Paragkan
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:48 pm: |
| 
|
संस्कार भारतीचं नाव वाचलं वरती. पॅटर्न्स हवे म्हणता? हे घ्या ... या खर्या रांगोळ्या नाहीत, कागदावर पेन अथवा पेन्सिलने काढलेली चित्रे आहेत. (उगीच नसत्या शंका नकोत म्हणून हे disclaimer ).

|
Paragkan
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:49 pm: |
| 
|
आणखी एक ... जंबो रांगोळी.

|
Moodi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:54 pm: |
| 
|
अतीशय सुंदर रांगोळ्या आहेत सगळ्यांच्या. मला रंगसंगती पण आवडली. संस्कार भारतीचा तर प्रश्नच नाही, फार रेखीव आल्यात. जया खूपच मस्त गं. 
|
Paragkan
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:55 pm: |
| 
|
आणखी एक -
यात कुणी symmetry, proportion वगैरे सारख्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये. माझ्या चित्रकलेचं वर्णन मी स्वतः करणं म्हणजे .. जाऊ दे झालं. शाळेत कुठल्याशा ईयत्तेत मास्तरांनी वाघ काढायला सांगितला होता. 'वाघाचा उंदीर करण्याची जादू कोणती' या प्रश्नाचं उत्तर ते अजून शोधत आहेत म्हणे. 
|
Moodi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:04 pm: |
| 
|
पराग फारच मऽऽस्त आहेत या रांगोळ्या.मोहकच! 
|
Arch
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:15 pm: |
| 
|
सुरेख. जया रंगीत दगडाची रांगोळी तर सुरेख आहेच पण कल्पनापण छान आहे. आणि ते खोबर्याची idea पण खास. एकदा करून बघितली पाहिजे. मिलिंदा, जेंव्हा तांदळाची किंवा डाळीची रांगोळी काढतात तेंव्हा त्या वस्तू निवडून, धुवून त्याची खिचडी करतात. ते फ़ुकट जात नाहीत.
|
काय सुंदर रांगोळ्या आहेत इथे! जया, तुस्सी मान गये! कसली सही दिसत्ये ती रंगीत दगड वापरून काढलेली रांगोळी!!
|
Arch
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:35 pm: |
| 
|
Deeps, सुरेख मेहेंदी काढायचा वारसा तुला कुठून लाभला ते कळल आता.
|
Wow सुरेख काढल्या आहेत रांगोळ्या. दगडाची रांगोळी मस्तच.. तांदुळ आणि दगड वगैरे कल्पना मस्तच. मी रांगोळी काढताना माझ्या चिमटीतून रांगोळी सुटतच नाही त्यामूळे अशा काढून बघायला हरकत नाही
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:46 pm: |
| 
|
अरे वा!मस्त आल्यात रांगोळ्या,बारिक दगडांची आईडिया मस्त आहे. माझ्या पण रांगोळ्या खुप छान येतात.. सणासुदिला आई-वहिनी फ़ार आठवण काढतात, वहिनी आणी मी मिळुन मोठया रांगोळ्या काढायचो.दादाने त्यांच्या फोटोचा अल्बम बनवला आहे. रांगोळी अनेक प्रकारे काढता येते. ठिपक्यांची , संस्कारभारतीची रंगावर रांगोळी रेखुन , ठिपक्यांची पाण्यावर कोळसापुड टाकुन , फुलांची , तांदळाची , तांदुळ पिठाची , लाकडि भुसा रंगवुन , धान्याची.. नागपुरला रांगोळीचे रंग फ़ार छान मिळतात. पांरपारिक फ़ुला पानाच्या रांगोळित ते फ़ार सुंदर दिसतात. अरे बाप रे ! आवडता विषय म्हणुन पोष्ट फ़ारच लांबले कि!
|
Shyamli
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:52 pm: |
| 
|
वा!! सहीच आहेत रांगोळ्या एकेक.. जया, आमच्याकडे पण ते खोब्र्याला कलर करुन गुज्जु काढतात रांगोळ्या मस्तच दिसतात एकदम.. तुझी ही आयडीया भारी आहे हां प्राजक्ता तुही टाक ना एखादा फोटो
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 4:15 pm: |
| 
|
'वाघाचा उंदीर करण्याची जादू कोणती' या प्रश्नाचं उत्तर ते अजून शोधत आहेत म्हणे. >>>>.. परागकण great....!!! संस्कार भारतीच्या रांगोळ्या सुरेख आहेत, मी या काढल्या देखिल आहेत पण त्याना संस्कार भारती का म्हणतात?.... सगळ्यान्ची रांगोळी फ़ार सुरेख आहे.. आणि प्रत्येक post मधील माहितीही..!!!
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 20, 2006 - 4:31 pm: |
| 
|
पराग, या प्रत्येक पॅटर्न ला नाव असते ना? म्हणजे शंख वगैरे. आणि त्याचे काही महत्व, शिवाय ते कसे वापरायचे याचे नियम वगैरे आहेत का?अजून तुला काही माहिती असेल तर लिही.
|
Paragkan
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:08 pm: |
| 
|
'संस्कार भारती' ही एक 'सांस्कृतिक' संस्था आहे. इथे जर कुणी 'संघ दक्ष' असतील तर ते त्याचा इतिहास वगैरे सांगू शकतील कदाचित. या संस्थेतर्फे या रांगोळ्या काढल्या जातात मोठ्या प्रमाणावर. म्हणून त्याला 'संस्कार भारतीची रांगोळी' असं म्हणतात. संस्कार भारतीतर्फ़े त्याचे वर्गही चालवले जातात. मैत्रेयी, मी इथे फक्त काही रांगोळिची designs टाकली आहेत. तू जे म्हणत आहेस त्याबद्दल लिहीन जरा सवडिने. तोपर्यंत इतर कुणाला जास्त चांगली माहिती असेल तर त्यांनी जरूर टाकावी.
|
Bee
| |
| Wednesday, September 20, 2006 - 10:00 pm: |
| 
|
काय सुंदर माहिती आणि सुंदर सुंदर रांगोळ्या. जयवी, हे दगड कुठे मिळालेत तुला? कारण हे दगड re-usable आहेत म्हणून तसे करायला परवडतात. शिवाय छानही दिसतात. जयवी, हो आमच्याकडेही कोळशाचा आधी कांडून भुसा करतात आणि मग तो पाण्यावर सोडतात. त्यासाठी मोठी परात किंवा कोपर लागतो. पराग, तुझी चित्रकला एकदम छान आहे. कुणीतरी ठिपक्यांची रांगोळी का नाही टाकत इथे...
|
Deepanjali
| |
| Wednesday, September 20, 2006 - 11:45 pm: |
| 
|
अजुन एक तांदूळ वापरून काढलेली रांगोळी , मी एका गुजराथी लग्नाच्या मेंदी पार्टीला गेले होते तिथे त्या घरातल्या लोकांनी काढली होती .

|
Seema_
| |
| Thursday, September 21, 2006 - 12:16 am: |
| 
|
wow dj काय मस्त आहे ग रांगोळी. वरती ती मोराची रांगोळी पण फ़ार मस्त आली आहे. पराग मस्त आलेत patterns. मी पण खुप काढायचे संस्कार भारतीच्या रांगोळ्या. फ़ोटो नाहीत पण माझ्याकडे. जयावी दगडाच combination फ़ार मस्त झालय. साधी माणस मस्तच आली आहे रांगोळी. खुप ideas मिळाल्या. आता या दिवाळीला मी तांदुळ आणि खोबर वापरुन काढीन रांगोळी.
|
Milindaa
| |
| Thursday, September 21, 2006 - 5:53 am: |
| 
|
मिलिंदा, जेंव्हा तांदळाची किंवा डाळीची रांगोळी काढतात तेंव्हा त्या वस्तू निवडून <<<< आर्च, मी केवळ गंमत करत होतो. तरीपण उत्तर दिलेस म्हणून धन्यवाद
|
Nalini
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:05 am: |
| 
|
Paint Brush वापरुन काढलेली ठिपक्यांची रांगोळी. २१ ते १.

|
Arch
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:28 am: |
| 
|
मिलिंदा, मला मजा कळली होती. पण कधी नव्हे ते तुला काहितरी सांगायची संधी कशी सोडायची? 
|