Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 01, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 01, 2007 « Previous Next »

Shyamli
Sunday, February 25, 2007 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असच एकदा फिरता फिरता
एक झाड दिसलं
मोठं डौलदार, स्वत:च वेगळेपण दाखऊन देणारं,
कदाचीत वेगळेपणामुळेच असेल
पण आवडुन गेलं फारच
रोज मायेनं खतपाणी करायला लागले,
तसं तसं सुकायला लागलं......
जरासा उशीरच झालाय
पण आलय लक्षात,
निवडुंगाला का कुठे गरज असते
असल्या सगळ्या गोष्टींची?

श्यामली!!!


Meenu
Sunday, February 25, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे कसे शांत शांत...
कोणाचीच का नाही चाहूल...
अचानक नीरव शांतता ही...
ना वाजे कुणाचे पाऊल....
नीलकांती सगळे गज़ल कार्यशाळेत दाखल झालेत ना म्हणुन इथे शांत .. आता लवकरच एकापेक्षा एक सुंदर गज़ल वाचायला मिळतील ..

Bee
Monday, February 26, 2007 - 1:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२री कविता छानच आहे पेशवा..

Saavat
Monday, February 26, 2007 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>
"ज्ञानाच्या गोधडिवारील
आत्मघोशाचे डाग... "

"पंख भोग
उतु आले
आला लांबचा प्रवास... ">>>


पेशवा,
वा! मित्रा मानल तूला.


Manas6
Monday, February 26, 2007 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज २७ फेब्रुवारी, स्व.कुसुमाग्रजांचा जन्मदिन! मराठी भाषेत अजरामर साहित्य-शिल्पे निर्माण करणाऱ्या ह्या साहित्य-सम्राटाच्या स्मॄतीला, ही एक लहानशी काव्य-पुष्पांजली!


तात्या, अपुली आठवण येते!

छंदोमयी, विशाखा, फिरुनी,
आज मनी अवतरते,
तात्या, अपुली आठवण येते!

आज मराठी अनाथ आहे,
तिला कुणाची, न साथ आहे,
पुन्हा पाहण्या गत-वैभव ही, आज तुम्हा स्मरते,
तात्या, अपुली आठवण येते!

आज मनांचा 'कणा' मोडला,
प्रलय भयंकर पूर जाहला,
'लढ' म्हणण्या ही पाठ हो तुमच्या, प्रेमळ हाता स्मरते,
तात्या, अपुली आठवण येते!

नटसम्राट; खिन्न उभा का?
दु:ख सांगण्या, शब्द शोधी का?
'घर देता का घर' हे वेदना पुन्हा ऊरी जागते,
तात्या, अपुली आठवण येते!

-- मानस६



Bhramar_vihar
Monday, February 26, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस छानच रे! ... !

Vaibhav_joshi
Tuesday, February 27, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस .. छान आहे रे !!!

Daad
Tuesday, February 27, 2007 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छानच आहे, मानस. एक (थोडासाच) वेडगळ प्रश्न जेव्हा आपण 'अपुली' म्हणतो, तेव्हा माझी अन, तुमची (तुझी) अस अभिप्रेत असतं का? (मला अस वाटतय)
की, या कवितेमध्ये वापरलय तसं आदरार्थी "आपली" (तुमची) या अर्थाने सुद्धा वापरता येतो तो शब्द?


Daad
Tuesday, February 27, 2007 - 10:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पापण्या झुकल्यावरीही झळकते
गुंजते हास्यातुनी, ते लाजणे

होऊनी धुन पावरीची, बावरी
वाहते रुधिरातुनी, ते लाजणे

उदविते नि:श्वास, श्वासा चुंबुनी
गंधाळते गात्रा.तुनी, ते लाजणे

भोगुनी तृष्णा, झिरपते अंतरी,
अंग-अंगी सांडते, ते लाजणे

मीलनाच्या उत्सवी का आजही
नसते तरी, वसते इथे, ते लाजणे?

