Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » काव्यधारा » झुळूक » Archive through November 08, 2006 « Previous Next »

Pujarins
Wednesday, November 01, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रथात तुझ्या
कोण कृष्ण बसला?
विखारी फ़ुत्कारांत
रथ कसा वाचला?


Daad
Wednesday, November 01, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओ हो! अति सुन्दर, पुजारीण (असा लिहायचा का तुमचा आयडी?)
कृष्णच तुझ्या
रथाचा सारथी
कळावा आरथी
लागे मनी
-- शलाका


Pujarins
Thursday, November 02, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद शलाका.
मी पुजारी (ण नाही:-))

स्पर्श काळीमा
रुतून सडली
विठू माऊली
तळघरात कोंडली


Daad
Thursday, November 02, 2006 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विठु माऊली राहिली
ना मूर्ती, ना राऊळी
सर बनून कोसळी,
नभ बनून साऊली
-- शलाका


Smi_dod
Thursday, November 02, 2006 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोट्याश्या झुळकेने
उठलेले तरंग पण
नको आहेत
माझ्या शांत तळ्यात
तु तर आलीस
वादळ होउन
पाण्याच्या लाटा उसळवत
तळ्याचा सागर होत नाही
हे मात्र विसरत.....
लाटांसाठी समुद्रच हवा
भरतीचा.....
आणि ओहोटीचा पण

स्मि


Smi_dod
Friday, November 03, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रु नाही बघायचे
मला तुझ्या डोळ्यात
हसुच बघायचे सतत
तुझ्या ओठात
असे म्हणणारा तु

एकाकी होते जेव्हा
बरसणार्‍या डोळ्यांनी
भिरभिरत तुला शोधणारी
पाण्याच्या पदड्या आडुन
दिसलास तु.....
मला बघुन झटकन पाठमोरा होणारा.....

माझ्या एका अश्रुने
व्याकुळ होणारा तु खरा की
कि घायाळ रडताना
पाठ्मोरा होणारा तु खरा.........

स्मि


Daad
Friday, November 03, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह!!
काम, क्रोध, लोभ, मोह,
मान, मत्सराचे मन
हेच काय पण देवा
माझ्यातून मला छीन
-- शलाका


Harshu007
Friday, November 03, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तु समोर असताना
मी फ़क्त बोलतच नाही
तु नसताना मात्र
मि माझा उरतच नाही


Shyamli
Friday, November 03, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बा भगवंता तुला मी सांग किती स्मरावे
कसे कितीक द्यावे मी, सांग ते पुरावे
नाम जपावे जपावे मन जपमाळ व्हावे
का पावशी न देवा तुझेच तुजला ठावे

श्यामली!!!





Meenu
Friday, November 03, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा श्यामली मन जपमाळ व्हावे मस्तच ..

Smi_dod
Friday, November 03, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाम जपावे जपावे मन जपमाळ व्हावे >>>>>>.श्यामली......... ....!

Lopamudraa
Friday, November 03, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली.... जपमाळ... great .... !!!

पुन्हा तो दिसला..
परत मनात
तीच हाल चाल..
आणि सारं जग स्तब्ध वाटु लागल..
त्याच्या हसण्यात पुन्हा माझ अस्तित्व..
विरघळु लागलं...!!!


Lopamudraa
Friday, November 03, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस आठवू नये.. सारखं
आणि इतक लोभस दिसु नये..
पुन्हा पुन्हा.. नजरेसमोर येउन
काळाजाचा ठाव घेउ नये..
आणि मला वेडीलाही दुसर कस का सुचु नये..!!!


Lopamudraa
Friday, November 03, 2006 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुनही तितकाच
निरागस आहे तो..
अजुनही तीतकाच..
सुंदर हसतो तो..
अजुनही.. जग...
बघत राहते त्याच्याकडे
जेव्हा जेव्हा..
ऐटीत मैफ़ीलित येतो..
अजुनही तितकाच
भोळा आहे तो
कळले नाही त्याला..
कुणितरी अजुनही तितकेच
प्रेम करते त्याच्यावर..!!!


Pujarins
Saturday, November 04, 2006 - 11:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भिक्षा वाढ माई
जोगी म्हणे दाराशी
कसे ठाव त्याला
औदुंबर परसाशी


Athak
Saturday, November 04, 2006 - 11:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या माई म्हणजे सोनिया अन जोगी म्हणजे अजित जोगी असा भास झाला :-)
पुजारी माफी असावी

सगळ्या झुळुकी छानच


Daad
Sunday, November 05, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, 'नाम जपावे जपावे मन जपमाळ व्हावे ' - फारच छान कल्पना...
खरतर.. सगळ्याच मस्तं!!

माझ्या डोळ्यांत सूर शोधायचास आपले,
आता.... आपलाच कणसूर लागल्यागत
मिटून घेतोस स्वत:ला
पापणीच्या अनाघाताने रोखलेला
बेबंद पाणलोट कसा दिसणार तुला? .....
आता तुझ्या दृष्टीने मी बेतालच....
-- शलाका


Shyamli
Monday, November 06, 2006 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद स्मि,मीनु,वैशाली,शलाका
.. ..


Pujarins
Monday, November 06, 2006 - 8:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोल तळे
लाट स्थिर
त्यात उडती
पतंग दूर


Meenu
Wednesday, November 08, 2006 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐन वेळी आपली माणसं फीरवतात पाठ ,
पण आज अश्रुंनी पाठ फिरवलेली पाहीली .....
माझ्या मनाची वाताहात , माझ्याच अश्रुंनी ,
डोळ्यात बसुन तटस्थपणे पाहीली ..
वाटलं धाय मोकलुन रडावं तरीही ,
अश्रुंनी माघार नाही घेतली
अश्रुंनीही आज पाठ फिरवलेली पाहीली ...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators