Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 15, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » ललित » प्रेमदिनाची पूर्वसंध्या » Archive through February 15, 2007 « Previous Next »

Jayavi
Tuesday, February 13, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



प्रेमदिन - अर्थातच Valentine Day!!

फेब्रुवारी महिना सुरु झाल्या झाल्या वेध लागतात व्हॅलेन्टाईन डे चे. पहिला आठवडा संपला की माझी फ़िल्डींग सुरु होते. टिव्ही, नेट, मासिकं........ जिथे कुठे ह्या प्रेमदिनाची जाहिरात दिसेल तिथे त्या जाहिरातीचं analysis करायला सुरवात करायची म्हणजे संभाषणाची गाडी बरोबर रुळावर येते (मला हव्या त्या दिशेला :-) ) . मग हळूच ......
" अवी ....माझ्या मैत्रिणीला ना (बरेचदा काल्पनिक) तिच्या नवऱयाने व्हॅलेन्टाईन डे ला ना .....इतकं मस्त सरप्राईज दिलं"
"आम्ही मैत्रिणी आज व्हॅलेन्टाईन डे बद्दल बोलत होतो ना .....( असे लाडिक 'ना' लावले की नकार यायची शक्यता जराशी कमी होते म्हणून ह्या 'ना' चा वापर जास्त :-)) तेव्हा त्या सगळ्या म्हणाल्या, "तुझा नवरा तर नेहेमीच मस्त गिफ़्ट्स देतो" (खरं तर ह्या 'देतो' ह्या शब्दाऐवजी 'तू लुबाडते' असा शब्दच चपखल बसतो :-) )"
नवऱयाचा अशावेळी अत्यंत सावध हुंकार येतो. म्हणजे आता ह्यावर्षी बाईसाहेबांच्या अपेक्षा 'माफक' ह्या शब्दाच्या किती पुढे गेल्या आहेत ह्याचा अंदाज घेत घेत आमच्या एकतर्फ़ी संभाषणाला continue करतो.

"अवी, ह्यावेळी काय करायचं हो?" माझा ३-४ दिवस आधीचा पवित्रा
"कशाबद्दल .....?" कळूनही न कळल्याचा आव ....दुसरं काय? पण मी ही त्यांचा 'तो' भाव न कळल्यासारखं अगदी साळसूदीने बोलते .....अहो करणार काय ......एक अच्छे गिफ़्ट का सवाल है ना ...... थोडा तो झेलनाही पडेगा
"अहो, व्हॅलेन्टाईन डे येतोय ना ....."
"हं .....!"
"अवी ..............." माझा 'अवी' नंतरचा pause ह्यांना नेहेमीच फार खर्चिक पडलाय त्यामुळे तो टॉपिक लवकरात लवकर बंद करावा म्हणून म्हणाले,
"अगं ..... बघूया ...... अजून वेळ आहे ना !"
"WOWWWWW ! म्हणजे सेलिब्रेशन नक्की तर.....!" माझ्या ह्या excitement ची पण ह्यांना वीस वर्षात इतकी सवय झालीये ना की ज्यादा हलचल नही होती :-(

मग १-२ दिवस गेल्यावर ......
"So ....... Whats the plan Dear?"
"कशाबद्दल ....?" ह्यांचा अनभिज्ञता दाखवायचा आटोकाट प्रयत्न अजूनही जोमात सुरुच. पण मी माघार घेणाऱ्यातली थोडीच आहे. अगदी शांतपणे त्याचा तो प्रयत्न हाणून पाडत हा interesting topic पुन्हा पुन्हा संभाषणात आणायचा अथक प्रयत्न माझाही सुरुच ......!
"अवी, व्हॅलेन्टाईन डे हो ......फ़क्त दोनच दिवस राहिलेत. "
"अवी .........तुमच्या ऑफ़िसमधे काय काय प्लॅन्स आहेत लोकांचे ?" व्हॅलेन्टाईन डे हा अगदी जागतिक आणि गहन प्रश्न असल्यासारखं मी विचारते.
"ऑफ़िसमधे आम्ही काऽऽऽऽम करतो"
"हो ..... पण म्हणून काय बाकी बोलायचंच नसतं की काय ......"
"बाकी बोलतो ना ........ पण हा महत्वाचा विषय राहूनच गेला ......."
कळतात हो टोमणे ....... पण इतका त्रास तर सहन करायलाच हवा ना ...... Dont let it go Jayu......come on..... !
"शी ......अगदीच बोअरिंग लोक आहेत तुमच्या ऑफ़िसमधले." मी शिक्कामोर्तब करुन मोकळी.
नवरा सोईस्करपणे ह्या माझ्या रिमार्ककडे दुर्लक्ष करतो.

अशीच खिंड लढवत राहते. अगदी १४ फ़ेब्रुवारी उजाडेपर्यंत और इतनी मेहेनत करुंगी...... तो फल तो मिलेगाही ना ......! आणि मग पुढचा व्हॅलेन्टाईन डे येईपर्यंत त्या सुखद आठवणी कुरवाळत बसायच्या. तशा ह्या सुखद आठवणी येतंच असतात मधून मधून ...... म्हणजे आणायच्याच असतात. जसं ...... वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, नवीन वर्ष, मदर्स डे ........!

आज एक छोटीशी (?) कविता लिहिलीये...... त्यांना मेलने पाठवणार .....मग बघूया कसा साजरा होतो ह्यावर्षीचा माझा ..... सॉरी आमचा व्हॅलेन्टाईन डे :-)

दिवस उगवला हळुवार
अलार्म पण किणकिणला नाजुक
कूस वळवून बघते तर
नवरा उभा हसतमुख

हातातलं गुलाबाचं फुल त्याच्या
गालावरुन फिरलं पिसासारखं
"How romantic Jaanu ....."
मन नाचलं थुईथुई मोरासारखं.

लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं
हातात हात घेऊन
"Tea.....Your Highness" म्हणाला
चहाचा कप देऊन.

मूडात होती भलतीच स्वारी
म्हटलं घ्यावा थोडा भाव खाऊन
जे जे वाटतंय करवून घ्यावं
ते ते घ्यावं करवून.

"कैसे मिजाज़ है आपके जानम ?"
सवाल जेव्हा आला .....
म्हटलं, "जायचंय आज मला ......
'सलामे इश्क' बघायला."

एरव्ही ह्याला पिक्चरची त्या
कायम असते ऍलर्जी
आज मात्र चक्क बोलला,
"जैसी आपकी मर्जी"

हॉलवरची झुंबड बघताच
जीव माझा चरकला
पण ब्लॅक मधे तिकिट मिळवून
मूड त्याने बनवला.

पिक्चरनंतर शाही जेवण
Dessert मात्र राहिलंच बाई .....!
"शॉपिंगला नेतो" म्हणताच त्यानं
कसं राहिल लक्षात काही ....?

डिझायनर साडी शोकेसमधली
कधीपासून होती खुणावत
मॅचिंग ज्वेलरी त्याच्यासोबत
वाढवत होती नजाकत

मनातले भाव माझ्या सारे
दाखवत होता चेहेरा
मनासारखं शॉपिंग होऊन
खुलत होता चेहरा

डोळ्यामधे सवाल होता
"आता पुढे काय .....?"
"Long Drive ला जाऊ या का .....
क्या है आपकी राय ?"

अपुन तो साला खल्लाऽऽऽऽस..... !!

मंद सुरावट गाडीमधली
सारं बोलून गेली
नयनामधली भाषा नयनी
सारे समजून गेली

तृप्तीची त्या पेंग छानशी
आली का अवेळी.....
डोळे झाले जड
लागली ब्रम्हानंदी टाळी

दचकून उठले गाली होता
स्पर्श रेशमी करांचा
नवरा हलके उठवत होता
गुच्छा घेऊनी सुमनांचा

स्वप्नामधूनी जागी झाले
वास्तव होते स्वप्न परी
प्रेमदिनाची पहाट होती
आता मात्र खरीखुरी.

जयश्री



Princess
Tuesday, February 13, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जयु, तू तर एकदम सॉलिड प्लान केलायेस.
छान लिहिलय. अशी कविता लिहिली तर मग काय... साहेब लगेच घरी परत येणार आणि घेउन जाणार long drive ला


Nandini2911
Tuesday, February 13, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव करो अणि तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होवोत.

Supermom
Tuesday, February 13, 2007 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयू,
मस्तच ग. अगदी आम्हा उभयतांचे दरवर्षीचे डायलॉग्ज आठवले.

नेहेमी मी पण नवर्‍याला मैत्रिणींचा हवाला देऊन सांगते की कोणाच्या नवर्‍याने कसं सरप्राईज गिफ़्ट दिलं तिला वगैरे. तर एका वर्षी valentine day ला पतिराज म्हणाले, 'मग काय सरप्राईज गिफ़्ट हवंय तुला या वर्षी?'


Athak
Tuesday, February 13, 2007 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु , लगे रहो :-) मैत्रिणी काल्पनिकच ठेव :-)

Mukman2004
Tuesday, February 13, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow!! how romantic!!!, solid plan दिसतोय..
कर कर enjoy कर.. आणि काय काय मिळाल ( I mean लुबाडल) ते पण सांग.. :-)



Prasik
Tuesday, February 13, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्नामधूनी जागी झाले
वास्तव होते स्वप्न परी
प्रेमदिनाची पहाट होती
आता मात्र खरीखुरी.............
Wow, छान लिहलयं, Happy Valentines Day for you & urs Valentine

Manuswini
Tuesday, February 13, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयवि,

Wish you & your loved one Happy Valentine day!!

पण एक असाच प्रश्ण पडतो हे असे मागुन gifT मिळण्यात काय मजा?
हे असे नवर्‍याकडुन gift मागणे बरोबर आहे?

प्रेमाने स्वःताहुन कोणी आणुन दीली तर ज्यास्त वाटते नै का?


Jayavi
Tuesday, February 13, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, नंदिनी, supermom , अथक, माधुरी, प्रसिक, मनु....... सगळ्यांचे मनापासून आभार!! प्रेमदिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा :-)

पूनम..... आता बघूया काय काय होतं ते ;)

supermom :-)

अथक....... क्यू रे....... आप तो डरते नही हो ना ;)

माधुरी.... अरे ऐसाही सॉलीड fielding लगाना पडता है ;)

मनु, अगं गंमत असते गं.... हे बघ गिफ़्ट तर आपण कितीदा तरी घेतच असतो. न मागता कोणी प्रेमाने आणून दिली तर नक्कीच जास्त आनंद होईल... . no doubt .... लेकिन इस मिठी मिठी नोकझोक का मजा भी कुछ और होता है रे...!


Psg
Wednesday, February 14, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, मस्त लिहिलं आहेस.. खूप गोड :-) प्रेमदिनी सर्व इच्छा पूर्ण होवोत!! :-)

Princess
Wednesday, February 14, 2007 - 12:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी लगता है तेरी शादी नही हुई है अबतक. :D

Manuswini
Wednesday, February 14, 2007 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहुधा बरोबर असेल तुझे म्हणणे,
princess , म्हणुनच तर प्रश्ण पडला.

मी स्वःता जरा ज्यास्तच हळवी आहे काय माहीत नाही पण समोरच्या व्यक्तीला 'छोट्याश्या gift बद्दल सांगायचे मग काय त्यात प्रेम असे मला वाटते. आपण एवढे मनापासुन करुन जर त्या व्याक्तीला एवढीही स्वःताहुन भावना होत नसेल काही आणायची special moments मग काय प्रेम..
पण जयवि म्हणते तसे असेल.


Sanghamitra
Wednesday, February 14, 2007 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया फ़िल्डिंग तर जोरात आहे.
पण कॅच जहीर खानचा मिळाला की धोनीचा ते उद्या सांग नक्की.


Suvikask
Wednesday, February 14, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता सुन्दरच आहे.. आत celebration कस झाल हे ही कळव. detail मधे हव बर का

Shyamli
Wednesday, February 14, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आगे क्या हुवाSSSSSSSS रे
बिझी दिस्तीये की ;)

मनु एवढा विचार नसतो ग करायचा :-)
एकदा लग्न झालं की विचार करण्यासाठी इतर ब-याच गोष्टी असतात :-)


Supermom
Wednesday, February 14, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु,
जयु म्हणतेय ते खरच ग, इस मीठी नोकझोक का मजा और ही होता है.
मला valentine day वरून एक गम्मत आठवली.
एकदा मी अन माझा नवरा( तेव्हा आम्ही दोघेच होतो, दोनाचे चार झालो नव्हतो. त्यामुळे शांततेत खरेदी करता येत असे.)

तर आम्ही कोणासाठी तरी गिफ़्ट घ्यायला गेलो. तिथे एक फ़ारच सुरेख घड्याळ दोघांनाही आवडले. किंमत पाहिली तर बर्‍यापैकी महाग होते. तेव्हा हे नको, दुसर्‍या दुकानातून काहीतरी घ्यावे म्हणून निघालो. दाराजवळ गेलो तोच नवरा परत मागे आला अन ते घड्याळ शोकेस मधून काढायला सांगू लागला. मला कळेचना. कारण त्या बाई, ज्यांना आम्ही गिफ़्ट देणार होतो त्यांना इतके महाग देण्याइतके संबंध नव्हते आमचे.
मी विचारले की' अहो, हे काय करताय?'
तर हसला अन म्हणाला की ' well माझ्या बायकोसाठी तर घ्यायला हरकत नाही ना? उद्या नाहीतरी valentine day आहेच.

जयु म्हणते तसं 'दिल खल्लास हो गया यार...'


Jhuluuk
Thursday, February 15, 2007 - 3:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयावी, मस्तच :-)
माझी मावशी तिच्या b'day साठी अशीच fielding लावते..
सुपरमॉम, हाउ रोमांटिक :-)


Princess
Thursday, February 15, 2007 - 3:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly श्यामली... हेच हेच सांगणार होते मी मनुला...
पण ते इतक्यात कळायचे नाही तिला. त्यासाठी त्या लग्न नावाच्या दिव्यातुन जावे लागते. पहिल्या valentine day ला आठवणीने gift आणणारा नवरा पुढच्याच वर्षी चक्क विसरुन जातो.:-) आणि मग अशी fielding लावावी लागते नंतर आयुष्यभर

by the way जयु, अग किती दिवस celebrate करतेस तू?



Nandini2911
Thursday, February 15, 2007 - 7:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस, नवरा नावाचा प्राणी ग्रेट असतो.. माझं नाही लोकाचं मत.. .. माझ्या एका मित्राचं नुकतंच लग्न झालं... आणि तो बायकोचा वाढदिवस विसरला...
हीच बायको जेव्हा त्याची गर्लफ़्रेंड होती तेव्हा तिच्या वाढदिवसाला भर कॉलेजात याने फ़िल्मि स्टाईलमधे गाणं म्हटलं होतं.. पण लग्नानंतर विसरला आणि त्याचं कारण त्याने दिलं...
आता मी विजेची, किराण्याची वगैरे बिलाची तारिख लक्षात ठेवतो..
(कुठच्या दुकानातून किराणा आणतो ते माहित नाही..) :-)


Abcd
Thursday, February 15, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़्या मते हे प्रत्येक माणसावर असते.
मला बाबान्च्या विसराळु स्वभावाची सवय होती.
पण माज़ा नवरा प्रत्येक वेळी छान गिफ़्ट आणतो आणि त्यालाही कारण लागत नाही (लग्नाच्या ९ वर्षानिही).

I got my gift yesterday too..:-)))




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators