|
Princess
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:57 am: |
| 
|
गोष्ट इथे संपत नाहीच. कारण ही काल्पनिक नसुन एक सत्यकथा आहे...पियुच्या भग्न स्वप्नांची... Thanks a lot shonoo,Rupali_rahul, rupali_county, chinnu, lopa,mirchi, mrudgandha and all for your encouragment. पुनम
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:24 am: |
| 
|
आले ग.. लक्षात. गोष्ट संपत नाही आणि ती पियुची नाही पूनमची.. आहे म्हणुनच जास्त.. भरुन आले..!!!
|
Princess
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:30 am: |
| 
|
लोपा....लोपा.... कसे कळले ग...
|
Shonoo
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:31 am: |
| 
|
पूनम छानच लिहिलं आहेस. आपलं आयुष्य, आपली नाती आणि आपली स्वप्नं सुद्धा किती fragile असतात आणि तरिही किती चिवट आणि कणखर असतात त्याचा प्रत्यय आला. लगे रहो.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 7:50 am: |
| 
|
पूनम.. अग..मानापासुन लिहिलेले थेट्पर्यन्त भिडते त्यात साहित्यिक अल.कारीक भाषा असलीच पाहिजे.. अस नाही..!!! आणि आयुष्यातल्या समस्या यशाकडच्या वाटचालितील मार्गदर्शक तत्वे असतात.. आज पर्यन्त तु धैर्य चिकाटीने लढत आलीस.. तुझी ताकद किति आहे ह्याची तुला कल्पना आलीच असेल्ल ती च जोपास. स्वतामधल्या नियंत्रक क्षमतेची जाणिव झाली की मन बलशाली आणि निश्चयी होतं...!!!
|
Megha16
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:33 am: |
| 
|
पुनम खुप छान कथा आहे. कथा वाचताना सगळ कस अगदी डोळ्यासमोर येत होत. ही कथा तुझीच आहे हे कळल तेव्हा तर, तु खुप धाडसी आहे. इतक्या कठीण प्रसंगाला मोठ्या धर्याने तोंड दिलस. आणी इथे कथा स्वरुपात मांडताना ही तुला त्रास झाला असेल.पण दु:ख सांगीतल्याने मन हलक होत अस म्हणतात, तुझ मन नक्की च हलक झाल असेल. हीच आशा करते. पुढेही अशाच धर्याने वागत राहा.
|
Swara
| |
| Wednesday, September 20, 2006 - 3:44 pm: |
| 
|
खूप छान लिहिलयस. वाचून डोळे भरून आले. ही खरच तुझी गोष्ट आहे का ग? अश्या कठीण प्रसंगाला तोन्ड देणार्या पियूच्या पाठीवर मझी पण कौतुकाची थाप!!!!
|
Princess
| |
| Thursday, September 21, 2006 - 12:07 am: |
| 
|
हो स्वरा... ही माझीच गोष्ट आहे. आणि या कथेत माझ्या व्यतिरिक्त मी कोणाचेही नाव सुद्धा बदललेले नाहे. माझी आई अरुणा, भाउ शंतनु, पांडुरंग काका, मीना.... सगळे लोक याच नावाने माझ्या आयुष्यात आहेत. ही कथा लिहिताना, मी कुठलाही ड्राफ़्ट चेक करु शकली नाही. सगळा भुतकाळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहायचा आणि... स्वप्न तुटतात. कोवळ्या वयात या सगळ्या गोष्टींचा खुप परिणाम होतो... पण आयुष्य थांबत नाही. आपल्याच स्वप्नांच्या तुकड्या वरुन आपल्याला चालत राहावे लागते... कारण Show must go on स्वप्न पुर्ण करण्यासाठी मार्ग बदलावे लागतात कधी कधी... पण पियुला दैवाने हात धरुन अशा रस्त्यावर आणुन सोडले, जिथुन स्वप्नांकडे जाणारा मार्ग नव्हताच...फ़क्त एक अखंड वाट. जिचा अंत नव्हता. पुनम
|
पूनम हा आयुष्या चा खेळ च असा आहे ना... सगळ कस छान चालल असत नि मधेच कूठे तरी अस विपरित घडत... पण हे लक्षात ठेव कठीण प्रवासा नन्तर काही तरि नक्किच चान्गल घडेल..प्रत्येक गोष्टि ची वेळ ठरलेलि आहे...ती कूणिही बदलू शकत नाही.... एवढच सान्गू इछ्चिते... गूड लक रुपाली
|
पुनम   ... पुनम बोलायला शब्दच नहीत गं. पहिल्यांदा मनाला चटका लावुन गेली ही कथा पण जेव्हा प्रतिक्रिया वाचल्या तेव्हा कळलं की हे वास्तव आहे. हे सत्य मला पचवायला कठीण गेल, डोळे भरुन आले... मग तुझ्यावर तर हे घडल आहे. खुप धैर्याची तु तोंड दिलस परिस्थितिला पण आयुष्य कधीच थांबत नाही. पण तुझ मला फ़ार कौतुक वाटत, स्वताच्या राखेतुन पुनर्जन्म घेणार्या फ़िनिक्स पक्ष्याप्रमाणे तु स्वताला घडविलस. खरच तुझ्याबद्द्ल मनात आदर निर्माण झाला. असच सांभाळुन रहा स्वताला, आईला, भावाला... तो वर बसलेला कर्ताकरविता सगळ बघतो आहे. तुझ्या या अग्निपरिक्षेत तुला यश मिळणारच... रुप.
|
Aandee
| |
| Thursday, September 21, 2006 - 1:36 pm: |
| 
|
पुनम,तुझ्या आयुष्यातल भयाण वास्तव कथारुपाने सगळ्या समोर मांडलस,[त्याला छान कथा लिहिलीस अस नक्कीच म्हणणार नाही] आल्या प्रसंगाला धैर्याने तोंड दिलस, तुझ वय ही लहान होत तरी स्वतला सावरुन सगळ्याना आधर दिला असशील. खुप सोसलस, सगळ्याना एक आदर्श घालुन दिलास,त्या साठी तुला किती दिव्यातुन जाव लागल असेल ह्याची कोणाला कल्पना पण येणार नाही.कोणी कोणीला कोरडी सहानभुती कधीच देऊ नये,देता आला तर आधार साठी हात पुढे करावा.माझा हात आधार साठी सदैव पुढे असेल.मला वाटत सगळ्याच्या मनात असच असेल.जरुर केव्हाही हाक मार मी हजर असेन.तुझ्या पुढच्या आयुष्या साठी अनेक शुभेच्छा.... आत काय करते आहेस हे जाणुन घ्यायची इच्छा आहे.
|
Asmaani
| |
| Thursday, September 21, 2006 - 6:24 pm: |
| 
|
पूनम, तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!. आजपर्यंत धैर्याने वागलीस. यापुढेही वागशीलच. रात्रीमागून दिवस येतो तसेच दु:खामागून सुख येते ह्यावर विश्वास ठेव. all the best .
|
Ashwini
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:21 pm: |
| 
|
पूनम, वडिलांच्या लाडक्या प्रिन्सेसला माथ्यावरचं छत्र हरपल्यानंतरचा प्रवास खूप अवघड गेला असणार. पण तू यश खेचून आणलस. हा दुसरा प्रवास तू कसा केलास यावरही काही लिहीलस तर इतरांना ते मार्गदर्शक ठरू शकेल.
|
Princess
| |
| Friday, September 22, 2006 - 12:46 am: |
| 
|
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद. कथा लिहितांना माहिती नव्हते की, मी माझ्या भावना योग्य शब्दात मांडु शकेल की नाही... तुम्ही सगळ्यांनी खुप प्रोत्साहन दिले. ही कथा लिहितांना, भुतकाळामागे धावणार्या माझ्या मनाला आवरणे खुप खुप कठिण गेले मला. यमाच्या दरबारातली लढाइ माझी आईच जिंकली. तिने यमाच्या तावडीतुन पप्पांचा जीव परत आणला. आमची प्रार्थना ऐकुन त्याला दया आली असेल कदाचित. अर्थातच तो प्रवास खुप कठिण होता. त्या काळात आयुष्याने खुप खुप शिकवले. ते ही लिहिन कधीतरी. धन्यवाद आन्दी, आस्मानी,अश्विनी,मेघा,स्वरा, रुप,रुपाली...
|
Milya
| |
| Friday, September 22, 2006 - 1:38 am: |
| 
|
प्रिन्सेस एकदम मन हेलावणारा अनुभव... हे एक बरे केलेस की त्या अपघातुन तुझे वडिल वाचले हे स्पष्ट केलेस.. कथेवरुन ते नीटसे स्पष्ट होत नव्हते... तुझ्या प्रोफ़ाईलवरुन तरी असे वाटते की u r well setteled now तेव्हा दैवाविरुद्धची लढाई तू नक्कीच जिंकलिस असे म्हणायला हरकत नाही.. well done 'When God closes one door, HE opens another' .. तू कदाचित dr होउ शकली नाहीस पण तरिही जिद्दिने जीवनात यशस्वी तर झालीस ना... त्याबद्दल तुझे अभिनंदन
|
Princess
| |
| Friday, September 22, 2006 - 7:00 am: |
| 
|
धन्यवाद मिल्या, तुमच्या प्रतिक्रिये बद्दल. खरय तुमचे, ती लढाइ जिंकली आम्ही. आणि आज सेटलही झालेय मी. शिक्षण झाले, लग्न झाले, मुलगा झाला. सेटल होणे म्हणता येइल असे सगळे काही झालय आता. कथेचा शेवट अपुर्ण वाटावा अशीच माझी इच्छा होती. आणि त्यामुळे मी वडिलांच्या आजाराबद्दल अधिक लिहिले नाही. हेड इन्ज्युरीच्या पेशंटचे कसे हाल असतात आणि त्यात त्याचे कुटुंब कसे सफर होते हे "जावे त्याच्या वंशा..." तसे आहे. ही कथा लिहितांना मला काही गोष्टी सांगायच्या होत्या १. पियुची स्वप्न पुर्ण होण्याआधीच तुटली. man proposes and god disposes ही माझी आवडती phrase आहे ते या अनुभवामुळेच. २. लहान असणारी पियु एक क्षणात मोठी झाली. कितीतरी मोठी जबाबदारी तिला घ्यावी लागली...तिच्या स्वप्नांना हरवुन. तुम्ही म्हणतात तसेच झालय आणि... देवाने माझ्यासाठी डॉक्टरकीचा दरवाजा बंद केला खरा पण शंतनु साठी, माझ्या भावासाठी मात्र खुलाच ठेवला. मी इंजिनीअर झाली आणि तो डॉक्टर. चला हे ही नसे थोडके... आणि महत्वाचे म्हणजे आमची आइ... तिने या एवढ्या मोठ्या दु:खाची झळ आम्हाला पोहचु दिली नाही. सगळे काही सोसुन आम्हाला मात्र कळु दिले नाही. पुनम
|
Prajaktad
| |
| Friday, September 22, 2006 - 7:20 am: |
| 
|
पूनम! या सत्यकथेचा शेवट सुखांत आहे वाचुन बर वाटल..
|
Sadda
| |
| Friday, September 22, 2006 - 7:52 am: |
| 
|
पुनम.. शब्दच नाहित.. तु धैर्याने एवढ यश खेचुन आणलस हे वाचुन आनंद झाला 
|
Aditih
| |
| Friday, September 22, 2006 - 7:57 am: |
| 
|
पूनम... खरंच चटका लावणारी सत्यकथा..... तुझ्यावर काय बेतलं असेल याची पूर्ण कल्पना मी करू शकते गं...ही अख्खी कथा माझी आहे असं वाटलं मला..फक्त फरक एवढाच की मी बारावीत नव्ह्ते तर इंजिनीअरींग च्या शेवटच्या वर्षात होते. माझे वडिल आजारपणाशी झुंजत होते तर मी , आई आणि दादा त्या परिस्थितीशी...चार वर्ष चाललं सगळं..पण शेवट मात्र बाबांच्या निधनात झाला...आज देवदयेने सगळं छान आहे.. पण खंत हीच आहे की ते सगळं पहायला बाबा नाहीयेत...ती उणीव आता आयुष्यभर अशीच...
|
I_maximus
| |
| Friday, September 22, 2006 - 8:10 am: |
| 
|
हे पूनम, खरच आन्तर्मुख करणारी कथा आहे छान लिहिते आहेस चालु ठेव.......
|
|
|