|
******** डॉन को पकडना मुष्कीलही नही नामुम्कीन है !!! सूचना : लवकरच 'डॉन' विषयी एक लेख पोस्ट करत आहे. ज्याना नवीन डॉन पहायचा आहे आणि हा लेखही वाचायचा आहे त्यांच्यासाठी नवीन डॉन मधील suspense चा भाग पांढर्या रंगात लिहीला आहे. तरीही काही भाग राहीला असल्यास क्षमस्व !
|
डॉन ! नरीमन इराणींना श्रद्धांजली अर्पण करणारी फ्रेम काही क्षण स्थिरावून जाते.. तांबूस गवत कापत जाणारी लांबलचक गाडी आणि 'ठॉक थडाडा'करुन सुरु झालेला दमदार रिदम हे दृश्य चालु होते.. गाडीत बसलेल्या 'डॉन' चा चेहरा आरशात दिसतो... त्या तिघांपासून थोड्या अन्तरावर गाडी येउन थांबते आणि फिक्कट काचांचा गॉगल घातलेला डॉन शांतपणे खाली उतरतो... ... 'ये दस लाख का सोना तो मैन भुल जाउंगा राजसिंग मगर तुम्हे याद रखुंगा. ये लो ! '... डॉन ने फेकलेल्या बॅगेचा स्फोट होतो.. उठलेल्या धूर आणि धुरळ्यात डॉन ची गाडी परतताना दिसते... त्याच क्षणी स्क्रीन 'निगेटिव'मधे दिसल्यासारखा बदलतो... हिरव्या तांबड्या रंगात चित्रपटातली पुढची दृश्ये दाखवत टायटल्स सुरु होतात. दहा लाख वेळा ऐकलेले टायटल मुजिक वाजू लागते... आणि असन्ख्य आठवणी आठवत मी डॉन पुन्हा एकदा पाहू लागतो ! शाळेत असताना डॉन पाहण्यासाठी घातलेल्या अटीमुळे हुशार (पुढे बोर्डात वगैरे आलेल्या) मुलांमधे नंबर काढला होता त्याची आठवण येते.. त्याअर्थाने माझी ती छोटिशी विजयगाथा आहे (नंतरच्या सहामाहीत काही 'आगामी आकर्षणे' नसल्याने झालेले पानिपतही आठवते ! ) पिक्चर पाहून आल्यवर मित्रांबरोबर गप्पा मारताना ते सुरुवातीचं (टायटल मुजिक वगैरे शब्द तेव्हा माहित नव्हते) म्युजिक जब्बरी आहे ना विचारल्यावर त्यांच्या आणि उभे राहून ऐकणार्या एका कॉलेजकुमारच्या चेहर्यावर पसरलेले अज्ञानही आठवते.. मग थोडेसे गुणगुणल्यावर (हो ! झटक्यात पाठ झाले माझे) फकफकत पेटणार्या त्यातल्या काहींच्या अंधुक ट्युबाही आठवतात ! जे चित्रपट, जी दृश्य मनात घर करुन बसतात त्यापैकी डॉन हा आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे. पण मुख्य म्हणजे तो जसा आहे तसा बेहद्द आवडल्यामुळे. अर्थातच अमिताभ बच्चनचा 'ओरिजनल' डॉन ! आणि म्हणूनच its not just business (of writing a review), its personal too! आता काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत : * ही सगळी चर्चा तुम्ही चित्रपट किती तटतटीने पहाता ह्यावर आहे... नहीतर hitchcock स्वत : म्हणायचाच 'its just a movie !' .पण आयुश्यात अशा काही तटतटून करण्यासारख्या, भरभरून बोलण्यासारख्या अशा गोष्टी असाव्यात, त्याबद्दल अभ्यासपूर्ण ठाम मते असावीत, ती defend करता यावीत, कराविशी वाटावित असे आपले मला वाटते. माझ्यासाठी डॉन (आणि एकंदर चित्रपट पहाणे) हे त्यापैकी एक आहे, कुणाचे तेच किंवा काही वेगळे असेल. 'का हो, सगळे सामाजिक प्रश्न संपले का ? , किंवा 'कश्शाला एव्हढा उहापोह ? ' वगैरे प्रश्न इथे फिजूल आहेत. * अर्थातच ओरिजनल डोन हा हिंदी मसला पिक्चर आहे..पण त्याच्या सर्व मर्यादा कळूनही तो अतिशय आवडतो करण त्या मर्यदांचा विचार करायला वेळही न मिळावा अशा चांगल्या गोष्टी त्यात आहेत ! शिवाय आता सवयही झालीये उद. अगदी पांडू दिसणार्या त्या दोन इन्स्पेक्टरांची सुद्ध्हा ज्यांची प्राण रेवडी उडवतो (अभी अभी इधर कोई आया है ? ).. * I dislike shahrukh khan very much पण त्यापेक्षाही मला नावडते ती लोकांची त्याला अत्यंत डबडा नट आहे हे माहित असूनही आवडून घेण्याची तडजोडी वृत्ती. तो KANK मधे कसा पोपडे आलेल्या भिंतीसारखा दिसतो हे कळत असते तरी केवळ SRK चा मुव्ही म्हणून पहयाला जाणारे कमी नाहीत ! 'शाहरुख खानने काय ऍक्टींग केलीये ना' अशा भावार्थाचे काही मी त्याच्या फॅनच्य तोंडूनही क्वचितच ऐकले आहे. * शहरुख खानच्या off the screen जे चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेतच.. तो मुलखातीत usually चुणचुणीतपणे चुरचुरीत आणि चाणाक्ष बोलतो.. तो सुरुवातीला कुठलाही so called 'godfather' नसतानाही 'वर' आला हे कौतुकास्पदच आहे. तो एव्हढा यशस्वी झाला (रुढार्थाने) त्यात त्याचे प्रचंड marketing skill (किम्बहुना फक्त तेव्हढेच) आहे. पण त्यासाठी डॉन मधल्या त्यच्या Dialogue delivery ला 'समजुन' घेणे, कित्ती मेहनत घेतलिये म्हणुन कौतुक करणे म्हणजे दरोडेखोराच्या वक्तशीरपणाचे कौतुक करण्यासारखे आहे ! * असे असूनही त्या तीन तासापुरता मी माझा पूर्वग्रह बाजूला ठेवण्याचा आटोकाट आणि प्रामाणिक प्रयत्न केला.. तरिही नवीन डॉन अनेक पातळ्यांवर फसला आहे.. शहरुख खान हा अनेक ठिकाणी संतापजनक, हास्यास्पद (विनोदी नाही) आणि अतिशय तोकडा वाटतो. ह्या पार्श्वभुमीवर जेव्हा नवीन डॉन पहायला गेलो तेव्हा अजिबात अपेक्षाभंग झाला नाही... कारण काडीचिही अपेक्षा ठेवली नव्हती ! ह्याची कारणे दोन : १. एक तर प्रोमोज पाहून शितावरुन भाताची परिक्षा करण्याची आलेली थोडीफार कुवत. २. शाहरुखची एकन्दर अभिनयक्षमता ( ? ) पहाता डोंबार्याला ऑलिम्पिक्स मधे भाग घ्यायला मिळाला तर बघायला ज्या अपेक्षेने जाऊ तितपतच अपेक्षा होती (बच्चन जर अभिनयात नारळाचे झाड असेल तर शहरुख जास्तीत जास्त पावसाळी छत्री (मशरुम) एव्हढा आहे. दोन चार इंच कमीच ! ) तरीहि नवीन डॉन ला महत्व देण्याचे आणि तो पहयला जाण्याचे पातक करण्याचे कारण : * फरहान अख्तर सार्खा 'दिल चाहता है' चा दिगदर्शक ह्यात काय value addition करतो ह्याबद्दल उत्सुकता. तो 'शाहरुख' फॅक्टर आपल्याला विसरयाला लावूनही नव्या सादरीकरणाने आपल्या गुंतवून ठेवू शकतो का ह्याची परिक्षा. आता नवीन 'डॉन' चा पंचनामा : डॉन हा स्पष्टपणे 'रिमेक' असल्याने त्याची ओरिजनलशी तुलन अन्याय्य किंवा फिजूल कशी काय होउ शकते ? ती अपरिहार्य आहे ! चांगल्या गोष्टी : अगदी तुरळक आहेत. १. नवीन तंत्रज्ञान आणि टेकिंगमुळे आपोआप आलेला आणि आणलेला चकचकाट. (हिंदी पिक्चरच्या तुलनेत) २. एक दोन चन्गले विनोद ३. क्वचीत तयार झालेली एखादी 'moment' . ऍंड दॅट इज ऑल ! वाईट गोष्टी : General: १. sheer arrogance ! आपल्या मर्यादा,शक्तीस्थाने आणि एकंदर कुवत माहीत असूनही शहरुखचा डॉन करण्याचा मुजोरपणा. तो मुलाखतीत काहीही बोलु दे 'मि. बच्चन' विषयी त्याची स्वत : 'किंग खान' असल्याची गैरसमजूत आहेच. बाबा रे, तुला कुवतीपेक्ष खुप जास्त यश मिळाले आहे ना - जे तुही मान्य करतोस ? , बिनडोक कॉलेजकुमार्या he is sooooo cute अशी बेताल आणि अतर्क्य विधाने करुन तुला अजून मोठे करत आहेत ना.. मग खुश रहा ना तेव्हढ्यात... डॉन ला हात घालायची गरज ? basically मुज़े इस बात पे गुस्सा के मेरे इलके मे आ कैसे गये ? 'यंग बच्चन' ये आपुन फॅन लोगका इलाका है ? काय लोक्स ? पटकथा आणि संवाद ! : सलीम जावेद (विशेषत : जावेद ) हे काय गांजा पिउन पटकथा लिहित होते असे फरहान्ला वाटते काय ? फरहान अख्तरने मूळ पटकथेला भगदाडे पाडली आहेत. जावेदच्या पायाशी बसून पटकथा बांधण्याचे काही धडे अजून त्याने घ्यायला हवेत. १. twists : खुर्ची घट्ट पकडा आणी वाचा.. नहीतर पडाल : फरहान ने दिलेले so called ट्विस्ट्स म्हणजे प्रेक्षकाने विश्वासाने त्याच्या हातात दिलेला हात मुरगळ्यासारखे वाटतात. ऐका तर ! नवीन डॉन मधे वरधान हा मलिक नसून इन्स्पेक्टर डिसिल्वा आहे (म्हणजेच ओम शिवपुरी च्या ऐवजी इफ़्तेकार) ... आता बोला ! ह्याने उभे राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज वाटलेली नाही.. म्हणजे तो जसजीत ल पकडतो कायद्याची बूज राखून ते कुठल्या मनोभुमिकेतून ? . आता पुढचा धक्का.. हा मी आधी ओळखला होता त्यामूळे आधीच वैताग आला.. डॉन च्या जागी विजय जात नसून डॉनच डॉनच्या जागी, (विजयला मारुन वगैरे) जातो !!! त्यामुले डॉनच्या जागी विजय हा खांबच तोडून टाकला आहे ! आता बोलती बंद झाली नसेल तर बोला ! कळ्ळ का. म्हणजे 'खैके पान' विजय नाही तर डॉन म्हणतो बर का !!! जस्जित हा गुन्हेगार दाखवला नाहीये त्यामुळे डिस्क 'चोरू' शकेल हे पुर्ण पटत नाही त्यामुळेच 'वोह आदमी इत्न तो शरिफ़ नही होगा के डायरीको पुलीस के पास ले जायेगा ! ' हा ओरिजनल घेतलेला डायलोग्स फसतो. नारंग हा कायम loyal दाखवला होता डॉन ला,.. इथे उगचच वेगळी शेड मधेच आणून गायब केली आहे. मलेशियात भांग आणि पान हा अजून एक प्रचंड विनोद. हिंदी सिनेमा illogical असला तरी ते 'बेइमानीका धन्दा करते है मगर इमानसे' असे पाहीजे ना ( method in madness ). २. पटकथा आणि संवाद दोन्ही फरहानचेच आहेत बहुदा ( written by ). एक दोन संवाद आणि एक दोन विनोद सोडले तरी कुठलिही value addition नाही पटकथेत. ३. जसजीत (जेजे) चे आधी सर्कशीत काम करणे, त्याचे गुन्हेगार असणे ह्याला पुढे काही संदर्भ आहे. ह्या दोन्ही गोष्टी इथे नाहीयेत ४. तो धरुनच चालला आहे की जुना डॉन लोकानी पाहीला असेलच आणि त्याना तो पाठ असेलच (मग कशाला काढला रे भिकार नवीन रिमेक). त्यामुळे characters establish वगैरे करण्याचे कष्ट अजिबात उचललेले नाहीत. प्रेक्शकांपुढे असंबद्ध तुकडे मांडले तरी ते समजून घेतील अशी त्याची अपेक्षा असावी ! ५. सलीम जावेदचे चलाख, crisp संवाद फार आठवत रहातात.. एकंदरच ओरिजनल नसलेल्या additional संवादांमधे काही दम नाहीये.. जेजे : 'नारंग साहब मै अपने रास्ते जा रहा हूं' (गाडीत बसलेला नारंग) : 'जेजे, इसिलिये तो पैदल जा रहे हो' अशासारखे ओरिजनल संवाद miss होतात. सादरीकरण : १. चकचकाट सोडला तर डॉन च्या entry सकट सर्व काही ढिल्ले वाटते... पात्रे आळसावल्यासार्खी कामे करतात. २. पाठलाग, स्टंट्स मधे नाविन्यपुर्ण काहीही नाही. नवीन तन्त्रचाही काही वापर नाही. ३. एकन्दर असे वाटते की शुट चालू झाल्यावर 'ये अपने बस की बात नही है' हे दिग्दर्शकच्या लक्शात आले आणि त्याने उरकून टाकले एकदाचे. संगीत : ओरिजनल डॉन कल्याणजी आनंदजी (आणि बाबला) ह्यानी विलक्षण 'उचलला' होता गाणी आणि पार्श्वसंगीताने... टायटल मुजिक पासून ते प्रत्येक दृश्यामधे पार्श्वसंगीताची जोड आहे (काहि वेळा ते अंगावर येते पण पिक्चर चे texture पहाता तशीच असावी असे वाटते). डॉनला हॉस्पिटल मधून सोडवतानचे मुजिक, विजय इफ़्तेकारला जेव्हा ब्रिजवर भेटतो तेव्हाची संथ लयीत वाजणारी title theme हे ओरिजनल मधे hightlights होते मुजिक चे. गाणी लोकांच्या डोक्यात बसली आहेत म्हणूनच बरिच गाणी तीच ठेवली असावीत. (हे पूर्ण पिक्चर बद्दल सुचले नव्हते वाटतं ? कशाला काढायचा रे भुक्कड रिमेक. औकात मे रेहेनेका रे बाबा ! ) २. miscast ची तर एक माळच लावली आहे दहा हजाराची.. बोमन इराणीसारखा talented actor मिसफिट आणि गोंधळलेला वाटतो. नारंगही एव्हढा डोक्यात बसला आहे की नवीन ऍक्टर (नुक्कड मधला) अगदीच सरकारी बाबू वाटतो. इन्स्पेक्टर वर्मा, मॅक ह्या लहान भुमिकांमधल्या लोकाना तर काही जीवच नाहिये अभिनय : शहरुख विजय च्य भुमिकेत किती तोकडा पडावा ह्याला काही मर्यादाच नाहीये. डॉन चे अतिलोकप्रिय डायलोग्स मारताना तर तो जोकर वाटतो. काही वेळा संवादफेकीमधे त्याने केलेले बदल अशक्त अभिनयक्षमतेअमुळे त्रासदायक आहेत. कानांना खटकतात.. आणि ओरिजनल तर पेलवण्याचा प्रश्नच नाहिये. त्याला फक्त पडद्यावर पिसाट खुन्यासारखे खुनशी दिसणे नाहीतर डायरेक्ट कोहिनूर सर्कस मधल्या जोकर सारखे दिसणे ह्या दोनच अभिनय छटा माहीत असाव्यात ! अमितभची personality हा डॉनच्या यशात महत्वाचा भाग होता. शाहरुखचा त्या बाबतीत बाजार उठला आहे ! अर्जून रामपाल फ्रिज मधे विसरून मागे राहिलेल्या कोबीसार्खा निर्जीव थंड वाटतो प्रियांका चोप्रा, करीना ठीक. इशा कोप्पीकर नगण्य. ओम पुरी मधे अधे येउन जातो आणि एक्दम फुटेल की काय अशी भिती वाटते. दिग्दर्शक आणि प्रमुख नटच सपाटून मार खातात तिथे बकिच्यान्चे काय ! डॉनला चित्रचौकटीत पुन्हा पकडणे हे नामुम्कीन आहे हाच फंडा ह्याना कळला नाही ! म्हणुनच नवीन डायलोग त्यांच्याच भाषेत सांगायचा तर 'नये डॉन की सबसे बडी गलती ये है की वोह पुराने डॉन का रिमेक है ! '
|
Yog
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:53 am: |
| 
|
अरे बाबा एव्हडे मनाला नको लावून घेवूस... (शाहरूख चे चित्रपट म्हणतोय मी)असो. आता नविन उमराव जान (चे प्रमोज तरी) बघायची हिम्मत आहे का? 
|
राहुल, नवीन डॉन नाही पाहिला अजुन, आणि आता बघायची हिम्मत होणे पण मुश्किल आहे. Agree 100% abt AB and SRK. AB was great, is great and will be forever great and Swades was the only film where I could really stand SRK
|
Shraddhak
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:12 am: |
| 
|
राहुल, लेख पटला. मुळात रीमेकची चीड येण्यासाठी मूळ सिनेमा तेवढ्या intensity ने बघितलेला हवा. तसं ते नसेल, तर मग ओरिजनल असो वा रीमेक, लोकांना काही फरक पडत नाही. गाणी लोकांच्या डोक्यात बसली आहेत म्हणूनच बरिच गाणी तीच ठेवली असावीत.<<<<< तीच गाणी ठेवलीयत पण तशीच नाहीत... रीमिक्स केलीयेत गाणीदेखील. त्यामुळे ती अजिबातच ऐकवत नाहीत. डॉनचा हा केविलवाणा रीमेक बघितला की नवीन ' शोले ' चं काय होईल याची कल्पनाही करवत नाही. 
|
Deepanjali
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:30 am: |
| 
|
ओरिजनल डॉन कल्याणजी आनंदजी (आणि बाबला) ह्यानी विलक्षण 'उचलला' होता गाणी <<अगदी !!!. लहान असताना ' प्रेक्षकांनी उचललेला ' ही phrase खूपदा ऐअकायचे .... अमिताभ चे असे एक से एक मास्टरपिसाहेत जे पहिल्या काही मिनिटातच उचलले जातात !!! btw, काय सही photo टाकले आहेत ते अमिताभ चे !
|
Nakul
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:59 am: |
| 
|
राहुल लेख वाचून आता डॊन बघणे मुश्किलच आहे. SRK च्या बाबतीत म्हणशील तर डर बघितल्यानंतर मी त्याचे सिनेमे बघणं सोडून दिलय (अपवाद यस बॊस जॊ मी गाण्यांसाठी बघितला) त्याच्या अभिनयाचे दोनच भाग मला दिसलेत - बाजीगर स्टाईल ऎग्रेशन किंवा डीडीएलजे स्टाईल लव्हरबॊय. त्यामुळे तुझा लेख अगदी पटला
|
Meenu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:59 am: |
| 
|
राहुल बच्चनचे फोटो सही आणी तुझा review एकदम मनापासुन ... पोटतिडीकीनी लिहीलं आहेस रे. मला शाहरुखचा Don चांगला वाटला म्हणजे तीन तास TP होण्याईतका नक्कीच ... तरीही तुझा review वाचुन क्षणभर परत विचार करावासा वाटलाच.
|
राहुल SRK चं इतक्या प्रिसिजन ने केलेलं पोस्टमार्टेम माझ्या वाचण्यात नाही. जबरदस्त !!! बाकीचं सोड दिवसभरात ८० की काय ते सिगारेट्स ओढणार्या माणसाला त्या पहिल्या फोटोतला लूक जरी जमला असताना तरी ज़िंदगी सफल झाली असती त्याची . पण मरू दे ना आपण कशाला वेळ घालवा त्यावर ? मी फोटो बघतो पुन्हा ... ( पुन्हा )
|
Tulip
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:56 am: |
| 
|
परफ़ेक्ट चिरफ़ाड केली आहेस राहुल. शाहरुखने प्रचंड हास्यास्पद रीत्या डायलॉग्ज म्हंटले आहेत. 'उसके जूते मुझे पसंद नही आये' त्याच्या तोंडून ऐकताना तो गोल्फ़चा चेंडू परत त्याच्याच तोंडावर का येऊन आदळला नाही असं वाटतं. मला तर डुप्लिकेट मधलाच शाहरुख आपण बघतोय असं वाटत होतं. अतीसामान्य. करीना ला अनुल्लेखाने मारले आहेस ते बरचं केलस
|
तरीही तुझा review वाचुन क्षणभर परत विचार करावासा वाटलाच.... हे ही नसे थोडके... रिमेक हा प्रकारच मला पटत नाही त्यामुळे तू जे काही लिहिलयस ते पटतय राहुल.. बाकी हा picture मी पाहिलेला नाही पण त्याचे जे promos पाहिले आहेत त्यात तरी मला शहारुख या भुमिकेत गरीबच वाटलाय एकदम..
|
सही लिहीलंयस रे राहुल. अग्गदी अस्संच झालं मला डॉन बघताना!!! शिवाय विजय झालेल्या अमिताभचा जो एक innocense आहे ना, तो SRK नाहीच portray करू शकत. ट्विस्टचं सोड, पण जो काही थोडा वेळ तो विजय आहे तेव्हाही! मला तर मा. अलंकार पण miss झाला!! ( तसंच तेव्हा मला हास्यास्पद वाटलेल्या काही गोष्टीही.. म्हणजे झीनत अमान किंवा ' खैके'च्या वेळी त्याने घातलेलं जॅकेट) SRK ची संवादफेक ( संवादगळती म्हणू हवंतर) बेकारच आहे, पण मला प्राणचं ' मैं तुमसे इतनी नफ़रत नहीं करता जितनी अपने बच्चोंसे मुहब्बत करता हूं' सुद्धा त्या नव्या माणसाच्या तोंडून ऐकवलं नाही!! जाता जाता, अगदीच रहावत नाही म्हणून एक सुधारणा सुचवू का? नामुम्किन असा शब्द आहे, नामुन्किन नव्हे.
|
लोक्स, फोटो आवडेश ना ? आता जमले तर audio links ही टाकतो.. रंगीबेरंगी मधल्या आता चालत नसणार (पार्श्वसंगीताबद्दलच्या लेखांमधल्या) श्रद्धा, येस. रिमिक्स मुळे अजूनच.. ८० की काय ते सिगारेट्स >>> वैभव, 'कसं बोललात ! ' स्वाती, ठांकू. चेंजलाय शब्द. (मला वाटलच होतं इतका सरळसोट कसा शब्द तो.. आज शुद्द्लेकनाच्या आसंख्य चूका होताहेत )
|
राहुल फ़र्स्टक्लास रिव्ह्यु. मल तर डॉनमधे "आमिताभच्या" जागी "शाहरुख" हे कॉंबिनेशनच एकदम अळणी आणि पचपचीत वाटत होते. तुझा लेख वाचला आणि मन:शांती झाली की माझे म्हणणे खरेच होते. शाहरुख़ ऍक्टींगच्या नावाखाली जे काही अतिरेकीपण करतो ते मला अजिबात आवडत नाही. >>>Agree 100% abt AB and SRK. AB was great, is great and will be forever great <<< 200% Agreed... एक सुचना तु समीक्षक म्हणुन काम चांगल करु शकतोस... पण फ़क्त शाहरुखच्या फ़िल्मचे...
|
Milindaa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:01 am: |
| 
|
झकास लिहीलं आहेस रे.. मी तसाही हा नवीन डॉन पाहिलाच नसता, आता तर जाऊदेच..
|
Badbadi
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:27 am: |
| 
|
राहुल, सही रे!!! SRK बद्दल बोलणे/ लिहिणे सुद्ध नको वाटते मला.... बिनडोक कॉलेजकुमार्या he is sooooo cute अशी बेताल आणि अतर्क्य विधाने करुन तुला अजून मोठे करत आहेत ना. >> अगदी अगदी.. अशा लोकांच्या बिनडोक पणाची किव येते.
|
Abhi_
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:27 am: |
| 
|
राहुल अगदी अक्षर अन अक्षर पटतय रे!!
पण तरीसुद्धा जास्त चांगल्या शिव्या देता याव्यात म्हणून नवा डॉन बघिनच म्हणतो एकदा!! अर्थात केबलवर लागेल तेंव्हा फुकटात. 
|
राहुल, अप्रतिम समिक्षण केलंयंस. जुन्या डॉन मधले संवाद, पार्श्वसंगीत आणि महत्वाचे म्हणजे अमिताभचे लूक्स, फ़्रेम अन फ़्रेम तोंडपाठ असताना आता नवीन डॉन बघणे या जन्मात शक्य नाही. शाहरुखचे दिवस कधीच संपलेत पण फ़रहान अख्तरने असा सिनेमा काढावा आणि पुन्हा शोले चा रीमेक होऊ शकत नाही असे वक्तव्य करावे म्हणजे हास्यास्पद आहे. बाकी तुझे लिखाण लई बेष्ट. योग, उमरावजान बाबतीत अगदी योग्य बोललास. अनुमोदन.
|
Abhiyadav
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:47 am: |
| 
|
SAHi re Sahi. DON ka remake karna mushkil hi nahi namumkin hai!
|
Maudee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:51 am: |
| 
|
आता कस शाहरुख़ला असले AB चे remake केल्यबद्दल चार शालजोडीतले दिलेले बघून मनशांती झाली. फोटो एकदम सही. मी हा picture बघितला नाहीये आणि बघण्याची इच्छाही नाही. त्या खैके गाण्याचे promoj बघितले... शाहरुख़ कसला छपरी नाचलाय शीः AB याच गाण्यात किती सहज नाचला होता. पण नवीन उमराव जान मधल ते बिटीयां गाण छान आहे ना आवडलं मला
|
|
|