|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 2:04 am: |
| 
|
मे महिना संपला तरीही उन्हाची काहिली थोडी सुद्धा कमी झाली नव्हती. त्या आग ओकणार्या नारायणाकडे बघुन तसे सगळेच धास्तावले होते. यावर्षी तरी पाउस चांगला पडणार की नाही??? भट्टगाव तालुक्याचे गाव... पण हे फ़क्त बोलायलाच. तिथे चांगला दवाखाना नव्हता, शाळा दोनच. गावातले नव्वद टक्के लोक शेतकरी. नौकरी करणार्यांचा साइड बिझिनेस सुद्धा शेतीच. एकुण सगळे गावच पावसावर अवलंबुन. गावातुन वाहणार्या गिरणा मायची तशी कृपा होती गावावर. बारा महिने वाहणार्या नदीमुळे इथले शेतकरी अगदीच गरीब नव्हते. उसासारखे नगदी पिक पण अगदी मुबलक होत असे. गावात असणार्या नौकरी वर जगणार्या अगदी मोजक्याच लोकांमध्ये तात्यासहेबांचे नाव अग्रक्रमावर. साखर कारखान्यात ऑफिसर असणार्या तात्यांची पत्नी शाळेत शिक्षिका. तात्यांचा स्वभाव खुप मनमिळावु. कामानिमित्त त्यांचा सतत शेतकरि, ट्रक द्रायव्हर, राजकारणी अश भिन्न स्तरातल्या लोकांशी संबध येत असे. पण तात्याना लोकाना हाताळण्याचे कसब देवा कडुनच लाभले होते. साखर कारखान म्हणजे तर त्यांचे दुसरे घरच झाले होते. समजुतदारपणाने संसार करणार्या त्यांच्या पत्नीने मात्र कधी चकार शब्दानेही तक्रार केली नव्हती. उलट हसत हसत नौकरी आणि दोन मुलांची जबाबदारी घेतली होती. प्रियांका आणि शंतनु, आइवडिलांप्रमाणेच शांत आणि मनमिळावु होते. शाळेतला पहिला नंबर त्यांनी कधीच सोडला नाही. "पियु... पियु...." शंतनु धावत हाका मारत होता. पण प्रियंका मात्र गच्चीवर आकाशाकडे बघत होती. "हे काय पियु, उन्हात का बसलीस? चल खाली आइ जेवायला बोलवतेय. प्रियंका खाली येण्यासाठी निघाली खरी पण तिचे मन पावसाच्या विचारानी भरुन आले होते. तिच्या शाळेतली मीना नुकतीच तिला भेटुन गेली होती."पाउस नाही आला तर मला शाळेत नाही पाठवणार... घरी पैसे नाहीत" मीनाचे शब्द अजुनही पियुच्या मनातुन जात नव्हते.
|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 2:09 am: |
| 
|
शोनू तुझ्या कथेच्या शीर्षका वरुन मला हे शीर्षक सुचलय. कथा खुप दिवसांपासुन होती मनात... पण मी काही तुझ्यासारखे लिहु शकत नाही. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तु माझी मायबोलिवरची खुप आवडती लेखिका आहे. तुझ्या आणि सग़ळ्याच मायबोलिकरंच्या अभिप्रायाची वाट बघतेय. पुनम
|
पुनम, अगदी छानच..पहिला प्रयत्न वाटत नाही ग तुझा.. खुप सुंदर!! लवकर पुर्ण कर
|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 4:44 am: |
| 
|
धन्स मृदगंधा. तू छान म्हणालीस.... परिस स्पर्श झाला म्हणायचे . thanks a lot शब्द संपत्ती नाही ग माझ्या कडे तुझ्या सारखी... तुझ्या शुभेच्छा असु देत फ़क्त माझ्या बरोबर.
|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 5:08 am: |
| 
|
जिन्याच्या पयर्या उतरतांना सुद्धा तिच्या मनातला कोलाहल कमी होत नव्हता. तिचे आज जेवणात लक्ष नाहीये हे लक्षात यायला अरुणाबाईंना वेळ लागला नाही." काय ग आज काय झालय? तुझ्या निकालाचे टेन्शन आलय का? लागेल बर का या एक दोन आठवड्यात. आणि मला आणि तुझ्या पप्पांना खात्री आहे की तु बोर्डाला येणार." आईचे बोलणे ऐकुन तिने काहीही प्रतिक्रिया दिली नही. हसरी असलेली आपली पोर आज अशी का वागतेय तेच त्याना कळेना... जेवण आटोपल्यावर मग पुन्हा त्यानी पियुला विचारले"काय झालेय आमच्या चिमणीला? पप्पा तुला पुण्याच्या कॉलेजात पाठवणार म्हणुन नाराज आहेस का?" "नाही ग मम्मा" असे बोलुन प्रियांका रडायलाच लागली."गरीबी खुप वाईट असते का ग? पैसा नसेल तर आपले स्वप्न पुर्ण नाही होत का?" आपल्या निरागस लेकिच्या तोंडुन आलेले ते प्रश्न पाहुन अरुणाबाईंना खात्री झाली. आता माझी लेक मोठी झालिये. ती आता जगाकडे उघड्या डोळ्याने पाहु लागलीय. "बघ बेटा जीवनात पैसा तर महत्वाचा आहेच. पण आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती हवी. आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे, आइ वडिलांचा शिक्षणाला पाठिंबा हवा" आपल्या मॉम ने आपले आणि मीनाचे बोलणे ओझरते ऐकले असावे असे एक क्षण पियुला वाटुन गेले. "आपण एका छोट्या गावात राहतो. इथे शिक्षणाचे महत्व लोकाना अजुन समजलेले नाही. आणि मुलीचे शिक्षण म्हणजे नेहमीच दुय्यम. रहता राहिला तुझा स्वप्नांचा प्रश्न... स्वप्न पुर्ण करताना अनेक अडचणी येतात. कधी कधी वाटही बदलावी लागते. पण रस्ता बदलला तरी आपले लक्ष्य बदलु देउ नकोस.समजले? आणि आता रडु नकोस बरे वेडाबाइ." किचन कडे जाणार्या मम्माकडे बघुन पियु स्वत"शीच हसली. "देवा मला हेच आईवडिल पुन्हा पुन्हा दे "नेहमीप्रमाणेच ती मनातल्या मनात पुटपुटली.
|
पुनम छान चाललय. असच लवकर लवकर लिहित जा ग, पुढच्या भागाची वाट बघतेय...
|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 5:44 am: |
| 
|
दिवस कसेकसे भरभर जात होते. तात्या पुण्या-मुंबैला जाउन चांगल्या कॉलेजेस ची माहिती काढुन आले. सगळे ब्रोशर्स घेउन तात्या आणि अरुणाबाइ बसलेले असतानाच पियु डान्स क्लास हुन परतली. "पप्पा... केव्हा आलात?" "आत्ताच आलो बेटा. ये इकडे, हे बघ, कॉलेजेस ची माहिती वाचुन काढ. तुला कोणते कॉलेज खुप आवडले ते सांग मला" "अहो तिला काय कळतेय. आपण ठरवु तिथेच जाणार ती. कुठल्या कुठल्या कॉलेजला कंॅपसमध्येच हॉस्टेल आहे ते आधी बघा. नाहीतर माझी नाजुक फुलासारखी मुलगी मोठ्या शहरातल्या धावपळीनेच सुकुन जाइल." "बो.सु. काय बोलताय तुम्ही? अहो आता मुलीला तिचे निर्णय घ्यायला शिकवायला हवे. आणि ति आता नाजुक राहता कामा नये. चांगली रफ़टफ़ व्हायला हवी." पप्पांच्या तोंडुन बो.सु. ऐकताच पियु आणि शंतनु खुदु खुदु हसायला लागलेत. बर्याचदा अरुणाबाइ तात्यांना त्यांच्या साखर कारखान्याच्या प्रेमावरुन चिडवत असत. कारखानाच तुमचे घर आहे. हे तर लॉजिंग बोर्डिंग आहे. अशा त्यांच्या बोलण्यामुळे तात्यांनी अरुणाबाइंचे नाव बोर्डिंग सुपरिटेंडेंट ठेवले होते. "आणि हे बघा बो.सु. २ दिवसांनन्तर कारखान्याची जनरल मीटींग आहे त्यामुळे हे दोन दिवस मला जरा उशिर होइल घरी परतायला. पियुची खरेदी मात्र सुरु करुन द्या. ऐनवेळी कही विसरायला नको. तिला हव्या असलेल्या सर्व गोष्टींची यादी बनवा आणि एक दोन दिवसात जळगावला जाउन सगळी खरेदी करुन घ्या." अरुणाबाइंचा होकार गृहित धरुन तात्या बाहेर निघुन गेले. कदाचित ऑफ़िसच्या कामासाठीच...
|
पूनम.. काय लिहु.. .. !!!! लिहित रहा.. अगदी आतल.. आहे सगळ.. सुंदर..!!!
|
Shonoo
| |
| Monday, September 18, 2006 - 7:39 am: |
| 
|
प्रिन्सेस्: छान लिहिते आहेस. चालू ठेव, लवकर संपव :-)
|
Princess
| |
| Monday, September 18, 2006 - 8:17 am: |
| 
|
धन्स रुपाली, लोपा आणि शोनू. आता पुढचा भाग उद्या टाकेन. हो न संपणारी गोष्ट असली तरी लवकरच संपवेन.
|
Princess
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:26 am: |
| 
|
अजुन तर परिक्षेचा रिझल्ट पण आला नाहीये तेव्हढ्यात मॉम आणि पपानी हे काय सुरु केलय तेच पियुला कळत नव्हते. पण छान छान नवे ड्रेस घ्यायला कोणाला आवडत नाही? म्हणुन मग ती ही अगदी आनंदाने खरेदी करत होती. थोड्या दिवसानंतर आपण हॉस्टेलला राहायला जाणार. मॉम आणि पपा पासुन दुर... हा विचार मनात येताच तिला खुप वाईट वाटायचे. पण आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करायचे तर हा निर्णय आपल्याला घ्यावाच लागणार हे ती मनोमन जाणुन होती. तिला लहानपणापासुन वाटायचे की आपण शहरात शिकायला जावे. डॉक्टर बनावे. का कोण जाणे पण डॉक्टर म्हणजे देव असेच तिला नेहमी वाटायचे. तात्यासहेबांना तर खात्रीच होती की पियु एक उत्तम डॉक्टर होणार. तिचा मृदु स्वभाव, तिचे लाघवी हास्य पेशंटला एका क्षणात बरे करेल असा काहीसा अति आत्मविश्वास ही त्याना वाटायचा. आपल्या वडिलांचा तो विश्वास सार्थ करणे हेच तिचे ध्येय होते. हेच उराशी जपलेले स्वप्न होते. आता ती आतुरतेने तिच्या निकालाची वाट पाहत होती. तो पांढरा शुभ्र कोट आणि स्टेथोस्कोप अडकवण्याचे तिचे स्वप्न पुर्ण होणे न होणे हे खुपसे त्या निकालावरच तर अवलंबुन होते. मीना पावसाची तर पियु निकालाची आतुरतेने वाट पाहत होत्या...
|
Princess
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:38 am: |
| 
|
१३ जुन उगवला तरी पण पावसाने मात्र यावर्शी तोंडही दाखवले नव्हते. आज वटपौर्णिमा म्हणुन सकाळपासुनच अरुणाबाइंची गडबड सुरु होती. आज तात्यानाही लवकरच निघायचे होते. जनरल मीटींग उद्यावर येउन ठेपली होती. त्यांना खुप कामे आजच आटोपणे आवश्यक होते. म्हणुन ते घरातुन लवकरच निघाले होते. रोज पियुला न विसरता बाय करुन जाणारे पप्पा आज फ़क्त तिच्या बेडरुम मध्ये डोकावुन गेले. पण तिला गाढ झोपलेले पाहुन पुन्हा मागे फ़िरले. आता थोडेच दिवस तिला अशी छान झोप मिळणार आहे. मग एकदा कॉलेज सुरु झाले की असली झोप कुठे. विचार करत करत ते घराबाहेर पडले सुद्धा. "पियु उठ बेटा... मी पुजेला जाउन येते" मम्मीचे हे शब्द कानावर पडताच पियु ताडकन उठुन बसली. हे काय आज किती उशिर केला उठायला... डान्स क्लासला आता संध्याकाळीच जाता येइल शी... पियु मनातल्या मनात स्वत:वरच चिडली. "सकाळचे १०च वाजलेत तरी काय तापलिय ना जमिन." पुजेला जमलेल्या बायकांची बडबड चालली होती. " बघा न नवर्याच्या आयुष्यासाठी उन्हाचे काय चटके सहन करावे लागताय" असे अरुणाबाइनी बोलताच सगळ्याजणी मनापासुन हसल्या. चेहर्यावरचा घाम टिपत, पदर सावरत सगळ्याजणी मग वडाची पुजा करू लागल्या. संध्याकाळी पियुला डान्स क्लास हुन परत आल्या आल्याच घरातुन खमंग वास आला. "मम्मा आज काय स्पेशल बेत? कित्ती सुवास पसरलाय घरभर. पुरणपोळी केलियेस न... वाव.... मज्जा येणार आज जेवायला." पियु आणि शंतनुने लगेच ताट घेतली सुद्धा. जेवणाचा छान आस्वाद घेतांनाच पियुच्या लक्षात आले.... अरे मॉम तर आज जेवलीच नहिये सकळपासुन."मॉम तु पण ये ना ग आमच्यासोबत जेवायला" " नाही बेटा, आज मी पप्पांची वाट बघेन आणि त्यांच्या नंतर मगच जेवणार" एवढी शिकली सवरलेली आपली मम्मी कधी कधी अशी अशिक्षित बायकांसारखी का वागते हा पियुला नेहमीच प्रश्न पडयचा. पण असे विचारले तर मम्मी पुन्हा तेच भारतीय सण, स्त्री, पुरुष इ.इ. लेक्चर देणार हे तिला माहिती होते. म्हणुन मग ती गप्पच बसली.
|
Princess
| |
| Tuesday, September 19, 2006 - 4:50 am: |
| 
|
रात्री १२ वाजता तिला खडबडुन जाग आली पाहते तर काय, मम्मी जागी आहे आणि खिडकीशी उभी राहुन पप्पांची वाट पाहतेय. "मॉम काय झाले ग? जेवलि नाहीस ना अजुन... चल जेवुन घे आता. पप्पांना उशिर होणार असे म्हणाले होते ना ते मग का उगिच वाट बघत बसलीय?" असे म्हणत ती सुद्धा मम्मी जवळ खिडकीपाशी येउन उभी राहिली. "चल ना मॉम जेवण कर आणि मग झोप... पप्पा आल्यावर पुन्हा जेव हवे तर..." पण अरुणाबाइ जागच्या हलल्या नाहीत... "आज एवढा उशिर कसा झाला काही कळत नाही... फोनही नाही केला दिवसभरात" स्वत:शीच बोलत असल्यागत पुटपुटल्या. पण पियुने त्याना बेडवर ओढत ओढत अणलेच...."ओके बाबा, जेवु नकोस, पण पडुन राहा आता. आणि पप्पा आले की मला सुद्धा उठव. मला बाय न करता असे कसे गेलेत ते आज" पियुचे बोलणे ऐकुन त्या काळजीच्या वातावरणात सुद्धा तिच्या मम्मीला हसायलाच आले. "पियु उठ... उठ लवकर" मम्मीच्या आवाजातला बदल प्रियंकाला जाणवला. रोज शांतपणे उठवणारी मम्मा आज अशी घाई का करतेय मला..." काय झाले मम्मा, झोपु दे ना थोडा वेळ" असे बोलत तिने पुन्हा पांघरुण डोक्यावर ओढुन घेतले. पण पुन्हा दोन मिनिटानी तिला मम्माचा आवाज आला. "उठ ना पियु लवकर. काल रात्री पप्पा घरी आलेच नाहीत." मम्माचे हे शब्द ऐकताच पियुची झोपच उडाली. काहीही झाले, कितीही उशिर झाला तरी पप्पा रोज घरीच जेवायला येणार. कुठेही थांबणार नाहीत हे तिला चांगलेच महिती होते. "तू जरा पांडुरंग काकांकडे जाउन त्यांची चौकशी करुन ये बरे" असे मम्माने म्हणताच ती ब्रश ही न करता घराबाहेर पडली. मनात एक अनामिक हुरहुर, भिती दाटुन आली होती...
|
Chinnu
| |
| Tuesday, September 19, 2006 - 1:57 pm: |
| 
|
माझ्याही मनात भीती दाटली बघ! येवु द्या पुढे.
|
Mirchi
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:03 am: |
| 
|
आता वाट पाहवत नाहिए 
|
प्रिन्सेस लवकर सान्ग पूढे काय झाल ते?
|
Princess
| |
| Wednesday, September 20, 2006 - 2:32 am: |
| 
|
अस्वस्थ पियुने डोअर बेल वरचा हात किती वेळ काढलाच नाही. अगदी चिडलेल्या चेहर्याने सुमा काकींनी दार उघडले तेव्हा ती अगदीच ओशाळली. "काकी सॉरी, काका आहेत का घरात?" तिचे बोलणे ऐकुन आतल्या खोलीतुन पांडुरंग काका बाहेर आले."अरे प्रियंका, आज सकाळी सकाळी गुलबकावलीचे फुल इकडे कुठे? ये ना बस बेटा"." नाही काका, मी.... मी.... पप्पा काल घरी आलेच नाही. आम्हाला खुप काळजी वाटतेय. पप्पा असे आम्हाला न सांगता घरी आले नाही असे होतच नाही." तिच्या आवाजातली अस्वस्थता मुळीच लपत नव्हती. तिचा रडवेला आवाज ऐकुन सुमाकाकी तिचा जवळ आल्यात आणि तिला म्हणाल्या "अग होते असे कधी कधी. काम खुप असेल. म्हणुन केला असेल मुक्काम मित्राकडे." पण पांडुरंग काकांच्या चेहर्यावर मात्र काहीतरी विचित्रच भाव होते."प्रियांका, मी कळवतो तुम्हाला. आता मी पण जनरल मीटींग साठी निघालोय. तिथे भेट होइलच माझी तात्यांशी. त्यांना मी ताबडतोब घरी फोन करायला सांगतो. जा तु घरी आणि ताईंना म्हणावे काळजी करू नका." पियु घरी परतली तेव्हा थोडी निश्चिंत झाली होती. मम्माला तिने सगळे काही सांगितले आणि मग त्या दोघी सकाळच्या कामांना लागल्या. सगळे काही आटोपल्यावर पियु आणि शंतनु टी.व्ही. वर कुठलासा हिन्दी पिक्चर बघत बसले. अरुणाबाइ सुद्धा निवांतपणे न्युजपेपर वाचत बसल्या. शेवटच्या पानावरच्या एका बातमीने मात्र त्यांचे लक्ष वेधुन घेतले. "जीपचा अक्सिडेंट. एक मृत, एकाची प्रकृती अतिगंभीर" त्यांच्या काळजात एका क्षणासाठी धस्स झाले. पण मन चिंती ते वैरी न चिंती असे म्हणुन त्यांनी त्या अशुभ विचारांना पळवुन लावले. "दुपारची झोप ही मला अतिप्रिय असणारी गोष्ट आहे" पियु शंतनुला सांगत होती."असे काय करतेस पियु? आपण बघुया ना हा पिक्चर. आता तर क्लायमॅक्स आहे." "शी हा काय क्लायमॅक्स आहे.... डॉक्टर काय सांगताय...इन्हे दवाओं की नही दुआओं की जरुरत है.... श्या मला नाही आवडत असले काहीही बघायला. डॉक्टराना असे हतबल झालेले बघणे मला नाही बाबा शक्य. आणि तु पण चल झोपायला. पप्पा आल्यावर मग छान नदीवर फिरायला जाउया आज. ओके?" पियुचा प्लान ऐकुन शंतनु फारच खुश झाला. आणि मग तो ही दुपारच्या झोप घ्यायला बेडरुम मध्ये गेला.
|
पुनम, जास्त वेळ ताणु नकोस प्लिज... एकदम हुरहुर लागते मग...
|
Princess
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:45 am: |
| 
|
"ताई, अरुणाताई, प्रिया... पियु बेटा" कोणीतरी बाहेरुन हाका मारता मारता आवाज देत होते. पेपर वाचता वाचता डोळा लागलेल्या अरुणाबाई दचकुन उठल्या. दार उघडताच समोर पांडुरंगराव उभे होते. त्यांचा आवाज ऐकुन पियु आणि शंतनु सुद्धा धावतच आले. "ताई... ताई, तात्यांचा अक्सिडेंट झालाय" कसे बसे धैर्य गोळा करुन एवढेच शब्द त्यांच्या तोंडुन बाहेर पडलेत. पण ते ऐकताच अरुणाबाइ धाडकन कोसळल्या. मागे उभी असलेली पियु जोरात रडायला लागली. आणि हा सगळा प्रकार ११ वर्षांचा शंतनु भांबावुन बघत रहिला. पियुचा रडण्याचा आवाज ऐकुन शेजारचे सर्व लोक गोळा झाले. शेजारच्या सीमा राणी पियुला समजावत होत्या तर त्यांची आइ अरुणाबाईंना शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करत होती. अरुणाबाईंनी डोळे उघडले आणि एकच विचारले "मला सांगा हे जीप ने येत होते ना.... सांगा मला.... आता कुठे आहेत.... कसे आहेत.... " आणि पुन्हा त्यांची शुद्ध हरपली. पियुलाच मग पांडुरंग रावांनी निघण्याची तयारी करायला सांगितली. दारात पप्पांच्या दोन तीन मित्रांनी एक कार आणुन उभी केली होती त्यात बसुन मग पियु, शंतनु, अरुणाबाई आणि तात्यांचे दोन तीन मित्र धुळ्याकडे निघाले. अर्धवट शुद्धीत असलेल्या अरुणाबाई कधी देवाचे नाव घेत तर कधी पोरांचे. "देवा माझ्या नवर्याला आयुष्य दे रे... माझ्या लेकरांवर दया कर रे बाबा..." असे काहीतरी पुटपुटत आणि मग पुन्हा त्यांना ग्लानी येई. पियुच्या डोळ्यातले अश्रु खळत नव्हते आणि हे सगळे काही बघुन तात्यांचे मित्र सुद्धा गुपचुप रुमालाने डोळे पुसत होते. तो २ तासांचा प्रवास सुद्धा त्या सगळ्यांना दोन युगांसारखा वाटला. सरकारी हॉस्पिटलच्या आवारात शिरताच पियुने पाहिले पप्पांचे सगळे मित्र घोळक्याने जमले होते. ते तिथे पोहचताच तिची धुळ्यातली मावशी रडतच तिच्या समोर आली. तिला बघताच पियुला जाणवले काहीतरी भयंकर घडलेय... पियु शुद्धीवर आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या एका बेडवर होती आणि वर गरगर फिरणारा पंखा पाहुन तिला पुन्हा चक्कर आली. पप्पा..........पप्पा........... असे ओरडत ती त्या रूम मधुन बाहेर पडली. तिच्या डोळ्यासमोर एकच दृष्य येत होते. रक्ताने माखलेले, शुद्ध हरपलेले पप्पा. "काल त्यांना पोलिसांनीच इथे आणले त्यावेळी त्यांच्या जवळ ओळख पटवण्यासाठी काहीही नव्हते म्हणुन मग त्यांना आम्ही "अनोळखी इसम " म्हणुन अऽडमिट करुन घेतले. कालच्या रणरणत्या उन्हात ते जवळजवळ ६ तास पडुन होते." शुद्ध हरपण्या आधी तिने फ़क्त हेच ऐकले होते. "माझे पप्पा... समाजासाठी झटणारे, गरिबांना मदत करणारे पप्पा.... का असे केलस रे देवा.... तुझ्या दारी न्याय नाही...देवा पप्पांना वाचव नाहीतर मला मारुन टाक..." पियुचे मन आक्रंदत होते. तात्यांचे काही मित्र आणि पियुची मावशी, काका डॉक्टरांशी काही गंभीर चर्चा करत होते. पियुला काही कळण्याच्या आतच बेशुद्ध अवस्थेतले तिचे पप्पा आणि १०-१२ लोक अऽन्ब्युलंस मधुन नासिक कडे निघाले होते. नासिकला पोहचताच काकांच्या ओळखीने वैद्यकीय क्षेत्रातली बरीच मान्यवर मंडळी अर्ध्या तासाच्या आत तात्यांच्या भोवती जमा झाली. २ तासांच्या चर्चेनंतर डॉ.जॉर्ज बाहेर आले आणि त्यांनी अरुणाबाईंना आणि इतरांना जवळ बोलवुन घेतले." हे बघा ही केस खुपच क्रिटीकल आहे. पेशंट कोमा मध्ये आहे हा एक सगळ्यात मोठा अडथळा आहे. बहात्तर तासांच्या आत जर पेशंटने रेस्पॉन्स दिला नाही तर..." हे ऐकताच अरुणाबाईंनी डॉक्टरांच्या पायावर डोके ठेवले."असे नका म्हणु डॉक्टर. तुम्ही वाचवा त्यांना. पैसे कुठुनही आणु आम्ही. वाचवा हो... माझ्या पोरांचे माझे श्वास तुमच्या हातात आहेत आता." तिच्या पाठीवर हात फिरवत त्यांनी सांगितले "बाइ, ही केस माझी नाही... त्याची आहे. त्यच्या पायावर पड. डॉक्टर सुद्धा माणुसच आहे. आम्ही सुद्धा हरतो त्याच्यापुढे कधी कधी." एवढे बोलुन डॉक्टर तात्यांना घेउन सी.टी. स्कऽन रूम मध्ये निघुन गेलेत. थोड्या वेळाने पियुच्या काकांनी जवळ येउन सांगितले"बघ पियु, आता तुच मोठी आहेस. अरुणाची अवस्था खुप वाईट आहे तिला सांभाळ. डॉक्टरांनी ४ दिवसाच्या आत ६ लाख द्यायला सांगितले आहे. आम्ही प्रयत्न करतोय. पण तुला हे सगळे माहिती हवे म्हणुन सांगतोय." स्वप्नांचे अनेक भग्न तुकडे उरात घेउन पियु मंदिराकडे निघाली होती. तिच्या आयुष्यात दु:खाचा, गरीबीचा एक न संपणारा अध्याय सुरु झाला होता. आकाशात पाउस भरुन आला होता... समाप्त.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, September 20, 2006 - 6:48 am: |
| 
|
पूनम... ..... . ... ... ...
|
|
|