|
Ajjuka
| |
| Monday, June 26, 2006 - 1:59 pm: |
| 
|
अंतोबा खासबारदार... भले.. तुमच्या दोनच कविता वाचायला मिळाल्या हो बाकी नुसती चौकोनाची भाषा. दुसरीकडे टाईप करून इथे चिकटवू नका. इथेच टाईप करा म्हणजे आम्हालाही वाचता येईल...
|
Mruda
| |
| Tuesday, June 27, 2006 - 3:04 am: |
| 
|
बापू, मानसी धन्यवाद…. बापू....लिहितांना मनात अगदीच वेगळं काही होतं. . . . आयुष्यातली एखादी अगदी जवळची व्यक्ती दुरावल्या नंतर ( अशी व्यक्ती की जिच्या पुरतंच कही काळ विश्व सिमीत झालेलं असतं ) एक व्यापुन राहिलेलं रिकामेपण आणि सगळं असुनही….कशालाच कही अर्थ नही कशातच कही रस आता नाही, जेन्व्हा जगणंच नकोस होत… अशी मनाची अवस्था. आणि म्हणुन संपण्याची ओढ’ हे लिहावसं वाटल. मानसी मी पाहिलं आहे’ लिहावसं वाटलं कारण आपण अशावेळी फ़क्त पाहू शकतो अगदी helpless असतो…
|
रात्र.. चांदणं गोंदण गालावर उमटत नजरेत दाटु लागली रात्र.. उन्मादत्या क्षणात, मोहरत्या मनात हरवु लागली रात्र.. हळु हळु चंद्राच्या कवडश्यात लाजु लागली रात्र.. आत आत खोल ठिबकत्या श्वासात भिजु लागली रात्र.. नजरेच्या तीरात,आवेगाच्या भरात सळसळु लागली रात्र.. व्याकुळ काजळात गुंफ़लेल्या ओठात अडकु लागली रात्र.. निशब्द, अविचल आज अस्फ़ुट हुंकारात बोलु लागली रात्र... स्वप्नफ़ुले माखुन तनात, स्पर्शात अविरत बरसु लागली रात्र.. रंगवुन माझे विश्व ओंजळीतुन निसटत जाउ लागली रात्र.. नक्षत्राचा वेल विझवत,प्राचीकडे झेपावत अस्तित्व विसरु लागली रात्र.. बेभान धुंदीत तेजात मिसळत धाऊ लागली रात्र.. दिवसाच्या प्रियकराची ही सावली रात्र...!!!
|
Jayavi
| |
| Tuesday, June 27, 2006 - 5:35 am: |
| 
|
लोपा, एक अतिशय उच्च काव्य. Very Intense ! शेवट तर अगदी कडेलोट! just too good! आषाढाची जबरदस्त सुरवात केलीस गं. तू खूप छान लिहितेस
|
अहाहा सुंदर, अप्रतिम शब्दच नाहीत गं
|
Mruda
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:09 am: |
| 
|
नक्षत्राचा वेल विझवत,प्राचीकडे धावत अस्तित्व विसरु लागली रात्र.. >>>>> लोपा...खूप छन.... intense
|
Lampan
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:20 am: |
| 
|
वा !!! best आहे कविता
|
Jo_s
| |
| Tuesday, June 27, 2006 - 6:32 am: |
| 
|
लोपा छानच जमल्ये कविता
|
R_joshi
| |
| Tuesday, June 27, 2006 - 7:56 am: |
| 
|
लोपा सुंदरच लिहिले आहेस
|
Sarang23
| |
| Tuesday, June 27, 2006 - 8:04 am: |
| 
|
पाऊस पावसा असाच पडत रहा, काही त्रास नाही... घरात बाहेर पाणीच पाणी बाकी खास नाही! माझा असाच फाटका संसार घेऊ नको टेन्शन. मागे पुढे कोणी नाही, काय करायची पेन्शन! भलताच अडदांड हात तुझा, आडवीच झाली भींत. सगळं पाणी क्षणात बाहेर; आत नको खंत. पुर्वी कसा हळुवार होतास भुर भुर भुर भुर पडायचा... छत्रीसाठी मग तिच्या भेटीचा योग घडायचा! पण ती गेली दुसर्यासोबत माझ्या छत्रीसकट, अठरा रुपये आणि पन्नास पैसे गेले पावसात फुकट! जेंव्हा जेंव्हा ती आठवते तेंव्हा तुही असतो... माझा पाऊस पाहुन खुशाल गालामध्ये हसतो. जसा माझा संसार तसा तुही बदलत गेला. चढाओढीने बरसत बरसत चटके देत गेला. अरे वेड्या पुरे झाले दिवस रात्र पडतो आहे. आठ दिवस मला मात्र ओला उपास घडतो आहे. ........ आता पाऊस थांबुन थोडा उजेड पडला आहे आणि त्याला झोपायाचा अजब छंद जडला आहे. कारण तोही म्हटला होता: "फक्त एवढे करुन जा... मातीमध्ये पुरुन मित्रा; तुही आता सरून जा... तुही आता सरून जा... तुही आता सरून जा..." सारंग
|
लोपा छानच.. सारंग पुनरागमन एकदम धडाक्यात.. उत्तम आहे
|
Meenu
| |
| Tuesday, June 27, 2006 - 12:13 pm: |
| 
|
सारंग सुंदर उच्च ...
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 27, 2006 - 1:31 pm: |
| 
|
लोपा, खुप सुंदर. सारंग, बर्याच दिवसानी !!!
|
Swara
| |
| Tuesday, June 27, 2006 - 2:48 pm: |
| 
|
लोपा आणि सारंग, एकदम सही!
|
Sarang23
| |
| Tuesday, June 27, 2006 - 11:07 pm: |
| 
|
देवा, मीनु, स्वर धन्यवाद! दिनेशदा... मध्यंतरी नौकरी बदलण्याच्या गडबडीत होतो त्यामुळे जमले नाही. पण परत चुकलेला फकीर मशीदीत आला आहे
|
Mruda
| |
| Tuesday, June 27, 2006 - 11:40 pm: |
| 
|
सारंग मस्तच रे.... डोलयांसमोर एक सहनशील वृद्ध उभा राहीला...
|
Jo_s
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:11 am: |
| 
|
>>मातीमध्ये पुरुन मित्रा; तुही आता सरून जा सारंगा छान बरसलायस.
|
Bani
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:40 am: |
| 
|
लोपा खूपच सुन्दर लिहले आहेस भरपुर शब्द भान्दार आहे त्या कवीतेत
|
लोपा खासच... वैभवच्या "सोहळ्या"ची आठवण झाली. सारंगभाऊ खूप दिवसांनी! मजा आली वाचून! बनी, bhaa.nDaar = भांडार
|
Naadamay
| |
| Wednesday, June 28, 2006 - 12:54 am: |
| 
|
लोपा, सारंग, छान लिहिलंय दोघांनी
|
|
|