Gajanan1
| |
| Monday, December 19, 2005 - 9:14 am: |
| 
|
एका आमदाराच्या जवळ्च्या नातलगाने लिहिलेले अश्लील चारोळ्यान्चे पुस्तक कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळाना सक्तीने विकत घ्यायला लावले..... या परिस्थितीवर केलेली कविता..... डोहाळे..... तुकोबा म्हणाले ज्ञानोबाना चारोळ्यान्चा आला जमाना व्यर्थ आपले अभन्ग ज्ञानोबा शिक्षणात आला ख़ेळ्ख़न्डोबा' शाळकरी आणि माळ्करी आपल्या रचना वाचत होते. सन्स्काराच्या पथावरी आनन्दाने नाचत होते. आता कुठले अभन्ग आणि कुठली ओवी 'दिपका' शिवाय न उरला कवी पन्तान्च्या आर्या फ़ेका सगळ्या मुलाना देवू अश्लील चारोळ्या बालकवीन्ची सम्पली सद्दी कुसुमाग्रजान्ची झाली रद्दी फ़ुलराणी आणि फ़ुलपाख़रे आता विसरायचे सारे ब ब बाईचा च च चोळीचा वर्गावर्गातून घुमवा सूर 'शान्ताबाई' आणि बहिणाबाई' शाळा सोडून पळा दूर काव्य शास्त्र विनोदाचे आज सोहाळे सम्पले आणि शिक्षणाला अश्लील चारोळ्याचे आता डोहाळे लागले.
|
Paragkan
| |
| Monday, December 19, 2005 - 1:02 pm: |
| 
|
Good one re !
|
गजानन, एकदम मार्मिक कविता ...
|
गजानन, एक्दम छान रे
|
Devdattag
| |
| Tuesday, December 20, 2005 - 4:58 am: |
| 
|
गजानन मस्त आहे. गौरवर्णी कमलाक्षी ती गालावरती हास्य खरे, पदर रेशमी कुंतलांचा पाहूनी तिजला मोद भरे मिटलेल्या ह्या अधरांमधूनी उष्म ओलेता श्वास फ़िरे धुन्द शराबी नयन का हे काळजामध्ये हा शर शिरे असो मेनका असो रंभा ही हिच्यावरुनी ना नजर सरे लावण्यवती हीच कामिनी तिला पाहण्या हा मदन झुरे
|
Milya
| |
| Tuesday, December 20, 2005 - 5:52 am: |
| 
|
गजानन : मस्तच. एकदम सही Tolaa
|
गजनन, खूप छन, बापू
|
Mmkarpe
| |
| Thursday, December 22, 2005 - 12:38 am: |
| 
|
माननीय खासदारांच्या पराक्रमावरुन सुचलेली..... आत्मसन्मान एक काळ असा होता आपल्या देशातही चारित्र्याला मान होता प्रत्येकजण त्यालाच जिवापाड जपत होता आता काळ बदललाय त्याचा'भाव' उरला नाही सरकारी कचेरिपासुन लोकशाहीच्या मंदिरापर्यन्त कुठेच'आत्मसन्मान' उरला नाही.
|
Devdattag
| |
| Thursday, December 22, 2005 - 2:55 am: |
| 
|
मुखचंद्र पाहतांना चंद्र हा झाकोळला मुखचंद्र पाहतांना चंद्र हा झाकोळला तो रविकरही होता म्हणे त्याच्यावरी भाळला हाय त्या नयनांनीही तीर ऐसा मारला हलकेच मान झटकूनी कलिजा अमुचा जाळला शपथ घेतो आम्ही आजवरी तो मार्ग होता टाळला बजरंगाचे नाव घेउन नेम ब्रम्हचर्याचा पाळला परि आज केसात तिने गजरा ऐसा माळला परिमळास काय पर्वा कोणी आसु आहे ढाळला निशा कित्येक आल्या परि मुखचंद्र ना डागाळला पहा, मुखचंद्र पाहतांना चंद्र हा झाकोळला
|
Champak
| |
| Thursday, December 22, 2005 - 10:35 am: |
| 
|
चंद्राचे वजन 10 raise to 22 kilogrmas इतके असते! तव्हा चंद्र स्वप्नात आणताना सावध झोपत जा !
|
Mmkarpe
| |
| Sunday, December 25, 2005 - 2:43 pm: |
| 
|
ईमान विकणे आहे! पेपर वाचता वाचता सहज नजर पडली 'ईमान विकणे आहे'ची जाहीरात होती झळकली. जाहीरात वाचुन आमचिही असुया खवळली ठरवल या महाशयांना अद्दल घडवुया चांगली या बेइमान दुनियेत हा इमानी प्राणी कोण? शोध लावायला लगेच रागातच उचलला फोन विचारले त्याला असे काय इमानाने तुझे घोडे मारले की तू इमानच विकायला काढले तो म्हणाला'इमान हातात घेउन दारोदार भटकलो पुर्या दुनियेच्या हास्याचे साधन बनलो इमानाला आजवर जिवापाड जपलो त्याला जपण्याच्या नादातच सर्वस्वाला मुकलो' शेवटी विचारले त्याला काय लावलेस तू इमानाचे मोल.. टेबलाखालुन घेणार असशिल तरच बोल. तो ओरडला जमणार नाही आपल्याला फसवेगिरी इमानाच्या सौद्यात तरी दाखवा थोडी इमानदारी.
|
करपे,छान रे.. काहीच्या काही मध्ये टाकली असलीस तरी एका बोचर्या कटु सत्याची जाणीव करून देणारी कविता आहे ही..
|
Jo_s
| |
| Monday, December 26, 2005 - 12:18 am: |
| 
|
कर्पे छानच, विकण्या एवढे ईमान आहे म्हणायचे. . . . कविता बीबी मधे हवी होती.
|
Champak
| |
| Monday, December 26, 2005 - 3:50 am: |
| 
|
छान कविता आहे रे कर्पे.... !
|
Paragkan
| |
| Monday, December 26, 2005 - 1:09 pm: |
| 
|
वाह कर्पे, रचनेतली सहजता आवडली.
|
पाहिले तुला जातांना जखमांना आली जाग सुकलेल्या वनराईला लागली पसरती आग या आगीच्या लाटेत जाहली सुखाची वाफ शेवटी फक्त राहीली तुझ्या स्मरणांची राख तुषार जोशी, नागपूर
|
Ninavi
| |
| Monday, December 26, 2005 - 1:55 pm: |
| 
|
तुषार, छान लिहिलंयस. पण ही इथे का?
|
इथे का? कारण पहिल्या चार ओळीत जे साधलय त्याची सर दुसर्या चार ओळींना आणता आली नाही ना मला म्हणून ही जागा निवडलीय. तुषार, नागपूर
|
Ninavi
| |
| Monday, December 26, 2005 - 2:21 pm: |
| 
|
एवढंच ना, मग पुन्हा बघ प्रयत्न करून. आणि जमल्या(जमून आल्या) की टाक'योग्य' बीबीवर.
|
काहीच्या काही अपेक्षा) पहायचय मला वैभवाला' ही संयम' सोडुन लिहीताना, आणखी आपुल्या बापुना' 'तारुण्यावरही' लिहीताना. 'निल्या,पमा,निनावी' छानच लिहीता प्रेमकविता, होउदे तव कविगर्जना' थरारुदे आसमंत आता. वाट पाहु सांग कितीरे सारंगा' तव गझलांची, कराल का हो इछ्छापुर्ती तुमच्या वेड्या रसिकांची.
|
ह्म्म्म ! रामचंद्रा ! संयम सोडायला सांगतोय . इथे जितका शक्य आहे तितका सोडून पाहतो रे दोस्ता ... जवानी .... तुझ्याही नकळत यंदाचा वसंत येवुनी गेला भल्याभल्यांना मोहवणारे सौंदर्य देवुनी गेला क्षणार्धात त्या डोळ्यांमधले भाव बदलले कसे ? फ़ूल उमलले आसपास भ्रमरास समजले कसे ? रंग तुझ्या त्या गालांवरचा रक्तिम होवुन गेला रसरसणारया ओठी कोण डाळिंब ठेवुनी गेला नखरेल अश्या त्या चालीवरती गाव लागले झुलु डचमळणारया कळशीमधुनी नीर लागले झरु कटाक्ष तिरका थेट मनाचा वेध घेवुनी गेला एक एक ती अदा पाहुनी जीव खुळावुन गेला असो सखे तू जपुन रहा हा मौसम असतो ओला कोरड माझ्या ओठी अन तू तुडुंब भरला प्याला वैभव !!!
|
Ramani
| |
| Tuesday, December 27, 2005 - 4:31 am: |
| 
|
वैभव, असो सखे तू जपुन रहा हा मौसम असतो ओला कोरड माझ्या ओठी अन तू तुडुंब भरला प्याला खासच!!
|
Devdattag
| |
| Tuesday, December 27, 2005 - 4:43 am: |
| 
|
वैभव खुप मस्त आहे..
|
अय, हाय.......... वैभव......जालीम मार डाला.. काय कविता आहे अरे...... तुला खरंच कुठुन सुचतय एव्हढं..... लाजवाब.......... जबरीच लिहीलंयस. रामचंद्रांचं ऐकुन तु संयम सोडलास याबद्दल त्यांना धन्यवाद देउ की तुला?
|
Sarang23
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:33 am: |
| 
|
आयला रे...!!!!!!
|
Sarang23
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:36 am: |
| 
|
रामचंद्रा सहीच रे...
|
Aaftaab
| |
| Tuesday, December 27, 2005 - 3:39 pm: |
| 
|
वैभवा एकदम जबरदस्तच रे
|
Chinnu
| |
| Tuesday, December 27, 2005 - 5:31 pm: |
| 
|
.... वैभवा छान रे!
|
वैभवा,माशा आल्या रे बहोत खुब
|
वैभवा एकदम जबरी.... रामचन्द्र धन्यवाद... आता बापु....सारंग... वाट पहातोय लवकर येउदेत
|
वैभवा, सुरेख,एकदम जबरी, विनंतीला मान दिल्याबद्दल धन्यवाद,
|
Milya
| |
| Wednesday, December 28, 2005 - 1:49 am: |
| 
|
वैभव : कुठल्या शब्दात दाद देउ सुचत नाहिये...
|
Sarang23
| |
| Wednesday, December 28, 2005 - 4:35 am: |
| 
|
रामचंद्र, तुमची काही च्या काही इच्छा इथे पुर्ण केली आहे.
|
Devdattag
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:06 am: |
| 
|
एक विडंबनाचा प्रयत्न.. CBDG मुळ गाणे.. मलमली तारुण्य माझे खडबडी आयुष्य माझे, तु मुक्याने सांभळावे मोकळ्या चुलीत माझ्या, तु आगीला पेटवावे लागुनी भांडी बुडाशी, काजळीही यावी अशी ही राजसा भांड्यास तू अन मी कपड्यासी धुवावे फुटलेल्या त्या गडूची धार उंचावून यावी डागही देउन तांब्याचे, त्यास तू वापरावे थांबुनही वाटेत तुझ्या, कपबशी रोज द्यावी रे तुला वाटे चहाच्या, मी कपाही चुंबुन द्यावे
|
धन्यवाद दोस्तांनो ... देवदत्त ... राजसा भांड्यास तू .... .. सहीच
|