Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
डॉन ! ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » कार्तिक » ललित » डॉन ! « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through November 01, 200620 11-01-06  6:51 am
Archive through November 02, 200620 11-02-06  4:25 am

Prashantkhapane
Thursday, November 02, 2006 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I agree with most of the points. You can check out my take on the new DON here:
why does the chase begin again?

The new film though has some 'moments' and younger generation who has never seen the original may like it, imo. Credit for that may goto the technical advances in film making and Farhaan to some extent.

Nandini2911
Thursday, November 02, 2006 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही फोटो
अमिताभ ये मेरा दिल गाण्यात जितका किलर दिसतो तितकाच शाहरुख बथ्थड दिसतो.

Farhan is getting techno-savvy. His innocence in DCH is lost. The core of DCH was emotions. In Lakshya he tried to expand it, but however DON does not have that emotional touch. There was also news that he is planning for a sequel नही
Anyhow I wish that he will rethink the decesion after box office collections.
The technology should make a film better not something like this DON where only technical advances are present. Nothing else.
Cinema is an art of make-believe not of Computer Graphics.,

Prashantkhapane
Thursday, November 02, 2006 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

A small but notable point: After the interval Amitabh is shown wearing the same attire for the rest of the film. New DON manages to get new clothes from somebody even thoughthe whole world is after him.

Chandrakor
Thursday, November 02, 2006 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही DJ ने म्हटलेल्या सग़ळ्या movies मधे ( excluding देवदास and including DDLJ शाहरुख खूप आवडलाय. पण शाहरुख don बीन म्हणून imagine च नाही करता येत.
माझ्या मते bollywood मधे दोन व्यक्तींनी स्वत्:चं tallent वाया घालवलय. एक म्हणजे शाहरुख्--- करणजोहर च्या movies मधे काम करुन. आणि दुसरी म्हणजे माधुरी दिक्षित. ह्या बाईला देखिल अभिनयाची ( specially facial expressions ) ची इतकी जबरदस्त जाण होती! पण अश्लील नृत्यांच्या आहारी जाउन स्व्त्:ची image down करुन घेतली. विषयांतराबद्दल सॉरी मंडळी पण रहावले नाही म्हणून लिहिले!


Dineshvs
Thursday, November 02, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जुना डॉन न पाहिलेला एक दुर्मिळ प्राणी आहे. नवीन डॉन च्या जवळपासहि जाणार नाही.
उमराव जानचे फोटोज ग्रेट आहेत पण गाणे अगदीच फालतु वाटले.
त्यावेळी हातावर मेंदी काढायची पद्धत नव्हती का ? ऐश्वर्याच्या हातावर केवळ चौकोन का ?
ईतिहासात खर्‍या उमरावजान उर्फ़ अदाच्या खात्यावर आणखी काहि कर्तृत्व जमा आहे. ते नवीन सिनेमात आहे का ? सुनील शेट्टी, पठाण ?


Prashantkhapane
Friday, November 03, 2006 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I read somewhere: "SRK delivers the famous DON lines like Prithwiraj kapoor". LOL.

Sandyg15
Friday, November 03, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहुल, फार भारी !!! :-)

अर्जून रामपाल फ्रिज मधे विसरून मागे राहिलेल्या कोबीसार्खा निर्जीव थंड वाटतो >>> lol

Prasik
Saturday, November 04, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता या क्षणी माझ्या पिसी वर जुना डॉन चालू आहे, (दुरदर्शन वर). राहुलने केलेले पोस्टमार्टम वाचून नवीन डॉन बघण्याचा ईन्टरेस्टच नाही राहीला. गाण्याबद्दल विचाराल तर करीनाला हेलनची सर बिलकूल नाही येत. खायके पान बनारसीवाला हे गाणे शाहरूखवर कसे वाटेल हे फ़क्त ईम्याजीनच केलेले बरे. अर्जुन रामपाल आणि प्राणच्या भुमिकेत.............. नको रे बाबा
रिमेक्स काढतातच कशाला हे पटण कठीण आहे.


Maitreyee
Saturday, November 04, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या चर्चे नन्तर मला परत जुना डॉन च बघावा वाटला पण माझ्या जवळच्या indian store मधे काल सगळ्या cassetes rent out झाल्या असे कळले :-) गम्मत च आहे सगळी!


Bhagya
Saturday, November 04, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नवा डॉन बघितला... hoyts ला जाऊन कारण त्याआधी हे सगळे वाचलेच नाही. आणि नवा डॉन इतका बेकार आहे, की त्या निर्म्यात्याची कीव आली.

इंडियन स्टोर ला जाऊन जुन्या डॉन ची डी व्ही डी विकतच घेतली.....आणि माझा नवरा गेले आठ दिवस तीच बघतोय.. जुना डॉनच बरा.


Bhagya
Sunday, November 05, 2006 - 7:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि हो, राहुल तू प्रत्येक शब्द अगदी मनाला पटणारा लिहिला आहेस.

Zakasrao
Monday, November 06, 2006 - 2:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी रात्रि डाॅन पाहिला. आधी रिमेकची चिरफ़ाड
वाचली म्हनुन नवीन डाॅन नाहि पाहिला.पाहनार नाही.
बच्चन रुबाबदार दिसतो.काही फ़ाइट्स सोड्ल्या तर फ़िल्म
एकदम झक्कास.


Lopamudraa
Monday, November 06, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्जून रामपाल फ्रिज मधे विसरून मागे राहिलेल्या कोबीसार्खा निर्जीव थंड वाटतो >>> lol >>>>
तो नेहमीच तसा वाटत आलाय... आता एकदा अशी च चिरफ़ाड त्या remix गाण्याबद्दल पण कर... अनामिकाच.. बाहोमे.. चले आलो.. किंवा.. मिल जाये इस तर्‍हा बघवत नाहीत..! एकुणच कुठलेच remix गाणे बघवत नाहीत.!! आमिताभ चे फोटो खुप सुरेख..!!!

Vinaydesai
Monday, November 06, 2006 - 1:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यासाअठी काल जुना डॉन बघितला... पण त्यात झीनतचा ExpressionLess थोबडा बघून 'या बाईला इथे का गेतलय हेच कळेना'...
:-(

Avdhut
Wednesday, November 08, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवीन Don अजुन बघीतला नाही. कदाचीत बकवास ही असेल पण शाहारुक वर राहुल उगाच चिडलाय. तो ईतका सुमार व बकवास अभीनेता नाही. हे जरा जास्तीच झालेय.

Abhiyadav
Thursday, November 09, 2006 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खैके गाने आणि टिपिकल शाहरुखी हावभाव सोडले तर पिक्चर चांगला आहे. हे माझे तो पाहील्यावरचे मत आहे.

Malavika
Thursday, November 09, 2006 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाहारूख खरोखर अतिशय बकवास अभिनय करतो. डर आणी तत्सम पिक्चर्स मधे तो बरा वाटतो कारण तो जे काय प्रकार करतो ते त्याने पहिल्यांदाच केल्यामुळे आपल्याला ते एवधे आॅगावर येत नाहीत. Pअन आत मात्र त्याचे ते प्रकार बघवत नाहीत.

Jadhavad
Thursday, November 09, 2006 - 11:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घ्या,
अहो "खाईके" च आत्मा आहे मुळ डॉन चा. आणि टिपीकल शाहरुख सोडला तर राहतच काय? नुसती स्टोरी आणी गाणे... आणि बोबो चा हेलन डान्स? मग शंकर्-एहसान्-लॉय पेक्षा कल्याणजी-आनंदजी कितीतरी पटीने चांगले...... हेलन तर उत्तमच.


Pendhya
Sunday, November 12, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल, श्रम घेतलेस रे detail मधे लेख लिहायला.

सर्व प्रथम, आधी, रिमेक बघायला जाण्याच्या आधी, थोडा विचार करावा. original चित्रपटाने आपल्या मनात काही घर केले होते का? किंवा, किती पातळी गाठली होती.
आणी Don सारखे दर्जेदार चित्रपट असतील तर, त्यांचे रिमेक बघायला जाण्यात काहीही अर्थ नाही, असं आपलं मला वाटतं.
" Original चित्रपटाच्या तुलनेत, त्याचा रिमेक कसा आहे, हे ठरवायला तो पाहिला " , असं म्हणणारेच बहुतांशी लोकं असतात. ते तसले रिमेक बघुन आल्यावर, त्याला भिकार म्हणणं, ह्याला काहीही अर्थ नाही. तो भिकार व्हायच्या आधी, त्याच्या success मधे तुमचा हातभार लागलेला असतो, कारण तुम्ही त्याची तिकिटं विकत घेतलेली असतात.

शहारुख सारखा नट, Don ची भुमिका पेलण्याजोगा परिपक्व नाही.
अर्थात, नव्या generation ला असली मतं कदाचित पटणार नाहीत.

मी नवा Don पाहिलेला नाही आणी बघण्याची ईच्छा ही नाही.

" एखादा रिमेक, न बघताच तो वाईट आहे, हे कसं कोण ठरवू शकतं? " , असं कोणी म्हणून वाद ऊपस्थित करु शकेल.
आता पुर्वी सारखे डायलॉग लिहिणारे राहीले नाहीत. असलेच तर, ते चित्रपटात, आपल्या लेखणीच्या रुपाने दिसत नाहीत. आणी मुख्य कारण म्हणजे, डायलॉग डिलिवरी.
अमिताभची personality एक भाग झाला, पण त्याच्या सारखी डायलॉग डिलिवरी, शाहरुख खान कडून अपेक्षीत करणं योग्य होणार नाही.

प्रत्येक generation मधे एक top actor असतो. तसं ह्या generation ला शाहरुख खान असेलही, आणी ज्यांनी जुना Don पाहिलेला नाही, त्यांना नवीन Don आवडेलही.
काळ बदलल्याने, चित्रपट बदललेत.
पण पुर्वी सारखे दर्जेदार चित्रपट आता होत नाहीत, हे ही तितकच खरं. अर्थात, एखादा चित्रपट ह्याला अपवाद ठरु शकेल............ पण एखादाच.


Saee
Sunday, November 12, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरदस्त लिहिलंयस रहुल. 'डॉन'च ते फ़ेमस पोस्टर (अमिताभ पळतानाच) पण इथे टाकायला हव कोणीतरी. रेडियमच, काळं - पांढरं. न्हाव्याच्या दुकानात, पानपट्टीवर, रिक्षांवर कुठेही दिसायच ते. टायटल आणि पुलावरच्या शॉटच्या म्युझिकचे audio तुकडे पण पुढे लेखात असतील अस वाटल मला:-)
अक्षर आणि अक्षर पटलं. नवीन डॉन बघायचा विचार नव्हताच, पण जुना डॉन अजुन आवडायला लागला.


Rahulphatak
Monday, November 20, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्व प्रतिक्रियांबद्दल आभार !

ज्यान्च्याकडे नसेल, ज्याना आठवत नसेल, ज्यानी ऐकल नसेल त्यांच्यासाठी :-) :

Original Don - Title Music

Original Don - Title Music (link 2)

तिथे bandwidth चा लगेचच मर्यादाभंग होतो त्यामुळे दोन्ही पैकी कुठलीच लिंक न चालल्यास पुन्हा थोड्या वेळाने प्रयत्न करा. धन्यवाद.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators