Mankya
| |
| Friday, January 12, 2007 - 8:14 am: |
| 
|
अस असेल तर भिति वाटण सहाजिकच आहे ! सहज ...... सुन्दर काव्य ..... मस्तच मीनू ! अर्थ सान्गितल्या बद्द्ल धन्स मीनू .. आता अजुन छान वाटते " हिरवाई " ! माणिक !
|
Shyamli
| |
| Friday, January 12, 2007 - 9:13 am: |
| 
|
माणिक,शलाका,सन्मी,सारंग,मीनु,वैभव,जया,वैशाली मन:पूर्वक आभार मंडळी
|
Niru_kul
| |
| Friday, January 12, 2007 - 10:44 am: |
| 
|
दुसरे आयुष्य..... मी मेल्यावर या जन्मी..... दुःख नक्कीच होईल तुला..... आणि पुन्हा जगेन मी एक इवलेसे आयुष्य.... तुझ्या डोळ्यात अश्रु बनून तरळेन.... स्पर्शिन तुझ्या गालांना पहिल्यांदाच.... ओघळेन तुझ्या हनुवटीवरून हलकेच.... आणि विरेन तुझ्या पावलांजवळाच्या मातीत..... जगेन हे इवलसं जीवन.... किमान हे आयुष्य तरी नक्कीच तुझ्या सहवासात जाईल.....
|
Shyamli
| |
| Friday, January 12, 2007 - 12:12 pm: |
| 
|
अन इथे मनावर सडा टाकिती प्राजक्ताची लक्ष फुले..>>> वाह वैभव.. मीनु, भीती आवडली
|
शामले,छोटीच पण छान कविता आहे.. मुख्य करून शेवटची ओळ वैभवा,खल्लास रे भो मीनु,हिरवाई ताजेतवाने करणारी... भिती मस्त...
|
पहाट.... पहाट उमलली गुरफ़टुन मिलनाची धुंदी स्पर्शाचे दव लेवुन पहुडली सुखाच्या पाकळीत जन्मोजन्मीचे नाते आपले तरी नित्य नवे चांदणे नवी संवेदना,नव्याने बहरणे तृप्तीच्या रंगात नहाणे आठवांच्या सरीत कोसळणे जागल्या नेत्रातील सुखाची स्वप्ने अन झोपलेल्या पापण्यातील रात्रींचे जागणे......
|
प्राणसखा..... रिमझिमला पाउस अचानक माझिया अंगणात ओलीचिंब झाली काया प्राणसख्या जवळी ये ना अलगद टिपुन मजला घे ना आस आता एकच लागली भेटीची ओढ दाटली कधी रे भेटशी मुक्तपणाने विरहाची वेदना दाटली डोळ्यात आर्जवांची यातना तनामनात हळुवार पणे फ़ुंक पुन्हा प्राणज्योत ही व्हावी प्राणसखी फ़िरुन पुर्नजन्माची
|
Mankya
| |
| Saturday, January 13, 2007 - 4:01 am: |
| 
|
" पहाट.... " खरच छान ! " प्राणसखा..... " सुन्दर प्रयत्न ! माणिक !
|
Mankya
| |
| Monday, January 15, 2007 - 11:18 am: |
| 
|
काय राव ! आजपण कुणीच नाही ! माणिक !
|
सांजवेळी सांजवेळी वार्याची शितल होशील का? मला तुझ्या मिठीत घेशील का? सांजवेळी माझ्या भेटीला तु येशील का? गोड गुलाबी होटांचे चुंबन देशील का? श्री
|
Parakhad
| |
| Tuesday, January 16, 2007 - 4:21 am: |
| 
|
तीर्थे म्हाराज ... ह्यो कविता बीबी हाय .. कविता कुटाय ?
|
Bbhannat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 4:45 am: |
| 
|
श्री वार्याची शितल म्हणजे काय व्हायचं ..? होट हा शबुद नविनच वाटला .. शब्दकोशात भर घालायची का आता ..?
|
Bbhannat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 4:48 am: |
| 
|
माणक्या तुम्ही सगळ्यांना छान सुंदर म्हणायचा पण केलाय का हो तुम्हाला कळतं का कवितेतलं काही ?
|
अहो परखडराव आणि भन्नाटराव दुसर्यांना नाव ठेवणं बंद करा. तुम्हाला काहीतरी कळतं का हो कवितेतलं? अहो कवितेच "क" तरी कळतं का? कधी वेळ मिळाला तर वाचा श्रीच्या आणि माणिकरावांच्या कविता. तुम्हाला कळेल कोणाला किति कळतं कवितेतलं. हिम्मत असेल तर स्वत:ची एक कविता लिहा. येत असेल तर!!!
|
Mankya
| |
| Tuesday, January 16, 2007 - 6:46 am: |
| 
|
Bhannat मित्रा हि ती जागा नाही बोलायची ! जे काही म्हणणे आहे ते mail कर ! तुझ्या सर्व शन्का दुर करेन ! बाकी कळायच म्हटल तर तुला काही विशेष येत असेल तर तुझ्याकडुनही शिकु की ! Looking forward for your mail DOST! कौतुक करायला काही लागत नाही यार, टीका करायला मात्र अधिकार लागतो हे खर ! माणिक !
|
वा!!! वा!!! माणिक मस्तचं
|
"प्रिय मित्रानों, नवीन कवीनां नावं ठेवणे बदं करा, त्यानां चुका दाखवाताना चुकू नका !"
|
Neelay
| |
| Tuesday, January 16, 2007 - 5:11 pm: |
| 
|
आशा फुलले आशेचे अंकुर मनात पण त्यांचं हिरवेगार रोप होण्याआधीच करपून काळं झालं मनाच्या जखमेवर खपली धरली जीवनाने घेतलं वेगळं वळण किंवा आपणच ते देण्याची धडपड, तडफड केली निष्फळ मनाला कितीही समजावलं तरी आशेचे नवीन कोंब फुटलेच मग तेही जळून खाक झाले जगण्याची नवीन दिशा शोधली परत पुन्हा एकदा रहाटगाडगं सुरु झालं वाटलं आत चाकोरीतून बाहेर पडावं नकोच त्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या सार्यांचीच एक होळी करावी मनाला खरपूस करपून द्यावं पण मग.... आशेविना काय अर्थ? जळकट धुरात कोंडून जिणं व्यर्थ फुलू द्यावेत मनात आशेचे अंकुर कधी तरी त्यांचं हिरवंगार रोप पाहायला मिळेल ही आशा धरून -नीलय
|
शामली.... किती कमी शब्दात खुप सार व्यक्त करतेस... सहजपणे.... अगदी नकळत भावुन जातेस..... अन.... याच निरागसतेने मग.... मनात घर करुन राहतेस..... वैभव सर.... फुलराणी साठी दाद द्यायला खरच शब्द शोधतो आहे... केवळ अ प्र ति म
|
Bbhannat
| |
| Tuesday, January 16, 2007 - 11:13 pm: |
| 
|
वाचा श्रीच्या आणि माणिकरावांच्या कविता >> किति हि हिम्मत
|