Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 05, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 05, 2006 « Previous Next »

Prasadmokashi
Tuesday, January 03, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीक्षा

क्षितिजावरल्या रक्त - थेंबाचं भगवं सौन्दर्य
जेंव्हा पाण्यात उतरलं,
प्रवाहातल्या एका चमचमत्या थेंबानं
आपल्या दोस्तांना विचारलं...

" सांगाल कुणी मला ?
आपण उगम पावलो कुठं ?
आणि
वेड्यासारखे वाहात वाहात
आता चाललो कुठं ?"

त्याच्या प्रश्नावर सारे थेंब अगदी खळखळून हसले,
" नक्कीच तू खडकावर आपटलास, म्हणून हे असले प्रश्न पडले "

एक थेंब मात्र त्याला अलगद येऊन भेटला
शब्द शब्द तोलत खूपच संथपणे म्हटला...

" शोधतो आहेस मित्रा तू प्रवाहातलं स्वत्व...
पण
प्रवाहाचा एक भाग हेच थेंबाचं अस्तित्व...

कुणास ठाऊक तू असाच, कुठवर वाहात राहशील...
जितकं पाहिलस त्याहून बरच, वेगळं काही पाहशील....

कुणी तृषार्त माणूस तुला ओंजळीत उचलून घेईल
किंवा
तुला पिऊन एखादा वेल आकाशावर जाईल.

ऐक मित्रा,
उगम आणि अंत यावर
फार विचार करू नकोस,
स्वत्व जपत रहा
पण वाहणं सोडू नकोस... "

~ प्रसाद





Paragkan
Tuesday, January 03, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह !!!

Moodi
Tuesday, January 03, 2006 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर.यापेक्षा वेगळी दाद काय द्यावी? शब्दच नाहीत.

Jaaaswand
Tuesday, January 03, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा प्रसाद....
कविता एकदम कमाल आहे....


Seema_
Tuesday, January 03, 2006 - 8:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय सुंदर लिहिता रे तुम्ही लोक . खरच moodi म्हणते तसे शब्दच नाहीत दाद द्यायला

Sarang23
Tuesday, January 03, 2006 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा वा वा!!!

Bgovekar
Tuesday, January 03, 2006 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'प्रवाहाचा एक भाग हेच थेंबाच अस्तीत्व' किती छान विचार सांगितला आहे. स्वताबद्दलचा अहंकार विसरविण्यास लावणारी अन खर्‍या अर्थाने विचार करण्यास भाग पाडणरी कविता छानच लिहिलीये.... सुंदर आत्मपरीक्षण!!

Giriraj
Tuesday, January 03, 2006 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह प्रसादभाऊ,तुम्हाला TCS बक्षीस!
परागमियाॅं,आजकाल फ़क्त दाद देणंच चालू आहे तुमच!कादंबरी लिहायला घेतलीस की काय?


Ajjuka
Tuesday, January 03, 2006 - 11:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद वा.. मजा आली खूप. तू दोन अडीच वर्षांपूर्वी का लिहिता नव्हतास रे मायबोलि वर? मला आवडल असत तुझ्या काही कवितांवर काम करायला माझ्या प्रयोगात.

Rajkumar
Wednesday, January 04, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह प्रसादबाबू,सुंदर लिहिलीये.. तुमच्या शब्दांचे कौतुक करायला आमचे शब्द कमी पडतायत...

Meggi
Wednesday, January 04, 2006 - 12:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह, प्रसाद फ़ार सुन्दर... अप्रतिम

Bhagya
Wednesday, January 04, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं कसं म्हणतोस.....!

असं कसं म्हणतोस की
तुझ्या माझ्यात काही नव्हतं
माझ्या कुवतीतलं सगळं जग
तुलाच तर अर्पिलं होतं

मी सावळ्या रात्रीचं का होईना,
तुझ्या घरावर पांघरूण घातलं होतं
आणि शरीरावर असंख्य चांदण्या
गोंदवण्याचं दु:ख्ख आनंदाने भोगलं होतं

सोसाट्याच्या पावसात आपल्या
घरकुलाचं छत जेव्हा गळत होतं
विटक्या, जीर्ण शीर्ण का असेना
पदराचं ठिगळ लावलं होतं

मान्य आहे, तुझ्यासारख्याला
हे करणं न करणं एकच होतं
अरे पण वळचणीतून ठिबकलेलं
माझंच तर मूक आयुष्य होतं!


Milya
Wednesday, January 04, 2006 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद : अतिशय सुरेख... अरे बाबा पण दोन कवितांमध्ये इतकी गॅप घेउ नकोस. कुठे होतास इतके दिवस?

Devdattag
Wednesday, January 04, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Too good Prasad..
आता ज्यान्च्याकडून कवितेचि दीक्षा घ्यायला लागणार आहे त्यांची लिस्ट वाढतेय..
वैभव.. सारंग..प्रसाद..मिल्या.. बापू..पमा..जास्वंद....


Gs1
Wednesday, January 04, 2006 - 4:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

p`saadÊ kivata AavaDlaI. AMtmau-K krNaara ivaYaya

Manatlya_unhat
Wednesday, January 04, 2006 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद कविता खुपच जबरदस्त यार !

Prasadmokashi
Wednesday, January 04, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कौतुकाबद्दल मनापासून आभार दोस्तांनो !

Bee
Wednesday, January 04, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनातल्या उन्हात अरे कुठे हरवलास इतक्यात मुळीच दिसत नाहीस.. welcome back!!!!!

प्रसाद, मला कवितेचा climax आवडला.

भाग्य, छान! गद्याकडेपण लक्ष दे जरा..


Manswi_mugdha
Wednesday, January 04, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिल कडव आवडल भाग्य......
छान आहे..


Dineshvs
Wednesday, January 04, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद खुप छान कविता आहे हि.
तुम्ही लोक तर प्रो आहातच, पण आमच्या बहिणाबाई भाग्यश्रीने पण छान लिहुन ठेवलय कि. गपचुप ईथे लिहुन ठेवलं. माझ्या नजरेतुन सुटेल असं वाटलं का गं ?
कविंची एक नवीन पिढी ऊदयाला येतेय ईथे.


Moodi
Wednesday, January 04, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप जणाना प्रश्न पडलाय गझल म्हणजे काय तर इथे बघा.
नेमस्तक जर ही माहिती इथे योग्य नाही वाटली तर योग्य त्या ठिकाणी हलवावी ही विनंती.

http://www.esakal.com/today/yuv_nivadak15.html

Chinnu
Wednesday, January 04, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अतीसुंदर! शब्दच नाहीत माझ्याकडेही! भाग्या, छान लिहीलिस हो.. अशीच लिहीत रहा.

Vaibhav_joshi
Thursday, January 05, 2006 - 1:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद ... फ़ारच सुंदर ....
भाग्यश्री ... मला आवडली तुमची कविता ... " सावळ्या रात्रीचं का होइना ... " कडव्यात अर्पणाचा high point सापडला


Sumati_wankhede
Thursday, January 05, 2006 - 2:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गूज

नकोच कुठले तरंग मनी
नको वाहणे रक्तातून काही;
आता कुठे सुकू लागली
पानावरची हळवी शाई

नकोच थरथर ओठान्ची
अल्लड पापणीची लवलव;
आता कुठे थबकून उभी
आडोश्याला कवळी दंव

नको नको ते ऊन्हं कवडसे
सुसाट वारा... थबकलेला;
वेढून अवघ्या तना मनाला
आता होता... आता गेला...

कोण? कधी? का? अन हे केव्हा?
घडले ते सारेच खरे;
'हो..तो माझा अन मी त्याची'
एवढेच मज कळते रे




Vaibhav_joshi
Thursday, January 05, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कविता ... आता कुठे सुकू लागली ... सुरेख

Sarang23
Thursday, January 05, 2006 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा... गुज कहर आहे. खुप सुंदर... कुसुमाग्रजांची आठवण झाली.

Sarang23
Thursday, January 05, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

       काठ

उंच शीडांच्या होडीला
अवखळ वारा जोडीला
मोह नको अनिवार तुला
सुगंधवेड्या रानफुला

हलके हलके भूल चढे
तारुण्यावर प्रेम जडे
घालवले क्षण भांडत काही
साठवले कण सांडत काही

टपोर डाळींबाचे दाणे
जाळीतील करवंदी गाणे
साठवले कण भांडत काही
घालवले क्षण सांडत काही

वाटेवरती बकुळफुलाच्या
इवल्या हाती मुला मुलाच्या
घालवले कण भांडण नाही
साठवले क्षण सांडण नाही

गोड मनाचा हलका स्पर्श
जीवनात ये नुस्ता हर्ष

सारंग


Shyamli
Thursday, January 05, 2006 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक नविन विशय,

सुन्दर स्वप्नात होति ती बाला
तीचा हो हुन्डाबळि झाला

स्त्रीधनच आज नीधन झाले
सासुरवासहि होऊ लागले

आण म्हणोनि रक्कम रोख
तुमचा आमचा हिशेब चोख

जमला नाही सौदा
आयुश्याचा झाला चोथा

सम्पलि ती कोमला
तीचा हो हुन्डाबळी झाला



Paragkan
Thursday, January 05, 2006 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह सुमती .... खासच!

Pama
Thursday, January 05, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, भाग्या, सुमती, सारंग... सगळ्यांच्या कविता फार आवडल्या. खूप छान लिहिलय सगळ्यांनीच!!
श्यामली, विषय चांगला आहे.


Vaibhav_joshi
Thursday, January 05, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरडा

मी तुझ्या विश्वात येवून सांग ना रे काय केले
रंगलो तितक्याच रंगी , रंग तू जितके दिलेले
का मला जमलेच नाही लांघणे माझेच अंगण
का बरे थिजलो असा मी लागता माझेच कुंपण
पाहिले मजला जगाने रंग केवळ बदलताना
ऐकले नाही तयांनी मूक मी आक्रंदताना
हे खरे तुजलाच ठावे नाही सहजी शक्य रे
जीव वाचावा म्हणूनी केवढाले यत्न ते
ही कशी तू निर्मिलेली " फ़ार हळवी " माणसे ?
रंग त्यांचे क्रूर इतके .. हा रडे तर तो हसे
पत्थरे हातात घेवून ठाव घ्याया थांबलेले
खेळुनी माझ्या जीवाशी ते किती आनंदलेले
अंतरी भय दाटलेले अन उरी आकांत होता
थांबलो सोडून आशा .. कुंपणाचा शाप होता
वाटले तुटणार आता जीवनाचा दोर हा
संपला रंगीन माझा रंगण्याचा खेळ हा
लागला नाही परंतू नेम मजला एकही
खेळ हा आहे तुझा .. जाणले मी तत्क्षणी
मारणारे ते ही सारे भोगणारे शाप होते
शेवटी सरडेच होते .. कुंपणाच्या आत होते

वैभव !!!


Chinnu
Thursday, January 05, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुंपणातले सरडे.. फ़ार गहिरा अर्थ आहे, वैभवा!
श्यामली, लिहीत रहा..
सारंग मला तुमचे साठवलेले कण आवडलेत. फ़ार सुंदर कविता!
सुमती हळवी शाई भावुन गेली बघ.


Bhagya
Thursday, January 05, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे!! इतक्या जणांना माझी कविता आवडली!!!
वैभव, 'तुम्ही' म्हणू नकोस रे. तू आणि पमा सारख्या दिग्गजांनी वाखाणलं, यातच सारं आलं.


Ameyadeshpande
Thursday, January 05, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव...प्रत्येक कविता लिहिलेल्या दिवशीच्या रात्री लागणारी झोप खूप समाधानाची असेल ना तुझी?
भावना सगळ्यान्च्या तितक्याच तिव्र असतात म्हणुन तर इतकी भरभरून दाद मिळते इथे... भावनेच्या पाकळ्या घेऊन शब्द बनुन येणारं मोगर्‍याचं प्रत्येक फ़ूल मग असं दरवळत रहातं... निसर्गाला मोगरा जन्माला घातल्यावर सृजनाचा जितका आनंद झाला असेल तितकाच तू प्रत्येक कवितेतून मिळवतोस ह्याचं खूप कौतुक वाटतं...


Sarang23
Thursday, January 05, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सरडा!!!!!!!!           




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators