Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 21, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through February 21, 2007 « Previous Next »

Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 1:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया,सुधीर,वैभव,मयुर,भ्रमर,प्रिन्सेस,रधिका.परागकण अभिप्रायाबद्दल मनःपुर्वक आभार.....
आपण लिहीतो ते कितीही स्वान्तसुखाय म्हटल तरी अशी दाद मिळाली की अजुन लिहिण्या साठी प्रोत्साहन मिळते...
लिहावे अजुन ही भावना जागत ठेवते..:-)

स्मि


Manogat
Wednesday, February 21, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरलंकेश्वर, पुलिस्त
धन्यवाद :-)
असेच प्रोत्साहन तुम्हा लोकांन कडुन मिळाल
तर माझ्या सरख्या नव कविला पण कहि लिहिण्याच उत्तेजन मिळत,
Thanks


Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 1:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका
!!!!!

स्मि शील्लक वाह :-)


Shirishk
Wednesday, February 21, 2007 - 2:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिक्षा

किती हा उशीर!

जेव्हा कोसळले मी, तेव्हा जवळ असतास
तर कदाचित कळली असतीही तुला
माझी कधीच न जाणवलेली वेदना
कदाचित कळली असतीही
माझ्याबरोबरच मिटणारी माझी एकच याचना!

आजतरी लवकर यायला पाहिजे होतस तू

सगळ्या गात्रांमधलं त्राण निघुन गेलं तरी
मी प्राणांना कसं बसं धरुन ठेवलेलं
त्याना समजावत होते, इतके दिवस इतकी वाट पहिलीत,
आता थोडाच काळ...
पण तेही वेडे इतके हट्टाला पेटलेले
की मला न जुमानताच निघुन गेले ..(तुझ्यासारखेच!)

पण अजुनही आठवतं,
कोसळताना वेडी आशा होती
कदाचित ह्या शेवटच्या क्षणी तरी
माझी हाक तुझ्या मनापर्यंत पोहोचेल
आणि तु येशील

-----
अन आता ह्या सगळ्याच्या पार जाउनही मी पुन्हा इथेच!
कारण?
कारण... ही तशीच अतृप्त इच्छा
ही अनन्तापर्यन्त्ची प्रतिक्षा
ही कधीही न संपणारी शिक्षा
ही कधीही न संपणारी शिक्षा
शिरीष



Shyamli
Wednesday, February 21, 2007 - 2:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.. .. .. ..
अन आता ह्या सगळ्याच्या पार जाउनही मी पुन्हा इथेच!>>>
!!!!!!!


Vaibhav_joshi
Wednesday, February 21, 2007 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आवडलीकविता छान आहे. पुधील लेखनाला शुभेछ्ह

Dhund_ravi
Wednesday, February 21, 2007 - 2:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच ग शिरीष...
तुझ्या बाकीच्या कवितापण टाक ना

धुंद रवी


Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरीष कधीही न संपणारी शिक्षा आवडली!

Ssbhave
Wednesday, February 21, 2007 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त ग
अशीच लिहित रहा.
आम्ही असेच वाचत राहू.


Vinaysm
Wednesday, February 21, 2007 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतिम! खरंच खुप छान. येत राहूदे...

Meghdhara
Wednesday, February 21, 2007 - 3:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरीष.. व्वा.... कधीही न संपणारी..

मेघा


Sherloc
Wednesday, February 21, 2007 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे लिहिलेल्या सगळ्या कवितांवर "वा, खुप छान" असंच म्हणायची पद्धत आहे का? असल्यास माझ्याकडुनही सर्वच कवितांना "वाह!"

Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिरीष... सुंदर...

चाकोरी!!!!!

तीच चाकोरी
त्याच मळलेल्या पायवाटा
आखुन दिलेल्या
सुबक, गुळगुळीत
शिक्षण, नोकरी,मुल
वासनेच रहाटगाडग चालु असत
नंतर त्या चाकोरीत विरक्त झालेल मन
आसक्ती विरक्तीच्या हिंदोळ्यावर
मागे पुढे होत....कधी कधी
चाकोरी सोडुन धावत.... अवखळपणे
बर्‍याचदा जखमी होउन परत फ़िरत
चाकोरीत....पराभूत पणे
क्वचित कधी
ठेचकाळत,चुकत मार्गही सापडतो
वेगळा......
कधीतरी विरक्तीच्या मार्गावरही उतरत
चोखाळली जाते वेगळी वाट....

स्मि


Lopamudraa
Wednesday, February 21, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे दोन दिवसात भरपुर काही घडुन गेलेल दिसतय
आता काय काय वाचु अस झालय..!!!


Shirishk
Wednesday, February 21, 2007 - 4:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks re sagalyna!
Mi ithali regular member nahi /navhate...
Mazi anakhin ek kavita attach keratiye..

Mazi kavita

Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि..फ़ारच मोठ्या विषयाला शब्दांकीत केलंयस...

'कधीतरी विरक्तीच्या मार्गावरही उतरत
चोखाळली जाते वेगळी वाट....' ह्याचा अर्थ समजला नाही :-(


Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 5:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुर आसक्ती आणि विरक्तीच्या हिंदोळ्यात आपण सगळेच येतो कधी न कधी.. ..
पण विरक्तीचा मार्ग तरी सगळेच स्विकारतात असे नाही. काहीजणच पुर्ण पणे विरक्त होतात.आणि मग हा विरक्तीचा मार्ग भिन्न नाही का?ईतरांपेक्षा?... असा अर्थ मला अपेक्षित आहे..:-)


Smi_dod
Wednesday, February 21, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सुख!!!!

सुखाच्या शोधात निघाले
खुप पायपीट केली
ठायी ठायी जे जे म्हणुन
सुख असावेसे वाटले
ते ते पारखुन बघितले
हेच आहे का सुख?
कि अगोदर होते ते सुखावह होते
छे!कशास म्हणावे सुख
या शोधात गात्रे थकली
मन थकले...
थकल्या मनाने विसावल्यावर जाणवले
देण्यातल्या आनंदातल ते सुख
सुख हवय म्हणुन मागण्यात नसत
वाट्याला येईल त्यालाच सुख
म्हणुन स्विकारण्यात असत

स्मि


Mayurlankeshwar
Wednesday, February 21, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अच्छा.. असं आहे होय! विरक्तीचा मार्ग हीच वेगळी वाट आहे आधी मी कन्फ्यूज झालो होतो थोडासा :-)
काहीतरी 'चाकोरी' बाहेरचं वाचल्याचं जाणवलं!
शिरीष 'कौशल्य' सुंदर आहे.


Krishnag
Wednesday, February 21, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मि,.. खरय सुख मानण्यात असतं..:-)


सुख मागण्यात नसतं
सुख मानण्यातं असतं
वाट्याला आलेले सुखावह म्हणुन मिरवण्यात असतं
देण्यानं सुखावलेले चेहरे पहाण्यात असतं
तृषार्तांच्या ओठी जलाची ओंजळ धरण्यात असतं
क्षुधीतांच्या तोंडी चारा घालण्यात असतं
म्हणुनच सुख मागण्यात नसतं
तर देण्यात असतं
देता देता मिळालेल्या
आनंदात असतं





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators