Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through March 09, 2007 « Previous Next »

Meenu
Monday, February 26, 2007 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे गुर्जी हे वाचलं होतं की मी सुरु laptop अन सुरु मायबोली मस्तच आहे.

मिल्या सहीच आहे तुझा माउसही

पण तेवढा स्कर्टच्या शेराचा मोह टाळायला हवा होता असं मलाही वाटलं

मानस, देवा मस्तच


Bairagee
Wednesday, February 28, 2007 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मिल्या, "तुझा माऊसही" ज़बरदस्तच आहे. हिला हझल म्हणता येइल.

गुलाबी-गोड गोष्टी चॅटवर तुज सांगता
तुझ्या इतकाच मग, लाजायचा माऊसही

अहाहा!

समोरच स्कर्टवाली सुंदरी जर बैसली
कसा हलकेच खाली, यायचा माऊसही

वा! काय चावट माऊस आहे!

अचानक कोड माझा चालताना पाहुनी
पुन्हा क्लिक क्लिक असा, नाचायचा माऊसही


अहाहा "क्लिक क्लिक" काय आले आहे. 'वेगळे'च नादमाधुर्य आहे!

मिल्या, तबीयत खुश!!!!! मार डाला!!!

संदीपची ती गझल अज़ून वाचलेली नाही. वाचून काय ते सांगता येईल. पण, प्रथमदर्शनी, चालून जावी अशी तडजोड वाटते.

जुन्या काळात ठीक होते, पण नव्या ज़मान्यात "हि" शक्यतो टाळावे असे म्हणतात.( तसेच 'मम', 'तव', 'तुज' चा आणि 'झणी' सारख्या शब्दांचा चा वापर टाळावा. विनोदात 'आर्केइक' भाषेचा वापर होतो तो वेगळा.) संदीपच्या कवितेत "हि" सारखी जुनी वळणे आहेत, हे मात्र खरे.


Keshavasumaar
Wednesday, February 28, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा साऱंग यांची गझल दिवा

कंदील - द दिवा

होता सुसाट वारा घुसला झग्यात माझ्या !
लाजून झाकला मी मुखडा करात माझ्या !

मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा
बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या?

मीही मठात जातो; अन मंदिरात जातो
पण ध्यान सर्व माझे असते बुटात माझ्या !!

नजरेत पाप आले, मन वासनेत न्हाले
(ह्याच्या पुढे जमेना सरत्या वयात माझ्या !! )

हे रोजचेच झाले आम्हास भारनियमन
कंदील ठेवला मी आता घरात माझ्या...!

केशवसुमार..



Rangoli
Thursday, March 01, 2007 - 10:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा या जावाकसमची लिंक असेल तर द्या ना प्लीज. म्हणजे आमच्या सरख्या नव्या मायबोलीकरांनाही रसस्वाद घेता येइल. विडंबन मस्तच.
अहाहा "क्लिक क्लिक" काय आले आहे. 'वेगळे'च नादमाधुर्य आहे!
Totally agree!!

Shonoo
Thursday, March 01, 2007 - 10:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या

माऊस झकास!

ते जगन बुवांच्या कवितेचे विडम्बन ( मी माझ्या सौ ला कसे विचारले आणि मी माझ्या वैर्‍याला कसे कटवले ) असेल तर परत एकदा पोस्ट करणार का!


Ekrasik
Thursday, March 01, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,
लैच भारी रे

मानस, वैभव, देवा

Chinnu
Thursday, March 01, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या भारीच हं माऊस तुमचा :-)

Princess
Thursday, March 01, 2007 - 10:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, माउस एकदम भारी बरे का:-)मजा आ गया

Himscool
Friday, March 02, 2007 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, गुरुजी, मानस, मिल्या गुड वन... .. :-)

Milya
Friday, March 02, 2007 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा सर्वांना धन्यवाद...

बैरागी : माझ्या विडंबनाच्या post मध्येच संदिपच्या मूळ गज़लची link आहे

रंगोली : अगं जावाकसम आता नाहीये मायबोलीवर कधीच जागेअभावी उडविले गेले. माझ्यकडे असेल तर मेल करेन...

पण ते minglish मध्ये आहे आणि ते लिहिताना जितकी मजा आली त्यावेळी तशी आता वाचताना नाही येणार..

मेधा अगं नाही गं काळाच्या ओघात ते ही वाहुन गेले गं.. :-(
माझ्यकडे save केलेले पण नाहिये ते...


Chinnu
Friday, March 02, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवसुमार, तुमचे मंदिरात असतांना बुटाकडचे ध्यान आणि भारनियमाचा कंदील आवडला. इतर शेर फ़क्त जगा भरतात असे वाटले. चुभुद्याघ्या.
मिल्या, त्या जावाकसमच्या काळातले लिखाण पुन्हा जिवंत होवु शकेल काय? प्रचंड उत्सुकता आहे मनात. काही असेल तर मलाही मेल करायची कृपा व्हावी.


Jayavi
Friday, March 02, 2007 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या....... एकदम सही बॉस! मजा आ गया.

केशवसुमार..... मस्त :-)


Adi787
Friday, March 02, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या... एकदम जबरी. आवडले :-)

Keshavasumaar
Tuesday, March 06, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा अभिजीत दाते यांची सुंदर गझल
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=926935#POST926935"

कुठे येत होते ,कुठे जात होते...
तुझ्या बापसाला कसे ज्ञात होते...

तुझ्या बापसांने किती बोंबलावे...
असे काय त्या सांग फोटोत होते...

प्रकाशून बत्ती किती मास झाले?
कशी वीज अदृष्य राज्यात होते...

वळावे किती ते तुझ्या चेंडवाने...
फलंदाज सारे बळी जात होते...

मला सर्व त्याचे इरादे कळाले...
तशी मी जुनी याच खेळात होते...

नको आणखी भात देऊस आता...
वजन वाढलेले मला खात होते...



Chinnu
Tuesday, March 06, 2007 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशवसुमार, प्रकाशूनी वीज सही! बाकिचं डोक्यावरुन गेलयं. आधीच उंची कमी आमची! :-)

Devdattag
Thursday, March 08, 2007 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयाविच्या "ऋतू येत होते ऋतू जात होते" चे विडंबन

प्रत्येक शेरातली पहिली ओळ तशीच ठेवून..
आणि मुख्य म्हणजे जयश्रीची माफी मागून

एका कामवालीची व्यथा


ऋतू येत होते ऋतू जात होते
अहो रोज बेधूंद पेल्यात होते

सखा आज येणार माहित होते
पसे आज त्यांच्या न हातात होते

तिन्ही सांज आली उन्हे पेटवूनी
निखारे कधी तीन दगडात होते

कसा गंध वाहे पुन्हा तो फिरोनी
कधी नाक गेले रुमालात होते?

कशाला हवी पौर्णिमेची मुजोरी --(पौर्णिमा मालकिणीचे नाव)
अहो काम का ह्या पगारात होते?

कसा रंग येइल त्या मैफलीला
अरे घास देवा न पोटात होते


Vinya
Thursday, March 08, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्याच्या त्या खलास ऋतू येत होते कवितेचे हे विडंबन. विडंबनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.

ऋतू येत होते ऋतू जात होते
चिकन तंदुरीते तरी खात होते

नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो
मसाले असे बटाट्यांत होते

मुकी राहुनीही किती बोलली ती (लवंगी मिरची)
झरे आसवांचे डोळ्यांत होते

अता सार्थकी लागला जन्म माझा
सुवास फोडणीचे श्वासात होते

रुढींची वृथाका तमा बाळगू मी
भज्यांचे चुरे आमरसात होते

तिच्यापासुनी वेगळे मज करावे (दारुच्या बाटली पासुन)
कुठे एवढे धैर्य काळ्यात होते? (गुत्त्यावरचा तगडा बॉडीगार्ड)


Lalu
Thursday, March 08, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळीच विडंबने..    

Deepstambh
Thursday, March 08, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळीच गडंबने (गज़ल + विडंबने )

Kandapohe
Friday, March 09, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळेच सुटले आहेत.

प्रकाशून बत्ती किती मास झाले सहीच.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators