|
Megha16
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:29 am: |
| 
|
सगळ्या च रांगोळ्या मस्त आहेत. संसकार भारतीच्या तर खुप च छान आहेत. जया, तुझी आयडीय मला खुप आवडली रंगीबेंरगी छोटे छोटे दगड वापरुन. मी पण इथे तांदुळा मध्ये वेगवेगळे कलर वापरुन रांगोळी काढते. नलीनी, रागोंळी खुप छान आहे.
|
Moodi
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:55 am: |
| 
|
नलिनी फारच सुरेख आलीय गं. आणि रंगसंगती काय कळत नाही म्हणतेस? गोड दिसतायत. 
|
Chioo
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:01 am: |
| 
|
काय सुरेख रांगोळ्या आहेत. मला आता घरी जऊन हेच करावेसे वाटते आहे. खूपच सुंदर आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, September 21, 2006 - 12:47 pm: |
| 
|
जर तुम्ही एक्सेल वापरत असाल तर त्यावर छान डिझाईन्स करता येतात. चौकोन आयतेच असतात ना. पाण्यावरची असते तशी पाण्याखालची पण रांगोळी असते. परातीला व्हॅसलीन किंवा मेण लावायचे. त्यात रांगोळी काढायची. मग ती परात किंचीत गरम करायची. त्याने रंग चिकटुन बसतात. आणि मग अगदी हळुहळु पाणी ओतायचे. हा प्रकार पण अनोखा आहे. शिवाय वर तरंगते दिवे सोडता येतात. बंगाली लोकात आल्पोना नावाची रांगोळी काढतात. एक उभी व एक आडवी रेघ काढुन त्याभोवती वेगवेगळे आकार रचले जातात. यात आणखी बेसिक आकारहि असतात. मद्रासी लोकात पण तांदुळ भिजवुन रांगोळ्या काढतात. ईयरबडने वैगरे अश्या रांगोळ्या काढणे सोपे जाते. पण अश्या पिठ कालवुन काढलेल्या रांगोळ्या आमच्या कडे निषिद्ध मानल्या जातात. अगदीच नवख्या माणसानी सुपारी, कवडी, बिटके यासारख्या वस्तु ठेवुन वरुन फ़क्त चिमटीने रांगोळी सोडली कि खाली छान आकार तयार होतात. त्यात रंग भरले कि झाले. चिमटीने रांगोळी काढणे अनेकाना जमत नाही. खास करुन रंग भरताना नीट भरले जात नाहीत. त्यानी चहाच्या गाळण्यात रंग भरुन गाळण्याला हलक्या हाताने टिचक्या माराव्यात. छान समतल रंग भरले जातात.
|
अरे वा काय सही रांगोळ्या आहेत. मला तर माहितच नव्हत असा BB आहे म्हणून.
|
Jayavi
| |
| Friday, September 22, 2006 - 3:28 am: |
| 
|
नलिनी, काय सुरेख गं! दिनेश, तुमची ही पाण्याखालची रांगोळीची कल्पना पण मस्त आहे. करुन बघावी लागेल एकदा.
|
Bee
| |
| Friday, September 22, 2006 - 4:11 am: |
| 
|
जयवी, सांगा ना ते दगड कुठून आणलेत. सागरतीरी गेली होतीस का नवर्याबरोबर :-)
|
Jayavi
| |
| Friday, September 22, 2006 - 4:52 am: |
| 
|
बी..... ते तर जातेच रे.... पण तेव्हा दुसरं असतं बरंच काही करायला अरे, हे दगड मी विकत आणले. इथे मिळतात.
|
माझाही पहिलाच प्रयत्न, एक्सेलचा उपयोग करुन काधलेली रांगोळी... 
|
Dineshvs
| |
| Friday, September 22, 2006 - 1:05 pm: |
| 
|
रांगोळीला सोबत हवी असते दिव्याची. परदेशी मेणबत्त्या हाताशी असतात. पण जर घरी करायच्या असतील तर अर्धवट जळलेल्या मेणबत्त्या घ्यावात. हौसच असेल तर नव्या घ्याव्यात. रंगासाठी घरातल्या लहान बाळाचे रंगीत क्रेयॉन्स बाळाच्या परवानगीने घ्यावेत. ( बाळाने नाहि दिले तर वेगळा बॉक्स आणावा, त्याचे चोरु नयेत. ) एका मोठा भांड्यात पाणी गरम करावे. त्यात बसेल असे एक छोटे भांडे घ्यावे. घरात पोचे आलेले एखादे भांडे असतेच, ते घावे. त्यात मेणबत्ती व हव्या त्या रंगाचे क्रेयॉन्स टाकावेत. व ढवळत मेण वितळवुन घ्यावे. वातीसाठी जाड सुत, एखाद्या सुगंधी तेलात बुडवुन घ्यावे. साच्यासाठी डोके लढवुन वेगवेगळी धातुची भांडी घ्यावीत. करवंटी वैगरे पण चालु शकेल. अंड्याचे टरफल पण चालते. या साच्याला आतुन तेलाचे बोट लावावे. तापवायचे सगळे मिश्रण एकजीव करण्यापेक्षा हळु हळु ढवळुन मार्बल ईफ़ेक्ट देता येतो. साच्यातहि काहि वेगळ्या रंगाचे तुकडे, सुकलेली फुले वैगरे घालता येतात. तापवलेले मेण साध्या हातानेहि हाताळता येते, त्यामुळे हवा तो आकार देता येतो. वातीचा दोरा जास्त लांब असला तर मेणबत्ती शेवटपर्यंत जळते. आखुड वात असली तर आकार शाबुत राहतो. फ़्रीजमधे ठेवलेली मेणबत्ती लवकर घट्ट होते आणि जास्त वेळ जळते. यात कलाकुसरीला भरपुर वाव आहे.
|
दिनेश दा एकदम छान... आणि हो त्या बाळाने किन्वा बाळीने.. आम्ही आणलेले नवीन क्रेयोन्स घेतले तर काय करायचे? तेही सान्गा की जरा....
|
|
|