Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 19, 200720 02-19-07  8:14 am
Archive through February 20, 200720 02-20-07  3:30 am
Archive through February 21, 200720 02-21-07  12:26 am
Archive through February 21, 200720 02-21-07  6:27 am
Archive through February 22, 200720 02-22-07  10:09 pm
Archive through February 25, 200720 02-25-07  5:16 am
Archive through March 01, 200720 03-01-07  9:31 am
Archive through March 05, 200720 03-05-07  11:14 pm
Archive through March 08, 200720 03-08-07  4:43 am
Archive through March 09, 200720 03-09-07  4:49 am
Archive through March 12, 200720 03-12-07  6:05 am
Archive through March 13, 200720 03-13-07  2:15 pm

Mrunatul
Wednesday, March 14, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाते तुझे माझे



नाते तुझे माझे,

मैत्रीचे,

प्रेमाचे,

विश्वासाचे,

काही न बोलता खूप काही सांगणारे,

शब्दांच्या पलिकडे जाणारे,

हसत हसत रडवणारे,

रडता रडता खेळवणारे,

प्रत्यक्ष न भेटून ही रोज रोज भेटणारे,

निस्वार्थपणा टिकवणारे,

नाते तुझे माझे,

एक दुवा,

एक आशिर्वाद,

एक ऋणानुबंध



Shree_tirthe
Wednesday, March 14, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृनालीनि ताई मायबोलीवर स्वागत आहे. मायबोलीवरची पहलीच कविता छान जमलीय. तुमच्या भावी कवितांसाठी शुभेच्छा.


Neelkantee
Wednesday, March 14, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणाल, छानंच लिहिलं आहेस!


Ganesh_kulkarni
Thursday, March 15, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाटतं पडतो पाऊस!

तुझं हसणं,तुझं बोलणं
तू हसता,बोलता...
वाटतं पडतो पाऊस!||१||
तुझं रुसणं,तुझं रागावणं
तू रुसता,रागावता...
वाटतं पडतो पाऊस!||२||
तुझं फुलणं,तुझं बहरणं
तू फुलता,बहारता...
वाटतं पडतो पाऊस!||३||
तुझं येणं,तुझं जाणं
तू येता, जाता...
वाटतं पडतो पाऊस!||४||
तुझं असणं,तुझं नसणं
तू असता.. नसता...
वाटतं पडतो पाऊस!||५||

गणेश(समीप)


Vaibhav_joshi
Thursday, March 15, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



प्रिय मित्रांनो

गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेरित होऊन फक्त मराठी गज़लसाठी वाहिलेले एखादे संकेतस्थळ का असू नये असा विचार डोक्यात आला आणि
www.marathigazal.com ची निर्मिती झाली .

गुरुवर्य सुरेश भट यांच्या स्मृतीदिनी म्हणजे काल ह्या संकेतथळाचं प्रकाशन करायचं ठरलं तेव्हा हाताशी फक्त ४ दिवस होते . पण प्रसाद शिरगावंकर याने रात्रंदिवस मेहनत घेऊन मुहूर्त साधला आणि काल सुरेश भटांना गुरुदक्षिणा म्हणून ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले . www.marathigazal.com वर सुरेश भटांनी लिहीलेली गज़लेची बाराखडी प्रकाशित कराण्याची परवानगी श्री चित्तरंजन भट यांनी दिल्याने नवोदित गज़लकारांना मदत होण्यास प्रचंड हातभार लागणार आहे .

मायबोलीशी असलेली बांधिलकी अबाधित राखत केवळ मराठी गज़ल साठी काहीतरी करावे या हेतूने प्रेरित होवून सुरू केलेल्या या संकेतस्थळाला सर्व मायबोलीकर , मॉडरेटर्स व मा. ऍडमिन यांना भेट देण्याचे व परिवार सदस्य होण्याचे आग्रहाचे आमंत्रण



प्रसाद शिरगांवकर
वैभव जोशी
www.marathigazal.com टीम


Mrunatul
Thursday, March 15, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या आयुष्याच्या प्रवासात
अनेक माणसं भेटतात
काही आपल्याला साथ देतात,काही सांडून जातात
काही दोन पावलेच चालतात,
आणि कायमची लक्षात राहतात,
काही आयुष्यभर साथ देण्याची हमी देऊन,
गर्दीत हरवून जातात.
नाती जपता जपता, तुटणार,
कुणीतरी दूर जाणार,
नवीन नाती जुळत राहणार
आयुष्य म्हटले तर,
हा प्रवाह असाच चालत राहणार
कुणी दूर गेले तर
जगणे थांबवता येत नाही
ह्या अथांग सागरात
एकटेच पोहता येत नाही!!!


Mayurlankeshwar
Thursday, March 15, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणाल चांगला प्रयत्न आहे. :-)

काही आपल्याला साथ देतात,काही सांडून जातात ...
इथे 'सांडून' च्या जागी 'सोडून' अभिप्रेत आहे काय?
'माणसं सांडणं' हे कसंसच वाटलं
बाकी छान.

गणेश... पाऊस पडल्यासारखं वाटलं :-)



Kashi
Thursday, March 15, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhavji & prasadji aabhinandan....!!!!!!

Devdattag
Friday, March 16, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि कळत नाही,
ही ओढ कशाची?
त्या आगळ्या वेगळ्या शय्येची?
का चंदनाच्या सुगंधाची?
तिकडे काय आहे हे पाहण्याची?
का इथे पाहिलेले विसरून जाण्याची?
त्या तप्त राखेची?
का त्या पापं धुवून टाकणार्‍या,
शीतल गंगाजलाची?


Mankya
Friday, March 16, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणाल .. छानच !
गणेश .. अजुन छान करता येईल रे .. अर्थ भावला !
देवा .. काय बोलणार .. अप्रतिम रे !

माणिक !


Meenu
Friday, March 16, 2007 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा .. .. .. हं !!

Naveen
Friday, March 16, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि प्रसाद मन:पूर्वक अभिनंदन.

Shree_tirthe
Friday, March 16, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश, मृणाल, देवदत्त कविता छान आहेत. मस्तं.

Shree_tirthe
Friday, March 16, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कट्टा

जगातला असा एक कोपरा
जिथं जगच विसरतात
जेव्हा कट्ट्यावर
मित्र-मैत्रिणी जमतात

विसरून जग सारे धम्माल करतात
मैत्रीसाठी तिथे वाट्टेल ते करतात

दु:खांना तिथे कधीच नसतो थारा
सुखाचाच नेहमी वाहतो वारा

श्री


Mankya
Friday, March 16, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री ... अश्या कट्ट्यामुळच माझं निभावलं बघा !
प्रत्येक आवर्तनानंतर नवीन कट्टा !
छे ... मन बेचैन होणार आता जुन्या आठवणींनी !
पण धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल !

माणिक !


Ganesh_kulkarni
Friday, March 16, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री,
आवडली कविता!
श्री,काॅलेजला असताना खरे मित्र कमी, पण कविता मात्र जास्ती भेटल्या... एकट्या कट्यावर बसल्यावर!


Chinnu
Friday, March 16, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृणाल, नाते छान. गणेश पाऊस आवडला. अजून सुधारणा होवु शकते हं.
देवा, ओळखीचे प्रश्न आहेत, खरच कशाची ओढ एवढी?


Swaatee_ambole
Friday, March 16, 2007 - 12:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, असं काय रे झालं एकदम?
छान लिहीलंयस. :-)


Sumedhap
Saturday, March 17, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डोळे...

अबोल असले तरीही भाषा असते डोळ्यांची
मनातला प्रत्येक भाव उतरतो त्यातच प्रथम
त्यातच असते माया, त्यातच दिसते प्रेम
दुःख झाले मनाला की दाटती त्यात थेंब
त्यातच असते जिद्द, त्यातच असतात स्वप्ने
पांढरे झाले केस तरी,त्यातच हिरवी राहतात मने
त्यातच दडतो विश्वास, त्यातच असतो धोका
अप्रत्यक्ष पाहण्याचाही तेच देतात मोका
डोळे चुकवून कुणाचे कधी काही करता येईल
वरुन पाहणार्‍या त्याच्या डोळ्यांना कधी चुकवता येईल?


Shree_tirthe
Saturday, March 17, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद माणिक, गणेश. आभारी आहे.
सुमेधा 'डोळे' मस्तं अगदी.

- श्री


Ganesh_kulkarni
Saturday, March 17, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमेधा ताई,
डोळे... कविता आवडली!
डोळे चुकवून कुणाचे कधी काही करता येईल
वरुन पाहणार्‍या त्याच्या डोळ्यांना कधी चुकवता येईल?




Sumedhap
Saturday, March 17, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद श्री आणि गणेश!!!!

Gargi
Sunday, March 18, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा सायंकाळी.......

अशा सायंकाळी.......
दिशांच आर्तपण
माझ्यात परावर्तित........ आरपांर
मी मनमोर
मनाच्या विसर सीमेवर
बरसणारा पाउस
आणि पावसाळा नसतानाही.....
मी भिजटभोर





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators