Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » मराठी गझल » Archive through March 04, 2007 « Previous Next »

Ganesh_kulkarni
Thursday, February 22, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति,
तुमच्या या गझलेतल्या मला फार आवडलेल्या ओळी,

"मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
का सभोती आंधळ्या या आरशांचे पीक आहे?

खरच आज ही असे होते आहे!


Vaibhav_joshi
Thursday, February 22, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोठलेली स्पंदने घन-तामसीशी रात्र, आणी
फुंकण्या अंगारविझल्या कोळशांचे पीक आहे.

मस्त आहे .. ( अगदी " आणी " मधला " णी " दीर्घ धरून सुध्दा .. )

पुलस्ति ..

मला माफ़ करा कारण इतरांच्या मानाने माझी प्रतिक्रिया अगदीच वेगळी दिसणार आहे पण जे प्रामाणिकपणे वाटतं ते बोलायचं आणि चर्चा होवू द्यायची हाच ह्या बीबी चा उद्देश आहे ..

मला खरंतर " पीक आहे " हा रदीफ़च वीक आहे असे वाटते .. म्हणजे मागे मी चाणक्यच्या वाळवंट ह्या रदीफ़ बद्दल पण हे बोललो होतो की जी रूपक / प्रतिमा आपण कवितेत किंवा गज़लमध्ये वापरतो ती प्रथम लौकिकार्थी applicable असायला हवीत असं माझं मत आहे .

उदा :- सशांचं पीक असतं का ? poetic license जरूर असतं पण जितक्या हक्काने " अफवांचे पीक " हा वाक्प्रचार वापरू शकतो तितका सशांचे पीक म्हणू शकतो का ? कदाचित एकदा गज़लेची ज़मीन तयार झाल्याने ( जी चांगली आहे ह्यात वाद नाही ) आपल्याला अवघड झाले असावे . ह्यावर इतर लोकांनी चर्चा केली तर मलाही समजेल

बाकी

१ ) वारशांच्या शेरामध्ये मेघधाराचा मुद्दा बरोबर आहे . तिथे " वारसांचा " हवे पण मग अलामत चुकते आणि शेर बदलावा लागेल

२ ) आरश्याच्या शेर्मध्ये जसा आहे तसा ओळखण्यासाठी एकदा तरी बघणे / दिसणे आवश्यक आहे ज्यामुळे आंधळे आरसे हे कन्नेक्ट होत नाहीये

पण हे सगळं लिहूनही तुमच्या कल्पना आणि निर्दोष गज़ल लिहीण्यामधली प्रगती स्तिमित करणारी आहे .
तुमच्या व इतरांच्या प्रतिक्रियांची वाट पाहतो . शुभेच्छा


Pulasti
Thursday, February 22, 2007 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार!
मेघधारा - "वारसांचे" असेच हवे.
वैभव - पण त्यामुळे अलामत कशी चुकते ते नीट कळले नाही. "पीक आहे" हा रदिफ़, "चे" हा काफ़िया आहे आणि "आ" स्वर ही अलामत आहे. मी शक्यतो "शाचे" वापरायचा प्रयत्न केलाय पण तरी अलामत "आ" हीच आहे. please let me know if i have misunderstood something.
पीकाबद्दल बोलायचं तर - तसं तर धान्ये सोडून कशाचीच लौकिकार्थाने पीके नसतात. "अफवांचे पीक" हेही केवळ वापरले म्हणून रूळले. पण तुमचा मूळ मुद्दा मला जाणवला आणि पटला तो असा की - लौकिकार्थी applicable नसलेली रूपक / प्रतिमा, शब्दप्रयोग ई. वापरायची असतील तर प्रचंड तयारी हवी! अर्थात - "पीक आहे" हा रदिफ़ वीक नाही, तर असे रदिफ़ पेलण्याइतकी माझी "जमीन" अजून तयार नाहीये! असेच डोळस मार्ग-आणि-दोषदर्शन करत रहा! प्रोत्साहनाबद्दल आभार!

भ्रमर - देव आणि दैत्य.. हा मिसरा नीट जमला नाहिये. शेवटचे "गालगागा" पाळता न आल्यामुळे लय चुकते आहे. थोडी खटपट केली, पण जमलंच नाही. sorry :-(.


Chanakya
Thursday, February 22, 2007 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति, वैभव ने तुमच्या गज़लवर केलेल्या काही सुचना पटल्या पण तरिही तुमच्य सर्वच कल्पना मस्त आहेत...

मला एक शंका आहे...

मतल्यात 'कशाचे पीक आहे' असे वरच्या मिसर्‍यात
तर सानि मिसर्‍यात 'सशांचे पीक आहे' असे शब्द आहेत..

मग अलामत तिथेच गंडतेय का? म्हणजे 'पीक आहे' असे रदीफ पकडले तर वरच्या ओळीत 'आ' अलामत येतेय तर खालच्या ओळीत 'अं ' येतीय...

कुणी शंका दूर करेल काय?
-----------------
सारंग -

मीही इतरांच बघून मनःशांतीच्या शोधार्थ मठात गेलो, मी मंदीरात गेलो, मी गाव गाव फिरलो... पण शांती मनातच होती! >>>>>

सारंग जर मी ची पुनरावृत्ती आहे तर ही ची पुनरावृत्ती केल्याशिवाय ही ने जे वजन येते ते बाकीच्या 'मी' ना लागु होत नाही असे मला तरी वाटते

व्याकरणदृष्ट्या, इतरांच बघून मीही मठात गेलो, मंदिरात गेलो, गाव गाव फ़िरलो हे जास्त संयुक्तिक वाटेल... म्हणून तो मीही आम्हाला खटकला..


Daad
Thursday, February 22, 2007 - 10:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति, मला या "गज़लेतल्या" सगळ्याच कल्पना आवडल्यात. आशयसपन्नता हे या गजलेचं वैशिष्ट्य त्याबद्दल प्रश्नच नाही.
मला आवडलेला शेर - "मी जसा आहे...."


Sarang23
Friday, February 23, 2007 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम, पुलस्ती तुमचे कौतुक करतो... कारण वैभवने सुचवलेल्या बाबी आपण खूप सकारात्मक घेतल्या हे पाहून आनंद वाटला. एवढ्या एकाच गोष्टीसाठी मी स्वतः परखड मत देणं टाळतो, पण आता मतप्रदर्शन करायला हरकत नाही!

पण प्रथम चाणक्य तुमची शंका दूर करतो...
हे वाक्य वाचा
मीही मठात गेलो, अन मंदिरात गेलो, मी गाव गाव फिरलो.
आणि आता हे वाक्य वाचा
मीही मठात गेलो, मीही मंदिरात गेलो, मीही गाव गाव फिरलो.
आता तुम्हीच सांगा कुठलं वाक्य अधीक योग्य आहे आणि वाटतय देखील...
तुमच्या भाषाभ्यासाचा आदर करून पुन्हा सांगतो की मी लिहिलेलं वाक्य योग्य आहे आणि तुम्ही जी ही ची पुनरावृत्ती करायला सांगताय ते कमकुवत वाक्य आहे. आपण आपल्या ओळखीच्या जाणकारांनाही विचारावं.
इतरांनीही कृपया या मुद्द्यावर आपले मत सांगावे.

पुलस्ती... अफवांचे पिक मध्ये अफवा ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेली उपमा नाही त्यामुळे शब्दशः आणि उपमा अशाप्रकारे अर्थ लागतो. अफवा(शब्दशः) + पिक(उपमा) पण तसा अर्थ नुसते सशांचे पिक म्हटलं तर लागत नाही त्यासाठी referance पहावा लागतो. त्यामुळे गडबड वाटते.

वैभव...सशांचं पीक असतं का ?
पहिल्या ओळीत जर सूर व्यक्त झाला असेल तर हरकत नसावी अशाप्रकारची सवलत घ्यायला असे वाटते... पण याच्या मर्यादा ठरवणं कठीण आहे हे नक्की!

पुलस्ती तुमचा पहिला शेर असा केला तर...
पाहिजे होते कशाचे अन कशाचे पीक आले
वाघ होते यायचे पण माकडांचे पीक आले
(माकडाचे?) (माणसाला उपमा देण्यासाठी सशापेक्षा माकड किंवा गाढव जास्त योग्य वाटेल. आणि अर्थ नुस्ता शक्तीपुरता मर्यादीत न रहाता शक्ती आणि युक्ती अशा दोन्ही अंगांनी विस्तारतो.)

अलामत "आ" हीच आहे

इथे तुम्ही पहिल्या शेरात अलामत भंग केली आहे...
कशाचे आणि सशांचे. आचे आणि आंचे मग आ ही अलामत कशी?

पीकाबद्दल बोलायचं तर - तसं तर धान्ये सोडून कशाचीच लौकिकार्थाने पीके नसतात. "अफवांचे पीक" हेही केवळ वापरले म्हणून रूळले. पण तुमचा मूळ मुद्दा मला जाणवला आणि पटला तो असा की - लौकिकार्थी applicable
नसलेली रूपक / प्रतिमा, शब्दप्रयोग ई. वापरायची असतील तर प्रचंड तयारी हवी!


वैभवचे फक्त एवढेच म्हणणे नसावे, इतका उथळ विचार त्याच्या मनातही येणार नाही. त्याला म्हणायचय की असे संकेत इतक्या सहजपणे यायला हवेत की त्याने एक अलवार धक्काही द्यायला हवा आणि शंकेची पालही चुकचुकू नये.

"पीक आहे" हा रदिफ़ वीक नाही, तर असे रदिफ़ पेलण्याइतकी माझी "जमीन" अजून तयार नाहीये!

मला वाटत की तो रदीफ वीक आहे. कारण मग उगीच सगळी पिके जोडत बसावी लागतात.

दुसर्‍या शेरात वारशांचे करायची कहीच गरज नाहीये कारण पहिल्या शेरात अलामत भंग केली आहे. मग श आणआयाची गरजच रहात नाही. पण तो शेर खास आवडला!

तिसरा शेर कळाला नाही...

चौथ्या शेरात आंधळे आरसे म्हणजे काय म्हणायचय ते कळाले नाही.

पाचव्या शेरात आणि ऐवजी असुनी टाकावेसे वाटले.

रदीफ पीक आहे ऐवजी पीक आले जास्त योग्य वाटेल.

पुलस्ती, शेरांमधल्या कल्पना छान आहेत! तुमची एकूण प्रगती पण वैभवने म्हटल्याप्रमणे थक्क करणारी आहे. मला विश्वास आहे की तुम्ही नजीकच्या भविष्यात सुंदर गझल लिहाल. चुका झाल्या तरी हरकत नाही, पण लिहीत रहा त्यानेच शिक्षण होते असे माझे मत आहे.
शुभेच्छा!



Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 3:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर विवेचन सारंग. लिहीत राहिलं तरच शिक्षण होते हे अगदी पटलं. तोच मुद्दा धरून अतिशय विनम्रपणे एक गोष्ट बोलू इच्छितो.

इथे एक गज़ल कार्यशाळा घेण्याचा विचार आहे . ह्या कार्यशाळेत मायबोलीच्या सर्व कवी / गज़लकारांना आग्रहाचे आमंत्रण आहे . कार्यशाळेच्या ह्या भागात " तरही " गज़ल लिहीण्याचा सर्वांनी प्रयत्न करवा अशी विनंती आहे .

तरही गज़ल मध्ये गज़ल ची पहिली ओळ दिली जाते ज्यावरून मीटर ठरतं . आपल्या सर्वांच्या मदतीसाठी ते मीटर खाली लिहून दाखवलं जाईल व तसेच त्यावर दुसरी ओळ कशी लिहीली जाते हे ही समजावलं जाईल . मग सर्वांनी आपापले शेर लिहावेत व कमीत कमी पाच शेर असलेली एक गज़ल माझ्या ई मेल वर पाठवून द्यावी . ह्यात खरोखर मी खूप जाणकार आहे हा भाग नसून माझ्याकडे जे आहे ते share करण्याचा भाग आहे . मी ही इतर सर्व लोकांशी चर्चा करूनच त्या गज़लकाराला मेल वरती संपर्क साधेन . साधारण दोन ते तीन मेल संभाषणात ती गज़ल पूर्णपणे ( त्यांच्य कल्पना अबाधित ठेवून ) निर्दोष करण्याचा प्रयत्न असेल . असे केल्याने प्रत्येकाला ती रचना कशी घडते आहे ह्याचा अन्दाज येईल व गज़ल लिहीण्याचा आत्मविश्वास तयार होईल असे वाटते .
सर्व निर्दोष गज़ल प्रकाशित झाल्यानंतर ऍडमिन ना विनंती करून त्यातली सर्वोत्तम गज़ल मायबोलीच्या मुखपृष्ठावर पोस्ट करण्याची विनंती करण्याचा विचार आहे . ( ह्यात स्वाती , सारंग , बैरागी , व प्रसाद शिरगावकर ह्यांनी आम्हां सर्वांना समजावे म्हणून जरूर तरही गज़ल लिहावी असा आग्रह आहे पन त्यांना मुखपृष्ठावर गज़ल पोस्ट केली जाण्याच बक्षिस मिळणार नाही . हा त्यांच्या आजवर लिहील्या गेलेल्या निर्दोष रचनांचा आदर आहे )

आपण सर्व मित्रांनी कृपया आपले अनुमोदन जर
vaibhav.joshee@gmail वर कळवले तर ही कार्यशाळा घडवून आणू या . सर्व गज़लप्रेमी व गज़ल शिकण्यास उत्सुक असलेल्या मित्रांनी लवकरात लवकर कळवले तर आजपासून ह्या महिना अखेरीपर्यंत आपण ही कार्यशाळा घेऊ शकू . वाट बघतो .

Lopamudraa
Friday, February 23, 2007 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप छान idea. .
कार्यशाळा व्यायला हवी.
वैभव तुला अनुमोदन..(नाहीतर या गजलेच्या bb वर याय्चे धाडस काही होत नव्हते.)


Prasad_shir
Friday, February 23, 2007 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव

कार्यशाळेची कल्पना आणि आराखडा दोन्ही उत्तम आहे! १००% अनुमोदन....

प्रसाद...


Sarang23
Friday, February 23, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! सुंदर कल्पना वैभव! पुर्ण अनुमोदन!

Paragkan
Friday, February 23, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

zakaas re ... good luck public .. shikshak aani vidyaarthi doghanahi ... I wish I could participate to learn atleast the basics. may be some other time.

Pulasti
Friday, February 23, 2007 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग -
अफ़वांचे पीक आणि सशांचे पीक मधल्या फरकाबद्दल्चे विवेचन एकदम पटले!
"त्याला म्हणायचय की असे संकेत इतक्या सहजपणे यायला हवेत की त्याने एक अलवार धक्काही द्यायला हवा आणि शंकेची पालही चुकचुकू नये." - आणि हेच करायला "तयारी हवी" - नाही का? मला अजूनही "एखादा रदीफच वीक" कसा ठरू शकतो हा तर्क कळला नहिये. असो. तेही हळुहळू कळेल!
"ससा" हा आकार नाही तर "वृत्ती" आहे - छानछोकी, गुबगुबीत आणि भेकड. "माकडांचे" ही सूचना मी नम्रपणे नाकारतो. राग नसावा.
कार्यशाळेची कल्पना छानच! i am in. वैभव - email पाठवले आहे.
-- पुलस्ति.

Shyamli
Friday, February 23, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण आहे आज वाचायलाही वेळ नाही झाला मला
कळलच नाही हे सगळ :-(
असो
:-)


Yog
Friday, February 23, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav,
झक्कास रे मित्रा.. सम्पूर्ण अनुमोदन आणि मदत. pl. check your mail

Anilbhai
Friday, February 23, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खालील ठिकाणी गजल कार्यशाळा सुरु केली आहे.
वैभव, मेरा नाम भी डालनेका रे बाबा.


/hitguj/messages/75/123104.html?1172257928

Mayurlankeshwar
Thursday, March 01, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली... मला वाटते ही कविता तुम्ही कवितेच्या बीबी वर पोस्ट करावी.
ही गझल नाही... कविता आहे.
गझल शाळेत जरा आधी सहभागी झाला असतात तर छान झाले असते.

गझलेचे संपूर्ण व्याकरण समजुन घेण्यासाठी तुम्ही कार्यशाळेतले सर्व धडे एकदा लक्षपूर्वक वाचून पाहावेत अशी विनंती.
धन्यवाद!




Niru_kul
Sunday, March 04, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझे रूप डोळ्यांत सांभाळतो मी


तुझे रूप डोळ्यांत सांभाळतो मी
तुझ्या आठवांशीच रेंगाळतो मी

मनाला कसे काय ठेवू उपाशी
तुझ्या चेहर्‍याला मनी कोरतो मी

तुझे नाव घेताच येतो उसासा
उसासे असे हे उरी पाळतो मी

नको आज तू या मनाशी दुरावू
तुला हे असे मागणे मागतो मी

कसा वागतो मी निराळा निराळा
निराळेपणालाच कंटाळतो मी

अता श्वास माझे अपूरे अधुरे
कसे वेदनेलाच गोंजारतो मी

- निरज कुलकर्णी.


Niru_kul
Sunday, March 04, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गज़ल लिहीण्याचा एक प्रयत्न केला आहे......
आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन लाभावे अशी विनंती....


Manas6
Sunday, March 04, 2007 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज, गझलेतील भाव सुरेख आहेत.. मतला तर मस्तच आहे.. फक्त काफ़ियाच्या नियमानुसार, म्हणजे तू मतल्यात जे काफ़िये निवडले आहेत त्यावरुन प्रत्येक शेरात पाळतो मी, जाळतो मी, वाळतो मी, गाळतो मी, भाळतो मी, संभाळतो मी- अश्या प्रकारचे काफ़िये आणि रदीफ़ यायला हवेत.. काफ़ियातील अलामत 'आ' आहे ती शेवट पर्यंत बदलायला नको..परत लिहुन पहा तुला नक्की जमेल

Pulasti
Sunday, March 04, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरज - छानच प्रयत्न! मानसने सांगितल्याप्रमाणे "ळतो" पाळायला लागेल. किंवा मतला थोडा असा करावा लागेल ज्याने "ळतो" हा नाही तर "तो" हाच काफ़िया होईल. आणि अलामत "अ" होईल.
इतर काही observations -- बघा पटताहेत का.
मतला मस्त!
उपाशी - मला या गझलेतला सगळ्यात आवडलेला शेर.
उसासा - छान.
पुढचे २ शेर जरा सपाट वाटतात. अपेक्षित परिणाम येत नाहिये.
मक्ता - कल्पना सुंदर आहे. पण "अपुरे" आणि "अधुरे" दोन्ही दीर्घ करावे लागतील वृत्त टिकवण्यासाठी. ते खटकतं.
CBDG!
-- पुलस्ति.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators