Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 9:14 am: |
| 
|
बाप रे! हे काय झालं इथे! मृद्गंधा, वर सगळ्यांनी सांगितलंच आहे, पण मी ही पुन्हा तेच सांगेन. तुझा खूप दुर्दैवी गैरसमज झालाय. पुन्हा इथे यायचं न यायचं हा तुझा प्रश्न, पण जाता जाता भलतेच आरोप करून जाणं हा काही शहाणपणा नव्हे. इथे कोणीच कोणाला दुखवण्याच्या उद्देशाने काही लिहीत नाही. आणि माझ्या अनुभवाप्रमाणे वैभव तर नाहीच नाही. शंका विचारणं म्हणजे अपमान वाटतो तुला? मग तू पब्लिक फोरम वर न येणंच उचित. मायबोली ही कुटुंबासारखी वाटते आम्हाला. इथे आम्ही एकमेकांचं हक्काने कौतूक करतो, वाद घालतो, थट्टाही करतो. पण आपलेपणाच्या भावनेतूनच. आम्ही कुणीच दिव्य नाही आहोत, त्यामुळे असे एकमेकांच्या मदतीने शिकतो.
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 9:16 am: |
| 
|
वैभव, गज़ल अप्रतिम, नेहेमीप्रमाणेच. तू बहुधा वायफळ चर्चा थांबवून पुन्हा कवितांकडे गाडं वळावं म्हणून टाकलीस, पण मला माझं मत नोंदवल्याशिवाय राहवे ना.
|
मित्रहो, तुमचा गैरसमज झाला असावा. मला टिका करण्याविशयी, चर्चा करण्याविशयी काहीच म्हनायचे नाही. आणि मी केलेले प्रश्न हे व्यक्तिसापेक्ष नाहीत माझि वैभवशी काही दुश्मनी नाही. rather कुनाशीही नाही. मला फ़क्त एव्ह्ढचे म्हणायचे आहे की चर्चा ही शुद्ध भावनेतुन झालेली असावी. वैभव तुझे "intention" खरेच शुद्ध होते तर मी माझी चुक कबूल करते की मी तुझी शन्का चुकीच्या पद्धतीने घेतले. आणि please ह गैर्समज नको की मि तुला काही बोलले.मी फ़क्त माझे विचार मांडत होते. काल रात्रिच या अशा विशयावर माझ्या मनात प्रश्न सुरु होते.. त्यान्चा उद्रेक झला त्यामगे तुल किव इतर कुणाला दुखावण्याचा हेतु नव्हता. तुझ्यातल्या सद्गुणान्ची मी माफ़ी मागते. मी जरा जास्तच भावनिक आहे.त्या भरात कधी कधी चुकिचेही बोलते.पण, माझी चुक असेल तर मी ती कबूलही करते. इथे तुझी भावना जर खरच निरागस होति तर मी मान्य करते that i was wrong and i highly apologise परन्तु माझा त्यामगचा उद्देश फ़क्त एख्यद्या प्रश्नाचि दुसरी बाजू माडन्याचा होता. मला काही problem नाही असल्या चर्चा घडाल्या तर निश्चितच हा स्तुत्य उपक्रम आहे.पण त्यातही काळि बाजू असु शकते. एव्हढेच मला म्हणायचे आहे. क्षमस्व! सुप्रिया }}
|
Zaad
| |
| Wednesday, July 19, 2006 - 9:46 am: |
| 
|
वैभव, मृद्गंधा, मी इथे कुणालाही व्यक्तिश्: ओळखत नाही. किंवा कुणाची बाजू घेण्यासाठी देखील मी हे लिहीत नाहीये. तुमची चर्चा वाचल्यानंतर बराच वेळ विचार केला मी यात भाग घ्यावा की घेऊ नये यावर. पण हितगुजवरच्या चर्चांनी असं कुणाचं मन दुखतय हे मला पाहवलं नाही म्हणून बोलतोय. हा माझा आगाऊपणा वाटला तर माझ्याकडे खुशाल दुर्लक्ष्य करा. कवितेवरची प्रतिक्रिया हा वाचकाचा एक दृष्टिकोण असतो. एखादी प्रतिक्रिया ही त्या कवितेचं मूल्यमापन कधीच करू शकत नाही असं मला वाटतं. सूर्य डोक्यावर असताना त्रासदायक वाटतो, उदयास्ताच्या वेळी आल्हाददायक वाटतो. पण खर्या अर्थाने सूर्याची उष्णता सारखीच नसते का? तसंच या प्रतिक्रिया असतात... असाव्यात असं मला वाटतं. वाचक जर स्वत्: कवी असेल तर त्याची प्रतिक्रिया नुसतीच एका तटस्थ वाचकाची असू शकेलच असे नाही. असंही होतं, कविता वाचताना त्याने लावलेले निकष, त्याच्या कवितेकडूनच्या अपेक्षा(इतर वाचकांच्याही) या व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. मृद्गंधा, मी असा आग्रह नाही धरत, पण तू या दृष्टीने थोडा विचार केला तर कदाचित तुझं शल्य कमी होईल. तुझ्या कविता आम्हाला अशाच वाचायला मिळत रहाव्यात हीच मनापासून इच्छा. अजून एक म्हणजे, तुमच्या दोघांचाही एक मुद्दा जरासा खटकला. मृद्गंधा तुला 'दिव्य'जनांनी तुझं कौतुक केलंय ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. पण समुद्र पाहिला म्हणून मी आता झरा बघणारच नाही हे कितपत योग्य आहे? वैभव, निर्भेळ चर्चेबद्दलची तुझी मतं सर्वांनाच ठाऊक आहेत, पण केवळ कुणी उत्तर नाही दिलं यात अपयशी वाटण्यासारखं काय आहे? तुमच्या दोघांबद्द्लही मनात नितांत आदर बाळगून मी इथेच थांबतो. मी कुणाला दुखावलं असेल तर क्षमस्व!
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 9:52 am: |
| 
|
मलाही एक शंका आहे. मृद्गंधा, एकदा दिव्य व्यक्तींनी कौतूक केल्यावर तुला इथे पोस्टायची तरी का गरज भासावी गं? >>>> आणि please ह गैर्समज नको की मि तुला काही बोलले.मी फ़क्त माझे विचार मांडत होते. तुझ्या वरच्या सगळ्या पोस्ट्स पुन्हा वाचून बघ बरं. तू जरा जास्तच भावनिक ( ?) आहेस म्हणून कमी भावनिक लोकांवर कसलेही आरोप करायचा परवाना मिळालाय तुला असं वाटतं का तुला?
|
malaa tase ajibaat vatat nahi ninavi ..mala to hakk nahi..chuka manasakadunach hotat ani mi majhi chuk KABOOL kelyaavarhi tulaa majhe utte kadhavese vatayalaa majhi tujhi vaiyktik dushmani ahe kaa??
|
मित्रांनो मी खरंच हे थांबावं म्हणून कविता टाकली होती .... झाड ... मीनू .. नलिनी ... " इथे केवळ कृत्रिम गंधांच्या फुलांची वाहवा होते " ह्या वाक्यावर माझा आक्षेप होता आणि तो मी एकट्याने नव्हे सगळ्यांनी घ्यायला हवा होता असं माझं मत होतं .. म्हणून तसं लिहीलं गेलं ... सुप्रिया ... आता एक नवी कविता टाक ... माझे प्रश्न तयार आहेत .... किंवा असं का नाहीस करत ? ह्यावेळी माझ्या " सुगंध " वर तू प्रश्न विचार ....
हलके घे गं बाई .... सर्वांचेच आभार ........
|
निनावी .. लोपा ... प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ... लोपा .... मकरंद हाच शब्द मरंद असाही वापरला जातो .... अर्थ बदलत नाही .... अर्थात हे कुठेतरी वाचूनच शिकलोय ...
|
वैभव, ''इथे '' म्हनजे या दुनियेत असे म्हनायचे होते मला.मायबोलिवर होते असे नाही. आणि तुझ्या कवितेत प्रश्न विचरायला कहीच जागा नाही ति अतिशय सुन्दर आहे. rather मला आता वाइट वाततेय कि मुद्द मान्डन्याच्या नादात मी तुल सम्बोधुन बोलले मि माझा मुद्दा हा स्वतन्त्रपणे एक वेगळा विषय म्हणुन मान्डायला हवा होता.म्हणजे हा गैरसमज झालही नसता आणि वाढला तर नसताच नसता.
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:23 am: |
| 
|
मृदगंधा खरच जरा lightly घे. .. तुच एक भावनिक असशील असं नाही. .. आणी खरं तर तु तशी असशील तर तुला कुणावर आरोप करताना दहादा विचार करायला पाहीजे. सगळ्यांनी तुला चांगल्या भाषेतच समजावुन सांगायला पाहीजे असं कुठे आहे ..? आणी बाकीचे सगळे हळवे नाहीत हे तु कसं ठरवणार. वैभवला तु जे काही बोललीस ते त्याला लागलं नसेल कशावरुन ..? tulaa majhe utte kadhavese vatayalaa majhi tujhi vaiyktik dushmani ahe kaa?? आता निनावीबद्दल काही माहीती नसताना तु तीला असं म्हणणं भावनिक असल्याचे लक्षण वाटत नाही.
|
Chinnu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:34 am: |
| 
|
सुप्रीया, तु छान लिहितेस, हे तुलाही माहीत आहे ना. तु जशी लिहितेस ते तसच छान असतं. तु तसच पोस्टत जा. आपल्या मित्रमैत्रीणिंचा राग नाही मानायचा कधी. वैभवा, (मेल्या तुला माझ्या कविता नाही दिसत चर्चायला! ) तुझी हलकी-फुलकी गझल आवडली. देवा तुझी पण छान आहे रे.
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:38 am: |
| 
|
वैभवा, (मेल्या तुला माझ्या कविता नाही दिसत चर्चायला! ) >> अगदी अगदी .. मेल्याला माझ्या पण कविता दिसत नाहीत. मी इतका घाम गाळुन कविता करते. मेलेल्याला काय म्हणा कदर कवितांची.
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:40 am: |
| 
|
कोण मेला? केव्हा मेला? मला सांगून तरी मरायचं!! चिन्नू, कुठाय तुझी कविता? मी करते चर्चा सुरू. ( मी आहे जिवंत अजून!!) 
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:41 am: |
| 
|
ए बाई अगं माफी वगैरे नको मागुस. निनावीच्या comment मधे तथ्य नाहीये का तुच विचार कर ..? खरच सगळ्या तुझ्या post परत एकदा वाच anyways होतात अशा घटना forget it
|
वैभवा, (मेल्या तुला माझ्या कविता नाही दिसत चर्चायला! >>.. aaNi majhyaapaN..??? aani ho malaa maahit naavhat h makarad mhanuach vichaarale.tee shankaa hoti.. mrudaga.ndhaa tu khup chaan lihit hotis mhanun tulaa itakyaa lavakar itake pratikriyaa denaare bhetalet...lihit rahaa..!!!
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:44 am: |
| 
|
चिन्नू, कुठाय तुझी कविता? मी करते चर्चा सुरू. >>> माझ्यापण कविता आहेत म्हणलं वरती आता त्यात चर्चा करण्यासारखं काही नसतं हा भाग वेगळा माझ्या कवितेवर चर्चा करायला लागणार म्हणल्यावर बघा कशी घाबरुन पळुन गेली
|
Ninavi
| |
| Wednesday, July 19, 2006 - 10:45 am: |
| 
|
हो हो आलेच. पटकन मीटिंगला जाऊन येते, मग मीनू तू आहेस आणि मी आहे. 
|
Meenu
| |
| Wednesday, July 19, 2006 - 11:03 am: |
| 
|
so pls for the last time"FORGIVE ME" >> अगं तसं माफी मागायची गरज नाहिये. पण चल मी सांगते सगळ्यांच्या वतीनी की आम्ही सगळे झालंगेलं विसरुन गेलोत तु पण मनात काही ठेवु नकोस. अगदी काढुन टाक हे सगळं डोक्यातुन. आणी हास आता छानपैकी
|