-- शलाका


Mankya
Wednesday, February 28, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शप्पथ ...... काय लिहिलस शलाका ...Ultimate गं !
शब्द काय सुंदर वापरलेस .... मनाला भावलं गं ... ते लाजणं !
सुंदर अविष्कार !

माणिक !


Ganesh_kulkarni
Wednesday, February 28, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका
"मीलनाच्या उत्सवी का आजही
नसते तरी, वसते इथे, ते लाजणे?"
छान!

गणेश(समीप)



Sumedhap
Wednesday, February 28, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेम कसे करावे...



मनात आहे बरेच काही, पण सांगता काही येत नाही
निशब्द माझ्या डोळ्यांची भाषा तुला काही कळत नाही
किती दिवस आणखी मी असेच झुरत रहावे
सांग मला तुझ्यावर मी प्रेम कसे करावे

सतत तुझा हसरा चेहरा डोळ्यांसमोर असतो
तुझ्या डोळ्यांत मात्र माझ्यासाठी काही भाव नसतो
मनात तुझ्या काय आहे मला कसे कळावे
सांग मला तुझ्यावर मी प्रेम कसे करावे

शेवटी एकदा ठरवलं मनातले बोलायचे
अथांग माझ्या प्रेमाचे दार तुझ्यापुढे खोलायचे
तेव्हा कुठे तुझ्या डोळ्यांत प्रेम मला दिसावे
सांग मला तुझ्यावर मी प्रेम कसे करावे

वाट तु पाहत होतीस मी काही बोलायची
आणि मला भिती होती तुझ्या रागाने पोळायची
आता वाटतं हे आयुष्य तुझ्याच स्वाधीन करावे
सांग मला तुझ्यावर मी प्रेम कसे करावे

आयुष्यात काही वाटा किती सोप्या असतात
फक्त त्या शोधणार्‍या नजरा आपल्याकडे नसतात
इतके कळले प्रेमाचे माप सांडण्याआधी भरावे
तुच शिकवलंस तुझ्यावर मी प्रेम कसे करावे


Pulasti
Wednesday, February 28, 2007 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका, excellent work! नितांतसुंदर काव्य.
गंधाळते गात्रा.तुनी, ते लाजणे -- वा!
नसते तरी, वसते इथे, ते लाजणे? -- खूपच छान!!
-- पुलस्ति.

Daad
Wednesday, February 28, 2007 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks heaps माणिक, पुलस्ति.
सुमेधा आवडली मला 'तुझ्यावर प्रेम कस करायच..'. शेवटचं कडवं खरच किती खर आहे? - आयुष्यात काही वाटा.....


Mi_anandyatri
Thursday, March 01, 2007 - 12:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शप्प्प्पथ!!!!
शलाका, खूप आवडली कविता!!

अगदी नेमकं काय आवडलं तर, शब्दयोजना!
वाह!! जियो...

पण "उदविते" म्हणजे काय? तसा अर्थ लावून घेतलाय... पण नेमका अर्थ हवाय..


Ajay_103
Thursday, March 01, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे ईश्वरा,
मला रस्त्यातला दगड बनवू नकोस
कुणास ठेच लागण्यासाठी...
त्या पेक्षा राहीन घराच्या भिंतीत
कुणा गरीबाच्या निवाऱ्यासाठी...

हे ईश्वरा,
मला पाण्याचा थेंब बनवू नकोस
अळवावर मिरविण्यासाठी...
त्या पेक्षा कामी येऊदे
एखाद्याची तहान शमविण्यासाठी...

हे ईश्वरा,
मला नुसतंच फुल बनवू नकोस
बागेत शोभण्यासाठी...
त्या पेक्षा येईन तुझ्या पायाशी
एखाद्याच्या इच्छापूर्तीसाठी...

हे ईश्वरा,
मला नुसताच शब्द बनवू नकोस
कुणाची उणीदुणी काढण्यासाठी...
त्या पेक्षा राहीन एखाद्या अभंगात
तुझे गुण गाण्यासाठी...

अजय



Bee
Thursday, March 01, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळोखाने विळखा घातलेल्या
अपरिचित सुमसान वाटेवर
जीव ज़सा भयाने कापतो
आणि आकाशात उडणार्‍या
पाखराकडे पाहून भेदरतो
तशी अवघड घटका
दिवसाच्या प्रखर उजेडात
आणि प्रियजनांच्या सहवासात
दुर्दैवाने आलीच तर...
पाखरू बनून विलीन व्हावे वा
काळोखाला अंगावर ओढून
शहार्‍यांचे अस्त्र करावे..




Manogat
Thursday, March 01, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा तुझे वेगळेच खेळ,
कटपुतल्यांना कस नाचवायच,
ह्यचाच ध्यास असतो,
का रे तुला सगळा वेळ.

गार्हणे ऐकुन,
थकत नाही का तुझे कान,
कि देवळात बसुन तु उपभोगत असतो,
माणसांनी दिलेला तुल देवरुपि मान.

तुझ्या अशिर्वादांना,
मंदिरात रुपयाचा मान मिळतो,
या सगळ्या भक्तात,
तुला खरा भक्त तरी कसा कळतो

मुर्ति रुपि देवा,
आता अवतरणार कधि,
हा पापांचा घडा,
भरण्याच्या तरी आधि.


Sumedhap
Thursday, March 01, 2007 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दाद!!!!!! आणि गणेश अधीच्या कवितेला दाद दिल्याबद्दल तुमचे आभार!!!
विचार

गर्त अंधारात, भर पावसात चालत होता तो
ओल्या कपड्यात वाट तुडवित जात होता तो
काजव्यासारखा दिवा वाटेवर प्रकाशबिंदु देत होता
ठकठकणार्‍या आवाजाचा तो कानोसा घेत होता
अढळला एक म्हातारा कोपर्‍यावरती बसलेला
भर पावसात उघडा बसुन काम करत असलेला
"काय करताय बाबा?" विचारताच क्षणभर वर पाहिले
म्हणाला झाकतो समोरचे गटार जे उघडे राहिले
आश्चर्याने तो म्हणाला बाबा मी तुम्हाला हात देतो
काळजी काही करु नका, मी पलिकडे तुम्हाला नेतो
ऐकताच हसला म्हातारा, बोलला," माझ्यासाठी नाही हे"
शाळकरी मुलांची जाण्याची ही वाट आहे
त्यांच्यासाठी झाले आहे धोक्याचे हे स्थळ
पडले कुणी तर जीव न त्याचा राही एक पळ
विपरीत काही घडले तर उरी सतत खंत राहील
मुलं जगली तरच आपला देश जिवंत राहील
त्यांच्यासाठी खड्डा तो झाकतो आहे
लाकडाची फळी बनवुन त्याच्यावर टाकतो आहे
थोर एवढा विचार या वृद्धाकडे जर असावा
आजच्या तरुण रक्तात हा भाव का नसावा?



Meenu
Thursday, March 01, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खून

आरशासमोर उभी राहीले ना?
की तुच दिसायचास आरशातही..
कंटाळुन त्या दिवशी शेवटी,
मी फोडला होता आरसाही..
आणि जीवाच्या आकांतानी,
रडायला लागले मीच पुन्हा..
तुला सभोवार असं,
तुकड्या तुकड्यात विखुरलेलं पाहून..
"खून, खून, खून केलाय मी त्याचा
हो खूनी आहे मी.... द्या, द्या मला
पोलीसांच्या ताब्यात..."
कळवळून सांगीतलं रे मी सगळ्यांना
कुणीच नाही माझं ऐकलं ..
या वेड्यांच्या इस्पितळात आणून घातलं..
पण तुला सांगु ..? इथल्या एका वेड्याला
जेव्हा सांगितली ना मी माझी कथा?
मला काय म्हणायचय, ते त्याला खरच कळलं होतं
त्याचे डोळे भरुन आले होते ऐकल्यावर,
खरच....





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators