Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 09, 2007

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through January 09, 2007 « Previous Next »

Ganesh_kulkarni
Friday, January 05, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" श्री " आणी मला मित्र मिळाला!

गणेश (समीप)


Niru_kul
Sunday, January 07, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरकटलेली स्वप्नं...

तू सांगितलंस ना मला....
की तुझं प्रेम नाहीये माझ्यावर,
तेव्हा खूप दुखलं गं ह्रदयात....
उगाच एक अनावर हुंदका दाटून आला गळ्यात....
कमीपणाची जाणीव आयुष्यात पहिल्यांदाच झाली....
पण बरंही वाटलं मनाला....
किमान तू माझी फसवणूक तर केली नाहीस म्हणून....
कारण तसे झाले असते, तर मी नक्कीच उध्वस्त झालो असतो....
माझ्या भावनांची तू कदर केलीस म्हणून आभार मानावेसे वाटतात तुझे...
एका कवीचा अंत, किती कुशलतेने टाळलास तू....
आणि माझ्या पदरात टाकून गेलीस धुरकटलेलं आभाळ,
आणि भरकटत गेलेली स्वप्नं....


Niru_kul
Sunday, January 07, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुझ्या घराच्या कोनाड्यात....

तुझ्या घराच्या कोनाड्यात कुठंतरी...
पडलं असेल माझं ह्रदय धूळ खात....
कधी जमलंच तर त्याच्याकडे लक्ष देऊन बघ....
अजूनही ते तुलाच साद घालत असेल....
त्याच तन्मयतेने, तुझ्याचसाठी धडकत असेल....
सहन करत असेल यातना, अगदी निःशब्दपणे....
तुझ्या एका कटाक्षासाठी, पोटतिडकीने तळमळत असेल...
स्पर्शून बघ कधी त्याला, उमलून येईल फुलासारखं....
झिडकारुन बाजूला फेकशील, तर मुसमुसत राहील मुलासारखं....
तरीही तुझ्याबद्दलची भावना, त्यातून कधी आटणार नाही;
तुझ्या संमतीशिवाय कधीही, ते मृत्यूला गाठणार नाही....
बघ जमलंच तर...... घे माझ्या ह्रदयाची परिक्षा.....
नाहीतर पडून राहू दे त्याला, तुझ्या घराच्या कोनाड्यात कुठंतरी....


Niru_kul
Sunday, January 07, 2007 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

तू नक्कीच होशील माझी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....
तू असशील माझ्या बाहूपाशी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

माझ्या मनीच्या भावना, समजू लागतील तुलाही;
माझी स्वप्नं सत्यात उतरतील, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

तुझ्याही मनात रुजू लागेल, प्रितीची निखळ भावना;
मोडून बंधनं तू येशील मजपाशी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

सर्वांच्या मग अनुमतीने, नात्याला आपल्या रुप मिळेल;
तू बनशील माझी अर्धांगी, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....

आयुष्य माझे सखे, समृध्द करशील तू सहवासाने;
आमरण आपुली साथ असेल, मी वाट पाहतोय त्या दिवसाची....



Shree_tirthe
Sunday, January 07, 2007 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरु एकाहून एक कविता आहेत. वा!!! मस्तचं.

श्री


Ganesh_kulkarni
Monday, January 08, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


"परतीच्या गावा मला
नेशील केव्हा
देवा मला सांगशील का? !! !!

वरुन मी दिसतो
कसा रुबाबदार
केव्हा संपेल हा बहार
मला सांगशील का? !! १!!
सगळ्यानां मी इथे
मानतो माज़े
सगळ्यातून तू मला
ओळखशील का? !!२!!
जळेन मी सरणावरी,
धुरातुन जाईल सवारी
मासे तरी राखेवरी...
माज़्या जगतील का?!!३!!
जगण्याचा माज़ा खोटा खटाटोप
शेवटी अश्रु...
दोन फक्त...
तिच्या डोळी सोडशील का?!!४!!

गणेश (समीप)



Mankya
Monday, January 08, 2007 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वप्न....

कवटाळण्या भग्न स्वप्नान्चे तुकडे
मानवा तुझा जन्म नाही
भुतकाळाच्या साखळदण्डानिही
बन्दिवान तुझे मन नाही

भविष्याच्या गरुडपन्खाचेही
लाभले तुझ वरदान
स्वप्न पाहण, फुलविण, धडपडण
त्या धडपडण्यातला आनन्द जाण

दुर्दैवाने स्वप्न भन्गले जरी, त्याच्या
तुकड्यावरुन रक्ताळलेल्या पायानी धावण
सोडु नको मानवा रे
दुसर स्वप्न पाहण...स्वप्न पाहण....

माणिक !


Meenu
Monday, January 08, 2007 - 11:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडझड

भरलेल्या घरात,
माणसांचा अभाव
परस्पर विरोधी,
प्रत्येकाचा स्वभाव
ईथे सतत काहीबाही,
चालु असते गडबड
आपलं महत्व ठसवायची,
प्रत्येकाची धडपड
सुंदर सजलेली घरं,
मनात जरी पडझड ...


Jayavi
Monday, January 08, 2007 - 11:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा.... मीनू, माणिक........ मस्तच हं!

Jayavi
Monday, January 08, 2007 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीवनरंग

बंधन कुठले नको वाटते
पाश नको ते कोणाचे,
मुक्त मोकळा श्वास हवा मज,
नकोच दडपण कोणाचे….

नको काळजी, नकोच चिंता
नको लढाई दुनियेशी,
नको दु:ख अन्‌ नको उसासे
नको लढाई पैशाशी.

अजब मागणे जगावेगळे
ऐकून हसला मनामधे
"तथास्तु'" म्हणुनी गुप्त जाहला
देव दाटशा धुक्यामधे.

सुखी जाहले वाटे मजला
मनापरी घडता सगळे,
परंतु सुख ते डाचत होते
कारण मज ते का न कळे....

विचार करता गूढ उकलले
शांती झाली चित्ताची,
बंधनातले सुख आकळले
किंमत कळली पाशाची

बेचव दुनिया फ़क्त सुखाची
दु:खाने गोडी वाढे,
दु:खानंतर येता सुख ते
जगण्याला मग रंग चढे.

नयनी पाणी दुस-यासाठी,
हास्य तयांच्या सुखामधे,
कळले मजला हीच जिंदगी
व्यर्थ गुंतणे स्वत:मधे

जयश्री



Shyamli
Monday, January 08, 2007 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा जया.........
श्वास गुदमरायला लागल्यावर सुखद गार झुळुक यावी आणि त्या झुळुकेबरोबरच एखादा ओळ्खिचा गंध असावा......तस वाटतय आज इकडे, धन्यवाद जयु

मीनु, जबरीच


Psg
Tuesday, January 09, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया, मस्तच :-) तुझ्या positive attitude ला साजेशी आहे!

Meenu
Tuesday, January 09, 2007 - 12:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जयावी मस्त .. फक्त धुरामधे ऐवजी धुक्यामधे लिहीलस तर जास्त बरं वाटेल की काय असं वाटलं .. पण मस्तच लिहीलं आहेस गं

Kanchangandha
Tuesday, January 09, 2007 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओळख.....
तुझ्या नजरेने माझ्यात
आरपार दाखवलेली ओळख
श्वासांनी तुझ्या श्वासात माझ्या
दाखवलेली गंधीत ओळख
रजईत त्या धुक्याच्या
एकमेकात गुरफ़टलेली ओळख
समोर आल्यावर
न दाखवलेली ओळख
पण अधिर्‍या त्या नेत्रात
दाटलेली ओढीची ती ओळख


Sarang23
Tuesday, January 09, 2007 - 1:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा जयश्री! खास!    

Princess
Tuesday, January 09, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जयु, मस्तच ग... आजचा दिवस एकदम positive केलास. धन्स

Jo_s
Tuesday, January 09, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्क्या छान

आपलं महत्व ठसवायची,
प्रत्येकाची धडपड ......मिनू जबरीच

दु:खानंतर येता सुख ते
जगण्याला मग रंग चढे.....जयावी अफलातून

Vaibhav_joshi
Tuesday, January 09, 2007 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया ... सहीच .. एकदम झिंगालाला
:-)
मीनू .. मस्त
माणिक ...
भुतकाळाच्या साखळदण्डानिही
बन्दिवान तुझे मन नाही

आवडलं




Prasadmokashi
Tuesday, January 09, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहीबाही ...

लिहीत जातो काहीबाही
त्या शब्दांना अर्थच नाही

जे जे येते, ते ते जाते
झुळुकीसरशी वाहून सारे,
हातामध्ये मुळी न येती
आठवणींचे मोर - पिसारे,
पेन चालतो यंत्रावत् ; अन्
उमटत जाते नुसती शाई ...
लिहीत जातो काहीबाही
त्या शब्दांना अर्थच नाही

ज्या झाडाची फुले वेचतो
त्या झाडाला देतो पाणी,
पाऊस होतो आणिक गातो
रंगबावरी श्रावणगाणी,
कधी ओढतो अंगागावर
कृष्णतनूची गर्द निळाई ...
लिहीत जातो काहीबाही
त्या शब्दांना अर्थच नाही

मी अंधार्‍या वाटेवरला
एक प्रवासी ; चालत जातो,
पापणीतला सूर्य तुम्हाला
तुकडा तुकडा वाटत राहतो,
सुख दुःखाच्या सैन्यासंगे
रोज पेटते जुनी लढाई ...
लिहीत जातो काहीबाही
त्या शब्दांना अर्थच नाही

अंतरातल्या आकाशातून
विहरत जाती मेघ सावळे,
वा ह्रूदयाच्या मातीमधूनी
फुटून येती कोंब कोवळे,
अशा क्षणाला मला भेटते ;
कुशीत घेते माझी आई ...

लिहीत जातो काहीबाही
त्या शब्दांना अर्थच नाही

~ प्रसाद


Vaibhav_joshi
Tuesday, January 09, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये बात ! अब मज़ा आ गया दोस्त .. welcome back




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators