|
वरील काफ़िया / अलामत चर्चा आधी ही झाली होती. त्या बद्दल एक शंका आहे. सुरेशजींच्या एका सुंदर गज़लचा मतला असा आहे: आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे! सांभाळुनी घेती मला माझी इमानी आसवे! इथे 'सवे' हे काफ़ियातला न बदलणारा अक्षर समूह तर 'आ' अलामत होइल. पण सुरेशजींनी पुढच्या शेरांमधे मात्र 'अ' ही अलामत वापरली आहे. प्रत्येक वेळी मी मला माझी खुशाली सांगतो प्रत्येक वेळी आणतो ओठां वरी हासू नवे! .... केव्हातरी दात्यापरी आयुष्य हाका मारते मीही असा भिक्षेकरी ज्याला न काही मागवे! शंका अशी आहे की options available असतांना गज़लकाराला अलामत निवडण्याचे स्वातंत्र्य असते / असावे का?
|
Rupalisagade, तुमची कविता खालील ठिकाणी हलवण्यात आली आहे. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=925658#POST925658
|
Pulasti
| |
| Thursday, March 15, 2007 - 12:05 am: |
|
|
कार्यशाळा चालू असल्यामुळे "गझल" विभागाकडे सध्या शुकशुकाट आहे. तरी ही नवी गझल इथे पोस्टतोय. "वर्म" का नव्याने विव्हळणे हे का पुन्हा चीत्कार आहे? या जुन्या वर्मावरी हा ओळखीचा वार आहे! शिंग कोणी फुंकले की शोधतो मी ढाल भारी शोभते म्यानात माझी गंजकी तलवार आहे व्यर्थ ते झिजले महात्मे, दु:ख का संपून गेले? हा वसा त्याचा खरा जो पीर वेडा ठार आहे जाणतो घरच्या खुणा मी, शोधता मिळतील वाटा मी रमावे मग इथे का? हाय हा व्यभिचार आहे! वाहते धमन्यात जे ते साकळे डोळ्यात ज्याच्या अर्थ शब्दांना तयाच्या, लेखणीला धार आहे! -- पुलस्ति.
|
Mankya
| |
| Thursday, March 15, 2007 - 12:35 am: |
|
|
पुलस्ति ... सर्व शेर आवडले .. अर्थ भावला ! पण मतल्यात ' का ' ची दुरुक्ती टाळता आली असती तर.....!! गंजकी शब्द खटकतोय ... दुसरं काहि शब्द असेल तर ... ! ' देखण्या म्यानात माझ्या बोथट हि तलवार आहे ' ईथे ' देखण्या म्यानात ' हि अर्थाला थोडं खुलवेल, आणि गंजकी पेक्षा बोथट अधिक जवळ घेउन जातं नाही निरूपयोगी शब्दाला ! मला आपलं वाटलं चु.भु.दे.घे. माणिक !
|
प्रिय मित्रांनो गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेरित होऊन फक्त मराठी गज़लसाठी वाहिलेले एखादे संकेतस्थळ का असू नये असा विचार डोक्यात आला आणि www.marathigazal.com ची निर्मिती झाली . गुरुवर्य सुरेश भट यांच्या स्मृतीदिनी म्हणजे काल ह्या संकेतथळाचं प्रकाशन करायचं ठरलं तेव्हा हाताशी फक्त ४ दिवस होते . पण प्रसाद शिरगावंकर याने रात्रंदिवस मेहनत घेऊन मुहूर्त साधला आणि काल सुरेश भटांना गुरुदक्षिणा म्हणून ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले . www.marathigazal.com वर सुरेश भटांनी लिहीलेली गज़लेची बाराखडी प्रकाशित कराण्याची परवानगी श्री चित्तरंजन भट यांनी दिल्याने नवोदित गज़लकारांना मदत होण्यास प्रचंड हातभार लागणार आहे . मायबोलीशी असलेली बांधिलकी अबाधित राखत केवळ मराठी गज़ल साठी काहीतरी करावे या हेतूने प्रेरित होवून सुरू केलेल्या या संकेतस्थळाला सर्व मायबोलीकर , मॉडरेटर्स व मा. ऍडमिन यांना भेट देण्याचे व परिवार सदस्य होण्याचे आग्रहाचे आमंत्रण प्रसाद शिरगांवकर वैभव जोशी व www.marathigazal.com टीम
|
Pulasti
| |
| Friday, March 16, 2007 - 10:29 pm: |
|
|
माणिक, तलवारीबद्दल तुमचा तर्क कळला. आणि माझाही तोच तर्क आहे..पण - नुसती "निरुपयोगी" नाही तर "न वापरल्यामुळे निरुपयोगी" असे सुचवायचे आहे. हे "न वापरणे" "गंजकी" ने पोचते .. असे मला वाटते. -- पुलस्ति.
|
Meenu
| |
| Saturday, March 17, 2007 - 1:29 am: |
|
|
वाहते धमन्यात जे ते साकळे डोळ्यात ज्याच्या अर्थ शब्दांना तयाच्या, लेखणीला धार आहे! >>> वा मस्त !! पुलस्ति गज़ल आवडली मस्त .. शोधतो मी ढाल पण मस्तच ..
|
|
|