Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
कविता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 27, 200620 12-27-06  1:07 am
Archive through December 27, 200620 12-27-06  11:56 pm
Archive through December 28, 200620 12-28-06  5:38 am
Archive through December 30, 200620 12-30-06  12:08 am
Archive through January 05, 200720 01-05-07  5:02 am
Archive through January 09, 200720 01-09-07  2:46 am
Archive through January 09, 200720 01-09-07  6:38 am
Archive through January 11, 200720 01-11-07  9:56 am
Archive through January 12, 200720 01-12-07  8:06 am
Archive through January 16, 200720 01-16-07  11:13 pm
Archive through January 18, 200719 01-18-07  1:22 am
Archive through January 20, 200720 01-20-07  12:02 am

Mankya
Saturday, January 20, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आठवणींना जेव्हा मी,
जगायचं ठरवलं तेव्हा ..
तेव्हा मात्र ..
वास्तवाला पर्याय नाही,
आठवणी त्या आठवणी ....!

हे मात्र जबरीच मीनू ...... छानच !

माणिक !


Vaibhav_joshi
Saturday, January 20, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती .... अप्रतिम ... हिंदी रचनेवर विचार करतो आहे ... तिथे लिहीन

मीनू ... आठवणी त्या आठवणी .. झकास


Suvikask
Saturday, January 20, 2007 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "जबाबदारी" कवितेचा अर्थ कळला नाही...

Meenu
Saturday, January 20, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला मला वेळ आहे मी सांगते अर्थ तर खरं म्हणजे नाव आहे 'जबाबदार' .. जबाबदारी नाही

पहील्या परीच्छेदात असा मनाशीच विचार चाल्लाय की कुणा प्रिय व्यक्तीचा विरह होऊन खुप काळ लोटलाय. मग आता त्या व्यक्तीची आठवण करुन देणार्‍या सर्व गोष्टी नष्ट करायची वेळ आलीये म्हणजे वर्तमानात नीट जगता येईल. हे म्हणताना आरशाकडे लक्ष गेल्यावर लक्षात आलं की स्वतःकडे बघुनही त्या प्रिय व्यक्तीची आठवण येत आहे. म्हणुन मग आत्महत्येचा (सगळ्या आठवण देणार्‍या गोष्टी नष्ट करायच्यात ना ..?) मार्ग स्विकारला हे सांगणार्‍या पुढच्या दोन ओळी दुसर्‍या परीच्छेदात आहेत.

काही प्रिय व्यक्तींचा आठवणी इतक्या अविभाज्य अंग झालेल्या असतात की त्या मीटवण्यासाठी स्वतःला मिटवायला लागतं!


Meenu
Saturday, January 20, 2007 - 10:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ध्येय

तेल संपल्यावर विझेलच दिवा,
मालवायची नको घाई ..
जोपर्यंत आहे जीव तोवर,
शिकायलाच हवं वाट पहायला ..
तेवढं या जन्मी बघु जमलं तर .. मग,
शिकता येईलही कधीतरी जगायला ..


Shree_tirthe
Sunday, January 21, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळ

स्वत:च्या सौदर्याला बघ
आरश्यापुढे उभी राहून
डोळे मिटवून घे
मी येईल तुझ्या मागून

आनंदी होऊ नकोस
मी येणार नाही
आज तुला चंद्रावर
नेणार नाही

माझा राग काढू नकोस
त्या आरशावर
उपाशी रहू नकोस
माझ्या भरवशावर

उशीर होईल मला
घरी येण्यासाठी
तु जेवण करून घे
माझ्यासाठी

आॅफीसमधून घरी
उद्या सकाळी लवकर येईन
आल्यावर तुला
चंद्रावर नेईन

सकाळ झाली मी घरी गेलो
ति रागात होती
कितीही झालं तरी
ति माझीच होती

तिने दिली मिठी
माझ्या प्रेमाच्या पोटी
चुंबनाने रंगले प्रेम
तिच्या ओठी

श्री


Devdattag
Sunday, January 21, 2007 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती.. अप्रतिम.. पंच मस्तच :-)
मीनु.. आठवणी त्या आठवणी छान..:-)


Meenu
Sunday, January 21, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्न उत्तर

अनुत्तरीत प्रश्नांची तुला मजा सांगु ..?
त्यांची उत्तरं तोपर्यंतच नसतात सापडणार
जोवर तुला ती हवी असतात ..!
ज्याक्षणी तुझ्या डोक्यातुन निघुन जातील प्रश्न,
आपसुक आडवी येतात सारी उत्तरं ..!
कधी कधी उत्तरं मिळुनही अनुत्तरीत वाटले प्रश्न,
तर फक्त ईतकच करायचं,
डोक्यातुन त्यांना फक्त काढुन टाकायचं ..!
आणि मग फक्त त्रयस्थपणे बघत रहायचं ..
एक एक उत्तर पायघड्यांप्रमाणे उलगडत जाताना ..
एक एक प्रश्न कायमचा विरत जाताना ..

स्वाती तुझा blog वाचल्यापासुन मनात घोळत होता हा विचार .. हा आपला माझा विचार चु. भु. दे. घे.


Manishalimaye
Sunday, January 21, 2007 - 10:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

}

स्वाती-वैभव तुमचा ब्लॉग वाचायला मिळला. डोळे मिटुन अनुभवावा असंच वाटलं. तुम्हा दोघांनाही खरचच धन्यवाद. अगदी मनापासुन.
thanks


Meenu
Monday, January 22, 2007 - 12:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हम्म !! सौमित्राची कॉपी झालीये का ..? तपासुन पाहायला हवं .. तसं जाणुनबुजुन केलेलं मात्र नाहीये ..
धन्यवाद


Manishalimaye
Monday, January 22, 2007 - 12:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए मिनु गैरसमज नकोत. हे लिहिलेल तुझ्यासाठी नाहिये. ज्याने कॉपी केल्ये त्याला कळेलच!!
पण कॉपीचा प्रयत्न सही सही आहे त्यामुळे करणार्‍याला ते माहीत असणारच.


Sarang23
Monday, January 22, 2007 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कविता नावाची कविता

आज ठरवूनच निघालो
म्हटलं शोधूच आज तिला,
माझ्या लाडक्या कवितेला!
मग सगळ्या ठरलेल्या जागा,
सगळ्या संकेतस्थळांना
एक वळसा मारून वर्तुळाकार...
पुन्हा सुरुवात केली तिथेच येऊन थांबलो...
हताश, उदास, एकलकोंडा नेहमीप्रमाणे...

मला अजूनही कळालेलं नाहीये
की परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही!


सारंग


Meenu
Monday, January 22, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्स होय .. माझ्या कवितेखाली आली नं प्रतिक्रीया त्यामुळे मला वाटलं मलाच लिहीलय .. ठीक आहे.

Manishalimaye
Monday, January 22, 2007 - 12:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>की परिघावर आयुष्यभर फिरूनही
केंद्रबिंदूशी फक्त नाते सांगता येते
सलगी मिळवता येत नाही! <<

वा!!



Smi_dod
Monday, January 22, 2007 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्प!!

खणऽऽ खणऽऽ
छिन्नी हातोडीचे घाव
पाषाण तो सोसत होता
प्रत्येक घावा सरशी
उडणारा छोटा तुकडा
दुरावत होता त्याच्यापासुन
घावा मागे घाव बसत होते
गरजेनुरूप तीव्र... हलके
वेदना उठत होत्या
पण प्रत्येक वेदना
होत होती नवी रुपरेषा
देत होती नवे रूप
नितांत सुंदर शिल्पाचे
असंख्य घाव सोसुन ते
आकारले एकसंध,
अप्रतिम शिल्प........
देखणे, प्रमाणबध्द
आता दिसतेय फ़क़्त ते शिल्प
वेदना भोगणारा पाषाण
कधीच अस्तंगत झालाय

स्मि


Smi_dod
Monday, January 22, 2007 - 12:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतर!!!

दोन पावले पुढे
अन दोन पावले मागे
दोन पावलाचे फ़क़्त
अंतर आपल्यातले
शेकडो मैल बरोबर
चालुन आल्यावरही
पडलेले हे अंतर
अजुनही तसेच आहे
प्रिया ये ना...
पाउलभर पुढे
दोन पावले मागे मी
कधीच आले आहे

स्मि


Daad
Monday, January 22, 2007 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अशी का दिसते?

खरंतर खूप दिवस झालेत....
श्वास थांबेल वाटलं किंवा
अन्न तरी तुटेल... पण...

कधीतरी चढलेली ही कात उसवेपर्यंत
सुक्या डोळ्यांनी शोधायचाय....
तू गोरज वेळी दाखवलेला
काळ्या नभाचा रुपेरी किनारा!

नको विचारूस ना, 'मी अशी का दिसते?'
-- शलाका


Smi_dod
Monday, January 22, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधीतरी चढलेली ही कात उसवेपर्यंत
सुक्या डोळ्यांनी शोधायचाय....
तू गोरज वेळी दाखवलेला
काळ्या नभाचा रुपेरी किनारा! >>> शलाका वा!!

सारंग...मस्त नेहमी प्रमाणे:-)

प्रतिक्षा!!!

कधी मागितल नव्हते काही
तुझ्या देण्याची प्रतिक्षा केली
माझ्या कैफ़ात मी होते
धुंदीत त्या जाणवलेच नाही
तु पण हीच प्रतिक्षा करतोय
न मागता मिळण्याची
आता जाणवलय पण
फ़ार उशीर झालाय
मागणं...मिळणं
प्रतिक्षे पलिकडे गेलय
मावळतीचा सुर्य
क्षितिजापल्याड गेलाय......
आता.....
आभाळभर पसरलाय
एक खिन्न काळोख

स्मि





Smi_dod
Monday, January 22, 2007 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे विश्व!!!!!

माझे आकाश
माझी जमीन...
फ़क़्त तुच
आभाळाकडे बघितल तर
आभाळ भर तुच दिसतो
दिशा नक्षत्रे दाखवतात
फ़क़्त तुझाच माग
माझे सगळे रस्ते
येतात तुझ्याचकडे
भरल्या डोळ्यांच्या तळ्यात
तुच असतो
पापण्यांच्या पदद्याआड
तुच लपतोस
माझे सगळे अवकाश
व्यापुन राहिलास तु
माझे अवघे विश्व भारलेय
तुझ्या अस्तित्वाने
आता मी?....
मी नाहीच
फ़क़्त तुच तु.......

स्मि


Sarang23
Monday, January 22, 2007 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्मी, दाद छान!

शिल्प विशेष आवडली


Devdattag
Monday, January 22, 2007 - 1:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कातळ
छे हो.. कातळाला कुठली आलीये जाणीव
त्याला कसले दु:ख त्याच्यावरल्या ओरखड्यांच
कधी आलाय रोमांच त्याच्यावर
थंडगार पाण्याच्या स्पर्शाचा?
मला वाटतय, मी ही अताशा कातळासारखच वागतोय
निर्जीव आणि संवेदना विहीन
पण.. पण मनात ही कुठली बदल्याची भावना?
का हे ही आहे कातळासारखच वागणं?
अंगावर पडलेल्या पायाला कचकन कापणं


Shree_tirthe
Monday, January 22, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झाकलेली मूठ

राग सोड
काहीतरी बोल
झाकलेली मूठ
हळूच खोल

माझं मन
तुझ्या प्रेमात नाहलं
बघ मी तुझ्यासाठी
काय आणलं?

रागात बघत
खूदकन हसली
भावनेच्या भरात
थोडीशी रडली

रडतच तिने
मीठी मारली
मीठी मारतच तिने
माफी मागितली

मी म्हणालो, "अगं वेडे
माफी कशाची?
आता नाती
जुळलीयतना मनाची"

ति म्हणाली, "तुम्ही मला
खूदकन हसवलं
मी मात्र तुम्हाला
जाणून बुजून सतवलं"

मी म्हणालो, "प्रिये, प्रेम
असचं वाढणार
एक रुसला कि
दुसरा हसवणार"

उघडली तिने माझी
मूठ झाकलेली
मूठ उघडताच
थोडीशी ति लाजलेली

श्री


Smi_dod
Monday, January 22, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आताशा!!

आताशा.....
नकोसे वाटतायेत ना
आठवाचे ते उमाळे
क्षणो क्षणी भरुन वहाणारे
आताशा.....
झालेल्या चुकांचे
पश्चातापही पोरके झालेय
आताशा....
कोरड्या पडलेल्या नदी सारखे
भरून वहायचे
डोळेही विसरून गेलेय
आताशा......
उसवलेल्या शिवणी सारखे
आयुष्य सगळीकडुन उसवलेय
आताशा....
ओळखीच्या खुणाही ही
अनोळखी झाल्याय
आताशा.......
जगण्याचच ओझ झालय
आयुष्य भाराने त्या वाकलय
आताशा....
एकटेपणाचा हा शाप
एकटीनेच भोगायचाय
आताशा....
दिशाहिन प्रवास सगळा
एकाकी पार पाडायचाय


स्मि


Suvikask
Monday, January 22, 2007 - 4:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मीनू,
छान अर्थ विशद केलास... एवढा सोपा अर्थ मला कळला नाही बघ..





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators