मित्रांनो.. मला वाटते तवाल(लखोबाजी) हा विषय भडकवण्यापेक्षा सर्वांनी समजुतदार होउन बोलावे. मित्रा नवीन.. नंदिनी ने म्हटल्याप्रमाणे खरंच 'गोलपिठा (कविता आणि नाटकही) अवश्य वाच! अधिक प्रगल्भ विचार करु शकशील. आशा करतो की मला जे काही म्हणायचे आहे ते तु समजुन घेशील.
|
Naveen
| |
| Friday, March 09, 2007 - 4:54 am: |
| 
|
जशी किड लागते एखाद्या भाजीला तशी काही पुरूष मंडळी कलंक आहेत स्वत:च्या जातीला घरातल्या स्त्रिवर दादागीरी करतात थोड्या पैशासाठी भडवेगीरी करतात रस्त्यावरून जात असताना छेडतात स्त्रिला हे विसरून जातात स्वत:च्या आई-बहिणीला हे पुरूषा, कोणत्याही स्त्रिला छेडताना बघ, तिच्या चेहर्यात स्वत:च्या आईला तरीपण तु प्रयत्न करशील का तिची अब्रु लुटायला? हे पुरूषा, क्षणभराच्या सुखासाठी इतका उतावीळ होऊ नकोस सुंदर तुझं भावी आयुष्य असं वाया घालवू नकोस कष्टाने कमवलेल्या भाजी भाकरीत आनंद मान वाईट मार्गाने कमवलेल्या अन्नाने पोट भरत नाही छान नवीन
|
Mankya
| |
| Friday, March 09, 2007 - 5:14 am: |
| 
|
नवीन ... मित्रा माझा हेतू तुझ्यापर्यंत नाही पोहोचला ! विषयात तर परीपक्वता, वास्तवावर पकड किंवा कल्पनेची उंच भरारी ई. ह्या गोष्टी लागतात पण माझं मत आपल्या शब्दांबद्दलही होतं रे ! इथे वापरलेले शब्द आपण आपल्या घरातही बिनधास्त बोलता येतील असेच असावेत ( आपल्या कित्येक बहिणी, मैत्रीणी हे वाचतात हे लक्षात ठेवूनच लिहायचं ) ! हि आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारीच नाही का ? कृपया या गोष्टींचा विचार कर मित्रा ... मला खात्री आहे मित्रा पुढच्या वेळेस लिहिताना तू नक्किच लक्षात ठेवशील ... पुढिल लेखनास अनेक शुभेच्छा ! नदिंनीशी सहमत, त्या स्त्रियांची दुःख खुप वेगळी असतात, ते आपल्या कल्पनांपलीकडे आहे ! माणिक !
|
जशी किड लागते एखाद्या भाजीला तशी काही पुरूष मंडळी कलंक आहेत स्वत:च्या जातीला --इथे 'भाजी' कोणत्या अर्थाने वापरली हे कळाले नाही. शिवाय 'काही ठराविक' पुरुष मंडळी 'पुरुष' ह्या 'जाती' ला कलंक आहेत..म्हणजे इथुन तुमचा 'पुरुषी अहंकार' दुखावतो असे वाटते. अवतरण चिन्हा मध्ये लिहिलेल्या गोष्टींचा अवश्य विचार करा पुन्हा. शेवटची दोन कडवी अगदीच अपरीपक्व-सुमार आहेत. नवीन मित्रा... एखादं मत मांडण्यासाठी आधी शब्दांची नस पकडावी लागते... अन्यथा ते विद्रुप होतं! माणिक शी सहमत.इथे 'घर' समजुन आपण आपलं मत कवितेतुन मांडतो. ते कुणाला वाचताना लज्जित वाटू नये असं हवं. भले ते कितीही वास्तवादी असो.शब्दांची निवड करताना भान राखायला हवेच!
|
Naveen
| |
| Friday, March 09, 2007 - 5:38 am: |
| 
|
मी तुमच्या सर्वांच्या मतांशी सहमत आहे त्यात काहीच वाद नाही. नाण्याला दोन बाजू असतात ज्या स्त्रियांना वाटतं कि अशा काही घटनांना माणसं जवाबदार असतात त्या माणसांबद्दल आणि ज्या माणसांना वाटतं कि अशा काही घटनांना स्त्रिया जवाबदार असतात त्या स्त्रियांबद्दल. अशा स्त्रिया आणि पुरूषांबद्दल मी लिहिल आहे. काही घटनांमूळे स्त्रियांना पुरूषांबाद्दल आणि पुरूषांना स्त्रियांबद्दल काय वाटतं तेच लिहिण्याचा प्रयत्न केला. नेमकी चूक कोणाची असते हे मला माहीत नाही. तुम्ही सांगितलेले बदल नक्की अमलात आणणार. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी असावी. नवीन
|
Meenu
| |
| Friday, March 09, 2007 - 5:50 am: |
| 
|
इथे 'भाजी' कोणत्या अर्थाने वापरली हे कळाले नाही. >>>>> 
|
कष्टाने कमवलेल्या भाजी भाकरीत आनंद मान वाईट मार्गाने कमवलेल्या अन्नाने पोट भरत नाही छान ............................ काय हे? कविता सुरू कोणत्या विषयावर झाली? संपली कुठे? जिगोलोवर होती का ही कविता? ================ हे पुरूषा, कोणत्याही स्त्रिला छेडताना बघ, तिच्या चेहर्यात स्वत:च्या आईला तरीपण तु प्रयत्न करशील का तिची तिची अब्रु लुटायला? ????????????????????? ये क्या था?
|
हे जिगोलो काय प्रकरण आहे?
|
अरे बाप रे! दोन दिवसात केव्हढे काय काय घडले! अचानक सारे कसे ढवळून निघाले.... वस्त्राआड प्रत्येकजणच नागडा असतो, पण ते झाकायलाच तर आपण सग़ळे कपडे घालतो... स्त्री मधली आई जर प्रत्येकवेळी आठवली... तर वाहणार कसे कोणी कोणाला शिव्यांची लाखोली... माणसातला "पशू" म्हणे... असं जनावराला हीन लेखायचा हक़्क़ दिला कोणी आपल्याला....? आपल्या मर्यादा आपणच ओळखायच्या.... दुःशासनाला लाज आणत मांड्या ठोकायच्या.... पण प्रत्येकजण असा नसतोच मुळी.. अन लाखातल्य एकानं संस्कृति बुडवायला... ती का इतकी तकलादू आहे..?
|
>>> अव्यक्ताचे धुके दाटता व्यक्त साठते दवबिंदूसम... वा! वा!! वा!!! झाड, तू हे असं त्रास देणारं का लिहीतोस?
|
Chinnu
| |
| Friday, March 09, 2007 - 10:03 am: |
| 
|
वळून चुकल्या रस्त्यालाही मंझिलाची अचूक ग्वाही! क्या confidence है! झाडा अव्यक्त सुंदर! मीनु महिलादिनाच्या शुभेछ्छा मस्त! मयुर, पहाट सुरुवात आणि शेवट छान! जयु, नात्यांचे दिमाखात डोलणारे तुरे! अपेक्षा फार जास्त आहेत बाई!
|
प्रिय ऍडमिन यांना एक नम्र विनंती.. आपण लवकरच एक स्वच्छता अभियान सुरु करावे असे मला मनोमन वाटते... जसा चहाचा डाग लागतो पांढर्या शुभ्र धोतीला.. तशी काही बिनचेहर्याची मंडळी कलंक आहेत मायबोलीकर जातीला.. (भाजीला - जातीला पेक्षा धोतीला - जातीला यमक जास्त जुळते.. अर्थात तडफदार कवी नविन यांची क्षमा मागुन..) तर अशा बिनचेहर्याच्या मंडळींकरता पुणे म. न. पा. प्रमाणे 'चकाचक अभियान' सुरु करावे असे मला वाटते. काही साईट्सवर existing members च्या reference शिवाय नविन मेंबर register होऊ शकत नाहीत अशी व्यवस्था असते.. मायबोलीवरही असे करता आले तर?? शेवटी quality is important than quantity . quality हा शब्द इथे genuine या अर्थाने घ्यावा. तसेच याआधीच ज्यांनी शिरकाव करुन हैदोस मांडला आहे त्यांना त्यांचे 'अस्तित्व' सिद्ध करण्याची विनंती करावी. सध्या मायबोलीचा परिवार एव्हढा वाढला आहे की बहुतेक 'चेहर्यासकट मायबोलीकर' प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एकमेकांना ओळखतात. त्यामुळे मुखवटे गळुन पडणे कठीण जाणार नाही. पाळण्यात ठेवलेल्या नावात समाधान मान शिवाजी हा शिवाजीच राहीला तो झाला नाही कधी खान.. विषय तसा जुना आहे.. जागा ही योग्य नाही.. पण रहावले नाही..
|
Naveen
| |
| Saturday, March 10, 2007 - 2:39 am: |
| 
|
दीपक पाटील तुमचा प्रत्येक शब्द पटला. मी तुमच्याशी सहमत आहे. आणि क्षमा कशासाठी? तो यमक छान वाटतोय. नवीन
|
Dineshvs
| |
| Saturday, March 10, 2007 - 10:43 am: |
| 
|
दीपस्तंभ, ज्या ज्या आयडीज संशयास्पद वाटताहेत, त्या त्या आडीजवर आणि त्यामागच्या आयडीजवर, एकमेकाना सावध करुन त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, एवढे तर आपल्या हाती नक्कीच आहे. प्रश्न जुना आहे, पण सुटला नसल्याने...
|
Meenu
| |
| Sunday, March 11, 2007 - 3:09 am: |
| 
|
काही दिवस असेच, अव्यक्त, निःशब्द .. काहीच मनापर्यंत, पोहोचत नाही ? कसलीही प्रतिक्रीया, उमटत नाही .. कि संपुन जातात, सारेच शब्द ? छे ! काही कळत नाही .. काही दिवस असेच, अव्यक्त, निःशब्द .. किती चाचपुन पाहीलं मनाला, तरी हाती काही लागत नाही.. शांत वाटतय म्हणावं, तर तेही खरं नाही .. वादळापुर्वीची शांतताही, अशीच असेल नाही ?
|
Mankya
| |
| Sunday, March 11, 2007 - 5:38 am: |
| 
|
खरंय मीनू .... शेवट मस्तच ! एक आठवलं " मनामध्ये धडपड असावी, घुसमट नसावी शांततेमागे सुतक नसावे, तृप्ती असावी !" युगंधरा तुझी अमाप प्रजा किती विलक्षण एक सम ना दुजा कुणी ईर्ष्येत तर कुणी अंधारात जळतो काहि मुखवटेच असतात काहिंच्या मुखवट्यासाठि धडपडतात कित्येक नावासाठीच जगतात कित्येक किर्तीरुपे उरतात जीव वासनेने वखवखलेले जीव मोक्षासाठी तळमळलेले किती स्वतःतल्या दैत्यालाच जाणतात किती दुसर्यातल्याही ईश्वराला मानतात ! माणिक !
|
मीनु छानच! माणिक... प्रजेचं चित्र मस्त आहे रे! 'जीव वासनेने वखवखलेले जीव मोक्षासाठी तळमळलेले ' हे जास्त भावलं!
|
Zaad
| |
| Monday, March 12, 2007 - 2:47 am: |
| 
|
बी, मयूर, अपर्णा, स्वाती, चिन्नू, धन्यवाद! अपर्णा, मंझील हा शब्द मराठीत पण वापरला गेला आहे. उदा. कुसुमाग्रजांच्या ह्या ओळी नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही सार्याच तारकांची जगतास जाण नाही गावातल्या दिव्यांना पथ तो काय पुसावा मंझीलकी जयाची तारांगणात राही
|
Mankya
| |
| Monday, March 12, 2007 - 4:18 am: |
| 
|
धन्स मयुरा ! जीवनसमरात बेदुंध बेफाम लढलो होतो तुझ्या आठवांशी लढताना दमछाक होते मनाने तुझियाच दरबारात होतो मज अंतःपुरी अंदाधुंद कारभार होते केले अखेर तू काबीज मनोराज्य सैन्य नेटाने लढले पण राजेच फितूर होते असह्य अहंकारा पराजय पण आनंदलो शेवट नाहितरी कुठे सुख विजयानंतरही जगण्यात होते ! माणिक !
|
i am slightly confused about the whole issue.. may be i couldnot catch up in between... still i tried to write a satire comment in between.. but today, i felt , something has seriously gone wrong... what's it...? can i get to know...?
|