Chinnu
| |
| Thursday, June 29, 2006 - 8:38 am: |
| 
|
आईशप्पत, सारंग, काय लिहितोस रे. झक्कास अगदी. जया सानुल्या सशासारख मन छान आहे ग. अर्चना छान. बापु तुम्ही छोटेखानी कविताच लिहिलीत प्रतिक्रियेत! >>सारन्ग.... पावसाच्या खूप कविता येतात दरवर्षी.. छत्र्यांसारख्या.. -तुझी कविता उठून दिसते!
|
Asmaani
| |
| Thursday, June 29, 2006 - 11:15 am: |
| 
|
सारंग, केवळ अप्रतिम. माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत
|
Asmaani
| |
| Thursday, June 29, 2006 - 11:24 am: |
| 
|
एकाकी वाट यमुनेचा काठ कान्ह्याची वाट पाही राधा उमटे जळात लहरींचा नाच विरहाची आच साही राधा कान्ह्याचा भास क्षणभर मनास फिरुनी उदास होई राधा कान्हा मनमीत र्ह्दयी आळवीत प्रितीचे गीत गाई राधा झाडामागून मुरलीची धून मोदे हरखून जाई राधा.
|
Arch
| |
| Thursday, June 29, 2006 - 11:33 am: |
| 
|
आस्मानी, खूप cute आहे. मस्त लय आहे तुझ्या कवितेला.
|
झाडासारखं न रडता रोज रोज मेल्यावर... झाडासारखं न रडता रोज रोज मेल्यावर..." >> सारंग सही. कान्ह्याचा भास ..> आस्मानी, आर्च ला अनुमोदन.
|
Jayavi
| |
| Thursday, June 29, 2006 - 12:44 pm: |
| 
|
सारंगा........ जबरी! अप्रतिम! विदारक सत्य खूपच मोजक्या शब्दात मांडतोस रे! अस्मानी, खरंच छान लय आहे तुझ्या कवितेला. लोपा, चिन्नू, मनापासून आभार
|
Chinnu
| |
| Thursday, June 29, 2006 - 9:29 pm: |
| 
|
अस्मानी, झुळुकेवरची तुझी पहीली झुळुक पण छान आणि ही कवितापण सुंदर!
|
Sarang23
| |
| Thursday, June 29, 2006 - 11:34 pm: |
| 
|
सुप्रभात मंडळी, सर्वांना धन्यवाद... ज़या, मनाच कोडं छान आहे! अर्चना, सुंदर वर्णन! अस्मानी छान कविता!
|
Aparnas
| |
| Friday, June 30, 2006 - 12:44 am: |
| 
|
सारंग सगळ्या कविता अप्रतिम..... जयावि, अस्मानी सुंदर आहेत तुमच्या कविता...
|
पुसटतं आयुष्य म्हणजे कुणी आपलं वाटत नाही थांबलेलं वाटलं तरी संपलं वाटत नाही दुखत असलं खूप तरी दुखलं वाटत नाही वर्षाव झाला अगदी तरी शिंपलं वाटत नाही खोल खोल गेलं तरी रूजलं वाटत नाही आपलं आपलं म्हणतानाच परकं वाटत रहातं कितीही सांभाळलं तरी पोरकं वाटत रहातं गडद गडद केलं तरी भुरकं वाटत रहातं कुठेतरी चुकतंय असं सारखं वाटत रहातं शोधावं म्हटलं तर मिळत नाही जुळवावं म्हटलं तर जुळत नाही पुसटतं आयुष्य... म्हणजे काय ते कळत नाही.
|
Naadamay
| |
| Friday, June 30, 2006 - 1:25 am: |
| 
|
सारंग, सुरेख कविता! वेगळीच शैली!
|
नववधू टाक जपून पावले सारे घर जागे आहे... हाक रायाची सखे गं तुला सुखावते आहे... चाल जपून पावले सळसळ दुलईची... नको कुणी ऐकावया खळबळ काळजाची... बघ जपून पावले कुणी उघडिल डोळा... मग सांगता बहाणे तुझा जीव थोडा थोडा... जरी जपून पावले तरी वाजती जोडवी... रुणझुण पैजणांचा नाद मधूर नाचवी... किती अधिर पावले 'वाट पहाते ना माडी'... सांग राजसाला तुझ्या वाट बघण्यात गोडी....
|
Jo_s
| |
| Friday, June 30, 2006 - 4:34 am: |
| 
|
सुमतीजी बर्याच दिवसांनी? छानच आहे कविता आर्चना, अस्मानी छानच
|
Jayavi
| |
| Friday, June 30, 2006 - 4:51 am: |
| 
|
धन्यवाद रे दोस्तांनो सुमती मस्तच गं......... खरंच खूप दिवसांनी येते आहेस.
|
Asmaani
| |
| Friday, June 30, 2006 - 11:14 am: |
| 
|
सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सुमती अर्चना छानच.
|
Shyamli
| |
| Friday, June 30, 2006 - 11:54 pm: |
| 
|
बापरे ८-१० दिवस नव्हते तर काय धमाल उडालिये....... वा सारंग आलास का रे! सारंग,वैशालि,जया,मृदा सगळेच एकसे एक आहेत
|
श्यामली, आपली प्रतिक्रीया मायदेशातुन समजायची का?
|
R_joshi
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:21 am: |
| 
|
सुमति सुरेख!!!! नववधुच्या मनातिल भाव छानच रेखाटलेस
|
Naadamay
| |
| Saturday, July 01, 2006 - 12:58 am: |
| 
|
दहन की दफन काय फरक पडतो! आत्मा सोडून जातो हे शाश्वत सत्य देव की खुदा काय फरक पडतो! चित्शक्ती एकच हे शाश्वत सत्य प्रार्थना की नमाज काय फरक पडतो! तत्त्वांना शरण हे शाश्वत सत्य भगवा की हिरवा काय फरक पडतो! रक्ताचा रंग हे शाश्वत सत्य विवाह की निकाह काय फरक पडतो! मनांचं मीलन हे शाश्वत सत्य साडी की बुरखा काय फरक पडतो! लज्जेचं रक्षण हे शाश्वत सत्य.. पण तरी फरक पडतो कारण समजतच नाही समजून घ्यायचंच नसतं ते शाश्वत सत्य धर्माची गफलत चुकीचा समज कर्माने शिरकाण बनतं शाश्वत सत्य सहस्र किरण देणारा सूर्य एकच ना? सहस्र थेंबांचा सिंधू एकच ना? सहस्र बांधवांच्या भुकेला इलाज एक अन्नच ना? मग बांधव की शत्रू? फरक पडतो...?
|
Jo_s
| |
| Saturday, July 01, 2006 - 3:21 am: |
| 
|
नादमय छान माझ्या मुलीलाही असे प्रश्ण पडत असतात उत्तर देता नाकीनउ येतात.
|