Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 31, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » माघ » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through January 31, 2007 « Previous Next »

Milya
Tuesday, January 30, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाल : संदीप ची कविता -
नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
मित्रांच्या येती फ़ौजा
अन घरात गलका होतो

घनघोर लढाई व्हावी
घर तसे रणांगण होते
पडण्या मग 'धारा'तिर्थी
हर वीर उतावीळ होतो

येताच ग्लास हाताशी
तत्काळ संपुनी जाती
दाण्यांचा उडतो फन्ना
चिवड्याचा चकणा होतो

तव मुठीत घुसमटणार्‍या
मज स्मरती भीषण वेळा
कैदेतून सुटका हावी
मी तसा आनंदित होतो

तू थांब सखे तिकडेच
मी वाहेन सारी धुरा
सिगरेटचा धूर झकास
माझ्यासह वर वर उडतो

पत्यांचा रंगता डाव
पालटते नशीब माझे
मी गुलाम संसारातील
हुकमाचा एक्का होतो

सखे, झाला खूप पसारा
आवरण्या परतून ये गं
तव फ़टकळ शब्दांवाचून
संसार सुना हा होतो

नसतेस घरी तू जेव्हा...


Princess
Tuesday, January 30, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप मस्त लिहिलय मिल्या. नुकतीच माहेरुन आलीय परत. हीच स्थिती आहे घरात.:-)

Jo_s
Tuesday, January 30, 2007 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या खतरनाक (घरी दाखवतोस कारे ही विडंबनं?)

Vaibhav_joshi
Tuesday, January 30, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ...
मस्त . विशेषतः पहिलं , चौथं आणि पाचवं कडवं .


Lopamudraa
Tuesday, January 30, 2007 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ने वाचलेल दिसत नाही अजुन...


Mrinmayee
Tuesday, January 30, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टू गुड!!
पत्यांचा रंगता डाव
पालटते नशीब माझे
मी गुलाम संसारातील
हुकमाचा एक्का होतो
....


Meenu
Tuesday, January 30, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तव फ़टकळ शब्दांवाचून
संसार सुना हा होतो >>> मिल्या अगदी अगदी मनापासुन मोदकच मोदक ... बाकी सहीच .. पुनमनी वाचल्यावर काय झालं ते लिहायला विसरु नकोस हो.

Nalini
Tuesday, January 30, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

          

Devdattag
Tuesday, January 30, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बहोत दिनो बाद..
पण तुफान आहे..:-) दोन्ही अर्थी..:-)


Milya
Tuesday, January 30, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप धन्यवाद सर्वांना

वैभवा post edit कर रे.. मी दोन कडव्यांची आत्ताच अदलाबदल केलीय...


आणि लोकहो... पूनमने कधीच वाचलेय हे...

प्रत्येक कविता / विडंबन स्वानुभवावर असावे असे थोडेच आहे.. आजुबाजुला बरीच उदाहरणे आहेत की अगदी मायबोलीवरही सापडतील


Manas6
Tuesday, January 30, 2007 - 1:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

...तुटे वजनाचा काटा !

आठवण तुझी येता,
फुले अंगावर काटा,
असे मी नाही म्हणत,
म्हणे वजनाचा काटा !

तुझ्या देहाच्या ह्या सीमा,
आठी दिशांना फैलती,
म्हणुनीच सारे तुला,
'अष्टफैलु' गं म्हणती !

पहा अजस्त्र केव्हढा,
तुझा देह बलडंड,
आता बाहु म्हणु ह्यांना,
का भीमाचे गं हे दंड !

जेव्हा पाऊल टाकीशी,
दणदणते धरणी,
देवा काय वर्णावी ही,
तुझी 'अगाध' करणी !

काल हॉटेलात गेली,
तेव्हा मालक म्हणाला,
आधी डिपॉझीट ठेवा,
मग ऑर्डरचं बोला !

जेव्ह जाते शिंप्याकडे,
द्याया कपड्याचे माप,
शिंपी पुटपुटे मनी,
अ ब ब ब, बाप बाप !

केली घोडेस्वारी हिने,
कमी करण्या वजन,
हिच्याऐवजी हो झाले,
कमी घोड्याचे वजन !

ऑटोरिक्शावाले हिला,
बघुनीच सुसांटती,
संपेस्तोवर पेट्रोल,
गाडी बेफाम हाणिती !

म्हणे जाऊनी वैद्याला,
झाली भुक कमी फार,
न्याहारीला फक्त पिते,
दुध लिटर मी चार !

येतो थकवा हो फार,
'भारी' पडतात कष्ट,
आता सुचवा ना गडे,
मला थोडी बेड-रेस्ट !

'नको नको' म्हणे वैद्य,
उगा बेडला का कष्ट?
द्यावी लागेल बेडला
पर्मनंट 'बेड-रेस्ट' !

मानस६





Lopamudraa
Tuesday, January 30, 2007 - 1:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maanas.. ....

मिल्या गमतीत म्हटलेय.खरय प्रत्येक कविता ही काही स्वानुभव नसते.


Vinaydesai
Tuesday, January 30, 2007 - 2:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Solid मिल्या... sixer मारलाय..

manas, Interesting..


Chinnu
Tuesday, January 30, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, मानस भन्नाट अगदी :-)

Paragm
Tuesday, January 30, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

milya tooo good, bhannat zaalay

Salil
Tuesday, January 30, 2007 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रे राखेचि किमत करु नये कोनि
गन्ध ह शेणाच माथि लयु नये कोनि

घर आहे दुर म्हनुनि जाउनये नये कोणी
चुल दुसरि शोधुन घर मोडू नये कोनि

लख लफ़दि पचवुनि रहाते ति (लग्नाला) उभी
त्य लग्नल कोणी शुल्लक म्हणू नये

सगल्या दगडाना देव कधि म्हनू नये
एअवधे हि आस्तिक कधी होउ नये

सात जन्माच्या कमाइतून नुम्बर हा लवला
एक नुम्बर हि ह्या जन्मि लागू नाये

तुला मि सोडुन जाताना प्राथन इतूकी
कोपर्यावर दुसरिला कधी दिसु नये मि


Zakasrao
Tuesday, January 30, 2007 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या मानस सलिल
मस्तच जमलय.
खुप दिवसांनी पण पदार्पणातील पहिल्याच बाॅलवर सिक्सर मारला मिल्याने.


Psg
Tuesday, January 30, 2007 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंद :-)

मानस, मस्त झालय.. मूळ गाण्याची लिंक देऊ शकाल का?


Badbadi
Wednesday, January 31, 2007 - 12:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, नेहमीप्रमाणे जबरी :-)
मानस, छान!!! पूनम म्हणते आहे तसं मूळ गाणं कळल तर अजून मजा येईल..


Shyamli
Wednesday, January 31, 2007 - 1:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,लै झ्याक,
नवर्‍याला वाचुन दाखवली,तर म्हणे"भलताच वीर दिसतोय,भेटाव लागेल याला एकदा."
संदीपची, ही कविता ऐकुन तमाम नवरे मंडळींना असच वाटत असत की काय?

मानस,





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators