Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 20, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » भाद्रपद » इतर कला » रांगोळी » Archive through September 20, 2006 « Previous Next »

Sadhi_manas
Monday, September 18, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हितगुज ऍडमिनीस्ट्रेटर आपण खास दसरा-दिवाळीसठी हा बीबी चालू केल्याबद्दल आभारी आहे.

इथे आपण काढलेल्या रांगोळ्या, ठिपक्यांच्या आणि इतर पाना-फ़ुलांचे डिझाईन, संस्कार भारती तसेच खर्‍या फ़ुलांची-पाकळ्यांची रंगोळी यांचे फोटो किंवा रंगोळी काढण्यासाठीची पूर्व तयारी म्हणून काढलेली कच्ची डिझाईन्स, परदेशात तर फ़ुले पण मिळत नाहीत दर वेळेस आणि वार्‍यामुळे कढलेली रंगोळी टिकत पण नाही उडून जाते... मग त्या ऐवजी रांगोळी साठी काही इतर युक्त्या असल्या तर देऊ शकाल का इथे?

-धन्यवाद


Maitreyee
Tuesday, September 19, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला संस्कारभारतीचे पॅटर्न्स येत असतील तर टाका की इथे!
तोवर हे पहा, एक अगदी सोपे, चटकन होणारे पण छान डिझाइन (माझ्या आईने काढलेले) :


mor

Deepanjali
Tuesday, September 19, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही गुज्जु style तांदळाला food color देउन काढलेली रांगोळी , अर्थात एका गुज्जु मैत्रीणीने काढली आहे .


Sadhi_manas
Tuesday, September 19, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा मैत्रेयी आणि दिपांजली या बीबी ची सुंदर रंगोळ्यांनी सुरवात झाली तर...

Bee
Tuesday, September 19, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा रांगोळीचा बीबी खूप आवडला. संस्कारभारतीचे patterns पण असतात हे वाचून उगीच मी पुतणीला एकच एक काय संस्कार भारतीची रांगोळी कढतेस म्हणून चिडवल्याचे आठवले. हा रांगोळीचा प्रकार आहे हेही मला माहिती नाही. मला वाटले ती आपले असेच काहीतरी काढते आहे. पण तिनी मला खूपदा सांगितले की ही रांगोळी शाळेत शिकवली आहे तरीही मी लक्ष दिले नाही. आता खूप वाईट वाटते आहे चूक लक्षात आल्यामुळे.

Bee
Tuesday, September 19, 2006 - 11:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रेयी, काकूंना सांग मोर एकदम छान आला.. असे वाटते थुईथुई नाचतो आहे तो :-)

Ramialahabade
Wednesday, September 20, 2006 - 2:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deepदिपा खूप सुन्दर आहे रान्गोलि

Lopamudraa
Wednesday, September 20, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया तु टाक ना... तुझ्या सुंदर फ़ुलांच्या रांगोळ्या..!!!

Bee
Wednesday, September 20, 2006 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपांजलीनी जी रांगोळी काढली आहे ती आणि कोलम नावाचा एक रांगोळीचा प्रकार असतो, ह्या दोनमध्ये नेमका काय फ़रक आहे? कोलम हा एक तांदळाचा प्रकार आहे. हे तांदूळ हव्या त्या रंगात मिसळून मग ते रांगोळीत भरले जातात म्हणून त्याला कोलम रंगोली म्हणतात.

तसेच नारळाचा भुसा पण रांगोळीत भरला जातो. कोळसा पाण्यावर तरंगतो म्हणून आधी तो पाण्यावर पसरवायचा आणि मग त्यावर रांगोळी काढायची. माझ्या ताईला प्रथम क्रमांक मिळाला होता शाळेत.


Shonoo
Wednesday, September 20, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अमेरिकेत रांगोळी काढणं म्हणजे दिव्यच आहे. एकदा एका शाळेत मुलांना दाखवण्याकरता माझ्या आईने मोठ्या काळ्या constructtion paper च्या शीटवर काढली होती. पण ती नंतर उचलून टाकून द्यावी लागली.

एरवी सणासुदीला ती इथे असली तर घरापुढची पायरी असते त्यावर driveway chalks किंवा साधे खडू पाण्यात भिजवून त्याने रांगोळी काढते.

एका वर्षी घरातल्या parquet जमिनीवर गेरू लावायचे प्रयत्न केले होते. ते यशस्वी व्हायचं दूरच, साफ करताना नाकी न ऊ आले होते.


Jayavi
Wednesday, September 20, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिपा, मैत्रेयी..... काय सुरेख आहेत ह्या रांगोळ्या!

मस्त बीबी उघडलाय हं.

लोपा, टाकते टाकते :-).

इथे कुवेतला पण रांगोळी मिळणं कठीणच आहे म्हणून मी तरी माझी रांगोळी घेऊनच येते भारतातून. पण इथे ना खोबर्‍याचा कीस असतो ना dessicated coconut त्यात रंग घलून मग रांगोळीत भरतात. खोबर्‍याच्या किसाच्या जाडीमुळे अगदी गालीच्या सारख्या दिसतात.

नुसत्या पानांच्या पण मस्त दिसतात. मी तर रांगोळी, फ़ुलं,पानं......... सगळं वापरुन काढते. ह्यावर्शी गणपतीला मी बारीक रंगीत दगड वापरुन काढली होती रांगोळी.

बी, तू म्हणतो आहेस तशी रांगोळी आम्ही पाण्यावर कोळशाचा भुगा टाकून मग त्यावर काढायचो.


Jayavi
Wednesday, September 20, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बघा माझी बारीक दगड वापरुन काढलेली रांगोळी.



Jayavi
Wednesday, September 20, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा क्लोज्-अप. मधे पांढरे शिंपले आहेत.


Prashantkhapane
Wednesday, September 20, 2006 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Jayavi,
my god, this must be a lot of hard work. Good stuff.

Lalu
Wednesday, September 20, 2006 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! छानच आहेत सगळ्या रांगोळ्या. बीबी चालू केल्याबद्दल धन्यवाद, माझा आवडता विषय आहे. :-)

रांगोळीसाठी 'कट्टा घालणे' हा प्रकार माहित आहे का? दिवाळीच्या आधी दारासमोर मातीचा एक फार उन्च नसलेला सपाट कट्टा तयार करायचा. तो शेणाने सारवायचा. वाळल्यावर झाडून मग त्यावर रांगोळी काढायची. घरासमोरची जागा खडबडीत असेल तर हा उपाय असायचा.

एका मोठ्या कागदावर अंतर मोजून पेटलेल्या उदबत्तीच्या टोकाने भोके पाडून ठिपक्यांसाठी आम्ही कागद तयार करायचो. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी दोन, एक सकाळी, एक सन्ध्याकाळ साठी आधीच डिझाईन निवडून ठेवायचे. भल्या पहाटे उठून रांगोळ्या काढायची स्पर्धाच असायची. आमच्या शेजारी, आजूबाजूच्या सगळ्याच बायका खूप छान रांगोळ्या काढायच्या.

मी कोल्हापूरहून आणलेल्या रांगोळ्या, मुलांसाठी आणलेले प्लास्टिकचे छाप वगैरे आहेत. इथेही दुकानात मुलांसाठी Arts चा सेक्शन असतो तिथे Sand Art मिळते. ही रन्गीत वाळू वापरुनही रांगोळी काढता येते. आम्ही दरवर्षी काढतो रांगोळी. मुलांना रंग भरायला मजा येते. फोटो सापडले तर टाकेन.


Sadhi_manas
Wednesday, September 20, 2006 - 11:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रांगोळी काढणे मला जमत नाही...पण कधी नव्हे तो गेल्या दिवळीला केलेला प्रयत्न...




Sadhi_manas
Wednesday, September 20, 2006 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही आजून एक माझ्या नंणदेनी काढलेली



Sadhi_manas
Wednesday, September 20, 2006 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जया रांगोळी एकदम मस्तच... तुझी ग्रव्हलनी आणि दिपांजलीच्या मैत्रिणीची आणि तांदूळानी रांगोळी कढायची युक्ती जे भारताबाहेर आहेत त्यांच्यासाठी तर मस्तच आहे गं!... अर्थात भारतात पण चांगलीच आहे म्हणा...




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators