Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 25, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through February 25, 2007 « Previous Next »

Neelkantee
Thursday, February 22, 2007 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मयुरा, दोस्तीमधे 'माफी मागायची' नसते...
never say sorry in friendship & never say thanks too

मानस, मला तर वाटलं प्रथम ही सुरेश भटांनी स्वतःच स्वतःवर लिहिलेली कविता आहे म्हणून....
त्यांच्या स्वभावानुसार ते अशी कविता लिहू शकतात...
तुझ्या प्रत्येक शब्दातला विरोधाभास असा तीरासारखा सुटला आहे...
एखाद्या किडकिडीत मुलाने full दादागिरी करावी तसा...
अप्रतिम! भटांचीच आठवण झाली बर्‍याच दिवसांनी...
आमच्या पिढीच्या तरूणांच्या अंतःर्विरोधि भावनांना भटांनी शब्दाने वाट दिली...
आजही ते शब्द तितकेच खरे वाटतात...
तुझ्या प्रत्येक अक्षरात त्यांना जगवलं आहेस...





Sumedhap
Thursday, February 22, 2007 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाट तुझी पाहता......

सख्या तुझी वाट पाहता दिन उतरुन गेला,
मावळला सुर्यही आता, वेळ कातरुन गेला

शब्द दिला होतास तु आज भेटण्याचा
सार्‍या त्या गोड आठवणी पुन्हा समेटण्याचा

किती स्वप्नांचे जाळे मी मनी माझ्या विणले
वाट तुझी पाहता पाहता डोळे माझे क्षिणले

चंद्रही तो मंदावला, थकुन निजुन गेला
मिलनात रात्रीच्या निशीगंधाने भिजुन गेला

हा निशीगंध सुद्धा आता होणार आहे साक्षी
मिलनाला छत्र आपल्या देईल तार्‍यांची नक्षी

जन्मभर वाट पाहीन तुझी,माझी आठवण राहुदे,
फक्त मला एकदा तुला डोळेभरुन पाहुदे,डोळेभरुन पाहुदे....


Smi_dod
Thursday, February 22, 2007 - 11:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा मानस....सही!!

धन्स माणिक..:-)

पराभूत!!!!!

ती संकेत स्थळे,ती वचने, त्या शपथा
सगळे नजेरेत प्रश्न घेउन बघत होते
ती पाने, फ़ुले,गवताचे गालीचे
त्यांच्या रोखलेल्या नजरा
सगळ्याच्या बाण आता मी चुकवत होते
मी नाकारलेले बंध,
झिडकारलेले क्षण
माझ्याकडे बघुन हसत होते
मी जिव्हारी घाव लागल्या सारखी
जखमी, पराभूत......
आज ते सगळे जिंकले होते
अन मी मात्र हरले होते....

स्मि


Neelkantee
Friday, February 23, 2007 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस,
वसंत आबाजी डहाकेंच्या 'आणि तिथे गुरुदत्त मेलेला आढळतो' ह्या कवितेची आठवण करुन दिलीस... विरोधाभासाचा कळस होता तो...
'माणुस' नावाचं पाक्षिक माजगांवकर काढायचे... त्यावेळच्या नवकवी... नवलेखकांच्या प्रतिभेला विसावायला दिलेली ओसरी...
आणि so called प्रथितयश प्रकाशकांना दिलेली खुन्नस...
त्यात डहाकेंची ही कविता प्रसिद्ध झाली होती....


Mankya
Friday, February 23, 2007 - 12:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sumedhap .... वर्णन छानच केलयस.. निशिगंध मस्तच !

स्मि .... खरंच असं हारण्याची वेळ कुणावर येऊ नये बघ ....
मस्तच लिहिलस गं ! सहज आठवलं म्हणून !

काळ जातो म्होरं म्होरं
जस वाघ लागला पाठी
काळाच्या मागं धावणं
एवढंच माणसाच्या हाती !

माणिक !


Neelkantee
Friday, February 23, 2007 - 12:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि
शेवटी
'मी मात्र हरले होते...'
असं असावं असं वाटलं...


Peshawa
Friday, February 23, 2007 - 12:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवाडेच बंद ठेवणाऱ्यांनी प्रकाशाची तिरिप मागु नये,
--------------------------------
बंद कवाडे
काही मागण्यासाठि असतात?
लपवतात ती
आतला कोवळा जखम...
त्याचा पाझरणारा उजेड...
दादागीरी फ़क्त काळोख करत नाही
उजेडाची जरब भोगणार्या
असंख्य डोळ्याना
बर्फाची धाव घेताना
पाहिल्यावर पापण्या
मिटतात
तसे असते कवाडांचे
अंधार विर्घळवून टाकतो
रेघा भासांचे अस्तित्व...
आरशातील प्रावर्तीत प्रतीमा...
ज्ञानाच्या गोधडिवारील
आत्मघोशाचे डाग...
कुठलिःइ शिवण न उसवता
नागडे करून जातो
आतला दुबळेपणा
स्वत्:च्या नकळत स्वत्:साठिच
कसा पोलाद होतो
हे अंधारात वितळ्या खेरीच
कवाडे मिटल्या खेरीच
कसे उमजणार?

----------------------------------------
मानस धन्यवाद वरच्या ओळिवरुन सहज हे सुचल...

मयुर, निलकंती शब्दांची धाव आवडली





Neelkantee
Friday, February 23, 2007 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काळ चाले बरोबर...
हात घेऊनिया हाती...
चालावं बेगीनं...
मग पावलांच्या सोबती...

बदलती वाट पावले पावलात...
रुळे... पळे... पाऊलवाट...
मग पावलांच्या सोबती...

कधी रुते जरी काटा...
रक्त ठिबके चालीत
बदलत्या पावलात...
वाट अडखळे...क्षणिक...



Mankya
Friday, February 23, 2007 - 12:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवा ... मित्रा जबरीच रे !
फक्त काहि शुद्धलिखाणाच्या चुका आहेत असे वाटते
भोगणार्‍या, आतली कोवळी जखम ... इ.
अस काहिस वाटतंय ! चु.भु.दे.घे.

निलकांती ... केवळ सुरेखच गं ... वाट अडखळे ... क्षणिक .. मस्तच !

माणिक !


Smi_dod
Friday, February 23, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताइ..:-) केला बदल..बघा आता..:-)
वाट अडखळते... ...जबरी!!!


Peshawa
Friday, February 23, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेग झाला देह
रेघ रेंगाळे नभात
पंख भोग
उतु आले
आला लांबचा प्रवास...

फ़ुल उमले फ़ांदीशी
जिची व्याक्या लोंबकळे
निळि झेप
जाणिवेची
भय टाचेत दुबळे...

वेग झाला देह
ढग मैलाचा दगड
शुभ्र झाले
दुख माझे
हिम वर्षावाचा सण...




Ajjuka
Friday, February 23, 2007 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीलुताई, सॉल्लिडच लिहिताय की हो. लागलं मायबोलीचं व्यसन लागलं तुम्हालाही.
जया.. मित्रा पहिली खूप नाही आवडली..
'हिंदोळणारा एक थेंबही नसेल तुमच्या शरीरपेल्यात
तर दारावर पावसाला बोलावू नका..'
ह्या तुझ्याच शब्दांशी बेमानी केलीस की काय असं वाटतय.
दुसरी.. मस्त.. गे माये ची आठवण झाली


Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह .. सही कविता आहेत ..

मित्रांनो .. गज़लप्रेमी व गज़लेच तंत्र शिकण्यास उत्सुक कवी / कवयित्रींसाठी कार्यशाळा करण्याचा विचार आहे . अधिक माहितीसाठी मराठी गज़ल बीबी वाचावा


Ganesh_kulkarni
Friday, February 23, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता कुठे...
आता कुठे कविता
माझ्या मनात...
माझ्या अंगणात...
येत असते अधूनमधून...,
घेण्यासाठी विसावा!,
एरव्ही म्हणे ती होती...
घायाळाच्या शोधात...
कदचित मी ही...
आता कुठे तिला...
थोडा घायाळ...
वाटत असावा!

गणेश(समीप)


Niru_kul
Friday, February 23, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू माझ्या स्वप्नांची राणी बनशील का?
( गाणे क्रमांक - ३ )

तू माझ्या स्वप्नांची राणी बनशील का?
माझ्या जीवनाला दिशा नवी देशील का?

श्वासात तू, माझ्या ध्यासात तू,
डोळ्यांना होणार्‍या भासात तू;
स्वप्नांत तू माझ्या रात्रंदिवस,
माझ्या प्रत्येक क्षणाच्या सहवासात तू...
हळव्या या मनाची भावना जपशील का?
तू माझ्या स्वप्नांची राणी बनशील का?

ओठांत तू, माझ्या शब्दात तू,
माझ्या प्रत्येक कवितेच्या अर्थात तू;
मी गुंतलो आता तुझ्यामध्ये,
माझ्या प्रत्येक निर्मीतीच्या जन्मात तू
माझ्या आयुष्याची अर्धांगी होशील का?
तू माझ्या स्वप्नांची राणी बनशील का?


Paragkan
Friday, February 23, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीमंत, (बर्‍याच दिवसांनी संधी मिळाली आहे तेव्हा) ... कुर्निसात! दोन्ही कविता आवडल्या.
पहिली भिडली गड्या! बर्‍याच दिवसांपासून असंच काही मनात घोळत होतं ... आता लिहायची गरज नाही.

निलूताई ... खासच लिहिताय!


Manas6
Friday, February 23, 2007 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुझ्या कार्यशाळेला ह्या काव्यमय शुभेच्छा!

...बघ गझल उमलली!

(उर्दूतील प्रसिद्ध शायर जफर गोरखपुरी ह्यांच्या ' तो समझो गझल हुई' ह्या गझलेचा स्वैर भावानुवाद; मात्र गझल ह्या वृत्तात नाही)

मूळ गझल

मिले किसीसे नजर, तो समझो गझल हुई,
रहे ना अपनी खबर,तो समझो गझल हुई

मिला के नजरों को, वो हया से फिर,
झुका ले अपनी नजर,तो समझो गझल हुई

इधर मचल कर उन्हें, पुकारे जुनूं मेरा,
भडक उठे दिल उधर, तो समझो गझल हुई

उदास बिस्तर की सिलवटें, जब तुम्हें चुभें,
न सो सको रातभर, तो समझो गझल हुई

वो बदगुमां हो तो, शेर सुझे ना शायरी,
वो महर-बां हो 'जफर', तो समझो गझल हुई
---------------------------------------------

मराठी भावानुवाद
..बघ गझल उमलली!

भेटता हे, नयन अपुले,बघ गझल उमलली!
मजसी मी, विसरलो अन,.. बघ गझल उमलली!

क्षणभरी, बघुनी तिने, लाजेने मग हळूच,
झुकविली खाली नजर अन,.. बघ गझल उमलली !

ह्या उदास शयनाच्या, सुरुकुत्या खुपती जीवा अन,
जागता मी रात्र सारी ,..बघ गझल उमलली!

झुरता मी हाय! येथ , 'तिकडेही' अन बघा ना,
'आग रेशम' चेतली अन,.. बघ गझल उमलली !

होती जेंव्हा रुसुन, कविता ना मज सुचे पण,
गोड ती हसली 'जफर' अन,..बघ गझल उमलली !

(ह्या भावानुवादात जर 'उमलली' हा शब्दाच्या
ठिकाणी 'उमजली' हा शब्द घातला तर
आशयाचा आणखी एक पदर दिसु शकतो असे
मला वाटते.)

--मानस६
(कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना दिलेल्या थीमवर 'हझल' लिहिण्याची सुद्धा अनुमती असावी)

















Sumedhap
Friday, February 23, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाया

रस्त्यावर चालत असताना पाहिले दोन पक्षी
एका रेषेत उडत होते स्वैर आकाशी
एकमेकांचा सहवास जणु त्यांना जगायचा होता
मलाही त्यांच्यातला आपलेपणा बघायचा होता
रस्त्यावर काही पाहुन खाली उतरुन आले
भरधाव एक वाहन येऊन एकाला बिथरुन गेले
दुसरा मग चिवचिव करत तिथेच फिरु लागला
सभोवताली त्या शवाच्या भिरभीरु लागला
रस्त्यावर वाहन येताच जरा कडेला यायचा
पुन्हा तिच्या जवळ जाऊन चिवचीवाट करायचा
जणु तिला सांगत होता,"ऊठ, पुन्हा उडुया."
"घरट्यात आपला नवा संसार प्रेमाने घडवुया."
हा नित्यक्रम चालु राहीला फार फार वेळ
माझ्याने मग पहावेना हा जीवघेणा खेळ
उचलले त्या शवाला, कडेला ठेवले नुसते
दुसर्‍यालाही मरताना मला पहावले नसते
शांत रस्त्यावर फक्त त्याचा चिवचिवाट कानी पडत होता
अबोल त्या पक्षांचा भाव माझ्याही मनी जडत होता
इवल्याश्या ह्या जीवांमध्ये दडली आहे किती माया
आपण ही का बनवु नये ह्या भावनेलाच आपला पाया?


Ganesh_kulkarni
Saturday, February 24, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मानस६,
"तो समझो गझल हुई" आणी "..बघ गझल उमलली!"
दोन्ही छान!
- सुमेधा "पाया" कविता मार्गदर्शक आहे!



Neelkantee
Sunday, February 25, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे कसे शांत शांत...
कोणाचीच का नाही चाहूल...
अचानक नीरव शांतता ही...
ना वाजे कुणाचे पाऊल....








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators