|
Daad
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आपल्या आत आत एक पडत असतो पाऊस कोणी पुसलं की दडत असतो पाऊस मनाच्या शिवारात सयींच्या मोसमात पापणीच्या शिंपीत घडत असतो पाऊस कधी बनून हुंदका बंद असतो मुठीत कधी अनावर होऊन झडत असतो पाऊस ठेवतो आपण फुलवून खळीभर हसू मग नको त्यालाच कसा दिसत असतो पाऊस? भरून येतं आणि कोसळतही नाही निळा निळा असा गडद असतो पाऊस न सांगता सवरता भेटतो आणि, कळत नकळत असा जडत असतो पाऊस -- शलाका
|
Smi_dod
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आठवणी!! फ़िरुन फ़िरुन येती थवे आठवणींचे जुन्याच डहाळ्यांना नविन पालवीचे बेसावध क्षणी सुटलेल्या तीरांच्या जखमा परत भळभळाव्या सल नाही जखमांचा घावांचा व्रण व्हावा ठसठसणार्या वेदनेचा उरी तरंग उठावा.. हलकेच त्या हेलकाव्याने हिंदोळा घटास बसावा ओघळावी ती माळ मोती मोती विखरावा.... स्मि
|
Smi_dod
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
उःशाप!!! विस्मरणाचा उःशाप द्या माझ्या स्मरणांना शापात त्या जीव गुदमरुन गेला.. स्मरणांचा पिंगा सततचा असतो रिंगणात मग त्या श्वास अडकतो आता ध्यास विस्मरणाचा निरागस,कोवळ्या किरणांचा तिमिरातुन उमटणार्या आशेचा....... स्मि
|
Shyamli
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अहा स्मि, आता ध्यास विस्मरणाचा..... खासच वैराग्य माझे घेईल कोणि असे कोणते सद्भाग्य माझे>>> हा विचार कोणि करतच नाहि नहि का? मस्तच रे देवा
|
Shyamli
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शलाका तु वाचतेस(खातेस) तरी काय एवढे सुरेख आणि गोड कस लिहीता येतं तुला wow प्रत्येक ओळ
|
Smi_dod
| |
| Thursday, December 28, 2006 - 12:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्यामली अग येते हि पण वेळ कधी कधी... नको वाटते काही आठवायला... दुःख! दुरवर पसरलेल्या आयुष्याच्या रस्त्यावर मैलाचे दगड आहेत माझी दुःखे सुखाच्या पापुद्र्याखाली दडलेली रक्तहीन,थरथरणार्या ओठातुन अस्फ़ुटणार्या हुंदक्यांची कळत नकळत घडलेली जाणुनबुजुन रंगवलेली अपेक्षांच्या सगळ्या वाटा बंद करुन विरक्तीच्या रस्त्यावर उतरलेली विरक्ती कडुन क्षितिजापार जाणारी अज्ञातांच्या प्रदेशात पण ओळखीची सोबत करणारी स्मि
|
खरंय जया... थोडं.. थोडं... उतरताना 'चल ये आज चांदण्यात' माझ्या मनात शेवटपर्यंत डोकावतच राहिली. तुझी नवरसांवरची कविता छानच आहे. पण ती जुलैमध्ये भेटलो की तुझ्याच तोंडून ऐकायला अधिक आवडेल. पमा, देवदत्त, दाद.... केवळ अप्रतिम. माझं लिखाण साधं साधं असतं. तुम्ही सारेजण शब्दसमृद्ध आहात.
|
Deep_tush
| |
| Thursday, December 28, 2006 - 1:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दु:ख़ कविता मस्त आहे मनाला स्पर्श करणारी आहे
|
Meenu
| |
| Thursday, December 28, 2006 - 2:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शलाका पाऊस मस्तच गं .. स्मि उःशाप छान ..
|
बहावा..... मिठीत तुझ्या मला माझ्या जगाचा भास होतो कवेत तुझ्या गंधीत श्वास होतो बाहुंच्या तटबंदीत विसावते काया अन मनमोगरा तरारतो खुळावतात पाकळ्या त्या दंशाने दवात मग अमृताचा वर्षाव होतो घट्ट होतो विळखा अजुन छाया ही एक होते शिडकाव्यात सुखाच्या रोम रोमी फ़ुलतो गुलमोहराच्या कुशीत माझा बहावा बहरतो
|
Meenu
| |
| Thursday, December 28, 2006 - 2:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पिंपळ भिंतीतुन उगवलेल्या, लोचट पिंपळासारख्या, काही भावना ..! किती वेळाही झिडकारल्या तरी उगवतात पुन्हा पुन्हा ... वर वर पाहुन, नाही अंदाज यायचा .. किती खोलवर पोहोचली असतील मुळं याचा, कापुन पहा, जाळुन पहा .. आता पिंपळ नसला तरी, चुकार नजर वळतेच तिकडे, काही दिवस बरं चालतं .....!! पुन्हा पिंपळाचं मुळ पालवतं ... भिंतीतुन डोकावु लागते, कोवळी कोवळी पालवी नकोशी असलेली .... तरी पण कधी कधी, हवीशी वाटणारी, ती कोवळीक परत अचानक जाग येते झिडकारायला हवं याची जाणीव होते परत एकदा .. कापुन पहा, जाळुन पहा .............
|
Meenu
| |
| Thursday, December 28, 2006 - 2:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गाव ... मनातलं कित्ती वर्षांनी आज तुझं पत्र आलं त्याचाच हात धरुन, मी पुन्हा गावात शिरले घरभर सांडल्या होत्या आठवणी .. दारचा मोगरा, गातच होता सुगंधी गाणी .. पाटामधुन वहातच होतं झुळुझुळु पाणी .. दारची तुळस हसतच, करत होती स्वागत .. आठवते ना अजुनी, अंगणातली अंगत पंगत .. रात्र रात्र ईथेच गप्पांच्या मैफीली जमत .. पडवीमधे कंदीलाचा लख्ख उजळ प्रकाश समोर तेच चांदण्यांनी भरलेलं आकाश मधुनच तो एक कोणता तारा निखळला ..? प्रत्येक तार्यानी, स्वतःचं आकाश बांधलं दिसेनासं झालं आकाश, तार्यांनी भरलेलं काही नाही, समोर फक्त पत्र तुझं धरलेलं ....
|
Smi_dod
| |
| Thursday, December 28, 2006 - 3:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा मीनु अगदी सुंदर दोनीही कविता..
|
स्मि, मीनु तुमच्या कविता छान आहेत! "दुःख ", " पिंपळ " अगदी विचार करायला लावतात!
|
Shyamli
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सणकन जावा जीव आता आहे आणि आता नाही अस व्हावं दिव्यातल्या वातीसारखं नाही, कापरासारखं जळावं अलगद विरून जावं जळता जळता आसमंतात अगदी राखही उरू नये मागे तेवढीही खूण नको, जगलो होतो आपणही हीही जाणीव नको श्यामली
|
श्यामली, " तेवढीही खूण नको, जगलो होतो आपणही हीही जाणीव नको " तूमच्या ह्या ओळी मला थोड्याश्या " निगेटिव्ह वाट्तात" मला वाट्त आपण जगतो ते काहीतरी देण्यासाटी! आणी कविता ही आपण जगलो याची ख़ुण आणी जाणीव आहे नाही का?
|
Smi_dod
| |
| Thursday, December 28, 2006 - 4:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
श्यामली.... ... ... ...!!!!!!!
|
Sakhi_d
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कांचनगंधा सुरेखचा.......... श्यामली काय लिहू?? खुपच सुंदर
|
Deep_tush
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गाव मनातल... छान अप्रतिम दारावरची तुळस...... मस्त ओळी आहेत मीनु छान लिहतेस
|
Sarang23
| |
| Thursday, December 28, 2006 - 5:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुमती, खूप साधी आणि छान कविता! फार भावली...! जयश्री, नवरस मस्त! पमा... बर्याच दिवसांनी येणे केले... छान आहे! श्यामली, सुंदर... पण जाणिव कुणाला राहील? "जो गेला तो गेला पार जाणिवेच्या..."
|
|
|