Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 12, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२८ (२००६-२००७) » आषाढ » काव्यधारा » कविता » Archive through July 12, 2006 « Previous Next »

Lopamudraa
Tuesday, July 11, 2006 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणा छोट्याची होडी माझ्या हाती तरु दे>>>>>...meenu mastach aahet doghii kavitaa..!!!
चालते ह्रदय, सवयीने श्वासांची लड उलगडते>>>>... ninaavii khup divasaanii pan ekadam jabardast...!!!!
mrudaaga.ndhaa ag.. itakii stutii nako karus.. cha.ngalyaavaaIT suchanaa tevhadhyaa det jaa!!!

Mrudgandha6
Tuesday, July 11, 2006 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moodi
तुझ्या अभिप्रायाबद्दल खूप आभारी आहे.

देवदत्त,
आज ''गुरुपौर्णिमेच्या भाग्यदिनी या अप्रतिम अभंगाचा खजिना तुमच्यामुळे मिळाला त्याबद्दल तुम्हाला शतकोटि धन्यवाद.

लोपा,
अगं, मी मृदा नाही ग.. मृदा वेगळी मी मृद्गंधा वेगळी आहे.. आणि मी योग्यच स्तुति केली आहे.. असो, मी सुचना जरुर करेन..


Sadda
Tuesday, July 11, 2006 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव मस्त आहे कविता अगदी दिवसाला साजेशी

Jayavi
Tuesday, July 11, 2006 - 5:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी,एकदम सही! शेवट तर अप्रतिम! चुरगळते चादर थोडी, उशी जराशी रडते....... क्या बात है!
सगळ्यांच्या कविता इतक्या सुरेख आहेत ना...... कशी तारीफ करावी तेच कळत नाही. खूप समाधान मिळतं इथे चक्कर मारली की!
मिनू,मृद्गंध,नेत्रसखी......... सुरेखंच गं!


Dineshvs
Tuesday, July 11, 2006 - 9:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, सुंदर काव्य. तैसे वैगरे शब्द आता कुठे वापरलेच जात नाहीत.

Ninavi
Tuesday, July 11, 2006 - 10:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्त्स. क्ष्क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष्क्ष क्ष्क्ष्क्ष्क्ष

Ninavi
Tuesday, July 11, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी कविता..

येते कानावर शीळ
ध्यानीमनीही नसता
माझ्या मनाच्या अंगणी
गाते वेल्हाळ कविता

घेती काळजाचा ठाव
तिच्या सुरेल लकेरी
पाय रोकड्या शब्दांचे
पंख अर्थाचे सोनेरी

तिची उफराटी तर्‍हा
जगावेगळीच रीत
नाही येण्याला कारण
नाही जाण्याला गणित

तिच्यासाठी जोपासावे
नाते एकेक हिरवे
मुक्या कळ्यांनी करावी
रोज ऋतूंची आर्जवे

तिला द्यावयास झोका
फांदी फांदी आसुसावी
तिची वाट पहाताना
पळे युगेच भासावी

अंती सोडावा निःश्वास
जेव्हा निराश होऊन
पंख हिचे झळाळावे
तोच निःश्वास लेवुन

हिच्यासाठी साठवावा
हिर्‍यामाणकांचा चारा
हिची तहान भागवी
डोळ्यांतील अश्रू खारा

असे वेडे हे पाखरू
कधी अवचित येते
त्याच्या मंजूळ नादाने
पुन्हा नादावून जाते..


Sarang23
Tuesday, July 11, 2006 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ सुरेख!!! क्या बात है निनावी...

Meenu
Wednesday, July 12, 2006 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा निनावी सुरेखच ....   

Devdattag
Wednesday, July 12, 2006 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि.. भई वाह.. ..

Meenu
Wednesday, July 12, 2006 - 12:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंद ओठाआड

तुझ्या बंद ओठाआडचा
तो हुंदका का ऐकु येतोय मला पुन्हा पुन्हा
की माझ्या कानातच तो साठुन राहीलाय?
परत वळुन तुझ्याकडे बघितल खातरजमा करुन घ्यायला
तर तुझ्या ओठावर तेच मंद स्मित रेंगाळताना पाहुन
उगीचच माझ्या ओठातुन फुटला हुंदका
तुझ्या बंद ओठाआडचा.......



Meenu
Wednesday, July 12, 2006 - 12:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वाट पहातेय

तुझ्यातला ज्वालामुखी
जागा होण्याची मी वाट पाहतेय
की तुझी सहनशक्ती संपण्याची
मी वाट पहातेय..?

अन्यायाला सीमा असते, पण
कळलय का तुला की अन्याय होतोय..?
तुझा स्व जागृत होण्याची
मी वाट पाहतेय

सवयच झालीये तुला
लक्तर होऊन जगण्याची
तुझी सवय सुटायची
मी वाट पाहतेय

खुप झाला अंधार
बरीच लांबली ही रात्र
दिवस उजाडायची
मी वाट पाहतेय...
मी वाट पाहतेय...


Sumati_wankhede
Wednesday, July 12, 2006 - 1:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि,
तुझी कविता... केवळ अप्रतिम.


Niru_kul
Wednesday, July 12, 2006 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तू परत ये......

तू चुक मान्य करणार नाहीस हे मला माहीत आहे,
म्हणुनच मी उगाच तुझी समजुत काढणार नाही;

तू परत यावीस असं मला मनापासुन वाटतं,
अजुनही तुझ्या आठवांचं आभाळ मनामध्ये दाटतं;

माझ्या सहवासातला प्रत्येक क्षण तुला हेच सांगेल,
तुझ्याकडे तुझ्याचसाठी, माझी साथ मागेल;

बघ, कोपर्‍यावरचा प्राजक्तही तुझ्या वाटेकडे डोळे लावून फुलायचा थांबलेला आहे,
किमान त्याच्यासाठीतरी तू परत ये.......

Jayavi
Wednesday, July 12, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, छान बरसताहेत आषाढसरी :-)
मीनू, मस्तच:-)


Lopamudraa
Wednesday, July 12, 2006 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु निनावि,निर.. सुंदर पुर्ण वेगळे विषय..!!!
हा अजुन एक विषय..


Lopamudraa
Wednesday, July 12, 2006 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नदी

गिरी शिखरांना पिंगा घालीत
हळुच दरीत मान मोडित,
रानात मटकुन मुरका घेई..
नदी ठुमकत जाई..

माळेचे मोती खळखळत
काताळातुन झळझळत..
आपल्याच तोर्‍यात चालत..
ही निर्झराची ताई..
नदी.....ठुमकत जाई

वरुणाच्या स्पर्शाने बेभान
आभाळ साठवत निघाली
उधाणल्या तारुण्याला या
किनार्‍याची माया सांभाळुन घेई..
नदी...ठुमकत जाई

रुप लेणं अस देखणं
फ़ुल पान माळलेलं
लव्हाळीच्या बटांनी
मरुताच्या खळीने
स्वतावरच भाळत..
सार्‍या गावातुन मिरवुन घेई..
नदी... ठुमकत जाई..

तरुची घसट, वृक्षाची लगट..
कड्याचा चोरटा कटाक्ष..
रानची हिरवी पिरती
सोडत सारे..
कुणाच्या ओढीने ही एकली जाई..
नदी...

झिल मिल जीव..गलबल पाही
खट्याळ नजर.. आतुर ह्रुदय
मिटवुन सीमारेषा..
सरीता सागर होई..
नदी ठुमकत जाई..!!!






Mrudgandha6
Wednesday, July 12, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

meenu,lopa,ninavi .. sagalech apratim !!!great!!!

Mruda
Wednesday, July 12, 2006 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सांगा कशी जपायची
नात्यांमधली तरलता..?
कशी जपुन ठेवायची
भेटींमधली अधीरता..?

नाती जुळतात, नाती तुटतात
एंट्री-एक्झिट सुरुच असते..
कुठे थांबायचं कळण्याची
फ़ार फ़ार गरज भासते..

इथल्या प्रत्येक नात्याला
सिमीत आयुष्य असतच का..?
ऐहिकातल्या नात्यांना
अमरपणाचं देण नसतच का..?

आली-गेलेली सगळीच नाती
आपला ठसा गोंदवत रहातात..
अशी ना तशी परत परत
वळणा-वळणावर भेटत रहातात..

आपण एकच करु शकतो
बदल सगळे स्विकारत जायचं..
संपलं म्हणुन रुसण्यापेक्षा
घडलं म्हणुन हसत रहायचं..

मृ



Jayavi
Wednesday, July 12, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, त्वाडा जवाब नही यार! अप्रतिम कविता!
मृ...... मला असं वाटतं या नावातच जादू असावी. किती सुरेख लिहिताय तुम्ही दोघी!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators