|
Sarang23
| |
| Thursday, December 29, 2005 - 5:58 am: |
| 
|
ते तुला सांभाळावे अस म्हणायच आहे का? व्याकरण गंडले आहे पण बाकी कविता म्हणुन छान.
|
Devdattag
| |
| Thursday, December 29, 2005 - 6:42 am: |
| 
|
धन्यवाद वैभव, सारंग.. सारंग शुद्धलेखनातली चुक.. व्याकरणात पहिल्यापासून..खरेतर पहिलीपासून कच्चा.. धन्यवाद
|
Gajanan1
| |
| Saturday, December 31, 2005 - 8:51 am: |
| 
|
ही कविता माझे मित्र डॉ उमेश कळेकर यान्ची आहे. कैफ़ियत [कुणाची?] ..... पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. पहिल्यान्दा आलो तेव्हा ताठा माझा भारी कडक कॉलर, रोज दोनदा बूट काळे करी आता वाटते उगाच ताठलो पुरी हौस फ़िटली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. पहिले आले सारे फ़ुकटे सगे आणि सोयरे वाटले जाऊ दे पहिला डाव भुताचा आहे रे! कसले काय कितीक आले आणि गेले, तरी ड्रॉवर माझा खाली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. समाज सेवा, रुग्ण सेवा, ईश सेवा, उच्च उदात्त सारे सुरुवातीचे विरुन गेले दिवसागणिक वारे 'वीस रुपयान्ची करमणूक' हीच किमत त्वा माझी केली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. औषधान्चा खर्च भारी.... वाढता वाढे 'म्होरच्या बिलाला' 'येत्या पगाराला' हेच तुझे रडे तुझ्या नावानी उधारीची वही सारी भरली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. आता मात्र मी झालो शहाणा पुरे झाला हा तुझा बहाणा 'कमिशन'ची ट्याक्ट गड्या मला आहे गावली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. स्पेशालिस्टान्चा जमाना आजचा इकडे जा, तिकडे जा, तिकडून आणि पलीकडे जा.. धन्दा माझा ट्राफ़िक पोलिसाचा स्पेशालिस्टान्चा एजन्ट हीच ओळख माझी उरली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. आता दवाखान्यात कधीतरीच असतो मी तरी शान्त झोपतो मी [ लोक विचारतात..] दवाखाना थन्ड आणि खिसा गरम ही काय जादू जाहली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. गाडी बन्गला मोबाईल सारच आहे आता तुझ्यामुळेच झालो मी प्रोफ़ेशनल' पुरता फ़्यामिली डॉक्टर ही कल्पना मी मोडीत आहे काढली पेशन्टा तुझ्याचसाठी गोळ्या सुई आणि डिस्टील वॉटरची बाटली.. डॉ उमेश कळेकर... शिरोळ जिल्हा कोल्हापूर
|
रुसवा .... हे रुसणे अन धुसफ़ुसणे तुज शोभुन दिसते छान गौरगुलाबी चर्या ! " अबोली " बंड निशाण ! लटकेच पाहणे रोखुन नयनांची कमळे दोन वार फ़ुलांचे झेलुन सुगंधित होते जान लढण्यासाठी म्हणुनी तु पदर खोचुनी घेशी दिलखेचक दोन्ही शस्त्रे , तलवार अन तिची म्यान पुन्:पुन्हा रागाने चावणे ओठ तो हलके हमखास उमटतो येथे हृदयावर आमच्या व्रण दूर दूर राहुनी आणखीच वाढते प्रीती तकलादु झाकण ठेवुन उकळीस येई उधाण अन रुसवा सोडणे ऐसे उपवास जणू सोडावा आधीच जीव व्याकुळला , ताटात पंचपक्वान्न वैभव !!!
|
Chinnu
| |
| Monday, January 02, 2006 - 12:26 pm: |
| 
|
पंचपक्वान्न! अहा!! वैभवा, असला रुसवा चित्तरवणे केवळ तुलाच जमेस भो! अबोलि-बंड निशाण!! लयी आवडले रे..
|
|
|