Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 16, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » चित्रकविता » Archive through January 16, 2007 « Previous Next »

Sarang23
Friday, January 12, 2007 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक तुझ्या चित्राकडे पाहून मला एक कथाच सुचली. तीच कवितेत मांडत आहे.
समस्त मायबोलीकरांना संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा.
काहीबाही खरडलंय, हाच तिळगूळ समजून गोड मानून घ्या.


फूल गवतास:


नितळ निळाई भरल्या
डोहावर हळवी छाया
तशीच चंद्रावरती
जडली वेडी माया

एक विनंती तुला तृणा रे
सांग तयाला इतके
रात्र कळे ना दिवस मला
प्रेम तयावर इतके

गवत झाडास:


ऐकलेस जे गूज, तू नको घेऊ मनावर त्याला
सोड ढाळणे अश्रू वेड्या, मोत्याची सर त्याला
येईल फूलही पुन्हा धरेवर जरा वेळ दे थोडा
रीत आगळी चंद्रकलांची कळेल लवकर त्याला

चंद्र झाडास:


कुठे सांगना कुठे लोपली
तुझियावरची गर्दी?
कुठे लोपले मधूर कुजन,
कुठे हरवले दर्दी?

पुर्‍या पंधरा दिवसांनी मी
तुला भेटण्या आलो
तुझ्या अवकळेविषयी मजला
कसलीच नाही वर्दी

झाड चंद्रास:


काय तुला मी सांगू चंद्रा
प्रेम असावे ते वेडे
फुलामध्ये त्या जीव अडकला
रमून गेले अन थोडे

तेच एकदा असे बिलगले
वेडच लाऊन गेले
आणि तोडले पाश एकदा
वसंत घेऊन गेले

असो सोड ते माझे दुखणे
तुज काय सांगतो ऐकून जा
एक विनंती शेवटची तू
प्रेम फुलाला देऊन जा

पहा पसरली धरेवरी या शततार्‍यांची रानफुले
तुझ्या प्रभेने लखलखली, पण विरहाने हैराण फुले

असे लागले वेड तयांना, तुझाच आता ध्यास उरे
तुला भराया कवेत तीही, त्यांच्यातच बेभान फुले

हरिततृणाला सांगत बसती आकाशाचे गार्‍हाणे
किती खुळी अन अबोल सारी गोरी गोरीपान फुले

कधीतरी तर होईल मीलन भ्रमात भलत्या डुलती
मान जराशी वेळावुन तुज हरखून बघती छान फुले

त्या वेड्यांना कसे कळावे क्षणभंगुर हे जगणे रे
उद्याच तिथल्या घरी जायची इवली इवली सान फुले

एवढीच ही रात्र राहिली अखेर त्यांच्यासाठी
यादगार कर रात्र तयांची, गातील गोंडस गान फुले

उद्या तेवढे माझेही तू मिटून डोळे हरवून जा
उधळून सारी निर्माल्याची अंगांगी धनवान फुले

सारंग


Nandini2911
Friday, January 12, 2007 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग.. हे तुझे काहीबाही खरडणे जीवघेणे आहे..
मजा आ गया.


Prasadmokashi
Friday, January 12, 2007 - 1:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय सुंदर लिहून ठेवलय सगळ्यांनी ...
संघमित्रा, जबरदस्त.
सारंग, कविवर्य सलाम


Vaibhav_joshi
Friday, January 12, 2007 - 1:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा ... मस्तच मैफ़ल जमलिये ...

प्रसाद ... आठवली रे ... खासच !!!

स्मि , किशोर , सन्मी , देवा , मीनू , हेम्स , आनंद .....

कुणा कुणाची नावं घ्यावी .... हा कवितेचा बीबी वाटण्यासारखं लिहीलंय सर्वांनी

सारंगा ... दोस्ता ... कमाल केलीस .... कवितेतून एक पूर्ण कथाच समजत गेली मला ... आणि बर्‍याच आठवणींना उजाळा मिळाला. तुझी कविता वाचताना माझी एक कविता आठवलेली जी इथे चित्राला suitable नाहीये पण माझ्या खूप जिव्हाळ्याची आहे ... म्हणून कविता बीबी वर पोस्ट करतो ... माझ्यातर्फे ही
तिळगुळ.

Prasadmokashi
Friday, January 12, 2007 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्र, चांदण्यावर इतके काही सुंदर वाचले आज इथे....
मजा आगया. त्याच स्फूर्तीतून ...

चांदणफुले

काळोखावर हळूच उमलून आली चांदणफुले
अन् धरणीच्या निळ्या महाली न्हाली चांदणफुले

हा प्रणयाचा धुंद गंध का सार्‍या सृष्टीवरी ?
आली उतरून अंबरातूनी खाली चांदणफुले

स्पर्शामधूनी फुलून यावी कोमल कांतीवरी
देहाने या खुडून काही ल्याली चांदणफुले

चंद्र वाहतो रक्तामधूनी चुंबन घेताना
ओठांनीही अलगद थोडी प्याली चांदणफुले

ना तू ना मी बोलावे या दुधात तरताना
मौनव्रतातील शब्द आपुले झाली चांदणफुले

~ प्रसाद



Sarang23
Friday, January 12, 2007 - 1:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! प्रसाद, दोस्ता... खासच! मजा आ गया!
फक्त शेवटच्या शेरात पहिली ओळ वाचताना अडथळा येतोय थोडा.


Sanghamitra
Friday, January 12, 2007 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंद निरोप खूप आवडली.
देवदत्त :-)

हळूवार चांदण्या गवतावरी रहाती. वा...
माझ्या निष्पर्णपणातही.... हेम्स छानच.
सारंगा गझलेचा मीटर सही आहे. का कुणास ठाऊक पंकज उधासची आठवण झाली. त्या धनवान शब्दामुळे असेल. :-)
चंद्र वाहतो रक्तामधुनी...
प्रसाद बोलायला शब्द नाहीत म्हणून माझ्या दोन ओळी जोडतेय.

मानेवरुनी ओघळले रे काही दंवबिंदू.
श्रांत धरेच्या पाठीवरती ओली चांदणफुले.
- संघमित्रा


Jayavi
Friday, January 12, 2007 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्र म्हणजे सगळ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय...! मस्त पसरलंय रे चांदणं सगळ्यांच्या काव्याचं..... आता कोणाकोणाची नावं घायची.... वा.... मजा आ गया दोस्तो :-)
प्रसाद, मीनु, सारंगा.... Just too good!
संघमित्रा..... २ ओळी फ़ारच सुरेख!


Meenu
Friday, January 12, 2007 - 3:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद चांदणफुले मस्त रे ..!!

जया तुझी पोस्ट वाचुन, काही दिवसापुर्वी एक मजेशीर व्याख्यांची मेल forwarded आली होती त्यातली चंद्राची व्याख्या आठवली, गम्मत म्हणुन देतेय ईथे

चंद्र : कवीच्या तावडीत सापडलेला दुर्दैवी प्राणी

दिवे घ्या


Jo_s
Friday, January 12, 2007 - 3:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक मझाही एक प्रयत्न

आम्ही बालके तुझीच रुपे
देवा तुजला स्मरतो
आंतर्बाह्य निर्मळ तुजसमं
येथे वावरतो

उगाच खोटा दिखावा तो
थोरांसच लखलाभ
येताजाता आम्हा सांगती
अरे असे वागं

व्यवहार, शिष्टाचारांचे ना
आम्हा ठावे बंध
निर्व्याज प्रेमा परी कुठला
दुसरा आनंद

तुला भेटण्या हवीत देवा
माध्यमे कशाला
भेटतोसकी वंदिता भावे
त्वरे आम्हाला

सुधीर

Mankya
Friday, January 12, 2007 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Anandg..... ' निरोप ' जबरी दिलाय की
" देह चाद्ण्यात न्हावा "... वाहवा !
hems.... छानच !
सारन्गा ..... एक नम्बर यार ... क्लास SSSSS!

" उद्या तेवढे माझेही तू मिटून डोळे हरवून जा
उधळून सारी निर्माल्याची अंगांगी धनवान फुले ".. क्या बात है !

मित्रा ( वैभवा )..... छे शब्द्च नाहीत लिहायला ...' फुलराणी ' .... Masterpiece!!

प्रसाद ... तु तर चित्रकवितान्चा सम्राटच ... सगळ्या कविता वाचल्या तुझ्या ... कळस हो कळस गाठ्लायस तु !!

सन्क्रन्तिच्या शुभेच्छा आणि स्वामी विवेकानन्दाना जयन्तिनिमित्त त्रिवार वन्दन !

माणिक !


Lopamudraa
Friday, January 12, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा इथे तर कवितांच चांदण फ़ुललय... मसत्च..
कोणाकोणाला छान म्हणाय्चे.. सगळ्याच सुंदर आहेत.
क्रिश्नाग,देवदत्ता,सारंग,संघमित्रा,आंनद,सुधिर आणि प्रसाद..
जया नुसती प्रतीक्रिया नाही द्यायची आपली अजुन एक कविता वाचु दे की आम्हाला..
आणि वैभव इतक सुंदर चित्र आहे आणि तुझी कविता नाही...


Ameyagambhir
Friday, January 12, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wa ! Lajawab ! Sagalyanchyach Shabda-shabdatun Teelachi snigdhata ani Gulacha godava osandun vahatoy !
Mazyahi shubhechha !

Kmayuresh2002
Friday, January 12, 2007 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग,सहीच रे मित्रा.. कवितेच्या माध्यमातुन सुंदर कथा फ़ुलवली आहेस..

प्रसाद,चांदणफ़ुले सहीच रे.. तुझा बहर पुन्हा सुरू झाला.. लगे रहो प्रसादभाई:-)

सन्मे,दोन्ही ओळी जबरीच...


Mankya
Monday, January 15, 2007 - 3:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prince

थोड अवघड आहे लिहिण या चित्रावर, पण तुम्ही लोक आहात ना !

माणिक !


Jo_s
Tuesday, January 16, 2007 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक तुझ्या चित्रा वरून

युध्दास सज्ज तो लेवूनी चिलखतं, शिरस्त्राणं
पोलादी बाहू कणखर वृत्ती जणू शौर्याची खाणं

काय वर्णावे रुप त्याचे जणू स्वर्गातून आला
बेसावध एका क्षणी त्याचा घात हाय झाला

रुपवतीची एका सुंदर, तसवीर त्यास दिसली
भान हरपले उमजेना की ही बिजली कुठली

रुप तिचे अधीक तेज की नेत्रांचे तिरं
बोथट वाटू लागे त्यास, त्याची तलवारं

तोच एक चमत्कार झाला जो मनी पटेना
चित्र सिमा भेदून अली बाहेर ती ललना

शौर्य विसरला, भान हरपले, संभ्रमीत झाला
तलवार तिच्या हाती देवून नतमस्तक झाला


सुधीर



Meenu
Tuesday, January 16, 2007 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुधीर मस्तच प्रयत्न ..

Mankya
Tuesday, January 16, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर ........ जमल रे मित्रा !
You have done it!
मस्तच !

माणिक !


Himscool
Tuesday, January 16, 2007 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुधीर शाळेत असताना स्कॉलरशिपला चित्रवर्णन असायचे तुमची कविता वाचून त्याचीच आठवण झाली..
सुरेख चित्र कविता


Nvgole
Tuesday, January 16, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! भाई वा!! सुधीर, सुंदरच कल्पना आहे तुझी. आणि ते चित्रही अद्भूतच आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators