Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 19, 2007

Hitguj » Help and Feedback » Feedback (write to Hitguj Admin) » General Feedback » Archive through March 19, 2007 « Previous Next »

Mrinmayee
Friday, March 16, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, याच व्यक्तीला मी ह्या संदर्भात मेल पाठवली असता त्याचं उत्तर.. "मी ही कम्युनिटी सुरु केली त्याचं काहीच श्रेय नाही का?"

Prady
Friday, March 16, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईतकं आंधळेपणाने कॉपी केलंय ना अगं त्यात त्याने बीने विचारलेले भाबडे(?) प्रश्न पण जसेच्या तसे पेस्ट केलेत. (बी दिवे घे रे.). आणी हा अजित किल्लेदार वर परत मायबोलीच्या कम्युनिटी वर येऊन तिथल्या लोकांनाच आवताण देतो या या माझी कम्युनिटी जॉईन करा.

Milindaa
Friday, March 16, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते Orkut च्या admin ना मेल करुन हे कळवावे.
माझ्या मते कॉपी करणे हा issue नाहीये, तर माहितीचा उगम कोठे आहे हे न सांगणे हा issue आहे.


Vinaydesai
Friday, March 16, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

MR त्याला मेल पाठव... चोरी करून त्याच सामानाचे दुकान घातले तर श्रेय नाही मिळत.. हातकड्या पडतात..
:-)

Lalu
Friday, March 16, 2007 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Lol प्राडी, खरंच की! जसंच्या तसं कॉपी केलंय. अगदी 'कांदा रडवतो', 'पाक उरलाय' आणि भरली कोंबडी पण आहे.

Karadkar
Friday, March 16, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यानी त्या community च्या report as bonus लिंकवर लिcक करा. Orkut Admin त्याशिवाय काहीही करु शकणार नाहीत.

Prady
Saturday, March 17, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल ह्य किल्लेदारला मेसेज टाकला होता की नेहेमी तुझ्या source ची माहिती दे तर आज त्याने तो उडवलाय. (उडवणारच काही आश्चर्य नाही) म्हणून आज नवा मेसेज टाकून आलेय तो असा


Mr. Killedar, kaal tumachya community madhe post kelela majha post jithe me tumhala tumachya uchalegirichya source chee mahitee jagasamor thewa mhanoon request kelee te udawlela disatay.Tumhee jyaa lekhakancha likhan maayboleewaroon choralat tyat meedekheel ek aahe.lokanee ekhadee changalee goshta wachawee yaat gair kaaheech nahee pan ashee dhaddhadeet choree karoo naka.jithun te uchalalat jasachya tasa shudhalekhanachya chuka hee na sudharata to source jaga samor aana. anee dusara mhanaje sagala jasachya tasa wachanyapeksha lokanee maaybolich wachawee kee.tumachee community kashala.waroon tumhee maayboli chya community madhe yeun lokana invite karata.tumachya dhadasacha kautuk karawa tewadha thoda aahe

खरच ही community बोगस म्हणून रिपोर्ट करा.


Mrinmayee
Saturday, March 17, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चोरी करून त्याच सामानाचे दुकान घातले तर श्रेय नाही मिळत.. हातकड्या पडतात कुठून चोरलं ते तरी सांगावं!



Savani
Saturday, March 17, 2007 - 2:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी केलय रिपोर्ट orkut admin कडे.

Sayonara
Sunday, March 18, 2007 - 3:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याने आता announce केलंय की सगळ्या रेसिपीज वेगवेगळ्या साईटसवरुन उचलल्या आहेत. आणि त्याला जेवण करण्याचा काहीही अनुभव नाही म्हणून.

Prady
Sunday, March 18, 2007 - 5:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याने माझा मेसेज परत एकदा डिलीट केलाय. आज्जुकाने पण त्याला लिहिलं होतं की तु मायबोलीचं नाव जाहीर करायला हवं तर त्याने तेही डिलीट केलय. ह्याचा सरळ सरळ अर्थ असा की हा माणूस चोर आहे. त्याला सूज्ञ पणे सांगूनही केवळ प्रसिद्धी आणी खोटं श्रेय लाटण्यासाठी तो हे सर्व करतोय. अजूनही तो मायबोलीचं नाव घेत नाहीये. तुम्हाआम्हा सर्वांचे लिखाण तिथे छापून तो ते स्वत्:चं असल्याचा भास निर्माण करतोय. अशा माणसाला खरच धडा शिकवायला हवा. प्रत्येक सच्च्या मायबोलिकराला माझी ही विनंती आहे. इतर वेळी एखाद्या चुकीच्या गोष्टीविरोधात जसे एकजूट होता तसे आताही व्हा. ह्या माणसाच्या कम्युनिटीला बोगस म्हणून ऑरकुटवर व्होट करा. आणी ह्याचं पिटळ उघडं पाडा.

Ajjuka
Sunday, March 18, 2007 - 7:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रॆडी.. त्याच्या स्क्रॆपबुक मधे एक मेसेज टाकलाय. कम्युनिटी बोगस रिपोर्ट करूचया. पण त्याआधी आपापल्या लिस्ट वरचे तिथे जे कोण असतील त्यांना खरं खरं काय ते सांगूया.. काय?

Prady
Monday, March 19, 2007 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरूर अज्जुका. मी ज्याना ज्याना ओळखते तसेच इथेही ज्या ज्या बीबी वर रेग्युलरली असते तिथे सर्वांना सांगेन. आणी अजून एक गोष्ट लक्षात आली हा माणूस मायबोलीच्या कम्युनिटीवर पण आहे. मायबोलीकर पण असणारच.

Bee
Monday, March 19, 2007 - 1:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, मी एक ललित लिहिले आहे. कालच लिहिले. ते ललित तुम्ही नविन महिन्यात टाकू शकाल का? प्लीज..

Moderator_10
Monday, March 19, 2007 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी तुझे ललित नवीन महिन्यात हलवले आहे

Bee
Monday, March 19, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक १०, त्वरीत प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

Dineshvs
Monday, March 19, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady मी मायबोली सोडुन कुठे लक्ष घालत नाही. म्हणुन मला याची कल्पना नाही. पण ती बोगस कम्युनिटी म्हणुन रिपोर्ट करावे, याबाबात मात्र कुणाचेहि दुमत असणार नाही.
सगळ्यांच्या सोयीसाठी ते कसे करायचे, हे कुणीतरी सविस्तर लिहा ना प्लीज.
तसेच जर सगळ्या मायबोलीकरांतर्फे एकच मेसेज टाकायचा असला तर तोहि ईथे असुद्या. आपण सगळे तो मेसेज तिथे टाकत राहु.


Bee
Monday, March 19, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेमस्तक, पाककला स्पर्धा हा बीबी उघडता येईल का? तो सध्या कुलुपबंद आहे विविधामधे.

Moderator_7
Monday, March 19, 2007 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी बी बी उघडला आहे.

Prady
Monday, March 19, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा आणी इतर सर्व मायबोलीकर धन्यवाद तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबाबत. किल्लेदारांना आता शहाणपण सुचलय. त्याने त्याच्या कम्युनिटीच्या होम पजवर मायबोली आणी ईतर सोर्सेसची नावं आता लिहिली आहेत. अर्थात त्याने तसं करताना आता बराच कांगावा करणंही सुरू केलय. माझ्या नावाने तो आता मायबोलीच्या ऑरकुटातल्या कम्युनिटीत येऊन शंख करतोय. मी कुठे काय केलं तुम्ही उगीच मला बापड्याला बोलताय. असाच सूर आहे. पण त्याला मी तिथे उत्तर दिलय.
http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=13783759&;tid=2521385502759682895&start=1





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators