Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 19, 2005

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » मार्गशीर्ष » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through December 19, 2005 « Previous Next »

Athak
Saturday, December 10, 2005 - 12:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव , जबरी , आमचे पोट दुखले तरी चालेल असाच भडीमार करत रहा :-)

Sarang23
Monday, December 12, 2005 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबर्‍या रे वैभव... पण पुढच्या आठवड्यात काय करणार?:-):-):-)

Pkarandikar50
Monday, December 12, 2005 - 9:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणालो, म्हणून म्हणाले
-----------------

'नाही येत' म्हणालो,म्हणून मला माझे मित्र म्हणाले
मला ते स्वार्थी म्हणाले, आत्मकेन्द्री सुद्धा म्हणाले.
तू तुसडा, तू माणूसघाणा, मित्र मला रागे भरले.
'गावात पाउस किती पडलाय, बघून येउ या,
आम्ही निघालोय, तू पण चल." मित्र म्हणाले.
घराचे छप्पर माझ्या, चहूकडून पार उसवलेले,
जिकडे तिकडे थारोळी, गळतीला थार नव्हता.
काय करणार होतो मी, गावातला पाउस पाहून?
"मला नाही यायचे" म्हणालो, म्हणून काय झाले?
तसे म्हणालो म्हणून मित्र काय वाट्टेल ते म्हणाले.

बापू करन्दिकर

Pkarandikar50
Monday, December 12, 2005 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणालो, म्हणून म्हणाले
-----------------

'नाही येत' म्हणालो,म्हणून मला माझे मित्र म्हणाले
मला ते स्वार्थी म्हणाले, आत्मकेन्द्री सुद्धा म्हणाले.
तू तुसडा, तू माणूसघाणा, मित्र मला रागे भरले.
'गावात पाउस किती पडलाय, बघून येउ या,
आम्ही निघालोय, तू पण चल." मित्र म्हणाले.
घराचे छप्पर माझ्या, चहूकडून पार उसवलेले,
जिकडे तिकडे थारोळी, गळतीला थार नव्हता.
काय करणार होतो मी, गावातला पाउस पाहून?
"मला नाही यायचे" म्हणालो, म्हणून काय झाले?
तसे म्हणालो म्हणून मित्र काय वाट्टेल ते म्हणाले.

बापू करन्दिकर

Nilyakulkarni
Monday, December 12, 2005 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय बापु....एकदम सही
वैभव नेहमी प्रमाने ग्रेट्च


Sarang23
Monday, December 12, 2005 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापु, कविता खरच काही च्या काही आहे:-) येवु द्या...

Pkarandikar50
Tuesday, December 13, 2005 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्नपत्रिका
-------------
परीक्षेची फी भरली का?
'फॉर्म' मिळला का?
सीट नम्बर कुठे आलाय?

पहिला प्रश्न अनिवार्य,
बाकीचे सगळे ऐच्छिक.

वेळ पुरला का?
पुरवण्या किती जोडल्या?

निकाल केव्हा लागणार?
फेरतपासणीची सोय आहे का?
अर्जासोबत फी किती लागते?

फी याच जन्मात भरायची का?
अर्जाचा निकाल केव्हा? पुढल्या जन्मात?

बापू करन्दिकर.


Raahul80
Tuesday, December 13, 2005 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त...

पन हा शेवटचा प्रश्न थोडा खटकला... तो काहीतरी आत्महत्येचा प्रकार वाटत आहे.


Pkarandikar50
Wednesday, December 14, 2005 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल,
धन्यवाद.
ह्याच नव्हे, पण कोणत्याही कवितेचा ज्याला जो अर्थ काढायचा असेल त्याने तो काढावा, असे माझे पक्के मत आहे.
'प्रश्नपत्रिके'च्या सन्दर्भात, माझ्या दृष्टिने तरी, शेवटच्या प्रश्नामुळेच, काही वेगळे अर्थ काढण्याच्या शक्यता निर्माण होतात. अन्यथा, ही एक 'काहीच्या काही' कविता एव्हढीच राहील, तीच्यातल्या प्रश्नान्ना सबन्ध आयुष्याचे एक व्यापक परीमाण मिळणार नाही.
हे प्रश्न काही फक्त विद्यार्थिदशेतच उद्भवत नाहीत, काही वेगळ्या
अर्थाने आणि सन्दर्भाने, असेच प्रश्न वारम्वार उभे राहतात, हे मला सुचवायचे होते.तुला शेवटच्या प्रश्नात, आत्महत्येच्या प्रकाराचा 'वास' आला असेल तर त्याबाबत मी काहीच भाष्य करू शकत नाही. मला नकळत, तसे घडले असेल, एव्हढेच मी म्हणेन.
बापू.

Sanjuda
Wednesday, December 14, 2005 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

breking nyooja
baatamyaachyaa cha.cnelavar breking nyoojachaa suroo hotaa daNakaa
aishwaryaachyaa laaDakyaa kutryaalaa mhaNe suroo jhaalyaa shinkaa
saangat hotee nivedikaa divasabhar viShay haach aaj daLaayachaa
kahee jaaIegaa mat ,aishachaa kutraach aaj divasabhar chaghaLaayachaa
hungat hungat aamachaacha baatameedaar sarvaaaadhee pohochalaa
baaIT aishachyaa kutryaachaa aamheech agodar ghetalaa
boloo thoDyaach veLaat aapaNa eksaparT Daa.ckTaraashee
jaaNoon gheU tyaanchyaakaDoon shink yaalaa aaleech kashee ?
baa.cleevooDavar aaj pasaralee dukhaa:chee chhaayaa
salloo aaNi vivekachyaa aikoo aataa pratikriyaa


}ब्रेकिन्ग न्यूज
बातम्याच्या चॅनेलवर ब्रेकिन्ग न्यूजचा सुरू होता दणका
ऐश्वर्याच्या लाडक्या कुत्र्याला म्हणे सुरू झाल्या शिन्का
सान्गत होती निवेदिका दिवसभर विषय हाच आज दळायचा
कही जाईएगा मत ऐशचा कुत्राच आज दिवसभर चघळायचा
हुन्गत हुन्गत आमचाच बातमीदार सर्वाआधी पोहोचला
बाईट ऐशच्या कुत्र्याचा आम्हीच अगोदर घेतला
बोलू थोड्याच वेळात आपण एक्सपर्ट डाॅक्टराशी
जाणून घेऊ त्यान्च्याकडून शिन्क याला आलीच कशी
बाॅलीवूडवर आज पसरली दुखा:ची छाया
सल्लू आणि विवेकच्या ऐकू आता प्रतिक्रिया



Sarang23
Wednesday, December 14, 2005 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा, सन्जुदा सहीच... :-)

Chinnu
Wednesday, December 14, 2005 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है संजुदा. फ़ारा दिसान्नी दिसलास.

Divya
Wednesday, December 14, 2005 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव गेम आनि केबीसी सहीच, अफ़लातुन कविता करता तुम्ही

Champak
Thursday, December 15, 2005 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमचा टाॅमी आजारी हे, हे चंपी ने सांगितले च न्हाई कि मला! बघतो च:-)

Moodi
Thursday, December 15, 2005 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीरे संजुदा
काय रे चंपक अशी तुझी चंपी? चांगली चंपी कर तिची फोन करुन.


Pama
Thursday, December 15, 2005 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संजूदा, सहीच.. ही न्यूज माहीतच नव्हती!!

Paragkan
Thursday, December 15, 2005 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास रे संजुदा !!

Devdattag
Thursday, December 15, 2005 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम

काय सांगू तुम्हास
किती खुबसुरत हे प्रेम हो
आधी हसले कुणी
ह्याचाच फ़क्त ब्लेम हो

लाजून हासणे तिचे
ते ही किती जालिम हो
त्याचे हसणे मात्र
एकदम कोलगेट फ़ेम हो

त्याने डोळे मारणे
अगदी हिरोसारखे सेम हो
आणि तिच्या भिरभिरणार्‍या पापण्यांचा
नयनरम्य गेम हो

करते ती नयनाचे बाण
चुके न कधी तिचा नेम हो
ह्या बाणांसठीच त्याने केली
हृदयाची डार्ट फ़्रेम हो


Sarang23
Friday, December 16, 2005 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे क्या बात है भाई देवदत्त! झकास.

Mmkarpe
Friday, December 16, 2005 - 7:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त मस्त आहे कविता.

प्रेमाचा खेळ...

मी जानुनबुजुन करत नसतो
पण.. तिने भेटायला बोलावल्यावर
हमखास उशीर होतो.
माझं तिच्यावर प्रेमच नसल्याचा
तिला भास जरुर होतो.
ती म्हणते'पुरे तुझे जुने बहाणे'
सांग खरेच की'आता आवडत नाही येणे'
तू वेळेचा किती पक्का
माहीत आहे बालपणापासुन
तुझे टाइमटेबल हमखास चुकते
मी बोलवायला लागल्यापासुन.
मग तिला समजावण्यातच
निघुन जातो सारा वेळ
असा हा आमच्या प्रेमाचा खेळ.


Pkarandikar50
Friday, December 16, 2005 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त,
छान. सन्दिप खरेच्या 'प्रेम' ह्या 'मिन्ग्लिश' भाषेतल्या ह्याआ 'मिन्ग्लिश' भाषेतल्या कवितेची आठवण झली.
बापू

Vaibhav_joshi
Friday, December 16, 2005 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवघड आहे!!!

असे काय बोलतो म्हणूनी खवळते माझी प्रिया
का सत्य ऐकूनी ऐसे तीन ताड उडे ही प्रिया

ती मला रिझविण्यासाठी ऑरगंडी नेसे साडी
मी सहज बोलूनी जातो भलतीच वाढलिय जाडी
क्षणांत ती अभिसारिका भासे का कैदाशीण
का रात्र रंगण्याआधीच होवुनी जातसे वैरीण
प्रेमळ सल्ल्यासही कैसे टोमणा समजते प्रिया
असे काय बोलतो म्हणूनी खवळते माझी प्रिया

कुणी सुंदर ललना दिसता कौतुके म्हणतो लव्हली
असा मुळीच नसतो भाव जाळ्यात मासोळी गावली
रस्त्यातील गर्दीदेखील " लव्हली " ची बाजू घेते
ही म्हणते मजला चला!आता घरी तुम्हाला बघते
निर्हेतुक कौतुक देखील ऐकून चिडे ही प्रिया
असे काय बोलतो म्हणूनी खवळते माझी प्रिया

कधी दत्त म्हणूनी येती सासरचे लोक अचानक
मी म्हणतो तुम्ही खरोखर शोभता घराचे मालक
मी मनापासूनी म्हणतो पण होई किती कांगावा
उलट पावली निघती ' आम्ही जातो अमुच्या गावा '
आणि त्यांच्यासोबत निघते बॅग घेवुनी प्रिया
असे काय बोलतो म्हणूनी खवळते माझी प्रिया

अनुभव हे असले येता मी बंदच केले बोलणे
तर म्हणते परवडले हो ते घालुन पाडुन बोलणे
तुम्ही गप्प गप्प राहता घर उठते मजला खाया
डोळ्यातील पाणी लपवत बिलगते माझी प्रिया

वैभव!!!



Moodi
Friday, December 16, 2005 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव शेवटची चार ओळी मनात चांगलीच ठसली. अप्रतिम!!

Divya
Friday, December 16, 2005 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव छानच अवघड आहे.

Mani_mau1
Friday, December 16, 2005 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaJyaa ka^mPyauTr Dosk Ta^pvar maI Kup Cana kivata zovalyaa Aahot.kivata sauMdr Aahot.malaa marazItuna yaoqao ilahayalaa Kup vaoL laagaola.tr kÜNaI saaMgaola ka kI Dayaro@T Dosk Ta^pva$na ksao yaoqao pÜsT k$ to.malaa tumha savaa-MXaI %yaa XaoAr krayacyaa Aahot.

Pama
Friday, December 16, 2005 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव... ही ही ही..

Sarang23
Saturday, December 17, 2005 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आखरी के चार लायना मे पंच है बर क्या!

Sarang23
Saturday, December 17, 2005 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खर तर ही कविता कुठे टाकावी याबद्दल मी जरा साशंकच आहे. कारण विडंबन वर टाकावी तर तो विनोदी सदरात येतो. या कवितेत विनोदी अस काहीच नाही. एक जळजळीत वास्तव आहे. खुप विचार करुन मग इथे टाकली. खर तर विडंबन तिसर्‍या कडव्यात संपत, पुढे स्वैर कविता आहे...

मुळ कवितेची
लिंक

माकड

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कोणी दात विचकणारे
कोणी वाकुल्या दाखवणारे
किती रंगांचे, किती ढंगांचे

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कधी टोप्या पळवणारे
कधी फळ फेकणारे
कोणी झाडावर, कोणी पारावर

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कोणी धिटुकले पिटुकले
कोणी वार्धक्याने पिकले
काही लालतोंडे, काही काळतोंडे

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कोणी पांढरे कपडे पांढरी टोपी
कोणी रस्त्यात करी चोपाचोपी
काही गारद्यांचे, काही पारध्यांचे

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कोणी ऍप्रनवाला देवदुत पैशासाठी मारी
कोणी काळा डगला, संन्याशाला शिक्षा करी
खुपसे अत्याचारी, खुपसे भ्रष्टाचारी

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

कोणी वखवखलेले, कोणी थरथरलेले
कोणी पिसाळलेले, कोणी माणसाळलेले
काही सुसाट, काही पिसाट.

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

काही संतांचे मारेकरी
काही चिंतांचे पहारेकरी
काही सैतान, काही हैवान

माकडांच्या गावात
सगळीकडे माकडच माकड...

अशी ही माकडच माकड
काही शेपटीची, काही बिनशेपटीची
आणि या माकडांच्या गर्दीत
तुमच्याआमच्यासारखी तिन चार गाढव
काही जाणून बुजुन शांत, काही चिरशांत

माकडांच्या गावात...

सारंग


Urmilaq
Saturday, December 17, 2005 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवजीन्ची अवघड वाचुन मलाहि स्फूर्ती आली..

अरे सन्सार सन्सार

उजीच चिड चिड करते आम्च्या ह्यान्चि स्वारी
जेव्हा बघावे तेव्हा भान्डण करण्याची असते तयारी
पगार वाढ्वुन घ्या म्हटल तर कुठे चुकल माज़्ह तरी
ह्याना काय माहित महिना काढ्ताना होते माज़्ही पन्चाईत खरी
उगीच चिड्चिड करते आम्च्या ह्यान्चि स्वारि..

टी वी वर दिसताच सुन्दर तरुणी खुलते ह्यान्चि कळी भारी
तास अन तास मग तिच्याकडे बघत बसायची असते तयारी
दहा वेळा हाका मरल्यातरी नेति ना कानावरी
तन्द्री भन्गल्यावर मात्र कपाळावर आठ्या भारी
छे, उगिच चिड्चिड करते आम्च्या ह्यान्चि स्वारी

भान्डण वाढली की म्हणतात आईला बोलावुन घेतो घरी
ते दिव्य परत करण्या पेक्शा ही भाण्डनेच बरी
मग मी अत्यन्त प्रेमाने म्हणते का सासुबाईना उगीच फेरी
त्यापेकशा तुम्हीच का नाही जात चार दिवस तुमच्या माहेरी
आता ह्यात येवढ रागवायच काय अस्त सान्गा कुणितरी
नहि पाण, उगीच चिड चिड करते आम्च्या ह्यान्चि स्वारी


मधुनच मग लाडात येते आम्च्या ह्यान्ची स्वारी
म्हणतात तयार रहा, आज लवकर येतो दुपारी
दोघ मिळुन फिरायला जाउ दूरवरी
नको टी वी वरचि तरुणी,
तुच माज़्हिया ह्रुदयाची राणी माज़्ही स्वप्न सुन्दरी



Urmilaq
Saturday, December 17, 2005 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moderators..i have trouble with the transliteration at times, please feel free to correct any mistakes in the above submission.. thanks, urmila

Nilyakulkarni
Saturday, December 17, 2005 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उर्मिला छान जमले आहे....

Pkarandikar50
Sunday, December 18, 2005 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम राम मन्डळी,

मायबोलीचे पुणे चप्टर सुरु करण्यात रस आहे का? असल्यास मला प्लिज मेसेज पाठवा. तुमच्या कल्पना, सूचना सहीत.
बापू

Vaibhav_joshi
Monday, December 19, 2005 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त .... सारंग .... खास रे ... उर्मिला .... छानच जमली आहे ...

Sarang23
Monday, December 19, 2005 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, धन्यवाद... बाकी देवदत्त तुझी कविता खुप छान होती दगड नावाची.. म्हणुन हे आपल उगाच काहीतरी...

Devdattag
Monday, December 19, 2005 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग.. लय खास.. आवडलय
वैभव.. अवघड आहे रे बाबा..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators