Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 27, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » पौष » काव्यधारा » कविता » Archive through December 27, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, December 25, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्षत्र

काळोख जन्म देतो माझ्या तुझ्या क्षणांना
हरखून पाहतो मी नक्षत्र जन्मताना !! धृ !!

निमिषात लख्ख माझा एकांत होत जातो
प्रत्येक श्वास माझा तेजाळ गीत गातो
अस्तित्व लाभते त्या गगनात चांदण्यांना
हरखून पाहतो मी नक्षत्र जन्मताना !! १ !!

डोळ्यांस साद जाते अलवार भावनांची
बरसात होत जाते शततारकाफुलांची
हुरळून रात्र जाते वर्षाव झेलताना
हरखून पाहतो मी नक्षत्र जन्मताना !! २ !!

काळोख जन्म देतो माझ्या तुझ्या क्षणांना
हरखून पाहतो मी नक्षत्र जन्मताना


Shyamli
Monday, December 25, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.....!!!!
पौषाची सुरवात इतकी सुरेख,
क्या बात है!


Nilyakulkarni
Monday, December 25, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वैभव......
नेहमी प्रमाने उ त्त म!!!


Sakhi_d
Monday, December 25, 2006 - 10:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव खुपच छान आहे...



Ganesh_kulkarni
Tuesday, December 26, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
" नक्षत्र " खुप छान
मला खुप भावलेल्या दोन ओळ्या
"निमिषात लख्ख माझा एकांत होत जातो
प्रत्येक श्वास माझा तेजाळ गीत गातो "
खुपच छान


Smi_dod
Tuesday, December 26, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव नेहमीप्रमाणेच... ... सुंदर.... :-)

Poojas
Tuesday, December 26, 2006 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Again.....touching...!!!
खूपच छान VJ ....:-)


Sarang23
Tuesday, December 26, 2006 - 12:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शततारकाफुले!!! पौषही दणक्यात म्हणायचा!

Manishalimaye
Tuesday, December 26, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला नव्या महिन्याची सुरवात तर छान झाली!
वैभव नेहमीप्रमाणेच खुपच छान!


Jayavi
Tuesday, December 26, 2006 - 2:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा....... नक्षत्राचा जन्म इतका सुरेख असतो का रे? की ते तुझ्या काव्यदृष्टीने तू ते बघतो आहेस म्हणून तो इतका सुरेख दिसतोय आम्हाला! जाऊ दे.......कशाला विचार करायचा...... हे जे तू जन्माला घातलं आहेस....त्याचाच फ़क्त अनुभव घ्यायचा बास! बाकी काही नको :-)

Manishalimaye
Tuesday, December 26, 2006 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वैभव,
तु तुझ्या कवितांचा संग्रह काढ रे म्हणजे आम्हा पामरांना तुझ्या सगळ्या कविता एकत्र वाचता येतील.
हे इथे असं नैवेद्य दाखवल्या सारख होत त्यापेक्षा जरा पोटभर खाऊ घाल[ संग्रह रुपात]
म्हण्जे आम्हालाही मनसोक्त वाचनानंद घेता येईल.


Vaibhav_joshi
Tuesday, December 26, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप खूप आभार मित्रांनो ...
जया .. प्रतिक्रिया जास्त सुरेख आहे असं वाटलं
मनिषा ... असं काही नाही हो .. नाहीतरी एका पुस्तकात अशा किती कविता मावणार ? मायबोलीच्या वहीत लिहीत जायचं ..
पण जरूर कळवेन पुस्तकाचं

पुन्हा एकदा धन्यवाद


Ganesh_kulkarni
Tuesday, December 26, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"ना रुतलो तरीही मी कुणाला....."

रोज छेडतो मी माज़े तराने
ना एकू येई कसे कुणाला
रोज मी रडतो मी माज़्याच सुराने
ना एकू जाई कसे ते कुणाला. !!१!!

रोज भिजतो मी माज़्याच डोळ्यानी
ना दिसलो मी पावसात कुणाला
रोज फ़ुट्तो मी ख़ड्याच्या, तड्याने
ना जुळलो तरी मी कुणाला. !! २!!

रोज असतो मी अगदी ख़र्‍याने
ना वाट्लो ख़रा कसा मी कुणाला
रोज हसतो मी असा दु:ख़ाने
ना रडवलो मी जराही कुणाला. !! ३!!

रोज हालतो मी कदीही वार्‍याने
ना उमगलो मी कसा तरी कुणाला
रोज फ़ुलतो मी ड्कर्‍या काट्याने
ना रूतलो तरीही मी कुणाला. !! ४!!.




Meenu
Tuesday, December 26, 2006 - 6:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुस्तक .. शेवट नसलेलं

उत्सुक मनानी घेतलं होतं,
पुस्तक एक वाचायला.
गुंतत गेले त्यात नकळत,
जशी कथा लागली सरकायला.

शिगेला पोहोचली उत्सुकता,
शेवट जाणुन घेण्याची.
हाय रे देवा !! नाही आहेत,
पानं काही शेवटची.

जागले कितीक रात्री ..
जरतरची मांडुन गणितं ,
अनेक तर्कवितर्क,
अन आडाख्यांची भुतं.

तर्काधिष्ठीत आडाख्यांनीही
समाधान नाहीच झालं
तुझ्यामाझ्या नात्याचं पुस्तक
शेवटाविना अधुरच राहीलं


Daad
Tuesday, December 26, 2006 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आहा वैभव,
'निमिषात लख्ख माझा एकांत होत जातो
प्रत्येक श्वास माझा तेजाळ गीत गातो
अस्तित्व लाभते त्या गगनात चांदण्यांना'

उजेडाची आतिषबाजी अनुभवायची असेल तर, आधी काळोखाची सोबत घ्यावी लागते....... (कुठेतरी वाचलय असं)
आपल्या तेजाळ श्वासाने चांदण्याना अस्तित्व देणं? क्या बात है! एकदम जिगरवाली बात झाली!
गणेश, मीनू मस्त!
खूप खूप (खरच खूपच) दिवसांनी आलेय.

रानातल्या पावसाची....
ओल्या ओठी, ओले गाणे गुणगुणे कोणी
रानातल्या पावसाची मनातली गाणी||

झंकारल्या धारा, अंग चिंब नवतीचे
सलज्ज मागणे, रोमरोमी तहानेचे
ओली शब्दबोली झाली काया शहारोनी
रानातल्या पावसाची...||

उबार मिठी, ओले गुंफण बाहुंचे
टिपून घेतले सूर सूर सर्वांगाचे
नवे वेद गाते, गोड वेदना ही जुनी
रानातल्या पावसाची...||

रुणझुणले तनूत ताल तुषारांचे
रुजू आले कोंब, शब्दांविनाही अर्थांचे
शृंगाराचे गान, झाली मने मोहरोनी
रानातल्या पावसाची...||

-- शलाका


Devdattag
Tuesday, December 26, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव प्रश्नच नाही!!!:-)
मीनु.. शेवटच्या कडव्याच्या दोन ओळींची मांडणी अजून प्रभावी हवी होती असं वाटतय.. बाकी कविता सहिच आहे
शलाका.. तुमचे शब्द फार वेगळे असतात


Kmayuresh2002
Tuesday, December 26, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा,नक्षत्र मस्तच रे मित्रा... दिल खूष कर दिया:-)

मीनु,पुस्तक छान गं:-)


Meenu
Tuesday, December 26, 2006 - 11:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका सलज्ज म्हणायला हवय का गं सल्लज न म्हणता .. बाकी माझही मत देवासारखच आहे. खुप वेगवेगळे गोड गोड शब्द असतात तुझ्या काव्यात ..

हो रे देवा मला पण तसच वाटतय .. विचार चाल्लाय त्यावर ..

प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद ..


Daad
Tuesday, December 26, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, thanks गं ... 'सलज्ज' च हवय. चूक सुधारलीये.
देवदत्त, धन्यवाद.


Jayavi
Wednesday, December 27, 2006 - 1:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा........शलाका........खूप गोड!
झंकारल्या धारा, अंग चिंब नवतीचे
सलज्ज मागणे, रोमरोमी तहानेचे
........ खासच!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators