|
Admin
| |
| Tuesday, January 17, 2006 - 6:21 pm: |
|
|
For those of you are Rangiberangi members: We fully support commercial use of Rangiberangi (as long as it is not for porn, piracy, gambelling illegal use etc. ) So anybody wants to include their own advertisements or advertisement from their own adsense account on rangiberangi, we will fully support it (even encourage it). You are paying for it so if you make any profit that is completely yours. Maayboli has helped many people to get started in writing and publishing their own work. If we can help more marathi people doing business, good for all of us in the community. Only thing we require is you rangiberangi membership is current and duely paid Obviously If you have a Rangiberangi BB sponsored by another maaybolikar, the person who pays for it, decides how it will be used and not person who operates it currently.
|
Seema_
| |
| Tuesday, April 18, 2006 - 4:58 am: |
|
|
admin देवनागरीत कस लिहायच ? याची लिन्क देताना ही खालील लिन्क दिली तर नविन लोकांचा गोंधळ व्हायची शक्यता आहे. कारण आपले पहिले खुप पुर्वीचे पोस्ट शिवाजी font install करण्याबद्दल आणि dev tag वापरण्याबद्दल लिहिले आहे /hitguj/messages/1/37997.html?1132544849
|
Kandapohe
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:18 am: |
|
|
नेमस्तक, झालेल्या प्रकाराची कारणे काहीही असोत पण त्या व्यक्तीला इतक्या सहजपणे तुमचा कोड मिळाला कसा? तुमच्याकडे कोड प्रोटेक्ट करण्याची यंत्रणा नाही? नसेल तर त्या दृष्टीने तुम्हीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही परत तोच कोड इथे चिकटवला आहे. त्याने आणखी काही व्यक्तींना तो कोड सहज उपलब्ध होत आहे असे मला वाटते.
|
Admin
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:28 pm: |
|
|
नेटवर broswer side वर असलेले काहीच मग ते लिखाण असो वा कोड असो, प्रोटेक्ट करणे शक्य नाही. ज्याला त्या तंत्रज्ञानाची माहिती आहे तो नेहमीच जगातल्या कुठल्याही साईटचे कोड पाहू शकतो. मी इथे लिहिलेले कोड पूर्ण कोडच्या १०% इतकेच होते त्यामुळे लिहायला हरकत नव्हती.
|
Yogibear
| |
| Wednesday, July 12, 2006 - 3:39 pm: |
|
|
Admin: पण मग असा code सर्वन्ना उपलब्ध असतो तेव्हा कोणिही copy paste करु शकत (नाही करतातच) तर मग त्यासाठी हरकत का असावी!!! आणि हे सर्व websites ना लागू होत....
|
Admin
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:02 pm: |
|
|
Yogibear तुमच्या शेजारच्या घराला कुंपण नसेल ( इथे कित्येक घराना नसते) म्हणून तुम्ही त्या घरमालकाला न सांगता त्यांच्या वस्तु घ्याल का? लक्षात घ्या कि येथे परंपरागत रिवाजानुसार बोलतो आहे. कदाचित भारतात असे कुंपण नाही म्हणजे घरमालकाला त्या वस्तु सांभाळायची इच्छा नाही असा अर्थ होऊ शकतो. दुसरे असे की कुंपण नाहीच असे नाही. पण जे आहे त्यातूनही आत कसे जायचे हे माहितगाराना ठावूक आहे. म्हणजे एखादी गोष्ट त्या कुंपणाच्या आत आहे हे माहित असुनही तुम्ही घेणे योग्य आहे का? तुम्ही ज्या कंपनीत काम करता त्या कंपनीचे source code सहज शक्य आहे म्हणून तुम्ही उघडपणे घेऊन खाजगी कामासाठी वापराल का?
|
Yogibear
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:20 pm: |
|
|
Admin: मला वाटलेले की एखाद्या page चे source code बघुन copy paste केले असेल पण तसे नसुन जर तो code public ला available नसुन एखाद्याने site hack करुन अथवा loop hole वापरुन copy paste केले असेल तर मात्र तुमचे म्हणने बरोबर आहे.
|
Lalu
| |
| Wednesday, January 10, 2007 - 5:56 pm: |
|
|
तो ' Old Wives Tales ' बीबी बंद करण्याचा निर्णय काही पटला नाही. प्रत्येकालाच ती उत्सुकता असते. त्यासाठी अगदी पूर्वीपासून अशा दंतकथा आहेत. त्या कोणी सिरियसली घेत नाही. केवळ गंमत म्हणूनच सगळे आपपल्या समजुती सांगत होते. त्यात डॉक्टरनाही काही वावगे वाटले असते असे वाटत नाही. ' ID डुप्लिकेट आहे' वगैरे हा वेगळा मुद्दा आहे, आणि तो बीबी बन्द करण्याचे ते कारणही नाही आहे. पटले नाही म्हणून सांगितले आपले.
|
Dineshvs
| |
| Friday, January 12, 2007 - 2:48 am: |
|
|
नमस्कार लालु, तुझ्या मताचा आदर आहेच, तरिही तु हे लक्षात घ्यावस म्हणुन. महर्षी व्यासानी उष्टावलेले नाही, असे ज्ञान जगात नाही, असे म्हणतात. तर त्याच महाभारतातला दाखला देऊन लिहायचे तर. एका यादवाने स्त्रीचे सोंग घेऊन, एका ॠषीना विचारले, मी गरोदर आहे, मला काय होईल ? ते ॠषी कोपिष्ट झाले, त्यानी शाप दिला, तुला मुसळ होईल, आणि ते तुझ्या कुलाचा नाश करेल. नंतर खरोखरच मुसळ झाल्यानंतर, घाबरुन, त्या मुसळाचे चुर्ण करुन पाण्यात टाकण्यात आले. त्या चुर्णातुन पुढे लव्हाळी उगवली. तीच लव्हाळी उपटुन यादवानी एकमेकाना मारले, आणि यादवी माजली. एरवी त्या BB कडे लक्ष द्यायचे मला काहि कारणच नव्हते. लोपाची शंका बघुन मी ते वाचले. आणि त्या माणसाचा डाव लक्षात आला. त्या माणसाला या बाबतीत विचित्र ऑब्सेशन आहे, आणि या सन्दर्भात त्याने अत्यंत घृणास्पद विधाने पुर्वी केली होती. तो सोडल्यास, तिथे जी मते दिली गेली होती, ती अत्यंत निरागसपणे दिली होती, पण मुळातच हेतु शुद्ध नसल्याने, त्या सर्व ज्येष्ठ सभासदांचा अपमान झाला असे मला वाटते.त्या ज्येष्ठ सभासदांबद्दल मला आदर असल्याने, त्यांचा अपमान मला सहन होणे शक्यच नव्हते. त्याना जेन्व्हा हे लक्षात आले असेल, तेन्व्हा त्याना किती क्लेश झाले असतील ? यापुढे ते कुठलाहि सल्ला देताना, मनमोकळेपणी देऊ शकतील ? दुसरे म्हणजे एकंदर त्या चर्चेचा ओघ, मुलगाच कसा होईल ? असाच होता. आणि हा विचार, एक माणुस म्हणुन मला कधीहि रुचण्यासारखा नव्हता. येणार्या बाळाचे, आपण निव्वळ माणुस म्हणुन स्वागत करायला कधी शिकणार ? जगातल्या किती संस्कृतिनी स्त्रीला सन्मान्य रितीने वागवलेय ? भारताची संकृति तशी होती का ? शिवाय गर्भाचे लिंग हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबुन असते, हे शास्त्रीय सत्य, किती जण स्वीकारतात ? तु म्हणशील, कि मी फारच ताणतोय. पण त्या माणसाचा छुपा हेतु, ओळखणे, माझ्यासारख्या अनेक जणाना सहज जमते. हाच प्रश्ण जर त्याने स्वतःच्या आयडीने विचारला असता, तर त्याच्याकडे कुणीहि लक्ष दिले नसते. पण येनकेन प्रकारे, प्रसिद्धि मिळवण्याचा त्याचा, किंवा तत्सम सगळ्यांचाच प्रयत्न हाणुन पाडायला हवा. त्या एकाच माणसाला मी शिकार बनवतोय, असे तु तरी म्हणु नयेस. त्याला उघड आव्हान तर मीच केले होते, शिवाय त्याच्यावर राग धरु नये असे आव्हानहि मीच, अनेक मायबोलिकरणीना केले होते. विषय केवळ डुप्लिकेट आयडीचा नव्हता, तर त्या बुरख्या आड चाललेल्या गैरप्रकाराचा होता. ईतर भुतावळीने देखील त्यातुन योग्य तो बोध घ्यावा, हि अपेक्षा. मी केलेल्या आव्हानावर मॉडरेटर्स नी बोटचेपे धोरण स्वीकारले, पण Admin ने मात्र अत्यंत योग्य ते पाऊल उचलले, याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. (edited by Admin on Jan 11, 2007 11;23 pm EST)
|
Admin
| |
| Friday, January 12, 2007 - 4:27 am: |
|
|
मॉडरेटर्सने सुरुवातीला घेतलेले धोरण बरोबरच होते कारण त्यांचे काम खूप अवघड आहे. केवळ एका व्यक्तिने तक्रार केली म्हणून त्यांनी लगेच लिखाण उडवणे योग्य नाही. त्यांच्या सुरुवातीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठींबा होता. तरीसुद्धा मी उडवण्याचा निर्णय का घेतला ते मी इथे लिहीत नाही कारण ती व्यक्तिही हे वाचते आहे.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:02 pm: |
|
|
administrator हा काय प्रकार आहे? why we Indians are like this बीबी वर चालू असलेला वाद तुम्ही वाचलाच असेल. त्यावर तुमचे मत काय? तुमच्या website वर कुणीही येऊन संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे, हे तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या व्याख्येत येते का? तुम्ही पुण्यात असताना मी हाच प्रश्न विचारला होता. तुम्ही त्याचे उत्तर दिले नाहीत आणि तो प्रश्नच आता उडवून टाकलेला आहे! झक्की वगैरेंना सावरून घेणे मी समजू शकतो, पण माझ्या योग्य शंकांचेही दमन का केले जात आहे कळेल का? यापूर्वी तुमच्या व्यक्तिगत निर्णयशक्तीचा मी आदरच केला आहे. तिथे आवडले तिथे मनमोकळे कौतुकही केले आहे. जे आवडले नाही, ते सांगणे गुन्हा आहे का? मग त्याचे उत्तर द्यायचे सोडून, माझी तक्रारीची posTs काढून का टाकली जात आहेत? उत्तर न मिळता, किमान हे पोस्ट उडवले जाणार नाही, ही अपेक्षा. धन्यवाद.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:31 pm: |
|
|
Moderator_7 & Administrator /hitguj/messages/46/120466.html?1166233802 Wednesday, December 13, 2006 - 9:27 am: झक्की यांचे हे पोस्ट पहा. "भिकारी आणि निकम्मे" म्हटलेले पोस्ट अजुनही तिथे आहे. त्यानंतरच मी या वादात पडलो. वास्तविक, दोघातिघांनी विरोध केल्यानंतर झक्की ह्यांच्या "आपले चुकले" हे लक्षत यायला हवे होते. पण "माझेच खरे" असा हेका त्यांनी लावून धरला. आणि नंतरचे नाट्य झाले! ह्यात तुम्ही माझे पोस्ट, माझी तक्रार काढून टाकलीत हे ठिक (म्हणजे ठिक नाही, पण आता काय करणार?), पण झक्की ह्यांचे हे "मतस्वातंत्र्य" प्रमाणापेक्षा जास्त पसरले आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
|
Admin
| |
| Tuesday, January 16, 2007 - 7:08 pm: |
|
|
laalbhai >तुमच्या website वर कुणीही येऊन संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे, हे तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या व्याख्येत येते का? होय. इथेच मायबोलीवर आणि admin team वर फारसे चांगले न म्हटलेली विधाने होती त्यानाही आम्ही ठेवले होते. तुम्हाला ते पटले नसले तर तुम्ही त्याला उत्तर द्या. तुम्ही वैयक्तिक पातळीवर उतरला नाहीत तर तुमचेही मत ठेवले जाईल नाहीतर उडवले जाईल. कोण कसे लिहितो आहे आणि कुणाचे ठेवायचे आणि उडवायचे याचा निर्णय moderator घेतात आणि त्यानी तुमचे post उडवले असेल तर ते योग्य कारणाने असेल याची मला खात्री आहे.
|
Laalbhai
| |
| Thursday, January 18, 2007 - 8:11 am: |
|
|
admin Not very secret that I am very much surprised! मग व्यक्तीस्वातंत्र्याची तुमची व्याख्या इतकी "अमर्याद" आहे. तर मग मी कुणाला "हलकट" म्हणणे तुमच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या व्याख्येत का येत नाही? मला "क्ष" व्यक्ती अक्कलशून्य, म्हातारचळ लागलेली वाटली तर मी तसे म्हणावे, हे माझे व्यक्तीस्वातंत्र्य आणि चळ लागलेल्या व्यक्तीने संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे, हे व्यक्तीस्वातंत्र्य ह्यात काय फरक आहे? "वैयक्तिक पातळीवर" उतरणे म्हणजे काय? आणि माझे लिखाण उडवले ह्याबद्दल मी बोलत नाहीये. वाद निर्माण करणारे "दोन्ही बाजूचे" लिखाण उडवले गेले नाही, ही माझी तक्रार आहे. पण तुम्ही "ते" मत "वाद निर्माण करणारे नाहीच" अशा अर्थाचे काही म्हणत आहात. (त्याला व्यक्तीस्वातंत्र्याचा मुलामा! ) दुसरे असे की, admin team बद्दल बरे वाईट म्हटलेले मी तरी कुठे पाहिले नाही. तुम्ही उडवलेत का? आणि तिसरे असे की, "admin team" आणि "आपला संपूर्ण भारतीय समाज" ह्यामधे काहीच फरक नाही का? दोन्हीची तुलना कशी काय होऊ शकते? असो. चौथे असे की, की मी जे म्हणतोय ते केवळ मीच म्हणतोय असे नाही. आम्हा अनेकांचे मत हेच आहे, की भारतीय समाजात अनेक दोष असले तरी संपूर्ण समाजाला "भिकारी आणि निकम्मा" म्हणणे ह्यात कोणताही शहाणपणा नाही! मी एकटाच हा मुद्दा ताणतोय आहे, असे काही चित्र नाहीये! असो. तात्पर्य असे की व्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादेची तुमची व्याख्या न पटणारी आहे. तुम्ही पुनर्विचार करावा, ही विनंती. उद्या कुणी "शिवाजीच्या जन्माचे रहस्य" म्हणून काही मूर्खासारखे लिहिले, तर "व्यक्तीस्वातंत्र्य" म्हणून तुम्ही ते लिखाण ठेवणार आहात का? कितीही विरोध झाला तरी? मला वाटते की प्रत्येक समाजाचे काही मानबिंदू असतात, त्यांचा आदर करणे त्या त्या समाजाला आवश्यक असते. तसेच "संपूर्ण भारतीय समाज" ह्याविषयीही आदराने बोलावे, (चूका दाखवू नयेत असे नव्हे!) अशी अपेक्षा गैर नव्हती. आणि "मायबोली" ही परदेशात, परदेशस्थ भारतीयांनी उभारलेली साईट असली तरी तिचे नाते इथल्या समाजाशी आणि संस्कृतीशी आहे - असावे असे वाटते. त्यादृष्टीने, मी आणि माझ्यासारखे मत मांडणारे अनेक, ह्यांच्या मताचा आदर केला जावा, ही अपेक्षा माझ्यामते रास्त होती. पूर्वग्रह न ठेवता माझ्या "ह्या" भुमिकेकडे बघितलेत तर तुम्हाला माझी भुमिका समजेलही. बाकी, उत्तराबद्दल धन्यवाद.
|
|
|