|
Savani
| |
| Friday, September 22, 2006 - 9:43 am: |
| 
|
पूनम कथा वाचायला घेतली तेव्हा खूप हळवी झाले मी. आणि जेव्हा कळलं की ती सत्यकथा आहे तर आणखीच मनाला चटका लावून गेली. पण ज्या हिमतीने तू सगळ्याला सामोरी गेलीस आणि कथेचा सुखांत केलास ते बघुन मात्र खरच तुझ्या हिमतीची दाद द्यावी. यापुढे मात्र गोष्टी तुझ्या मनासारख्या घडोत आणि तुझी स्वप्नं पुर्ण होवोत. आदिती
|
Mrinmayee
| |
| Friday, September 22, 2006 - 10:19 am: |
| 
|
पुनम, तुझी कथा मी पुन्हा पुन्हा वाचून काढली. तुझ्या आईच्या, तुझ्या, तुम्हा सगळ्यांच्या धीराचं खूप कौतुक वाटलं. तुम्ही काय परिस्थीतीतून जाता आहात याची पूर्ण कल्पना आहे. कारण सांगते. माझा सख्खा मावस भाऊ गेली १३ वर्ष अंथरुणात लोळागोळा होऊन पडलेला आहे. मुंबईला त्याचा अपघात झाला. पाण्याच्या टॅंकरनी दिलेल्या धडकीत अत्यंत गंभीर हेड इंजुरी झालीय. साडेतीन महीने कोमात होता. त्याच्या १५ वर्षांच्या मुलाला "बाबा कधीतरी चालु-बोलु शकायचा आणि आपल्याशी खेळायचा" यावर विश्वास बसत नाही. माझी वहीनी अत्यंत धिरानी हे सगळं सांभाळते आहे. माझी मावशी आणि तिचे यजमान आता चाळीशी उलटलेल्या मुलाचं अंथरुणातलं सगळं एखाद्या लहान बाळाचं करावं तसं करतात. खूप कठीण आहे आयुष्य! आणि आपण तर सगळं taken for granted घेऊन चालतो!
|
Swara
| |
| Friday, September 22, 2006 - 6:39 pm: |
| 
|
Hats off to you Poonam. तुझ्या आयुष्यात ह्या पुढे फक्त आनन्द नान्दो ही शुभेच्छा.
|
पुनम कथा खरी खुरी आहे हे लगेच लक्षात आलं. खूप मनापासून लिहिल आहेस. सुखांत आहे हे ऐकून खरोखरच खूप बरे वाटले.
|
Mepunekar
| |
| Friday, September 22, 2006 - 8:07 pm: |
| 
|
पुनम, वाचताना शेवटी अश्रुंच्या धारा वाहु लागल्या.. खुप धीराने तु सामना केलास परिस्थीतिचा हे पाहुन तुझे खुप कौतुक वाटले.. तुला अनेक शुभेछ्या
|
my sweetoo , थोडा उशिर झाला ग लिहायला.. पण खुप भरुन आले हृदय..आणि खुप खुप अभिमान वाटला तुझा..खरेच princess नाव अगदी सार्थ केलेस ग..मलाच परिस स्पर्श झला म्हणायचा.. मला माझ्याच भुत्काळाची आठवण झाली..२%ने मेरिट गेले आणि मग donation देणे आम्हाला परवडणार नव्हते.. आता मला doctor न होण्याचे दुःख वाटत नाही कारण मला माझे आयुष्य खुप अर्थ्पुर्ण करायचे होते doctor न होताही ते करता येतेच की..समाधान आहे की मला ते अर्थ्पुर्ण करता येतेय आणि त्यात तुझ्या आई-वडिलांसारखेच खुप छान असे माझे आई-वडिल,३ छान बहिनी,आणि मझ्या परिसाचे,माधवाचे प्रेम माझ्या सोबतीस आहे्ईइच आयुSयातली शिदोरी आणि हिच खरी मिळकत सुद्धा. काही स्वप्ने तूटतात म्हणुन स्वप्ने बघणे सोडायचे नसते..कारण तुमची जिद्द स्वप्न्पुर्ती घडवुन आणतेच.्ई जिद्दच खरेतर यश आहे..पुन्हा उठण्याची इच्छा हेच खरे यश आहे..त्यानन्तरचि स्वप्न्पुर्ती तर केवळ त्याचा सोहळा असतो. मला केव्ह्धी भिती वाटत होती..कारण तुझ्या कथेवरुन तुझ्या पपांचे काय झाले याची कल्पना आली नव्हती..ती नंतर तू दिलिस..ते सुखरुप आहेत हे वाचून केव्हधा आनंद झाला...मझ्या पपंनानही एकदा असेच म्रुत्युशी झुन्झताना पहिलय मी..मी मोठीच ग,भवू नाही आणि ३ लहान बहिणि..तो प्रसन्ग आठवला तरी थरकाप होतो.. अशावेळी नातेवाइकान्चा काही उपयोग नसतो..फ़क्त जोडलेली माणसे येतात..आणि माझे पपाही असेच तुझ्या पपांसारखे इतरांसाठी झटणारे त्यामुळे खुप माणसे आली मदतीला..पण,आपली त्यावेळचि तगमग फ़क्त आपणच जाणतो..माझी आईल्ही महालक्ष्मीसारखी..त्यामुळे माझे पपाही आज सुखरुप आहेत..आणि यात मुख्य म्हणजे माझ्या परिसाची,साईबाबांची आणि त्या कृपाळू भगवन्ताची खुप खुप कृपाच आहे.. मी सुद्धा आयुष्याच्या या वळणापर्यन्त येता येता खुप स्वप्ने पाहिली..बरिचशी तूट्तली..पण स्वप्ने पहाणॅ कधीच सोडले नाही..तू हि सोडणार नाहिस याची खात्री आहे मला. तुला,सर्वांना खुप खुप आनंद मिळो.. हीच ईश्वराजवळ प्रार्थना.
|
Jayavi
| |
| Saturday, September 23, 2006 - 10:22 am: |
| 
|
princess , तुझी कथा अगदी मन हेलावून गेली गं. फ़ार धीरानं तू सगळं सांभाळलंस आणि आज स्वत:चं अस्तित्व घडवलंस. आज तुझे आई आणि बाबा नक्कीच धन्य झाले असतील. तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
|
Princess
| |
| Saturday, September 23, 2006 - 2:16 pm: |
| 
|
धन्यवाद... खुप खुप धन्यवाद. मायबोलिवर माझे मन मोकळे करुन छान वाटतय. तुम्हा सगळ्यानी मला मदतीचा हात पुढे केला. मला शुभेच्छा दिल्यात. मन भरुन आले. असेच प्रेम असु द्या हीच विनंती. इथे लिहिण्याआधी मला माझेच दु:ख मोठे असे वाटत होते पण तुम्हा सगळ्यांचे अभिप्राय वाचले, मेल वाचले आणि कळले आपल्यासारखेच आजुबाजुला खुप लोक आहेत. मृण्मयी(मंजुषा), वाईट वाटले ग तुझ्या भावाबद्दल वाचुन. तुझ्या वहिनिची मानसिक स्थिती समजु शकते मी. माझे वडिल सुद्धा ४ महिने कोमात होते आणि तब्बल दोन ते तीन वर्षे अथंरुणावर पडुन होते. तुला मेल केलाय. धन्यवाद स्वरा, श्रद्धा, प्राजक्ता, आदिती,शिरिष, मीपुणेकर, सावनी, मऊद्गंधा आणि जयावि आणि सगळ्यांना.
|
"स्वप्नांचे अनेक भग्न तुकडे उरात घेउन पियु मंदिराकडे निघाली होती" हेच सत्य आहे. पियु, अशा व्यक्तिगत घटना, माणसाला अधिक डोळस बनवतात, खर्या-खोट्याची, बर्या-वाईटाची ओळख करुन देतात. धन्य त्या आईची जीने हा प्रसंग पचवला. देव करो असा प्रसंग कोणावर हि न येवो. मंदिराकडे जाण कधीच सोडू नका, असल्या प्रसंगात ' 'तो' पाठिशी आहे ' ही भावनाच उपयोगी पडते. 'कर्ता-करविता' असणार्यावर आपल सगळ 'ओझ' टाकल, की मोकळ-मोकळ वाटत, कारण 'तो' कधिच वाईट करणार नाही, ह्या डोळस श्रध्देचा जन्म झालेला असतो. आणि हेच सत्य आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीस माझ्या अनेक शुभेच्छा!
|
|
|