Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 22, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » मराठी गझल » Archive through February 22, 2007 « Previous Next »

Yog
Tuesday, February 20, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी ही खटकतय निश्चीत. त्याच शेराच्या दुसर्‍या ओळीत मग पुन्हा मीही चार धाम फ़िरलो असे का नाही लिहीत? गझलेची सर्वात शेवटची ओळ जरा गडबडलेली वाटते.
मला तर या गझलेत"मी" आणि "पण" याचीही आवश्यकता वाटत नाही. त्यामूळे subtle punch निघून जातो अस वाटत. गझल पुन्हा लिहायची गुस्ताखी केली तर :
भलतेच काजवे (घुसले?)घरात माझ्या
उपराच राहिलो तारान्गणात माझ्या

तुळस लावली जाई गुलाब सुद्धा
बाभळीच रुजली अन्गणात माझ्या

मठात गेलो अन (याचा वापर meter साठी?) मन्दीरात गेलो
चार धाम फ़िरलो शान्ती मनात माझ्या

नजरेत पाप आले मन वासनेत न्हाले
नुसत्याच आरत्या ताला सुरात माझ्या

तेल ना दिले ना वातही दिव्याला
अन्धार लख्ख दिपला उरात माझ्या
(अन्ती किव्वा लख्ख पैकी एकच शब्द बरा वाटतो. कुठला तो लिहीणार्‍याने ठरवायचा. अन्ती हे conclusive मूल्यमापन असल्याने त्यानन्तर "उरला" हे व्याकरणाच्या दृष्टीने योग्य वाटेल. लख्ख हे वैभन ने म्हटल्यानुसार quantitive विशेषण असल्याने त्यानन्तर दिपला हे योग्य वाटेल. तेव्हा शेवटची ओळ अन्धार लख्ख दिपला किव्वा अन्धार अन्ती उरला अशी लिहीता येईल का?)

वैभव, सारन्ग, गझलेची बाराखडी आणि इतर web links वाचल्या आहेत. त्यात गझलेच्या स्वताच्या व्याकरणावर दिलेला भर आणि जोर लक्षात येतो. पण तुमच्या माहिती नुसार किव्वा मतानुसार काव्यातील सहज सुलभता टिकवण्यासाठी मूळ मराठी भाषेच्या व्याकरणाचा योग्य वापरही असणे अपेक्षित आहे का? तसे जर लिहीता आले तर दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. अन्यथा गझलेच्या एकूण परिणाम अन "रचना बन्धाला" तुम्ही जास्त महत्व देता का? तुम्हाला काय वाटत? मी आधी म्हटल्यानुसार मला गझल लिहीणे म्हणूणच अधिक अवघड वाटते कारण त्यात भाषेच्या मूळ व्याकरणा खेरीज (जे आजकाल पाळले जातेच असेही नाही) गझलेच स्वताच व्याकरणही पाळाव लागत.
चू. भू. द्या. घ्या.


Bairagee
Wednesday, February 21, 2007 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सानी मिसरे (दुसऱ्या ओळी) विशेष आवडले.
उपराच राहिलो मी तारांगणात माझ्या !
पण बाभळीच रुजली या अंगणात माझ्या !
नुस्त्याच आरत्या पण ताला-सुरात माझ्या !!

वा. मतल्यात काजवे "घुसलेले" बरे वाटत नाहीत हे खरे. पण मतला चांगला आहे. "बाभळी"ही. असो.


Mahesh
Wednesday, February 21, 2007 - 1:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे गझल, त्याची सर्वांनी मिळून चिरफाड नका बुवा करू.
विनोद आणी कविता याचे खुप जास्त विश्लेषण केले की त्यातली गंमत निघून जाते असे वाटते.


Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग काय जबरदस्त गझल लिहतोस रे!
हा शेवट म्हणजे सगळ्या शेरांचा बाप!
'ना तेल मी दिलेले, ना वातही दिव्याला
अंधार लख्ख अंती दिपला उरात माझ्या...!'

बाकी गझलेची बरीच चिरफाड चालू आहे... हे पाहीलं माझ्यासारख्यांचा
'गझल लिहू शकू' हा नसलेला 'आत्मविश्वास' मायनस होतो :-(

व्याकरण हे शिरेना डोक्यात माझ्या! :-(

'वृत्त' म्हणजे नेमके काय ह्याविषयी एखादी लिंक दिली तर बरे होईल :-)
चू.भू.द्या.घ्या.


Devdattag
Wednesday, February 21, 2007 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महेश आणि मयुर तुमच्याशी असहमत..
उलट ह्या चर्चा व्हाव्याच, फक्त त्या वाचाव्यात किंवा वाचू नये हे ज्याचे त्याने ठरवाव..
आणि ह्या चर्चा नाही झाल्यातर आम्ही पामरांनी कुणाकडून शिकावं..:-)


Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 3:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त साहेब.. चर्चा तर झाल्याच पाहीजेत :-)
माझा कधी विरोध नाही चर्चेला!
पण कधी कधी ह्या चर्चा 'समजत' नाहीत आमच्या सारख्या पामरांना...
म्हणुन तर म्हटले 'वृत्त' वगैरे विषयी धडे दिलेत तर छान होईल :-)


Meghdhara
Wednesday, February 21, 2007 - 3:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव अगदी खरय..
झाला तर फायदाच आहे आपला..
मेघा



Sarang23
Wednesday, February 21, 2007 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो, आभार...
आणि इतकी सुंदर चर्चा होतेय हे पाहून खुप आनंदही झाला.

चाणक्य मीही मधला 'ही' एक followers mentality दाखवतो, असं नाही वाटत तुला? स्वातीने अगदी योग्य विश्लेषण केलय...

दिनेशदा...
पण आरत्या नुसत्याच तालासुरात माझ्या
इथे पण आरत्याच नुस्त्या तालासुरात माझ्या
'च' ची अदलाबदल करून बदल आवडला... तरि मधला लघू रि खटकला
त्यापेक्षा पण आरत्या तरीही तालासुरात माझ्या अजून मजा आणेल असं वाटतं. तुला काय वाटतं?

योग... मीही चा खुलासा अजून थोडासा...

मीही इतरांच बघून मनःशांतीच्या शोधार्थ मठात गेलो, मी मंदीरात गेलो, मी गाव गाव फिरलो... पण शांती मनातच होती! असं वाक्य मी लिहू शकत नाही का? ही ची पुनरावृत्ती सगळीकडे करण्याची खरच गरज आहे का?
वरचं लाल रंगातलं वाक्य व्याकरणदृष्ट्या निर्दोष आहे असा माझा दावा आहे, आणि तिथे एकदाच ही वापरलाय...
आता तू केलेले बदल पाहू...

भलतेच काजवे (घुसले?)घरात माझ्या
उपराच राहिलो तारान्गणात माझ्या

मला घुसले वरचा आक्षेप कळाला नाही...

तुळस लावली जाई गुलाब सुद्धा
बाभळीच रुजली अन्गणात माझ्या

मला पहिल्या ओळीत कुठलीच सहजता जाणवली नाही... आणि ती ओळ व्याकरणदृष्ट्या सदोष वाटते.

इथे सगळीकडेच पण हा सगळ्यात जास्त परीणामकारक शब्द आहे असे वाटते. तू परत विचार करून पहावास असे वाटते.

मठात गेलो अन (याचा वापर मेतेर साठी?) मन्दीरात गेलो
चार धाम फ़िरलो शान्ती मनात माझ्या

मिटर तर कुठेच follow केलेलं दिसत नाहीये...!

शेवटी दोन्ही शद्ब महत्त्वाचे आहेत... अंती पण आणि लख्ख पण... आणि म्हणूनच ही पण ची द्विरुक्ती जेणेकरून पण चे महत्त्व पण तुझ्या लक्षात येईल.

पण तुमच्या माहिती नुसार किव्वा मतानुसार काव्यातील सहज सुलभता टिकवण्यासाठी मूळ मराठी भाषेच्या व्याकरणाचा योग्य वापरही असणे अपेक्षित आहे का?

पाहीजेच!!! आणि मला वाटतं की मी किंवा वैभव तो नक्कीच करतो. यावरून वेळोवेळी झालेली चर्चाही तितकीच महत्त्वाची आहे.

तसे जर लिहीता आले तर दुग्ध शर्करा योग म्हणता येईल.
हो. मी माझ्या मराठी व्याकरणाच्या अभ्यासानुसार व्याकरणदृष्ट्या निर्दोष लिहिण्याचा कायमच प्रयत्न करत असतो. तुझ्याकडे अजून काही माहिती असल्यास वाचायला नक्की आवडेल.

(जे आजकाल पाळले जातेच असेही नाही)
अशी उदाहरणे वाचायला आवडतील जिथे ते पाळले गेले नाहीये.

तुझ्या कळकळीचा आदर करून एक गोष्ट सांगतो... पुनर्लिखीत केलेल्या गझलेमध्ये मला मराठी व्याकरणानुसार प्रचंड चुका आढळल्या आहेत; पण value addition कुठेच दिसले नाही. अर्थात हे माझं मत आहे. जरा परखड वाटत असेल तर क्षमस्व.

चु. भु. दे. घे.



Sarang23
Wednesday, February 21, 2007 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर, वृत्ताची लिंक नाही माहीत; पण मी माझ्यापरीने सांगतो.

मराठी लिखाणात दोन प्राथमीक गट पडतात... गद्य आणि पद्य...

गद्य हा खूप मोठा विषय आहे, त्यामुळे तो सोडतो.

आता पद्य... पद्यात दोन प्रकारचे लिखाण होते छंदबद्ध आणि छंदमुक्त...

छंदबद्धात म्हणजेच वृत्तबद्ध रचनांमध्ये पुढे दोन गट पडतात...

मात्राछंद किंवा मात्रावृत्त, आणि
अक्षरगणवृत्त (अक्षरगणछंद)


आता पुढे पोटजाती सांगत नाही कारण मात्रावृत्तात किमान माझ्या माहितीनुसार ११२ ते १२० वेगवेगळ्या उपजाती आहेत... (अजून भरपुर असाव्यात असे वाटते, मला ज्ञात नाहीत ही खेदाची बाब...:-()

आणि अक्षरगणवृत्तातही असाच प्रकार आहे.

मात्रावृत्तात फक्त यती (वाचताना जिथे थांबाव लागत)आणि मात्रांच बंधन असतं आणि अक्षरगणात लघु गुरु क्रम, यती आणि मात्रा या दोन्हींच...

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

इथे यती आणि मात्रा सम आहेत, पण भुजंगप्रयातादी वृत्तांप्रमाणे लघु गुरु क्रम समान नाही.

आता अक्षरगणामध्ये १० अक्षरींपासून २३ अक्षरींपर्यंत बरेच combinations असतात...

जसे की

अनंता तुझे गोल तारे तुझे
(सौदामिनी)
लगागा लगागा लगागा लगा

बुडाल्या जळी केशरी लाल ओळी!
अश्या सावळ्या मर्मरी सांध्यवेळी!
(भुजंगप्रयात)
लगागा लगागा लगागा लगागा

अक्षरगणवृत्त ओळखण्यासाठी तीन तीन अक्षरांचे गट केले जातात आणि मग त्यांना आद्य, मध्य, अंत्य आणि सर्व लघू तसेच आध्य मध्य, अंत्य आणि सर्व गुरु अशाप्रकारे विभागलं जातं...

त्यांचा क्रम असा...
य र त न भ ज स म

मग त्यानुसार भुजंगप्रयाताचे लक्षण म्हणजे सगळ्याच गटात आद्य लघू आहे म्हणजे चार वेळा य येतो... म्हणून आपल्या हुशार व जाणकार मंडळींनी भुजंगप्रयाती य ये चार वेळा असे त्याचे लक्षण सांगितले अहे...

असेच जतजगग, ततजगग ही इंद्रवज्रा आणि उपेंद्रवज्रा वृत्ताची लक्षणे
नभभर ही दृतविलंबित ची लक्षणे आहेत.
असे भरपुर सांगता येतील... मंदाक्रांता, पृथ्वी, मालिनी, स्त्रग्धरा, स्त्रग्विणी, शार्दुलविक्रिडीत, मंदारमाला, सुमंदारमाला, वसंतमाला आणि अजून खूप...

मी थांबतो, कारण वृत्त पाहिजे तितके तयारही करता येतील... आणि जे कानांना लयीत ऐकायला छान वाटतात तेवढेच आपल्या पुर्वजांनी लिहून ठेवले आहेत सध्या तेच पुरेसे आहेत!

ही पोस्ट उपयोगाची नसेल तर कृपया सांगा म्हणजे उडवतो. उगीच इथली जागा वाया घालवायला नको.







Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान माहिती सांगितलिस सारंग.. ग ला गा आत्ता समज्ले.. !!!

Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान सारंग...थोडे थोडे समजते आहे..:-)

Dineshvs
Wednesday, February 21, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग तूम्ही कविमंडळी, सगळ्यांच्या सुचनांकडे लक्ष देताय
आणि मूळात अशी चर्चा ईथे होतेय, हे एक फार चांगले लक्षण आहे.

वृत्तात लिहिलेल्या कवितेला, एक अंगभुत लय असते. ( जयुच्या कवितात
तर ती नैसर्गिकरित्याच येते. ) कविता मनात जरी वाचली, तरी वाचनात
ती लय जाणवते, आणि हि लय अर्थाला सोबत घेऊनच येते. त्यामूळे एक वाचक म्हणुन
जिथे मी अडखळतो, ते आवर्जुन लिहितो.

पुर्वी सिनेमासाठी गीत लिहिणारे, सगळेच अश्या चर्चेला सामोरे जात असत,
त्यामुळेच जुन्या गाण्यातले शब्द कसे, अर्थाला, लयीला सहज वाहून नेतात.


Yog
Wednesday, February 21, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारन्ग,
दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! तुझी गझल सदोष आहे असे मला म्हणायचे नव्हते. hope you didn't take it that way cause ur post is much defensive ,म्हणून मुद्दामून नमूद करतोय. ही फ़क्त विचारान्ची देवाण घेवाण आहे, टीका अन उत्तर प्रत्त्युत्तर नव्हे.

"जे आजकाल पाळले जात नाही" हे मी एकन्दरीत कविता किव्वा लिखाणाबद्दल म्हणतोय. अर्थात हे माझे मत.

"अन" हे तुझ्या गझलेत तू meter साठी वापरलस का असा प्रश्ण होता. "ही" बद्दलही तसच वाटत.
असो.
इथे काहीनी म्हटले आहे तेही खरे आहे कविता वा इतर लिखाण ही एक सहज(?) निर्मिती असते, स्फ़ुरण असते. ते असे का तसे का अशी चिरफ़ाड करण्यात अर्थ नसतो. मी स्वता हेच लिहीले होते (जे आता माघ महिन्यात archive मधे गेले आहे) की लिहा अन वाचा तृप्त मनाने, चर्चा गौण आहे. पण "गझल" हा प्रकार free form नसल्याने त्याच्या नियम, बन्ध, रचनेबद्दल अशा शन्का, कुशन्का येणारच. त्यातून लिहीणार्‍याला वा वाचणार्‍याला दोघान्नाही फ़ायदा व्हावा ही अपेक्षा.


Pulasti
Wednesday, February 21, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पीक
=====================
लाविले मी बी कशाचे हे कशाचे पीक आहे?
पाहिजे ते वाघ होते हे सशांचे पीक आहे!

आज कोण्या प्रेषिताच्या मागुती लपशील देवा?
झिंगले त्यांच्याच वेड्या वारशांचे पीक आहे.

देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
द्वेषसूक्ते घोकणार्‍या मदरशांचे पीक आहे.

मी जसा आहे तसा कोणीच का ना ओळखावे?
का सभोती आंधळ्या या आरशांचे पीक आहे?

गोठलेली स्पंदने घन-तामसीशी रात्र, आणी
फुंकण्या अंगारविझल्या कोळशांचे पीक आहे.

-- पुलस्ति

Yog
Wednesday, February 21, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! क्या बात है.. शेवटचा शेर लयी खास.

Bhramar_vihar
Thursday, February 22, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
द्वेषसूक्ते घोकणार्‍या मदरशांचे पीक आहे.

पुलस्ति,इथे काहीतरी खटकतं आहे.. म्हणजे लय नाही सापडत. मी काही जाणकार नाही, एक सामान्या रसिक म्हणु मला वाटलं ते लिहिलय. चु.भु.द्या.घ्या.

आंधळ्या आरशांचे पिक... मस्तच!


Nandini2911
Thursday, February 22, 2007 - 12:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज कोण्या प्रेषिताच्या मागुती लपशील देवा?
झिंगले त्यांच्याच वेड्या वारशांचे पीक आहे.

हा शेर मस्त आहे...


Meenu
Thursday, February 22, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पुलस्ति मस्तच आशयसंपन्न गज़ल ...

Meghdhara
Thursday, February 22, 2007 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति, वाह!
मी जसा आहे..
अगदी..
पण त्यांना झेपलो नाही तर ही भिती रहातेच दांभिकता जपत. लूप.

मेघा



Meghdhara
Thursday, February 22, 2007 - 1:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वारशांचे की वारसांचे?

मेघा





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators