Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 18, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, July 17, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलख निरंजन

दारात क्षणांच्या थांबुन, भिक्षांदेही बोलावे
झोळीत पडावे जे जे, ते गोड मानुनी घ्यावे

माथ्यावर वात्सल्याची शीतलशी छाया नाही
अन अस्तित्वाची अवनी तलखीने लाही लाही
हृदयांच्या गावोगावी मृगजळ शोधाया जावे
ते ही न गवसता हासुन ओंजळभर अश्रू प्यावे

येणारा फकीर होता, जाणारा फकीर आहे
तो आला आणिक गेला कोणाला फिकीर आहे?
दिवसांच्या धुळीसवे तू वर्षांच्या क्षितिजी जावे
क्षितिजे ओलांडत जाता मागे ना मुळी पहावे

मग एका दारी वेड्या बळ सरेल तव पायीचे
ते अंगण येता ओझे होईल तुला झोळीचे
हा क्षण यजमान खरा हे त्या क्षणीच ध्यानी यावे
त्या दारी भिक्षा मिळता मन अलख निरंजन व्हावे
मन अलख निरंजन व्हावे ...
अलख निरंजन !!!



Ninavi
Monday, July 17, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' दारात क्षणांच्या..'
वा, एकदम touching कल्पना आहे वैभव.
बरेच दिवसांनी आलात. सुंदर आहे कविता.

झाड, ' हात जोडणंही तूच ठरवावंस..?' यात तक्रारीचा सूर नाही ना?
तुझ्या कविता नेहेमीच थोडं बोलून बर्‍याच विचारात पाडतात.

मीनू, मृद्गंधा, सोनल, नीरू.. छान गं.


Sarang23
Monday, July 17, 2006 - 11:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! वैभवा... जीएंची आठवण झाली!!!

Sarang23
Monday, July 17, 2006 - 11:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य

तुझ्या वागण्याला नसे चाल रीत
चुकती प्रेषित तुझ्यामुळे

ज्याचा त्याचा भाग ज्याचा त्याचा वाटा
संपताच साठा खेळ थांबे!

कुणी नसे सान कुणी नसे थोर
सगळ्यांचा भार ठरलेला

वेळ जाहलेली सुटला सय्यम
बनलो माध्यम पापासाठी

कितीतरी वेळ झुंजवीला काळ
शेवटचा आळ साहवेना

ठरलेली चूक तिचा नको रोष
नशिबास दोष कशासाठी?

म्हणून सांगतो नसे ही अहंता
साधुची महंता सांगू नये


सारंग


Sadda
Tuesday, July 18, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मंडळी..तुमच्या येवढ्या सुंदर कवीतांमधे माझी हि १ कविता देत आहे आवडते का पहा

Meenu
Tuesday, July 18, 2006 - 2:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अलख निरंजन या शब्दाला काही specific अर्थ आहे का ..?. मला माहीत नाही म्हणुन विचारते ..
श्रद्धा छान


Mruda
Tuesday, July 18, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. खुप दिवसांनी आलास... पावसा सारखा तूही गायबच झाला होतास की....
नेहमीप्रमाणे सुंदर लिहील आहेस....
सत्य आहे पण तयात कुठे तक्रार नही....
समर्थांच्या "कृपाळुपणे अल्प धारिष्ट्य पाहे" ची आठवण झाली...


Lopamudraa
Tuesday, July 18, 2006 - 3:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसांच्या धुळीसवे तू वर्षांच्या क्षितिजी जावे
क्षितिजे ओलांडत जाता मागे ना मुळी पहावे >>>>.वैभव मला ह्या ओळी जास्त आवडल्या.
आणि आज मी तुझी कविता कुनितरी अठवण काढतय मरठि blogs वर सोनल ह्या id ने तेच्या blog वर टाकलेली वाचली, शिवाय काल एका तीथल्याच प्रसाद म्हणुन id च्या blog वर वाचली दोन्ही ठिकाणी तुझे नाव नाहिये.. पहिल्याच पानावर आहे.. बघ.!!!


Vaibhav_joshi
Tuesday, July 18, 2006 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा ... माहितीबद्दल धन्यवाद ... मला त्याची लिंक मेल करशील का ? this is quite discouraging

Vaibhav_joshi
Tuesday, July 18, 2006 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा खास ... चर्चा होईलच नेहेमीप्रमाणे .. :-)
मीनू मेल करतो


Devdattag
Tuesday, July 18, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मस्तच रे..:-)
सारंग कवितेचे चौथे आणि पाचवे कडवे..:-(.. मेल करशील का अर्थ..??


Giriraj
Tuesday, July 18, 2006 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,खूप दिवसांनी.. 'सत्र' इकडे नव्हती का रे टाकलीस?

अलख निरंजन खास!

सारंगराव... माया पातळ केली राव!
प्रत्येक ओळ ज़बर्दस्त...





Misonal
Tuesday, July 18, 2006 - 6:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Alakh Niranjan Sunder..
Meenu, Anuwad kelyabaddal aabhar. nirmiti awadali.

Manasi
Tuesday, July 18, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे १५ दिवसानी आले तर कवितान्चा धुन्वाधार पाऊस पडला आहे. फारच मजा आली.
मृद्गन्धा तुझ्या सगळ्याच कविता सुन्दर आहेत.
मीनु, निनावी, मृदा, लोपा,सारन्ग, नादमय, वैभव सगळ्यानीच छान लिहीले आहे.


Pkarandikar50
Tuesday, July 18, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,
बर्‍याच दिवसांनी छान कविता टाकलीस.. अल्लख निरंजन. पण मला दुसर्‍या आणि तिसर्‍या कडव्याच्या मानाने पहिले कडवे जरा गुळगुळीत आणि पसरट वाटले.
-बापू


Lopamudraa
Tuesday, July 18, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrudagandhaa kavitaa khup aavadali, malaa pratikriyelaa tujhyaa itake chaan shabd naahii saapadat!!!
sarang kavitetlaa kaahi bhaag kalalaa naahi.


Ninavi
Tuesday, July 18, 2006 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगा, मस्तच रे.
मृद्गंधा, keep it up .


Yog
Tuesday, July 18, 2006 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,
अलख निरंजन कविता सुन्दर आहे..

Kandapohe
Tuesday, July 18, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते अंगण येता ओझे होईल तुला झोळीचे >>>
वैभव, सहीच!!

मोहरते मातीतून अत्तर अन
नीळा मनमोर नाचू लागतो>>>>
सही कल्पना!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators