Bbhannat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 11:37 pm: |
| 
|
कौतुक करायला काही लागत नाही यार, >> फुकट तिथं चिकट .. कर कशाचं पण कौतुक लावलं बिचार्या इथल्या भल्या भल्या कविंना पळवुन .. आता ते चांगले कवि होते त्यांच्यापैकि कुणी ईथे कविता टाकेना झालेत
|
भावविश्व.... फुलवायचय आपल्याला आपलं नंदनवन कधीच न कोमेजणार्या रंग न उडुन जाणार्या फुलांचे ताटवे........... रसदायी,चैतन्य देणारे आपले भावविश्व..... फुलवायचय ते विश्वासाच्या मातीत एकमेकांच्या अपेक्षापुर्तीच खतपाणी घालत गंधवाटा मग दशदिशानी दरवळतील गंधवेड्या आपल्यात चैतन्य उसळवतील अन नसानसातुन मग गंध भरून वाहिल
|
Mankya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 1:56 am: |
| 
|
kanchangandha.... हो नक्किच गन्ध भरुन वाहील .... छान आहे हो भावविश्व ! नीलय .... आशा ..... प्रयत्न छान आहे ! माणिक !
|
चला पंढरीला चला पंढरीला चला रे भक्तांनो चला पंढरीला चला काळा सावळा रंग पाहून विट्ठलाचा प्रत्येकाला वाटे तो क्षण आनंदाचा मृदंगाच्या तालावर वाजवा वीणा-टाळ विट्ठलाच्या दर्शनासाठी निघाला रांगत बाळ विट्ठलाची पंढरी संतांचे माहेर भक्त करतात त्यांना तुळशीचा आहेर विट्ठलासाठी सर्व सम तेथे नाही भेदभाव चंद्रभागेतही चालवितो तो भक्ताची नाव भक्ताचं आणि विट्ठलाचं नातं आहे अतुट रुख्मिणीलाही पाडता आली नाही फूट पंढरीत भक्तांसाठी ऊभा आहे एकटा पंढरीच्या वाटेने पावलं टाका पटापटा चला पंढरीला चला रे भक्तांनो श्री
|
Bbhannat
| |
| Wednesday, January 17, 2007 - 3:26 am: |
| 
|
पंढरी .... इयत्ता दुसरीच्या मुलानी लिहीलेली कविता .... भावविश्व ... अरे कुणी तरी आवरा या बाईला ..
|
भन्नाट..... शिणलो मी शिणलो विचार करुन थकलो कविता काही सुचेना ट ला ट जोडला पण री ला री जमेना नाव फ़क़्त भन्नाट माझे भन्नाट करायला काही जमेना असलेल्या कवितेंवर ओढावे म्हण्ट्ल ताशेरे पण त्यालाही लागते बुद्धी काय करावे सुचेना मग केली सुरवात असेल त्याला नावे ठेवायची त्यातही फ़सगत झाली ते ही निटसे जमेना मग दिली सोडुन अगदीच पातळी आय डी पण घेतला डुप्लिकेट.... स्त्री का पुरुष ते माझे मला कळेना केला मारा भन्नाट पण भन्नाट काही वाटेना तरी ही झालो खुश माझ्यावरच मी अजुन कोणी मला हाकलेना
|
Mankya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 4:24 am: |
| 
|
kanchangandha..... कविता मात्र भन्नाट ह! आता कुठे भन्नाट नावाला काहितरी साजेस वाटतय ( कवितेमुळेच ) ! केला मारा भन्नाट पण भन्नाट काही वाटेना तरी ही झालो खुश माझ्यावरच मी अजुन कोणी मला हाकलेना Ulitimate...! माणिक !
|
कांचनगंधा अप्रतिम कविता केली आहे तुम्ही. भन्नाट मित्राने आपली चेष्टा केल्यामुळे मी दाद देत नाही. खरोखरच कविता अप्रतिम ऐवढ्या कमी वेळात तुम्ही खूपच सुंदर कविता केली आहे. श्री
|
Parakhad
| |
| Wednesday, January 17, 2007 - 4:27 am: |
| 
|
लैच घाइ घाईत जोडलंया ट ला ट . भन्नाट " आत्मचरित्र " लिवलंत बगा
|
Sarang23
| |
| Wednesday, January 17, 2007 - 7:28 am: |
| 
|
गोटा देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू रोज रोज हे नवीन अपघात कसे साहू? सगळ्याच आठवणी आता झाल्यात ओझे हरेक क्षण फितूर, दुष्मन बनलेत माझे चुकार, भिकार, टुकार, होकार, नकार सगळेच विकार मुरलेत खोल आत आता सांग ना मी एकटा कुणाकुणाला वाहू? देवा मला नर्मदेचा गोटाच कर पाहू मी घाबरतो आता माझ्याचसमोर यायला आरसाही उठतो खायला, त्रास द्यायला अहम, त्रास, मनस्ताप, विरह, एकटेपणा, सगळेच ऐकवतात आपआपलेच रडगाणे या सगळ्यांमध्ये "मी" कोरडा कसा राहू? देवा मला खरंच नर्मदेचा गोटाच कर पाहू सारंग
|
सारंग "गोटा" खुप छान!
|
Mankya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 8:12 am: |
| 
|
सारंग ...... सहज, साधी पण खुपच अर्थपुर्ण ! एकन्दरीत ..... सुन्दरच ! माणिक !
|
Shyamli
| |
| Wednesday, January 17, 2007 - 8:31 am: |
| 
|
ओय क्या बात है रे! मस्तच
|
सारंग........ .. .. ... ..
|
Priyasathi
| |
| Wednesday, January 17, 2007 - 11:55 am: |
| 
|
दि. ०४ जानेवारी २००७ रोजीची नवीन कविता "मैत्रिण" ह्रदयामध्ये साठवलेलं सगळं दु:ख थोडं आहे. का आवडतेस तू मला? खरंच एक कोडं आहे. १ का मला तुझा आधार हवाहवासा वाटतो का तुझा गंध माझ्या श्वासांमध्ये दाटतो २ का वाटतं असं मला तुझ्या कुशीत यावं एकदा तरी तुझं दु:ख ओंजळभरून प्यावं. ३ चेहरा हसरा असला तरी दु:ख असतं मोठं कधी कधी चेहर्यावरचं हसू असतं खोटं. ४ दु:ख सगळं लपवतेस नी हसू ठेवतेस ओठांत हजार चुका केल्या जरी तरी घेतेस पोटात. ५ हेच तुझं वागणं नेमकं मला वेड लावतं कितीही आवरलं मनाला तरी ते तुझ्याकडेच धावतं. ६ तुझ्या डोळ्यांच्या डोहामधलं दु:ख मला कळू दे एकदा तरी तुझं मन माझ्याकडे वळू दे. ७ फक्त एकदाच तुझं मन मोकळं करून बघ, माझा हात विश्वासानं हातात घेऊन जग. ८ सर्व हक्क सुरक्षित. संपर्क ९२२५५२२९८८.
|
Priyasathi
| |
| Wednesday, January 17, 2007 - 11:59 am: |
| 
|
नवीन कविता आहेतच. पण जुन्या कविता कशा पोस्ट करायच्या हे कोणी मला सांगेल का?
|
Mankya
| |
| Wednesday, January 17, 2007 - 12:50 pm: |
| 
|
दु:ख सगळं लपवतेस नी हसू ठेवतेस ओठांत हजार चुका केल्या जरी तरी घेतेस पोटात. ५ priyasathi...... हे पटल बरं का ( अनुभवलय ) ! एकदम सही लिहिलय ! माणिक !
|
नर्मदेतला गोटा भन्नाट या ID ने इथे येतो का? ए.भा.प्र!
|
Modrator
| |
| Thursday, January 18, 2007 - 12:15 am: |
| 
|
बाबानु काय टि पी चाललाय. मुकाट कविता वाचा की, उगीच येत नाहीन काही नाही चालेले आपले परखड मत द्यायला. हा भन्नाट पणा करु नका.
|