|
नमस्कार मास्तुरे, general feedback मध्ये प्रतिक्रिया नोंदवतानादेखील तुमचा psg या आयडीबद्दल काय वैयक्तिक आकस आहे नकळे! आधीही जेव्हा तिच्या कथांवर तुम्ही बोचरी टीका केली होतीत तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला गेला होता. एकीकडे कसलाही आकस नाही म्हणताना; तेव्हा सकारात्मक टीकेची मागणी केल्यानंतर आपण तिथे पुन्हा तोंड दाखवलेले नाही. तुम्हाला साहित्याविषयी कळकळ असतीच तर इतरांनी गुलमोहरातल्या सध्याच्या सुमार साहित्यावर प्रतिक्रिया देण्याआधी तुमची प्रतिक्रिया तिथे दिसली असती. पण ते न करता फ़क्त psg च्या कथांवर बोचरी टीका करून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करण्याचा तुमचा प्रयत्न दिसतो. बरं आणि तुमचा वैयक्तिक आकस असला तिच्यावर तरी तो इथे अस्थानी व्यक्त करण्याचे कारण? ऍडमिन, या ' सद्गृहस्थांनाही ' तेवढे सांगता येईल का? आणि हे मास्तुरेंसाठी; 'एका' ठिकाणि जमून कसे एकगठ्ठा चांगले प्रतिसाद द्यायचे, कुणावर तुटून पडायचे हे ठरवणार्यांनी इकडे पण तसेच केले.<<<<< एवढं छातीठोकपणे कसं सांगता हो, मास्तुरे? आणि एवढं दुसर्याला बोलायची हौस असेल तर बुरखा पांघरून का वावरता?
|
होळी उद्या हे (होळी रे होळी, पुरणाची पोळी) धुळवड परवा हे उद्या परवा करता काही तरी राखून ठेवा बर्र का!! (आम्ही आहोतच बाजुला.... कपडे साम्भाळीत... अर्थात आमचेच.....)  DDD अपार्ट फ्रॉम दि अस्थानी जोक.... ऍडमिन, नेहेमीप्रमाणेच अत्यन्त सन्तुलित भुमिका हे आपली! जवाब नही!
|
Upas
| |
| Friday, March 21, 2008 - 2:49 pm: |
| 
|
कोणतीही संस्था दीर्घकाळ टीकण्यासाठी तिची उद्दिष्टे सुस्पष्ट असावी लागतात आणि ती डोळ्यासमोर ठेवून आपली कृती, धोरणे त्या उद्दिष्टांशी सुसंगत आहेत ना हे वेळोवेळी तपासावे लागतेच.. ऍड्मीन, तुमचं पोस्ट वाचून आणि मायबोलीच्या ध्येयांची तसेच धोरणांची सुसंगत सुस्पष्टता पाहून खरच खूप बरं वाटलं.. तुमचं हे पोस्ट जास्तीत जास्त मायबोलीकरांपर्यंत पोहोचेल असे काही करता येईल का, म्हणजे त्यातूनच मायबोलीवर सौहार्दाचे वातावरण वाढवायला मदत होउ शकेल असे वाटते!
|
Yog
| |
| Friday, March 21, 2008 - 8:56 pm: |
| 
|
Admin, तुमचे वरील स्पष्टिकरण वाचले.. पण policy म्हणून वाचायला योग्य वाटले तरी मला वाटते एक फ़ार महत्वाचा अन मूळ मुद्दा दुर्लक्षिला गेला आहे : माझ्या इथल्या अनुभवानुसार बरेचसे वाचक, लेखक हे सकस साहित्त्य सहज उपलब्ध होते म्हणून इथे येतात. इतरही मराठी sites आहेत, पण मायबोलीवरील लिखाण दर्जा हा इतर सर्वान्पेक्षा निश्चीतच वेगळा, वरचढ होता हे सुजाण वाचकाच्या लक्षात आले म्हणून वाचक वर्ग इथे सतत येवू लागला, अन लिहूही लागला... "केवळ" मराठी लोकानी एकत्र येणे हा तुमच्या पोस्ट मधला उद्देश यापुढे अगदीच थिटा वाटतो. तसे आहे तर मग फ़क्त GTP, GTG, VnC इतपतच BB उघडूनही चार मराठी टाळकी एकत्र आणाता येतीलच ना.? वैयक्तीक इतकेच म्हणू शकतो की आजच्या भरधाव युगात दिवसातील थोडा शिल्लक वेळही खास मायबोलीकरता राखून ठेवणारा वाचक आणि लेखक वर्ग इथल्या एकन्दर above average दर्जामूळे इथे येतो, फ़क्त एकत्र येवून गप्पा करण्यासाठी नव्हे, त्यासाठी GTG सारखे पर्यायही उपलब्ध आहेत्च. i am bit surprised to read that "दर्जाकडे दुर्लक्ष चालेल.." आजचे मायबोलीचे स्वरूप (त्यावर लिहीले जाणारे साहित्त्य) अन तुमच्या अकरा वर्षाच्या इथल्या अनुभवातून पाहिलेले आधीचे साहित्य यात काहीच फ़रक नाही असे कसे म्हणता येईल..? >त्यामुळे लेखनाचा दर्जा सुधारायचा असेल तर एक वाचक म्हणून तुम्हा सगळ्याकडे प्रतिक्रिया नावाचे एक उत्तम साधन आहे. ती देऊन (किंवा न देऊन) तो नक्किच सुधारला जातो हा आपला अनुभव आहे. एकदा दर्जा एका उच्चतम पातळीवर पोचल्यावर (जो वाचकानीच याहीपूर्वी ठरवला होता) तो पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याचे हे धोरण खचितच पटले नाही. मला वाटत इथल्या सक्षम अन सुजाण वाचकाची किमान अपेक्षा इतकीच आहे की: मायबोलीचे रुपान्तर निव्वळ साहित्यीक शिन्तोड्यान्च्या bb चे सन्कलन अशात न होता मूल्यवान साहित्त्यीक साठवण असेच रहावे.. त्या अनुशन्गाने moderation आवश्यक आहे इतकच. असो. तुमच्याच भाषेत माझ्या या पोस्टकडे "प्रतिक्रीया" नावाचे वापरलेले साधन म्हणून पाहिलेत तरी चालेल, (उखाणे मायबोलीष्टाईल प्रमाणे) तरिही न मागितलेल्या सूचनेबद्दल क्षमस्व!
|
Manjud
| |
| Monday, March 24, 2008 - 8:11 am: |
| 
|
मॉडरेटर्_१०, धन्यवाद. ऍडमीन, मायबोली प्रशासनाची ध्येय आणि धोरणे आपल्या पोस्टवरून तपशीलवार कळली. पण 'दर्जाकडे दुर्लक्ष चालेल' हे तितकेसे पटले नाही.
|
ऍडमिन, मायबोली अकरा वर्षांपूर्वी बाल्यावस्थेत होती तेव्हा ही धोरणे सुसंगत होती. कालानुरूप धोरणांमध्येही बदल व्हायला हवेत ना? मराठी लोकांनी मायबोलीच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणे, हे गेल्या अकरा वर्षांत साध्य झालेले आहेच. मग पुढची पायरी, जसे की जास्तीत जास्त देवनागरी लेखन ( आजही बहुतांश नवीन सदस्य रिवाज असल्यासारखे रोमनमधून सुरुवात करतात.), शुद्धलेखन ( ज्याचा आग्रह अजूनही मायबोलीवर धरला जात नाही, हे केवळ दुर्दैव!), लिखाणाचा किमान दर्जा... ही गाठणे महत्त्वाचे का वाटू नये? आज वाचक वेळ घालवायचा म्हणून ( च फ़क्त!) मायबोलीवर येत नाहीत. त्यामुळे ' दर्जाशी तडजोड चालेल. ' हा मुद्दा मलाही पटला नाही. योगच्या मुद्द्यांना माझे अनुमोदन.
|
Pha
| |
| Monday, March 24, 2008 - 12:21 pm: |
| 
|
ऍडमिन, तुमची उद्दिष्टे वाचली. तरीही श्रद्धा, योग, मंजू यांचा मुद्दा मलाही महत्त्वाचा वाटतो. ' मराठी लोकांना एकत्र आणणे / लिहिते करणे ' हे उद्दिष्ट अनंतकाळ साध्यच राहील. कारण जन्मणार्या दर नव्या पिढीगणिक ज्यांना लिहितं करायची गरज आहे, एकत्र आणायची गरज आहे अशा मराठी लोकांचा समूह भूतलावर नांदतच राहणार. म्हणून भारत सरकाराप्रमाणे आपण ' सर्व शिक्षा अभियाना ' वरच खिळून राहायचं का? मूलभूत तत्त्व म्हणून ' लिहितं करण्याचा ' मुद्दा ग्राह्य मानला तरीही टेक्स्ट एडिटरमध्ये सध्या जसं देवनागरी टंकन डीफॉल्ट ठेवलंय तसं सुपूर्द करतेवेळी डीफॉल्टच शुद्धलेखन चिकित्सक वापरणं इत्यादी उपाय करायला काय हरकत आहे? ज्यांना चिकित्सक वापरायचा नाही ते(उदा. ज्यांना ग्रामीण बोलीतील कथा लिहायची असेल त्यांनी) तो पर्याय बंद केला तर काहीही गैरसोय होणार नाही. पण शुद्धलेखन चिकित्सकाने लिखाणातले दोष तर सुधारतील! हा मुद्दा झाला तांत्रिक दर्जाचा, जो स्क्रिप्ट, प्रोग्रॅमिंग वापरून मायबोलीवर लागू करणं सहज शक्य आहे. साहित्यिक दर्जाबद्दल मात्र व्यावहारिक मर्यादा लक्षात घेऊन तुम्ही म्हणता तसं प्रतिक्रियेचं हत्यार सर्वोत्तम आहे हे मान्य करावं लागेल. पण त्याबरोबरच, पूर्वी ' मॉडरेटर्स चॉइस ' जाहीर केले जायचे तसे / तत्सम उपक्रम चालू करण्याचा उपाय योजता येईल.
|
Admin
| |
| Tuesday, March 25, 2008 - 12:16 am: |
| 
|
मला वाटते "दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले तरी चालेल" याचा अर्थ तुम्ही थोडा वेगळा घेताय. लिहिताना बराच विचार करूनच मी ते वाक्य लिहिले आहे. मी स्पष्ट करायचा प्रयत्न करतोय. या गोष्टीला वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि दृष्टिकोनातून पहावे लागेल १. >>आजचे मायबोलीचे स्वरूप (त्यावर लिहीले जाणारे साहित्य) अन तुमच्या अकरा वर्षाच्या इथल्या अनुभवातून पाहिलेले आधीचे साहित्य यात काहीच फ़रक नाही असे कसे म्हणता येईल..? आज मायबोलीवर नव्यानेच लिहिणार्यांची धडपड आणि ११ वर्षांपूर्वी नव्यानेच लिहिणार्यांची धडपड यात मला फरक दिसत नाही. अर्थात तेंव्हाही काही जणाना ही धडपड करण्याची गरज पडली नाही (आधीचा अनुभव, सवय किंवा प्रतिभा असेल म्हणून) आणि आजही काही लोकाना ती धडपड करावी लागत नाही. पण सगळेच इतक्या सहजरित्या लिहितातच असे नाही. २. दर्जा हा २ प्रकारचा असू शकतो. सुरुवातीचा (प्रवेशपूर्व) आणि नंतरचा. उदा. २ प्रकारच्या शाळा असतात. एका शाळेत प्रवेशासाठी खूप अवघड प्रवेश परिक्षा द्यावी लागते. त्यामुळे सगळ्यात उत्तम असे विद्यार्थीच, पण खूप थोडे विद्यार्थी त्यात प्रवेश घेऊ शकतात. त्यामुळे त्या शाळेतून बाहेर पडणारे जवळ जवळ सगळेच विद्यार्थी पुढे लौकिकार्थाने मोठे होतात. दुसर्या शाळेत कुणालाही प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थीही खूप असतात. तरीही काही विद्यार्थी चमकतात आणि मोठे होतात. कधी कधी या दुसर्या शाळेतून खूप यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पहिल्या शाळेपेक्षा जास्त असते. पण सरासरी पाहिली तर मूळातच एकूण प्रवेश घेणारे विद्यार्थी जास्त असल्याने ती नेहमीच पहिल्या शाळेपेक्षा कमी असते. यात दुसर्या शाळेचे संचालक कायमच दर्जाकडे दुर्लक्ष करतात असे नसून फक्त प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांपूरता तो निकष ठेवत नाही. मायबोलीला कुठेतरी या सामान्य लोकांच्या दुसर्या शाळेसारखं व्हायचंय असं मला अभिप्रेत होतं. ३. दर्जा आणि तांत्रिकता यात खूपदा गल्लत होते. एखाद्या कथाबीजात खूप खोल आशय असतो आणि लेखकही प्रतिभावान असतो. पण त्याला पात्रांची मांडणी, सुरवात, शेवट, कथाप्रवाहातले चढउतार हे न जमल्याने ती कथा एकदम सुमार दर्जाची वाटते. तर कधी एखादा सराईत लेखक फालतू कथाबिजाला तांत्रिक अंगांनी सजवून एकदम दर्जेदार कथेचा आभास तयार करू शकतो. त्यामुळे चांगला दर्जा कुठला हे नेहमीच सांगता येतं असं नाही. तो वाचक सापेक्ष असू शकतो. म्हणूनच काही प्रकाशने विशिष्ट वाचकवर्गाला आवडतात आणि इतराना आवडत नाहीत. पण ती त्या त्या वाचकवर्गासाठी दर्जेदार असतात. मायबोलीवरच लिहिणारे अनेक लेखक लेखिका यांनी हे हळुहळु हे तंत्र आत्मसात केलं. त्याना सुरुवातीलाच प्रोत्साहन मिळाले नसते तर त्याना हे कष्ट घ्यावेसे वाटले असते का हे विचारात घेण्याची गरज आहे. ४. "दर्जाकडे दुर्लक्ष करायचं" याचं कारण "काय लिहिलं जातंय याच्याशी घेणं देणं नाही" असे नसून नक्की कशाला दर्जेदार म्हणायचं आणि "मायबोलीच्या सगळ्या वाचकांसाठी दर्जा ठरवणारे आपण कोण" हा नम्र भाव त्यामागे आहे. कारण या गोष्टीचे भान ठेवले नाही तर एका विशिष्ट गटाला अभिप्रेत असलेला मजकूर तितकाच प्रकाशित होईल. याच कारणासाठी दरवर्षी दिवाळी अंकाच्या काळात, गुलमोहर विभागात प्रकाशन सुरूच ठेवले जाते. कारण शेवटी दिवाळी अंक त्या त्या संपादक मंडळाच्या आवडीनिवडीचे प्रतिनिधित्व करतो. पण त्यापेक्षा इतर कुणाची आवड वेगळी असेल तर त्या व्यक्तिला गुलमोहरवर लिहायचे वाचायचे स्वातंत्र्य आहे. ५. नवीन माध्यमात नवीन पायंडे पाडणारा हा उपक्रम असल्यामुळे मायबोलीवर असलेल्या जबाबदारीचे एक भानही आपण ठेवले पाहिजे. जुन्या माध्यमात असलेले दर्जाचे सगळेच निकष इथे लावता येणार नाहीत. उदा. मायबोलीवर जेंव्हा पहिली कादंबरी प्रकाशित झाली तेंव्हा छापील माध्यमाचा पृष्ठ्संख्येचा निकष लावून तिला दीर्घकथा म्हणावे का वाचकाला एक ऑनलाईन कादंबरी वाचल्याचे सूख मिळत असेल तर तीला कादंबरी का म्हणू नये? असे प्रश्न उपस्थित होतात. किंवा पुढे जाऊन असेही म्हणता येईल की फक्त छापील माध्यमाची सामर्थ्ये वापरून दर्जेदार असलेली कलाकृती जर ऑनलाईन माध्यमाच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तिला कितपत दर्जेदार म्हणावे? एखादी "यशस्वी" कथा तशीच्या तशी दूरचित्रवाणीसारख्या माध्यमात दर्जेदार वाटेलच असे नाही. वरचाच मुद्दा थोडा पुढे नेऊन असे म्हणता येईल की आपल्या कल्पनेतही नसणारा दर्जा देणारा एखादा प्रतिभावंत असेल तर मायबोली प्रशासनाने त्याला/तीला तांत्रिक गोष्टि किंवा आमचे निकष लावून नाऊमेद करणे कितपत योग्य आहे? या सगळ्याचा अर्थ असा नाही की शुद्धलेखनाकडे किंवा अगदी साध्या गोष्टिंकडे मुद्दाम कायम दुर्लक्ष करा असे मायबोलीचे धोरण आहे. केवळ शुद्ध लिहिलेत तरच प्रकाशित होईल असा नियम नाही इतकेच. वाचकानी "शुध्द लिहिलेत तर वाचायला अधिक आवडेल", "देवनागरीत लिहिले नाही त्यामुळे वाचावेसे वाटत नाही" अशा प्रतिक्रिया दिल्या तर त्याचा जितका दूरगामी परिणाम होतोय तितका प्रकाशनाच्या अटी करून आणि धोरणे ठेवून होणार नाही.
|
नमस्कार ऍडमिन, " विरंगुळा " विभाग हलवला गेल्याचं दिसलं. पण त्या विभागाला समर्पक मराठी नाव देण्यात यावे, असे वाटते. ' ग्रुप्स ' कशासाठी? तसेच सुरु झालेल्या दुसर्या एका विभागाचे नाव 'My Unread' असे शुद्ध इंग्रजी का? ते सध्या चाचणी घेण्यासाठी म्हणून कार्यान्वित केले आहे का? तसे असेल, तर त्यातले बदल होईपर्यंत माझे हे पोस्ट काढून टाकावे.
|
Admin
| |
| Monday, March 31, 2008 - 6:44 am: |
| 
|
तुम्ही दुसरे चांगले नाव सुचवलेत तर स्वागतच आहे. नाव ठरवताना सोपे, वापरातले असावे (जडबंबाळ वाटू नये) हा एक मुख्य उद्देश होता. काही मायबोलीकरांना काही दिवस चाचणीसाठी निमंत्रित केले होते त्याना तरी काही वावगे वाटले नाही. गृप हा शब्द आता बर्यापैकी मराठीत रुळला आहे असे वाटले. "आमच्या सगळ्यांचा एक मस्त गृप जमला आहे हे वाक्य" नेहमी ऐकायला मिळते. म्हणजे म्हणून आपण तो शब्द वापरलाच पाहिजे असे नाही. नवीन शब्दाचे स्वागत आहे. 'My Unread' हे तात्पुरते आहे. भाषांतराचे काम चालू आहे.
|
Admin
| |
| Monday, March 31, 2008 - 6:48 am: |
| 
|
त्या विभागाला खरा जास्त चपखल शब्द हितगुज आहे. पण सध्या काही दिवस पुन्हा नवीन हितगुज आणि जुनं यात गोंधळ होऊ नये म्हणूनही ही सोय आहे.
|
Admin
| |
| Monday, March 31, 2008 - 6:51 am: |
| 
|
My unread हा वेगळा विभाग नसून तुम्ही ज्या ज्या गृपचे सभासद आहात त्या सगळ्या गृपमधे असलेले पण तुम्ही अजून न वाचलेले संदेश एकत्र दिसावेत म्हणून ती सोय केली आहे.
|
Manjud
| |
| Monday, March 31, 2008 - 7:23 am: |
| 
|
GTP आत्ता छान वाटतंय. 'ग्रुप्स' साठी 'कट्टा' किंवा 'पारावरच्या गप्पा' हे मराठी शब्द चालू शकेल का? हे मी फक्त सुचवतेय. सध्या तरी 'ग्रुप्स' खाली फक्त GTP हलवलंय पण तसंच my city पण जाणार का? तसेच my unread मध्ये फक्त 'ग्रुप्स' मधील न वाचलेले दिसणार की गुलमोहर व रंगीबेरंगीचा पण त्यात समावेश आहे?
|
Anilbhai
| |
| Monday, March 31, 2008 - 2:18 pm: |
| 
|
ऍडमिन, 'जुन्या हितगुज' च्या आधी 'हितगुज' असा टॅब करुन त्यात हे नविन हितगुज टप्प्या टप्प्याने हलवता येईल का?.
|
Prachee
| |
| Monday, March 31, 2008 - 2:21 pm: |
| 
|
मंजु 'कट्टा' साठी अनुमोदन. 'गप्पाटपा' चालेल का?
|
Admin
| |
| Tuesday, April 01, 2008 - 2:33 am: |
| 
|
फक्त my city च नाही तर हळुहळु सध्याच्या हितगुजवरचे सगळेच विभाग वेगवेगळ्या प्रकारे नवीन मायबोलीवर नेले जातील. सध्याच्या हितगुजचे software १२ वर्षे जुने झाले आहे आणि ते मायबोली छोटी असताना खूप छान होते पण आता ते त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त ताणले जाते आहे. सुरुवातीला My unread मधे फक्त गृप्स मधले संदेश दिसतील. पण सगळ्या मायबोलीवर लिहिलेले आणि तुम्ही न वाचलेले सगळे एका ठिकाणी सोपेपणाने वाचता यावे असे केले जाईल. फक्त हे टप्प्याटप्प्याने केले जाईल.
|
Admin
| |
| Tuesday, April 01, 2008 - 2:47 am: |
| 
|
नवीन नाव सुचवणार्या सगळ्याना धन्यवाद. सगळ्या सुचनांचे स्वागत आहे. एक सांगावसं वाटतं. ग़ृप्स फक्त गप्पांपुरते मर्यादित रहाणार नाही तर इतर अधिक महत्वाच्या कामांसाठी वापरता यावेत म्हणून त्यात अधिक सुविधाही केल्या जातील. एकदा मायबोलीकर गृप्स मधे रुळले कि कुणालाही त्यांचे गृप्स स्वत्: तयार करता येतील. यातले काही सार्वजनिक आणि काही फक्त निमंत्रितांसाठी असतील. उदा. १. सेवाभावी संस्था किंवा चांगला उपक्रम यात सहभागी असलेले मायबोलीकर. २. मायबोलीवरच्या काही उपक्रमांची तयारी आणि व्यवस्थापन करणारे मायबोलीकर (दिवाळी अंक संपादन समिती, वर्षाविहार समिती ३. खाजगी GTG किंवा एखादं संमेलन. त्यामुळे नाव सुचवताना फक्त गप्पा इतका उद्देश वाटू नये असे नाव अपेक्षित आहे.
|
Admin
| |
| Tuesday, April 01, 2008 - 2:49 am: |
| 
|
अनिलभाई थोडे जास्त गृप्स झाले की असे करता येईल. नाव तेच ठेवले तर सारखी नवी जुनी अशी तुलना होते आणि नवीन विभागात रुळायला अवघड जाते. पण नवीन नाव असले की त्यातल्या सुविधा वापरून बघायला जास्त मोकळेपणाने पाहिले जाते असा अनुभव आहे.
|
Pha
| |
| Tuesday, April 01, 2008 - 9:10 am: |
| 
|
ऍडमिन : 'ग्रुप' या नावाला अनौपचारिक संदर्भात 'कट्टा' आणि औपचारिक संदर्भात 'समूह' हे शब्द चपखल ठरू शकतील. बाकी, तुमच्या म्हणण्याप्रमाणे 'ग्रुप' हा बर्यापैकी प्रचलित शब्द वापरतानादेखील 'ग्रुप्स' या इंग्लिश व्याकरण पाळणार्या रूपापेक्षा 'ग्रुप' हे अनेकवचनाबाबत मराठी व्याकरणानुसार योग्य असलेले रूप वापरावे. 'ग्रुप' हा शब्द इंग्लिश भाषेतून उसना घेतल्यानंतर, अकारान्त पुल्लिंगी सामान्यनाम असल्याप्रमाणे वापरला जातो ('समूह' या तदर्थाच्या शब्दाप्रमाणे. अकारान्त पुल्लिंगी नामांची इतर उदाहरणे द्यायची तर: देव, दगड, उपग्रह, स्वर, रंग, अर्ज). त्यामुळे त्याचे अनेकवचनी रूप 'ग्रुप' असेच होईल(तो देव - ते देव, तो रंग - ते रंग, तो अर्ज - ते अर्ज). ' अर्ज ' या शब्दासारख्या फारसीतून उचललेल्या शब्दांना आपण आपल्या भाषेच्या व्याकरणात बसवून वापरतो; त्यामुळे ' ग्रुप ' या शब्दापासूनच नाव ठेवायचे असल्यास ते ' ग्रुप्स ' न ठेवता ' ग्रुप ' च ठेवावे अशी माझी विनंती. ता.क. : तरीही इतर काही चपखल मराठी शब्द पसंत पडले तर उत्तमच!
|
Manjud
| |
| Tuesday, April 01, 2008 - 9:49 am: |
| 
|
हा शब्द 'गृप' असा न लिहिता 'ग्रुप' असा लिहिणं जास्त योग्य वाटतं का? आणि ह्यासाठी दोन मराठी शब्द मला सुचताहेत 'चावडी' आणि 'दरबार'.
|
|
|