|
Daad
| |
| Thursday, November 16, 2006 - 8:28 pm: |
| 
|
मग.... आकारतात ढग आपल्या आतले उबारतात पंख, सोन्-माखले हिरवा कंठ, गुलाबी सूर आपलीच मैफिल, आपलाच नूर आपणच आपल्याला कळू लागतो रस्ता आपल्यासाठीच वळू लागतो मग... शोधावं कुणी उपर्या भाळाचं, शोधात आपल्याच, कधी काळाचं आपलं आभाळ त्याला द्यावं त्याचं आभाळ कवेत घ्यावं -- शलाका
|
Smi_dod
| |
| Friday, November 17, 2006 - 1:24 am: |
| 
|
बांधुन टाकलय मला तुझ्या शपथांनी,वचनांनी मोकळेपणे व्यक्त ही होउ देत नाहीत त्या मला कोसळु देत नाहीत बेभानपणे कदाचित असे बेधुंद बरसल्यामुळे जाईलतरी संपुन हे दुःख सारे उरणारच नाही काही पण पटायला हवे ना तुला करायला हवे ना तु मला मोकळे त्या वचनांतुन हलकी हलकी होइल मी तरल...वार्यासोबत तरंगणारी उत्फ़ुल्ल...उन्मुक्त.. अशरिरी..... स्मि
|
R_joshi
| |
| Friday, November 17, 2006 - 11:43 pm: |
| 
|
स्मि,शलाका उत्तम बरसणार आभाळ झाले तरी साथ तुझी लागेल जलबिंदु हा आवेगाचा कुशीत तुझिया सामावेल. वचनातुन मोकळी होइन ही पण बंध हे असेच राहतिल नव जीवनाच्या आरंभाची ते साक्ष होऊन जगतिल. प्रिति
|
Shyamli
| |
| Sunday, November 19, 2006 - 1:39 pm: |
| 
|
सांभाळावीत स्वप्ने आजचीही रीत नाही आस नाही मज जराही वा जगाची चीड नाही श्यामली!!
|
Daad
| |
| Sunday, November 19, 2006 - 5:14 pm: |
| 
|
स्मि, प्रीती, - झकास. श्यामली व्वा... ही अजून फुलव ना....
|
वा!बरेच दिवस इकडे फ़िरकलेच नव्हते आणि काय miss केले हे कळल्यावर आता मला माझा राग येतोय. अतिशय सुंदर शब्दच नाहीत माझ्याकडे,लोपा,देवा,श्यामली,स्मि,प्रिती,मीनू,सुरेख.. आणि दाद,पुजारी तुमची राधा-कृष्णावरची जुगलबंदी सर्वात जास्त आवडली.. शलाका,मला खरेच तुझ्या कविता वाचणे[विशेषता भक्तीरसातल्या]म्हणजे एक मेजवानीच असते.लिहित रहा ग असेच..
|
Daad
| |
| Monday, November 20, 2006 - 1:46 am: |
| 
|
मृ, thanks heaps!! एकूणच भक्ती हा जिव्हाळ्याचा विषय.
|
Shyamli
| |
| Monday, November 20, 2006 - 2:04 am: |
| 
|
शलाका,मृ.. थॅंक्स ग! शलाका, अग नाही सुचल पुढे पण तु लिही ना आवडेल मला
|
R_joshi
| |
| Monday, November 20, 2006 - 5:09 am: |
| 
|
मृदुगंधा, शलाका आभारी आहे मृ तु ब-याच दिवसांनी आलिस. आता तुझ्या झुळुकाही लवकर पोस्ट कर बघु इथे.
|
R_joshi
| |
| Monday, November 20, 2006 - 5:14 am: |
| 
|
वैराग्याच्या उन्हातुन जाताना मैत्रिची सोबत सावलिसारखि भासते आशा- निराशेच्या फळाची कधी तिला चिंता नसते प्रिति
|
R_joshi
| |
| Monday, November 20, 2006 - 5:18 am: |
| 
|
नभ दाटुन आले कि ते बरसणारच एखाद्याला सुखावणार तर एखाद्याला रडवणारच प्रिति
|
प्रीती, सुरेख.. दुःखे किती सहज घ्यावीत याची कल्पना छानच मांडली आहेस.. मी लिहेन लवकरच
|
खूप जुनी आहे[१२ वर्शांपुर्वीची] माझी ही चारोळी.. ते प्रेम असते जिथं सारे संदर्भ कळतात उमेदीने पाऊल पुढे पडतं मागे फ़क्त खुणा उरतात
|
वेड लावाणारी तान पुन्हा छेडू नको सख्या तू असा मला परत छळू नको अताच कुठे जराशी स्वप्ने उमलताहेत तुझ्या मिठीचे मला भास होताहेत.. अजून दूर आहे पहाट रात्र बरीच पडलीय.. सांग ना त्या चन्द्रास " इतक्यातच मावळू नको."
|
सांग ना त्या चन्द्रास " इतक्यातच मावळू नको." >>>>>>>>... फ़ारच.. छान.. मस्त... !!! तुझी गझल मिळाली सुंदर आहे re करायचा राहिलाय..त्याबद्दल sorry ...!!!.. अजुन लिही..
|
Dineshvs
| |
| Monday, November 20, 2006 - 1:04 pm: |
| 
|
मृदगंधा, तुम्हाला कल्पना आहे कि नाही माहित नाही, पण लावणी आणि वगकर्त्यांच्या भाषेत, चंद्राला म्हनं मावळु नगस, हि ओळ एखाद्या लावण्यवतीचे सौंदर्य वर्णन करताना वापरत असत.
|
Daad
| |
| Monday, November 20, 2006 - 5:20 pm: |
| 
|
प्रिती, नभ दाटुन आले कि.. - फारच सुंदर. मृ, आहा! मस्तच...
|
धन्यवाद,लोपा,दाद, दिनेशदादा,मला लावणीची आजिबात कल्पना नाही.. मला इथे असे सुचवायचे होते चन्द्राने लवकर मावळू नये.र्आत्र लवकर ढळू नये आणि विरहाचा क्षण लवकर येऊ नये..
|
Meenu
| |
| Tuesday, November 21, 2006 - 1:47 am: |
| 
|
ए मृ तु मेलला री नाही केलास की गं
|
मीनू sorry ग खूप busy होते.. मी काल रात्रीच विचार केला तुला mail करायचा..टाकते लवकरच..
|
Pujarins
| |
| Tuesday, November 21, 2006 - 3:21 am: |
| 
|
एक दिवस नव्हतो तर एवढ्या पोस्टिंगज.. मृ, धन्यवाद इतक्यातच मावळू नको.. झकासच प्रिती, जलबिंदु आवेगाचा... सुंदर
|
|
|