तशा परत आणायचा प्रयत्न करतो आहोत. नवीनही देतो आहोत.

तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रीया आम्हाला खूप महत्वाच्या आहेत. त्या वाचून काय अगोदर बदलायचे काय नंतर हे ठरवणे सोपे जाते.

कृपया समजून घ्या


Princess
Wednesday, April 30, 2008 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही उत्तर दिलेत त्यासाठी खुप खुप धन्यवाद.
नवी मायबोली दिसायला जुन्यासारखीच नाही का ठेवता येणार?
निदान झुळुकेसाठी तरी काही उपाय करा. एकतर झुळुक लोकांना पटकन सापडत नाहीत मग लोक कुठेही लिहुन टाकतात.
नवी मायबोली बर्‍यापैकी complex आहे. थोडी अजुन सोपी करता आली तर बघा.
तुमच्या कष्टांची जाणीव आहे. मायबोली चालवणे हे "येर्‍यागबाळ्याचे काम नोहे" हे पण जाणुन आहे.त्यासाठी तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. Hats off to you .
जर तुम्ही जुन्या लोकांचे मत विचारात घेतले तर नक्कीच काही उपाय हाती येतील असे वाटते. अचानक लिहिते लोक रोमात कसे गेलेत ते त्यांच्याकडुनच तुम्हाला कळु शकते.
पुन्हा एकदा धन्यवाद.


Himscool
Wednesday, April 30, 2008 - 10:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन..
नविन मायबोलीवर नुकतीच सुरू केलेली पोस्ट लिहिण्याची पध्दत एकदम आवडलेली आहे.. आधीच्या पोस्ट्स वाचून झाल्या की लगेच त्याच पानावरून प्रतिसाद देण्याची ही सुविधा मायबोलीच्या वापराच्या दृष्टीने खूपच सोयीची झाल्यासारखी वाटते आहे...
अशाच नवनवीन आणि चांगल्या सुविधा वारंवार मिळत राहोत हीच सदिच्छा!!!


Admin
Thursday, May 01, 2008 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Himscool आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
princess हळुहळु जमेल तसे बदल करतो आहोत. सूचनांबद्दल धन्यवाद.


Tabla_dagga
Thursday, May 01, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला मायबोलीवर एक जाहिरात द्यायची आहे.मी काय करु?

Admin
Friday, May 02, 2008 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

support at maayboli dot com ला अधिक माहिती कळवा.

तुम्ही कुठे असता
कशाची जाहिरात
किती दिवस?


Dhumketu
Friday, July 11, 2008 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन मायबोलीत माहितीची देवघेव वा त्या सारखा BB आहे का? मला एक प्रश्न विचारायचा आहे.

Admin
Friday, July 11, 2008 - 11:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुद्दामच तसा विभाग नवीन मायबोलीत नाही. कारण तसे पाहिले तर सगळीकडेच देवघेव चालू असते. आणि त्या त्या विभागात ती होण्याऐवजी सगळी सरमिसळ मग एकाच ठिकाणी होते जी आयत्या वेळेस सापडत नाही.

तुम्ही कुठल्या विषयाच्या संदर्भात आहे ते कळवले तर योग्य जागा सूचवू किंवा नसेल तर सुरू करून देऊ.


Lahari
Wednesday, August 19, 2009 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dear admin of hitguj,
i have created a post on hitguj under the name of lahari, and wanted to put some posts...but could not do so...last year or so i had started a community named S.S.P.M.S to get my friends on hitguj but i myself is unable to visit hitguj often, so i kindly request u to delete my accout from hitguj as well as my posts in it....kindly help as i m unable to delete that post as it is more than 720 mons old...so plzz help



Add Your Message Here
Posting is currently disabled in this topic. Contact your discussion moderator for more information.

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators