Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
विडंबन

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » विनोदी साहित्य » विडंबन « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 21, 200720 02-21-07  12:07 pm
Archive through February 26, 200720 02-26-07  12:50 am
Archive through March 09, 200720 03-09-07  12:00 am
Archive through March 14, 200720 03-14-07  1:40 am

Keshavasumaar
Wednesday, March 14, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा मीनाक्षी हर्डीकर (मीनु) यांनी गज़ल

ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
अता बोलणे फक्त स्पर्शात होते ..

कुणी बेवडा गात जातो भसाडा ..
शिव्या फक्त देण्या जणू रात होते ..

घरी एकटी ती, असावे सवे मी ..
असे नेहमी फक्त स्वप्नात होते ..

मनी चाललेले तुझ्या जाणतो मी ..
सुरू खेळ सारे इशाऱ्यात होते ..

दुकाने सुरेची, भले बंद केली ..
तरी आमची सोय गुत्यात होते ..

मला वाटले फास बसला गळ्याला ..
करांचे तिच्या हार कंठात होते ..

सुरू श्वास नाही अधी दाखला द्या ..
म्हणे चैकशी फार मुडद्यात होते ..

कुणी एक रेडा, झपाटून जावा ..
असे लाल या काय रंगात होते ?

भले तोल जावो, भले चाल बदलो ..
तरी चालणे हे दिमाखात होते ..

कुणी काव्य केले, कुणी गीत केले ..
अखेरीस त्यांची, हजामात होते ..

नडे या कवीशी नडे त्या कवीशी ..
तुला"केशवा"टेकले हात होते ..



Vinya
Wednesday, March 14, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा केशवा! मजा आली. छान लिहीताहो तुम्ही खूप.

Deepstambh
Wednesday, March 14, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या... केशवसुमार, केशवसुमार, केशवसुमार, केशवसुमार (या पानावरच्या चार गडंबनांसाठी..)

आता लवकरच एक 'गज़ल विडंबन कार्यशाळा' सुरु केली पाहीजे..

जसे 'आनंदघन' म्हणजे लता मंगेशकर.. तसे 'केशवसुमार' म्हणजे मायबोलीचे एक प्रसिद्ध व्यक्तीमत्व असे मला का वाटते???

मिल्या स्वःताच्या काव्याचे विडंबन करणारा मराठी साहित्यात तू पहिलाच कवी असशील..

तसेच विडंबनाचे विडंबग्रहणन कराणारा मीच पहिला नमुना असेन...

बैरागी, राहूल, चिन्नू, सन्मी, देवा, मिल्या, झकास.. असाच लोभ असू द्या.. :-)


Meenu
Wednesday, March 14, 2007 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिप्या तु सुटलाच आहेस
मिल्या सहीच ..
केशवसुमार यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाहीये .. कच्च्या मालाची इतकी आवक झाल्याने ताण एकदम वाढला असेल नाही ...?

.. असाच लोभ असू द्या.. >>> बस क्या गुरु .. अजुन कुणाकुणाची खेचायचीये म्हणजे ..

Keshavasumaar
Saturday, March 17, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमची प्रेरणा पुलस्ति यांची गझल वर्म

मालकाचे विव्हळणे ना मद्य ही चिक्कार आहे
त्या जुन्या गुत्त्यापरी हा ओळखीचा बार आहे!

शिंग कोणी मारलेले शोध ते नंतर जरा तू
(झाक हाताने अधी तू फाटली सलवार आहे)

व्यर्थ का झिंगले महात्मे, मद्य बघ संपून गेले
या बसा हासू नका मी प्यायलेलो फार आहे!

जाणतो रस्ता घराच्या , शोधता मिळती न वाटा
मी करावे मग कसे? मी चालण्या लाचार आहे!

वाहते धमन्यात ते जे "केशवा" पेल्यात होते
अर्थ शब्दांना कुठे मग, लिहिणे बेकार आहे!

-- केशवसुमार.






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators