Sukumoz
| |
| Saturday, October 07, 2006 - 10:04 am: |
| 
|
अरे संज्या हित हायेस व्हय म्या म्हनल कुट गेल माज ध्यान? तुले तंबाखु आणाले धाडले ना रे टपरीवर, त हित गप्पा करत बसला व्हय, मले मशेरी लावाची हाय नव्ह का. म्या वाट बघुन र्हायले ना रे बाप्पा तुजी तिकड चल बीगी बीगी तंबाखु आण बाबा.
|
Zakki
| |
| Saturday, October 07, 2006 - 1:34 pm: |
| 
|
अवघे वाढले एरण्ड म्हणुनि का होइल ते इक्षुदन्ड? (इक्षुदन्ड्=ऊस) बर मग नाही झाले ऊस, तर बिघडले कुठे? नाहीतरी ऊस नि साखर खाऊन मधुमेह व्हायचा, त्यापेक्षा एरंडच बरा, निदान एरंडेल तेल प्यायले तर पोट तरी साफ राहील. त्यामुळे कदाचित् टाळक पण सुधारेल तुझे! असे म्हणतात. ख. खो. दे. जा. नि संजय मोने बद्दल लिहीताना एरंड नि ऊस कुठे आले? आणि खरे चित्रपटसृष्टीतले असतील monez तर त्यांनी इतर गोष्टी सांगू नये असे कुठे तुमच्या कायद्यात बसते? बाकी काही वकील मात्र वकिली करायची सोडून (का जमत नाही म्हणून?) रिकामा न्हावी जसा भिंतीला तुंबड्या लावी तसे करत असतात! (ते माझे काम!) कितीही ऽऽऽऽ लिहीलेस तरी अर्थ कळतो का त्याचा तुला? उगीच परत परत लिहीले म्हणजे तुला अर्थ कळला असे नव्हे! ब्रम्ह सत्यं जगन्मिथ्या! नि मी ते आचरणात आणतो आहे! या जगात आहे तोपर्यंत नुसती मजाच मजा करतो आहे!नाहीतरी जिंदगी ख्वाब है असे एका हिंदी गाण्यात म्हंटलेच आहे!
|
जिन्दगी ख्वाब है असे एका हिन्दी गाण्यात म्हटलेय ते पावशेर नवटाक'टाकूनच' हे मी तुमच्या मागेच निदर्शनाला आणलेले आहे. ते काय एवढे seriously घ्यायचे? त्याला तुम्ही एकदम त्रिकालाबाधित सत्य म्हणून काय उड्या मारताय?... बरीक या मोनेंना काहीही उमेदवारी न करता fluent मराठीही लिहिता येऊ लागले वा वा!! अहो आपले महामहोपाध्याय प.पू. झक्कीसाहेब(मी त्याना वन्दन करतो.)हे सुद्धा हितगुजवर सुरुवातीची काही वर्षे'रांगतच' चालत असत. आताच्या या फ़्लुएन्ट मराठीचे रहस्य काय? भगवंतांचा हितगुजवरचा हा कितवा'अवतार' म्हणायचा? जेहेत्ते कालाचे ठायी सम्भवामी युगे युगे!! हितगुजवरची मूळ लोकसंख्या एक तृतीयांशही भरेल की नाही कुणास ठाऊक? (उरलेल्या सर्व डुप्लिकेट आय डी आहेत असं कोण म्हणालं? आवाज ह. ह. चा वाटतोय. बोवा ssss जीआत्मा अमर आहे!!)
|
हे खरोखरच संजय मोनेच आहेत. मी स्वत: त्यांना फोन करुन खात्री केली आहे. त्यामुळे आता wel-come संजयजी. मायबोलीच्या परीवारातर्फे मी आपले स्वागत करते. . नेहेमी या आम्हाला आनंद होइल. एक सुचना.... आता कृपया कोणीही शंका घेऊ नका.
|
Jo_s
| |
| Monday, October 09, 2006 - 8:39 am: |
| 
|
व्वा, आता संजय मोनें सारखी मोठी माणसं ही इथे येऊ लागली. संजयजी तुमचं इथे स्वागत. सुधीर
|
Neelu_n
| |
| Monday, October 09, 2006 - 10:03 am: |
| 
|
मोने उभयतांचे मायबोलीवर स्वागत आहे. पण आज गेले कुठे हे दोघं? आज बी सुकन्याकाकुंनी तमाकु आणायला पिटाळलं काय?
|
Yogibear
| |
| Monday, October 09, 2006 - 1:55 pm: |
| 
|
वाईट वाटल हे बघुन की इथल्या community मधला विश्वास हरवला आहे... फ़ोन करुन खरखोट कराव लागत आणि वर सांगाव लागत की शंका घेउ नका... 
|
खरंय योगीबेअर, विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ही. पण कोणीही नवीन आले तर त्याला सहज मिसळु दिले जात नाही, हा अनुभव आहे. . काही थोड्या लोकांमुळे आज हे असं होतय. मलाही एक वेळ आता पुन्हा इथे येउ की नको असे झाले होते, मात्र आता नाही आले तर चालत नाही एवढे हे व्यसन पराकोटीला गेले आहे. एकदा इथे रमलो तर मात्र मायबोलीत विरघळुन जायला होते हे ही तितकेच खरे आहे नाही का?
|
Zakki
| |
| Monday, October 09, 2006 - 2:38 pm: |
| 
|
अहो, नविन येणार्याला कळले पाहिजे की इथे कशा प्रकारचे लोक आहेत. बहुतेक सर्व Jolly good fellows, taking it easy, take it lightly असे असले तरी एकमेकांची गमतीत चेष्टा मस्करी जोरात चालते. त्याला घाबरणारे किंवा तसे नसतील तर इथे टिकणारच नाहीत!
|
Athak
| |
| Monday, October 09, 2006 - 3:14 pm: |
| 
|
आपली मायबोली ही एक चालती बोलती आगगाडी आहे , तुडुंब गर्दीची , प्रत्येक ठेसनावर थांबली की बाहेरच्या लोकांना आधी आंत शिरण्यास विरोध करणारी मंडळी एकदा आंत शिरली की लगेच त्यांच्यात मिसळुन जाणारी अन हसत खेळत पुढच्या प्रवासाला लागणारी .
|
Mrinmayee
| |
| Monday, October 09, 2006 - 3:27 pm: |
| 
|
अथक, काय पण झकास उपमा दिलीत!!! खरय अगदी! आतल्या प्रवाशांचे कधी चुकून तर कधी जाणून बुजून पायावर पाय पडतात. मग माफ्या-बिफ्या मागीतल्या जातात. अती स्फोटक पदार्थ मॉडकडून कधी त्वरित तर कधी ज ss राशी 'नुस्कानी' झाल्यावर विझवल्या जातात. खाण्या-पिण्याच्या पदार्थांचं आदानप्रदान चालतं. आणि मुख्य म्हणजे पुढल्या 'ठेसनावर' उतरलेले प्रवासी, परत (जरा दिवसांनी का होईना) धडपडत गाडीत चढतात.
|
वा! वा! छान वाटलं वाचुन. खरच आहे तुम्ही म्हणता ते, पण आता एकदा आत आलो की एकमेकांची सगळी सुख दु:ख वाटली जातात कोणाशी तरी बोलावे वाटते तेही मनमोकळेपणाने बोलता येते. आणी मायेचे सल्लेही मिळतात. तरी कधी दिवे घ्यायला मदत करणारेही असतात. हो ना!
|
Jo_s
| |
| Tuesday, October 10, 2006 - 5:09 am: |
| 
|
अथक छान उपमा दिलीस आगगाडी, एकदम पटलं सुधीर
|
Surabhi
| |
| Tuesday, October 10, 2006 - 6:31 am: |
| 
|
वा! अथक, मृ, मनिषा क्या बात है! एकदम सही! 
|
इथे यायचे म्हणजे'त्वचा जणू गेन्डीयाचे चर्म' अशी वृत्ती बाणवावी लागते...
|
Paragkan
| |
| Tuesday, October 10, 2006 - 4:19 pm: |
| 
|
म्हणजे इथे आला की माणूस 'राजकारणी' होतो म्हणा की. हितगुजची नवी जाहिरात करायला हरकत नसावी मग अशी. 
|
Monez
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:39 am: |
| 
|
just thought of an informal tete-a-tete and joined.some may try pulling my leg,its but natural.even i did the same thing.in my younger days. no hard feelings what so ever. does any body has contact with singapore maharashtra mandal?please let me know.
|
Maitreyee
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:51 am: |
| 
|
संजय, इथे क्लिक करा. या बीबी वर तुम्हाला सिंगापूर चे लोक भेटतील
|
Bee
| |
| Thursday, October 12, 2006 - 3:34 am: |
| 
|
मोनेझ, तुम्ही खालिल साईट वर जा आणि तिथे पोचलात की कमिटीवर टिचकी मारा. मग तुम्हाला यंदाच्या कार्यकारिणीची यादी मिळेल. तिथे तुम्ही कुणालाही संपर्क करु शकता. तर ती लिंक अशी आहे : http://www.maharashtra-mandal-singapore.org/ मैत्रेयी, म्या पामराला कुणाच्या तरी प्रश्नाचे उत्तर देण्याची संधी प्राप्त करुन दिल्याबद्दल तुझे कोण आभार :-) कोण शब्द चुकला तर नाही ना :-)
|
पेज घेण्यासाठी डोलर मध्ये( poundaatun ) पैसे कसे भरायचे..!!!
|