|
मला अजूनही जमत नाही... ----------------------------- 'ब्रह्म' नावाची पाकसिद्धी अवगत करून सोवळ्यातल्या शब्दांना काव्यभोजन घालणे... हे मला अजूनही जमत नाही. सुसांट धावणा-या रस्त्यावरुन जेव्हा घराकडे परततात माझे एकाकी मोर्चे तेव्हा माझ्या SCRATCH पडलेल्या चेह-याकडे पाहुन कोसळतात घराच्या भिंती अन आरसेही. सवयीप्रमाणे मी नुसतेच पेलुन धरतो जाळ्या-जळमटांनी शिवलेले छत. माणसाचे कान तरी अजुन शाबुत असतील असं समजुन शेजारी म्हणतात-- "चलता काय प्रवचनाला? तेवढीच आध्यात्मीक शांती!" निघायचा विचार करतो न करतो तोच शेजारी सुचना करतात-- "सभामंडपात यायचं असेल तर छत इथेच सोडुन चला". मग मी जागचा हलत नाही. दूरातून उठतो जेव्हा टाळ-गजरांचा कुचकामी कल्लोळ, तेव्हा माझ्या चेह-यासमोर रेंगाळत असतात भर दुपारी फूटपाथावर सांडलेल्या माणसांच्या जखमांची पिढीजात सडलेली आयुष्यं... चौकाचौकात झिजणा-या माणसांचे कफल्लक सांगाडे... भरधाव चाकाखाली तुडविल्या जाणा-या सावल्यांचे आवाज... अब्रुच्या धास्तीनं धावणारं स्व:ताचं नागडेपण... आणि छतासकट मी खचतो जमिनीत! मी विचारतो पृथ्वीच्या गर्भाला -- "कुजलेल्या गर्भाशयातून इथे सृजनाचे दाखले दिले जातात, आपण तरीही म्हणायचे का?-- 'आत्मा वा अरे मन्तव्य श्रोतव्य|| आत्मा वा अरे निदिध्यासितव्य||'" छे! स्व:ताच्या षंढत्वावर अध्यात्माची कातडी पांघरणा-या समाजात मी जन्माला आलोय. माफ करा, पण इतकं सारं लिहल्यावर सहाव्या इंद्रीयाची भाषा बोलणे मला जमत नाही. 'ब्रह्म' नावाची पाकसिद्धी अवगत करून सोवळ्यातल्या शब्दांना काव्यभोजन घालणे... हे मला अजूनही जमत नाही. ----------मयूर------------------
|
मयूर मला अजूनही जमत नाही, खुप आवडली. बहुदा ही "सल' असावी असं वाटतं!
|
Meenu
| |
| Tuesday, February 20, 2007 - 4:23 am: |
| 
|
'आत्मा वा अरे मन्तव्य श्रोतव्य|| आत्मा वा अरे निदिध्यासितव्य||'" >>> याचा अर्थ हवाय मला ..
|
मीनु.. अर्थ पुढील प्रमाणे--- ' आत्म्याचे सदैव मनन करावे.. आत्म्याचे सदैव श्रवण करावे.. आत्म्याविषयी नित्य ध्यास असावा.' हे मी 'ययाती' मध्ये वाचले होते... वेदामधला हा श्लोक आहे असा कादंबरीत संदर्भ आहे. गणेश धन्यवाद! तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा 'सल' नाहीये... फक्त मला काही गोष्टी पटत नाहीत एवढंच!
|
स्मि...तुमचा कवडसा मनावर चांदणे पेरुन गेला..!!
|
मयुर, अंगावर आली कविता. एक विनंती करेन, संस्कृत श्लोक वगैरे कविते मधे वापरले तर सर्वाना कळतीलच अस नाही... म्हणजे मला तरी नव्हता कळला. शक्यतो अशा श्लोकाचा अर्थ घेउन तशी रचना केली तर छान! cbdg
|
स्मि, शिल्लक! सहि जमलीये!
|
Princess
| |
| Tuesday, February 20, 2007 - 5:53 am: |
| 
|
पुलस्ति, नायगारा मस्तच मानस, गावरान कविता आवडली स्मि, दोन्ही कविता सुरेख पण कवडसा पेक्षा शिल्लक छान... गणेश, अनामिक सुरेख जमुन आलिये. मैफिलीत मजा येतेय आता...
|
भ्रमर खरंय..श्लोकाचा अर्थ आधी द्यायला हवा होता..किंवा तशी रचना करून कविता सादर करायला हवी होती... पण आधीच लांब कविता लांबलचक होईल म्हणून श्लोक आहे तसा लिहला. मुळात कवितेतला जो काही 'रिदम'(असलाच तर ) आहे तो जपण्यासाठी आहे तसा श्लोक वापरणे उचित वाटले. चु.भु.दे.घे.
|
Devdattag
| |
| Tuesday, February 20, 2007 - 6:21 am: |
| 
|
मयुर.. उपनिशदातल हे एक वाक्य आहे, "आत्मा वा अरे द्रष्टव्य: श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य:. ", पण वेदांमध्ये मुमुक्षुची कल्पनाही मांडलेली आहेच की... वेदात दोन संकल्पना मांडल्या आहेत १. स्वर्गाची कामना करणार्यांनी कर्मकांडाची कास धरावि.. २. ब्रम्हाची अपेक्षा ठेवणार्यांनी ज्ञानकांडाची कास धरावि.. दुसरा मार्ग तसा कोणालाही जमत नाही..
|
Raadhika
| |
| Tuesday, February 20, 2007 - 6:24 am: |
| 
|
मयूर, खूप म्हणजे खूपच छान आहे कविता. स्मि, सुरेख as usual . मानस, 'गेले आडवे मांजर'... छानच
|
राधिका खूप खूप धन्यवाद! देवदत्त तुमच्या एक्सप्लेनेशन बद्दल आभार! इथे मी कवितेतुन जो मुद्दा मांडायचा प्रयत्न केला तो 'अपेक्षा' ठेवणे जमत नाही ह्या अर्थाचा नाहीये. स्वर्ग,ब्रह्म ह्या हायपोथेटीकल गोष्टी माणसाला आंधळ्या बनवितात असा निदान माझा तरी वैयक्तीक अनुभव आहे. आताच्या जगात कर्मकांड आणि ज्ञानकांड हे वेगवेगळे राहीलेतच कुठे? कशाला 'ज्ञान' म्हणायचे हा वादाचा मुद्दा आहे ना? चु.भू,दे.घे. मानस कविता छान आहे... सोप्या शब्दात प्रबोधनीय! स्मि 'शिल्लक' सुरेख!
|
Manogat
| |
| Tuesday, February 20, 2007 - 8:34 am: |
| 
|
"दोन प्रेमाचे ते बोल" नाहि मायेचा पदर, नाहि शब्दांचा आधार, इथे हरवले काय, दोन प्रेमाचे ते बोल. नाहि पाठिवर थाप, नाहि धिरचे ते बोल, इथे हरवले काय, दोन प्रेमाचे ते बोल. वाहता नयनातुन पणि, इथे पुसणार कोण, अश्य अनोळख्या देशि मी हरवले काय, दोन प्रेमाचे ते बोल. घरट्याला सोडुन, आकाशि उडतांना, त्या पिल्लाला कळणार कसे, त्याने हरवले काय, दोन प्रेमाचे ते बोल. जाता परदेशि आई, आज उमगले मला, किति अनमोल होते, तुझे दोन प्रेमाचे ते बोल, तुझे दोन प्रेमाचे ते बोल.
|
Niru_kul
| |
| Tuesday, February 20, 2007 - 9:28 am: |
| 
|
तिमीर.... तसा तो माझा बालपणीचा मित्र.... एकदम जिवलग... पण तरीही थोडासा भितीदायक.... कधी त्याचा सहवास अगदी हवाहवासा वाटे.... तर कधी त्याच्याबरोबर असताना मन अगदी गुदमरुन जाई.... पण एक खासियत होती त्याची.... त्याच्या कुशीत शिरल्यावर, सगळी दुःख पसार होऊन जायची.... त्याच्या मिठीत मला, शांतता लाभायची.... त्यानेच तर जन्म दिला माझ्या प्रतिभेला.... त्यानेच तर पोसलंय माझ्या प्रत्येक कवितेला.... त्यानेच तर मला शब्द दिले.... त्यानेच माझ्या काव्याला रंग दिले.... आणि आज.... आज माझ्या काव्याचा अविभाज्य भाग बनलाय तो.... माझ्या नियतीशी नातं जोडून बसलाय तो.... पण त्याला ठाऊक नाहीये, की आता त्याचा आणि माझा संबंध एवढा गहीरा राहणार नाही.... कारण "तिच्या" आगमनामुळे आता माझे आयुष्य उजळले आहे... त्याने जन्माला घातलेली भावना, आज तिच्यावर लुब्ध झाली आहे.... त्याच्या ऐवजी आता मला, तिची संगत प्यारी आहे.... मैत्री आमची दुरावली तरी, तुटणार मात्र नक्कीच नाही.... कारण असा मित्र कुठेही, शोधूनही सापडणार नाही...
|
Pulasti
| |
| Tuesday, February 20, 2007 - 10:14 am: |
| 
|
गणेश (पाट्या, अनामिक), श्यामली (अपेक्षा), स्मि (मौन, शिल्लक, कवडसा), जया (बुरखा), कांचन (विश्वास), मानस (मांजर), मनोगत (प्रेमाचे बोल), देवा (बहाणे) - कविता खूप आवडल्या! मयुर - बाप समजली पण आवडली नाही.. (अर्थात सर्वांना आवडणार नाहे हे तुम्ही हे आधीच जाणलं होतं!). "जमत नाही" खूप आवडलीय.. पण अजून पूर्ण समजली नाहिये. पुन्हा एक-दोनदा वाचीन. जया, मयुर, श्यामली, प्रिंसेस, वैभव - नायगारा वरच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद! -- पुलस्ति.
|
Paragkan
| |
| Tuesday, February 20, 2007 - 12:20 pm: |
| 
|
Mayur, Good one! चांगली लिहिली आहे 'जमत नाही'. पण शेवटचा punch अगदीच obvious आहे. छे! स्व:ताच्या षंढत्वावर अध्यात्माची कातडी पांघरणा-या समाजात मी जन्माला आलोय. माफ करा, इथे 'सूचकतेचा' वापर जास्त परिणामकारक झाला असता ..... अर्थात हे माझं मत. 'नायगरा' आवदली. खासच उतरली आहे. 'शिल्लक' ... वाह!
|
Daad
| |
| Tuesday, February 20, 2007 - 7:39 pm: |
| 
|
मनाचा तो कोपरा नं? अनेकदा स्वच्छ केला, जळमट काढली, सारवला! म्हटल असूदे, वापरता येईल पुन्हा कधीतरी! पण रोज कोण काढणार नव जळमट, नवा गुंता! आता कधी पडेल तेव्हा नवच बांधुन घेऊ एक नष्ट विचार नांदतोय मनाच्या त्या कोपर्यात! -- शलाका
|
मनोगत 'बोल' आवडले निरु...'तिमीर' चांगला आहे. शलाका..तुम्हाला 'दाद' देण्यास शब्द सापडत नाहीयेत...'मनाचा कोपरा' छान गवसलाय! पुलस्ती,परागकण धन्यवाद! परागकण 'सुचकतेचा' म्हणजे नेमका कशाचा वापर प्रभावी ठरला असता हे नीटसं समजलं नाही.
|
वेदात दोन संकल्पना मांडल्या आहेत >>>> देवा दोन नाही तिन. कृष्ण उध्दवाला तिन मार्ग सांगतो. पत्येक मार्गाने मुक्ती साधता येते. कर्मयोग, ज्ञानयोग नी भक्तीयोग. (ऑफकोर्स हे कवितांसंबधी नाही पण सहज वाचले म्हणून लिहावे वाटले).
|
पुनम,पुलस्ति... आभिप्रायाबद्द्ल धन्यवाद! गणेश(समीप)
|
|
|