Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 05, 200635 01-05-06  10:43 pm
Archive through January 09, 200635 01-09-06  11:32 pm
Archive through January 12, 200635 01-12-06  5:40 am
Archive through January 16, 200635 01-16-06  4:02 am
Archive through January 18, 200635 01-18-06  1:57 pm
Archive through January 22, 200635 01-22-06  3:14 am
Archive through January 25, 200635 01-25-06  5:07 am
Archive through January 27, 200635 01-27-06  4:36 am

Chinnu
Friday, January 27, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कविता आदित्य. शेवटच्या दोन ओळी फ़ारच भिडल्या. झाड छान कल्पना आणि छान कविता.

Ninavi
Friday, January 27, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य, मला पण नाहीच रे कळली.
विशेषतः ' उत्कट अलिप्त सहजता ' , ' अळवाचे पद्मपत्र ' या कल्पना तर अगदीच बाऊन्सर गेल्या! ( पद्म म्हणजे कमळ ना? )

झाड, तुमची कल्पना आवडली.


Priyasathi
Friday, January 27, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यामधली वर्दळ आता घातक होत आहे.
आणि रस्त्यावरून चालणेसुद्धा पातक होत आहे.
माझी नवीन कविता...
दि.२२.०१.२००६ रोजी पुणे आकाशवाणीवर प्रसारीत झाली


Lalu
Friday, January 27, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि, अनुमोदन. मला पण काल ते उत्कट अलिप्त' खटकलं होतं. मला कवितेतलं फारसं काही कळत नाही. पर्युत्सुक आणि निस्सुख या शब्दाचे मला अर्थच माहीत नाहीत.
झाड, आवडली. प्रियासाठी, अभिनन्दन.

निनावी, या पोस्ट मधे कुठेही स्मायली नाही याची नोन्द घे. ~d


Ninavi
Friday, January 27, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियासाथी, अभिनंदन!
लालू, मानधन कमी करू का?

Pkarandikar50
Friday, January 27, 2006 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते की अदित्यची कविता दुर्बोध झली त्याचे कारण म्हणजे एकीकडे देहाचे भोग भोगण्यातली अलिप्त सहजता आणि दुसरीकडे व्याकुळ वेदना, छाती बडवणे यातला विरोधाभास नीटपणे स्पष्ट झाला नाही. का यात काही विरोधाभास नहताच? तसेही असेल पण काय ते नीटसे उलगडले नाही.
बापू.


Pama
Friday, January 27, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड, कविता आवडली.
प्रियसाथी, अभिनंदन!!
बापू तुम्हाला अनुमोदन. प्रत्येक २ ओळी वेगळ्या कळल्या अस वाटतय.. सगळ्या एकदम वाचल्या तर नक्की काय म्हणायचय ते नाही कळत. आदित्य समजावून सांगेलच

निनावे, अब आई ना लाईन पे! आता कस लगेच कमी केलस मानधन!

" मी इथे काल पासून खूप दंगा केला आहे. आता हाताची घडी, तोंडावर बोट. मी काल शिक्षा म्हणून' स्टॅम्प' पण दहा वेळा लिहिल. " :-(

Priyasathi
Friday, January 27, 2006 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यामधली वर्दळ आता घातक होत आहे.
आणि रस्त्यावरून चालणेसुद्धा पातक होत आहे.
गर्दी वाढली तसे इथले रस्तेसुद्धा वाढले,
मधे येतात म्हणून जुने वाडेसुद्धा पाडले.
वढीव रस्तेसुद्धा इथल्या वर्दळीला पुरले नाहीत,
आणि रस्त्याकडेचे फुटपाथसुद्धा चालण्यासाठी उरले नाहीत.
वाहतुक नियंत्रित करण्यासाठी चौकात दिवे जळत असतात,
त्याच्याकडे दुर्लक्ष करून वाहने मात्र पळत असतात.
हिरवा दिवा लागण्यापूर्वीच निघण्यासाठी घाई,
लाल दिवा लागल्यावरही वर्दळ जात राही.
मधला पिवळा दिवा मात्र विनाकारणच जळतो,
दुचाकीवरच्या पुणेकरांना कुठे सिग्नल कळतो....?
वाहतुक नियम कुणासाठी कोडं मला पडतं...
लाल दिवा लागला कि मग माझंच पाऊल अडतं....


पूर्ण करायला वेळ नाही मिळाला........
उर्वरीत कविता नंतर पोस्ट करतो.... मग वाचा...
धन्यवाद.
किंवा मला मेल करा.


Pama
Friday, January 27, 2006 - 11:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रियसाथी, तुमची ही कविता मार्गशीष महिन्यातील Posted on Saturday, December 31, 2005 - 5:06 am: या जागी आहेच.

Champak
Friday, January 27, 2006 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये, हाणा रे ह्या गुर्‍या ला हाणा रे :-) डबल डबल टाकतो तो!!

Adityaranade
Friday, January 27, 2006 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो! प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
कविता काहीशी दुर्बोध झाली आहे हे कबूल करतो
आता या कवितेचा मला अपेक्षित असलेला अर्थ...
ही कविता माणसाच्या जीवनमध्ये जे वैफल्य असते.. अगदी कायमचे अस्तित्वात असते त्याबद्दल आहे
असे हे वैफल्य कोणत्या का वेदनेमुळे असो, निर्माण झाल्याखेरीज कोणीच स्वताचा किंवा जगातील अंतिम सत्याचा) शोध घ्यायला बाहेर पडत नाही. त्यामुळे वेदनेने व्याकुळ झाल्याखेरीज यातले काहीच अनुभवाला येणार नाही
एकदा हा शोध सुरु झाल की तेच आसक्ती आणि विरक्तीला आव्हान आहे
मानवाच्या यात स्त्री पुरुष दोन्ही आले) जगण्यामधील सगळ्यात ठसठसणारे द्वैत असे की आपण मातीतून जन्माला आलो सर्व प्राण्यांप्रमाणे. परंतु आपला अपेक्षित प्रवास मात्र देवत्वाच्या दिशेने, युटोपियाच्या दिशेने असतो.
पण देहाचे भोग हे अटळ आहेत. त्यात वाटणार आनद, उन्माद्; दुख अटळ आहेत. त्यामुळे ते नाकारण्यात अर्थ नाही.तर उत्कट अलिप्त सहजतेने ते स्वीकरण्यात शांती आहे.कुत्र्या मांजराना हे समजावून सान्गावे लागत नाही. समुद्र किनारी डोलणार्‍या झाडालादेखिल.
अर्थात सर्वकाळ अस जगण्याच प्रयत्न हा प्रयत्नच राहील. या तर्‍हेची अलिप्तता कायमची कोणत्याही नात्याला परवडणार नाही.कारण अशा तर्‍हेने विचार करणारे लोक फ़ार विरळा. जग तुम्हाल वेड्यात काढेल.म्हणून चार दोनच क्षण या वार्‍याचे पदरी बांधून घ्यावेत. प्रसंगी उपयोगी पडतात


Adityaranade
Friday, January 27, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hope this clarifies it..

Adityaranade
Friday, January 27, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पर्युत्सुक म्हणजे nostalgic. अळवाची उपमा अशासाठी की त्यावर पाणी पडले तरी पारा घरंगळल्याचा भास होतो

Ninavi
Friday, January 27, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य, समजावून सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आता जरा जरा समजायला सुरुवात झाली. तरीही वैफल्य आल्यावर विरक्तीला आव्हान का हा प्रश्न आहेच. तसंच एकीकडे कुत्र्यामांजरांना ती देवत्वाची ओढ नाही म्हणतोस, आणि तरीही त्यांना ती ' उत्कट अलिप्त सहजता ' साधली आहे असंही म्हणतोस! देवत्व म्हणजे तसं निर्बुद्ध निराकार अस्तित्व नक्कीच नव्हे. आणि ज्याला देवत्वाची ओढ एकदा लागली तो कशाला देहाचे बरेवाईट भोग क्षणिकसुद्धा उत्कटतेने भोगेल?
अळवाच्या पानाचा संदर्भ नेहेमीच्याच वापरातला असल्यामुळे कळला होता, फक्त त्याला पद्मपत्र म्हटल्याचं खटकलं होतं. पद्मपत्राचाही तोच ( अलिप्तता ) विशेष आहे हे खरं.


Adityaranade
Friday, January 27, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी
इथे देवत्व हा शब्द काहीश्या निराळ्या अर्थाने वापरलाय मी
मला अभिप्रेत असलेल देवत्व म्हणजे सर्व गोष्टी, वर्तमान, भूत, भविष्य नियंत्रित करण्याची ताकद
युटोपिया आपण निर्माण करु शकतो हा याच गैरसमजाचा अजुन एक भाग

this concept of all powerful "god" is admittedly more Judeo-Christian than Hindu.
भारतीय तत्वज्ञानात विशेषत उपनिषदांमध्ये असलेला निर्गुण निराकार देवाची सकल्पना बायबल किंवा आपल्याकडील भागवत पुराणांपेक्षा निराई आहे. खर तर जे उपनिषदांमध्ये आहे त्याअ सकल्पनेला देवही म्हणण चुकिच आहे. आपण त्याला आत्मन अणि ब्रह्मन म्हणू

atman is the self whereas brahman is the universal energy present within each one of us, the same energy that created life.
so the whole point of upnishads as far as I know is how to get to brahman from atman..and that is done through meditation etc. according to upnishads and the later yoga parampara.and BTW even upnishads say that reaching this brahman stage can at best be a few moments..so there you go!
anyhow..I guess i am digressing a bit here from the main topic.so I better stop

Bee
Friday, January 27, 2006 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Adityaranade , कविता जरी कळली नाही तरी ती कुठे तरी मनात रेंगाळते आहे. आज ना उद्या गर्भित अर्थ कळेल. असो.. ही तुझी पाहिलीच कविता मी वाचतो आहे. तू तुझ्या असतील नसतील सगळ्या कविता इथे पोष्ट कर पाहू...

Hems
Friday, January 27, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाड,शेवटचं कडवं छान आहे

Adityaranade
Friday, January 27, 2006 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, धन्यवाद!!!
अजुन काही कविता पोस्ट करित आहे

तुझ्या आगमे

तुझ्या आगमे
संदर्भ हरवले
आरक्त सायंकाळी
ओठ जे विलगले

आठवणींची पाखरे
भिरभिरली थरथरली
दिशाहीन रानी
पाय जे थबकले

सुरांत मिसळले
गंध अन स्पर्श
अद्वैत त्यांचे
आज मज उमगले


Adityaranade
Friday, January 27, 2006 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सांजवेळा

सांजवेळा का अशा घेऊनी आल्या तुला
सूर ओळखीचे का गोठवीती मजला

उतरले कवडसे उन्हांचे, श्वास थकले जुन्या वादळांचे
जुनी तू आणि नवा मी, अर्थ चुकले तुझ्या आरशांचे
तू परतुनि जा, दु:ख नवे हवे ते मला

तुझियापाशी ठेव तुझा किनारा, भोगू दे मला माझा वादळवारा
नको इंद्रधनुष्य तुझे, आणि नको मला तुझिया स्मिताचा उबारा
हवी मला अशी माझी वेदना, या कातर वेळा

सांजवेळा का अशा घेऊनी आल्या तुला
सूर ओळखीचे का गोठवीती मजला


Adityaranade
Friday, January 27, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW सांजवेळा हे गीत म्हणून लिहिलेली कविता आहे
कोणाला हवे असल्यास माझ्याकडे याचे रेकोर्डिंग सी डी वर आहे
चाल व गायन माझे आहे

don't tell me I didn't warn you beforehand!:-)

Adityaranade
Friday, January 27, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाट

अशी वाट ती दूर जावी
दूर त्या, त्या नभाला जी मिळावी

वस्त्र दिशांचे गळावे, मुक्तता पारव्याची मनी
हवेतुनि येई झपूर्झा, आणि कानी वेणूचा ध्वनी

झाडांचे निष्पर्ण फुलोरे, निळाई नभी दाटते
नको सुख कालचे, अन दु:ख नको आजचे
अशी वाट का अस्फुट होई

हलके होई धुके दाटलेले, बिलोरी ऊन पडे कुठुनि
निसटुनी जाती, धरता हाती, भाव-तरंग पाण्यातुनी

अशी वाट ही दूर जावी
शिशिरामधुनी हेमंती साज घेई


BTW this was also written as a song and I have it on a CD as part of a collection

Bee
Saturday, January 28, 2006 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Aditya, ur songs are pretty nice. Poems are also nice. Send ur songs :-)

Niru_kul
Saturday, January 28, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण काही कविता लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.
काही चारोळ्या पाठवत आहे.

आज आपल्या नात्याला, मी नवे नाव दिलय्;
आज तुझ्या निशेसाठी, मी स्वप्नाचे गाव दिलय.

तू मोहक हसतेस,
तेव्हा मी हरख़ुन जातो;
भोवतालचे जग, अगदी विसरुन जातो;
तुझ्या हास्यासारख़ेच र्निभेळ, प्रेम मला देशील का?
पुन्हा एकदा, फ़क्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

मनातल्या भावना,
कागदावर उतरतात;
लोकाना उगीच वाटते,
मला कविता करता येतात.


Niru_kul
Saturday, January 28, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेव्हा तुझ्या ओठावरच्या,
मोहक हास्याला बहर येतो;
खरं सागू तेव्हा,
तेव्हा सौन्दर्याचा कळस होतो.


Vaibhav_joshi
Sunday, January 29, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षणभंगूर ...

क्षणभंगूरच असतं जीवन ... अस्तित्वात येणारया प्रत्येक क्षणाचं
क्षणात जन्मायचं .. क्षणभर नांदायचं , निघून जायचं
तरीही जीवन जगण्याची प्रचंड उमेद घेवून येतो प्रत्येक क्षण
कित्येक जीवनांवर स्वतःचा ठसा उमटवून जातो प्रत्येक क्षण
कधी आनंद , कधी दुःख , कधी समाधान अन शांतता ...
ओंजळीतलं दान आहे तस देवून जातो .. स्वतःलाही न फ़सवता
फ़रक असतोच तर तो असतो दान स्वीकारणारया हातांमध्ये -
- जे शोधत राहतात फ़रक , आधीच्या अन आत्ताच्या दानामध्ये
असे लाखो क्षण रोज आपल्या प्राक्तनात लिहीलेले
अन त्यातले कित्येक , तसेच अस्वीकार ... आले तसे गेलेले
शेवटी निघताना मनावरती मोजक्या क्षणांच आभूषण उरतं
अन जीवनाच्या माथी उगाच " क्षणभंगूर " नावाच दूषण उरतं


वैभव !!!


Shyamli
Sunday, January 29, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुला मागे कुणितरी शब्द्ववैभव अस म्हणल होत
अगदी खरय ते


Ninavi
Sunday, January 29, 2006 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मीच म्हटलं असेल! ( इतकं खरं दुसरं कोण बोलणार! )
वैभव,

Sarya
Sunday, January 29, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा छानच... बर्‍याच दिवसांनी परत आलोय... छान वाटतय... sarang23 पेक्षा sarya जरा जवळचा वाटतो म्हणून हा बदल... शेवटी काय परिवर्तन ही संसार का नियम है...
*अगदी याच वाक्याला स्मरून दुरदर्शनवरची संसार मालिका आणि इतर सर्व मालिका ज्या, संसार शब्द वापरत, त्या चालत असतात... दर एपिसोडला नविन काहितरी...*:-)


Zaad
Monday, January 30, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे तिने स्वत:हूनच
तिच्या देहाचं शिल्प
माझ्या मिठीत रचून ठेवलं होतं...
आणि मी...
एखाद्या जीर्ण देऊळाच्या गाभा-यातल्या अंधारासारखा
तिला बिलगून राहिलो...
पुढे भाविकांची गर्दी वाढत गेली.
समईत तेल पडत गेलं...
आणि मी...
एखाद्या जीर्ण देऊळाच्या भिंतीवरल्या उडून गेलेल्या रंगासारखा
हळूहळू दिसेनासा झालो...
तसे तिने स्वत:हूनच
तिच्या देहाचं शिल्प
माझ्या मिठीत रचून ठेवलं होतं...


Muktrasika
Monday, January 30, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज अचानक त्या वळनावर
मन लागले परत फिरु,
आठवणीन्चे घेऊन ओझे
नयन लागले परत भरु....

या नयनान्तील अश्रू वाहता
कोण पुसे या नयनान्ना?
वेदना हि देई यातना
त्यास विचारी मग कोण आता?

असेच विचार करता-करता
ह्रुदय दाटूनी येई सदा
पण मग भविष्य दिसता सुन्दर
आशा जगण्याची फुले जीवा.


Vaishali_hinge
Monday, January 30, 2006 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अगदी खरय मनावर आभुषण ग्रेट..!

Vaishali_hinge
Monday, January 30, 2006 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षणभंगुरच असते जीवन,
क्षण येतो काही आठ्वायला काही क्षण मागे ठेवुन जातो,

या जगण्याची, य जन्माची क्षण्भंगुरता जाणवुन....
परत पुढच्या क्षणात येते मनात तिच विरक्ती,

खरतर प्रत्येक क्षण घेउन येतो...
त्याच स्वतंत्र अस्तित्व.......
मग का वेड मन स्वताच्या प्राक्तनावर शका घेत?

तो ओंजळीत ठेउन जातांना लक्ष क्षण,
कुजबुजतो कानात.........
य स्रुष्टिवर कुणिही नाही माझ्या दानापासुन पारखे,
दिलेत काही ओबड्धोबड अन काही गुळ्गुळित,
पण आहेत सगळ्यंना सारखे......

लक्ष मोलाचे आंदण आम्ही सांडत राहतो,
त्याने संगितलेले विसरुन जातो,
ओबड्धोबड क्षणांना घडवण्याआधी उपभोगाया ओरबडायला जातो,
तो आहे तस देउन गेलाय....

फ़रक आहे घेण्यारयाच्या हातात कीति ताकद आहे ते पेलण्याची,
ज्याच्या हातात जितकी निर्मीती
तितके त्याच्या क्षणांचे सुंदर शिल्प,

असे लाखो काळाचे ३४;बिंदु&#३४;
ज्याने ३४;आयुष्य&#३४; हे ३४;अक्षर्&#३४; बनले,

कित्येक त्यातले नकोसे वाटले,
कित्येक रोमारोमात सामाउन गेलेत,

जिंकलेल्या क्षणांना परतपरत आठ्वले...
हरवलेल्या क्षणांन खोलखोल गाडुन टाकले

काही क्षणांना जगापासुन लपवुन,
मनाच्या कुपित रुजवीत ठेवले

काही क्षणांनी स्वप्नांचे रंगिबेरंगी आभास बघीतले,
कधी काळाच्या झेपेने क्षणभर

झोप उडाली......

काही क्षण ३४;जगण्&#३४; बनुन समोर आलेत,
तर काहीक्षणात म्त्रुत्यु पाउन माझे अस्तित्व अंतर्धान पावले,

कधी रेटलेत काही क्षण,
कधी हव्यास केला त्यांना धरुन ठेवण्याचा......

कधी व्याकुळ झाले क्षणाक्षणांनी,
कधी हरवले त्यात, कधी सापडला दवबिंदुत प्रतिबिंबत, कधी
माळरानावर मोकळा आल्हाद!

जगण्याच्या आसक्तिची धरुन आस,
शोधत राहीले दाही दिशा, ते क्षण सापडले
माझ्याच अंजलीत.........

जाणवले मनाची पाटी कितीही
ठेवली कोरी तरी
काही क्षणांनी मजबुत केलेली असते आशेची चिवट दोरी....
जिने पुन्हा पुन्हा जगण्याची जिद्द मनाशी बंधुन टाकलेली,
मनावर उठते ज्यांचे गोंदण अश्या मोजक्यांचेच अस्तित्व उरत जे जगण्यासाठी पुरत!

आयुष्य संपता संपता स्पर्शतात काही क्षणांची शिल्पे मनासारखी
आखिव रेखीव परीपुर्ण काही अर्धवट राहिलेली,,, काही टाकलेली,
काही नावाजलेली तर काही तशीच ओबड्धोबड.... ज्याच्या अस्तिवाकडे कधी लक्षच गेले नाही अशी.......
घडवायची राहुन गेलेली...........


Devdattag
Monday, January 30, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव उत्तम
वैशालीजी मस्तच
आदित्य सांजवेळा?


Priyasathi
Monday, January 30, 2006 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नविन कविता...

घर झालंय वादळशान्त...
सुन्या झाल्यात भिन्ती
संवाद गेलेत हरवून...
आणि मुकी झालेत नाती.१
येण्या-जाण्या पुरतंच...
काम उरलंय दाराचं
सोफा खुर्ची याना....
ओझं झालंय भाराचं.२
स्वयंपाकघरात फोडणीचा....
दरवळत नाही वास
आणि कुणासाठी कुणाचा
इथं अडकत नाही घास ३
दिवाणखाना वाट बघतोय....
आता कुणाचं पाऊल येतंय
घर भयाण शान्ततेची
कळत नकळत चाहूल देतंय ४
आता घरच येईल प्रत्येकाच्या..
अंगावरती उसळून
भिन्ती शाबूत असूनसुद्धा...
छप्पर जाईल कोसळून.५
कोन्डलेल्या भावनाना त्याआधीच...
मोकळी वाट करावी लागेल
घुसमट होत राहिली तर...
वेगळी वाट धरावी लागेल.६
देवा अशी घरघर...
माझ्या घराला लागू नये
घरानेच शेवटी आधारासाठी....
दुसरं घर मागू नये.७
प्रेम जिव्हाळा, आपुलकीनं...
ओथंबलेलं घर हवं
प्रत्येकाला आधारासाठी...
आपलं असं घर हवं.८

गुरुराज गर्दे.
मोबा.९२२५५२२९८८


Mavla
Monday, January 30, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदित्य, निरज,वैभव जी, वैशाली जी,झाड,गुरुराज सगले solid कविता करताय. हे पान मस्तच सजवुन टाकलय, सुन्दर कवितांनी
लगे रहो....


Pama
Monday, January 30, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदित्य, गुरुराज, झाड नीरज.. छान आहेत कविता..
वैभव आणि वैशाली.. दोघांनी खूप सुरेख लिहिलय..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators